सिंगापूर ट्र्रीप बद्दल मार्गदर्शन हवे आहे.....

Submitted by बाबा कामदेव on 22 August, 2018 - 05:04

इतरत्र लिहिल्याप्रमाणे विसाची कटकट मिटली आहे. मुसाफिर.कॉम ह्या विसा एजंटचा चांगला अनुभव आला. सिंगापूर कॉन्स्युलेट डायरेक्ट अर्ज घेत नाहीत. त्यांचे अधिकृत एजंट्स आहेत. थॉ /कु पण आहे. अनुभव वाइट . त्यांनी तर पुण्यातूनच रडायला सुरौवात केली . फार थोडे दिवस राहिलेत . खूप सुट्या असल्याने वर्कीन्ग डे कमी आहेत . (तरी ९ दिवस कामाचे होते कॉन्सुलेटचे ). मग मुसाफिर वाल्याना विचारले . त्यांनी हा फोन चालू असतानाच दुसर्‍याफोनवरून कॉन्सुलेटला विचारून पेपर पूर्ण असतील तर नक्कीच होइल असा दिलासा दिला होता.त्याम्नुसार वेळेत काम झाले.
असो.
आता बुंग.....विमान व हॉटेल बुकिंग झाले आहे.
सिंगापूर शहराचा मॅप आणि ट्रान्स्पोर्ट सिस्टीम माझी पाठ झाली आहे. खरं तर सिंगापूर सगळं माझं न जाता 'पाहून' झालं आहे. इतकंच काय जगातली सगळी मुख्यशहरं टूरिस्ट स्पॉट्स माझे ' पाहून ' झाले आहेत. म्हणजे असे की यू टूबचे ट्रावल व्हिडिओ पाहणे माझा आवडता छंद आहे. व आंतरजालाचा मुख्य उपयोग मी त्यासाठीच करतो. अगदी होटेले ,रिसॉट्स , ड्रोन फूटेजेस , व्लॉग्ज , वॉकिन्ग टूर्स सगळे सगळे.... (पु लं च्या अपूर्वाइ मधले पिट्लॉक्री व्हिलेजला देखील ' जाउन' पु लं नी वर्णन केलेया जागाही शोधून काढल्या आहेत. मीना प्रभूंची पुस्तके तर यू ट्यूब पुढे घेउन वाचायला फार मजा येते...) त्यामुळे नवखेपण तसे जाणवणार नाही. इटिनरी तयार आहे. फक्त कोणत्या गोष्तीला किती वेळ द्यायचा याचा अनुभव नाही. त्याबद्दल मार्गदर्शन हवे आहे. बहुधा जुराँग बर्ड पार्क,युनिवर्द्सल स्टुडिओ ,बटर्फ्लाय गार्डन याना जास्त वेळ द्यावा लागेल असे वाटते.
दोन तीन प्रसिद्ध मॉल्स नुसतेच हिंडून यायचेत. कारण भारताकिमतेत/ अमेझॉनच्या किमतीत आणि तिथल्या किमतीत फार फरक नाही असे दिसून आले आहे.
एक दोन एलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घ्यायची आहेत. त्यात कटमचा काय लफडा असतो त्याबाबत सांगावे...
आणखी काही टिप्स असतील , अनुभव असतील तर कृपया सांगावे.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Timely व्हिसा चे अभिनंदन

नाईट सफारी staged वाटली तरी आम्हाला आवडली होती. Sky wheel पण सुंदर अनुभव. बुगीस च्या बाहेर स्ट्रीट shopping केली होती, सगळ्या वस्तू छान निघाल्या. (पर्सेस, टी शर्टस, फॅन्सी मनगटी आणि लॉकेट घड्याळ, छत्र्या इ.) Sentosa, SEA पण आवडलं होतं. Little इंडिया आणि मुस्तफा अजिबात आवडलं नाही. 15 मिनिटात बाहेर पडलो. तुम्ही लिहिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त वरील. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी कराच.

