तू राजीनामा दे .....!

Submitted by satish_choudhari on 27 August, 2018 - 12:29

तू राजीनामा दे ......!

चल देवा आज तुझी
परीक्षा घेतो मी
जर पास झालास तर
तू मागशील ते तुला देतो मी
मी ऐकले तुझ्या दरबारातून
कोणी खाली हात जात नाही
असतोस त्यांचा मायबाप
ज्यांच्या डोक्यावर कुणाचा हात नाही
चल आलो मी पण
तुझ्याकडे हात पसरवून
माझे मागणे ऐकून तुझे
देवपण जाऊ नको विसरून...
तुझ्या हाती तर धार धार शस्त्र आहेत
त्याने तू या जातीवादी राक्षसांचा
इथल्या गोर गरीब जनतेचा छळ करणार्या
पुढार्यांचा,
कामगारांच्या पोटावर लाथ मारणार्या
भांडवलदारांचा...
जातीवादी शैतानांचा वध कर....
मी ऐकले हा निसर्ग तू घडवलास..?
मग पावसाला जरा समजाव ना
शेतकरी उपाशी मरू लागलाय
त्याचे सहाय्य कर....
त्याची फाटलेली ओंजळ
सुखाने भर....
हाताला काम दे
घामाला दाम दे...
जर हे जमत नसेन तर ठीक आहे....
मी ऐकले आहे तू माणसाचा पुनर्जन्म
घडवतोस....?
मग मला तो माझा राजा दे...
जो शेतकऱ्याला कधी उपाशी
ठेवत नव्हता,
हाताला काम अन घामाला दाम
देत होता....
रयतेला सुखाचा
हो हो...
मला तो युगपुरुष दे…
जो माणसाला माणसाची
जाणीव करून देत होता
इथल्या जातिभेदाच्या
कचाट्यात गुदमरत असलेल्या
दिन दुबळ्याना नवजीवनाचा श्वास
देत होता....
हो हो … तोच 'छत्रपती शिवराय महाराज'
आणि 'विश्वरत्न डॉ.बाबासाहेब रामजी आंबेडकर'.....
बस्स.......
हे दोन योद्धे पुन्हा
पाठवून दे....
.
.
जर नाही जमत असेल तुला हे सुद्धा...
तर...............
तु राजीनामा दे ।...................

- सतीश चौधरी
Email - satish.visit@gmail.com
Phone : +91 8208309791

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users