प्राचीन विश्वेश्वर मंदिर

Submitted by Mandar Katre on 27 August, 2018 - 01:38

ॐ नम: शिवाय .
कोकण म्हणजे देवाची भूमी .रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुक्यातील आमच्या चोरवणे गावात एक शिवकालीन पुरातन श्री विश्वेश्वर मंदिर आहे . हे मंदिर सुमारे पाचशे वर्षापेक्षा अधिक जुने असल्याचा अंदाज आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले असून मंदिरापासून दीड किलोमिटर अंतरावरून बावनदी वाहते.

या मंदिरात जाताना रस्त्यात एक पुरातन भुयार आहे ज्याला " वाघबीळ " असे म्हणतात. हे भुयार खूप दूर गेलेले असून प्राचीन काळात एक मनुष्य आत गेला तेव्हा त्याला आतमध्ये सुंदर तळे व इतर देवाच्या मूर्ती वगैरे दिसल्या अशी आख्यायिका आहे . शिवाजी महाराजांच्या काळात येथून जवळपास घोड्याच्या पागा वगैरे होत्या तसेच येथून जवळच विशाळगड हून संगमेश्वरला घोड्यावरून जाण्याचा रस्ता होता व त्याच मार्गाने संभाजी महाराज गेले होते असा ऐकीव इतिहास आहे .

आमच्या वडिलांच्या कारकिर्दीत २५-३० वर्षापूर्वी पर्यंत या मंदिरात दर श्रावण महिन्यात अभिषेक पूजा होत असत. सदरहू मंदिर गाववस्तीपासून दूर दुसर्या टोकाला सुमारे सहा किलोमिटर अंतरावर असून घनदाट जंगलातून तिथे जाणे अतिशय कठिण होते .परंतु काही वर्षापासून गावातून मंदिरापर्यंत रस्ता झाला आहे. तरीही पावसाळ्यात चालत सुमारे ३ किमी जावे लागते .
सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु असून सध्याचे सरपंच पवार बंधू त्यासाठी प्रयत्नशील आहेत .

चोरवणे हे गाव रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पालीच्या पुढे नाणीज नजिक आहे .
Dropped pin
near Ratnagiri, Maharashtra

https://goo.gl/maps/8CpKsQouzdz

Group content visibility: 
Public - accessible to all site users

maayboli android app वरून image देता येत नाहीये . कोणी मदत कराल का ?