१. सेंटोसा ला जाऊन या. तिथेच युनिवर्सल स्टुडिओ वगैरे आहे. तिथे केबल कार ने जाता येते. आवडत असेल तर तो अनुभव पण घेऊन टाका. युनिवर्सल स्टुडिओ मध्ये hollywood dreams parade असते. शनिवारी कि रविवारी असते. गुगलून पहा. छान असते. शक्यतो चुकवू नका. सेंटोसाला युनिवर्सल स्टुडिओ शिवाय इतर अनेक आकर्षणे आहेत. एक दिवस आलोकेट करायला हरकत नाही.

२. निसर्गाची आवड असेल तर जूरोंग बर्ड पार्क आणि Orchid Garden चुकवू नका. नक्की आवडतील.

३. सिंगापोर झू सुद्धा खूप छान. त्यातल्या त्यात त्यांची नाईट सफारी तर अप्रतिम अनुभव असतो.

४. खरेदी करायची तर मुस्तफा मॉलला भेट द्याच. (सिंगापोरला गेला आणि मुस्तफा मॉल पाहिला नाही? असे काहीजण विचारतात). इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी Sim Lim Square आहे. पण आधी ऑनलाईन भारतात कितीला पडते वस्तू ते पाहूनच खरेदी करा.

Travelling साठी LRT आणि MRT अशा दोन सेवा आहेत आणि त्या कनेक्टेड आहेत व अत्यंत सोप्या आहेत. लंडन अंडरग्राउंडचा अनुभव असेल तर हे अगदी सेम. चिंताच नाही. आणि धोबी घाट तसेच इतर अनेक MRT स्टेशन वरच मोठे मोठे मॉल आहेत.

अजून काय सुचले तर नंतर लिहितो.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दरात आता अमेझॉन / फ्लिप कार्ट मुळे फरक राहिलेला नाही. फक्त नवीन इकडे न दिसणारे गॅजेट्स पाहू. गिम्बाल घ्यायचाय. अमेझॉन शी तुलना करून बघू. निसर्गाशी संबंधीत गोष्टी चांगल्या प्रिझर्व केल्यात म्हणून आवर्जून पाह्यच्यात. अन्यथा शोपिंग मध्ये दम नाही. सिम् लिम मधल्या चीटिंग बद्दल बरेच वाचले आहे.एक व्हिडिओ ही व्हायरल झाला होता एका फिलिपिनो चा त्याबद्दल. मुस्तफा म्हणजे मुम्बैच्या मनीश मार्केट्ची साफ सुथरी आवृत्ती दिसत आहे,
गोल्डनव्हिलेज व्हिवोसिटी थिएटर मध्ये चित्रपट पाह्यचा आहे.
ओब्झवेशन डेक तीन पैकी एक.

आम्ही गेलो तेव्हा असं फिरलो होतो.

दिवस १:

दुपारी १ ला फिरायला सुरुवात केली कारण रात्री उशीरा पोचलो:

१.सिंगापूर डक टूर - नक्की करा..जमीनीवर व पाण्यात दोन्हीकडे एकाच बोट कम गाडी ने फिरवतात.मस्त आहे ही १ तासाची टूर.
ही टूर सनटेक सिटी पाशी संपते. तिथे फुड कोर्ट मद्धे जेवण.
२.गार्डन्स बाय द बे - १/२ दिवस

दिवस २:

१.सिंगापूर फ्लायर - ४५ मिनिट ची राईड आहे.
२.मर्लायन समोर फोटो :-), ही जागा मस्त आहे ..तिथे वेळ काढायला छान वाटते. - २ ते ३ तास.
३. SEA aquarium - २-३ तास.
४. luge ride in sentosa. ( फार खास नाही वाटले...सेंतोसा मद्धे अजुन दुसरे काही करु शकता किंवा बीच वर टीपी.)

दिवस ३:

१. Universal studio - ईथे पूर्ण दिवस लागला.
ईथे आम्ही केबल कार ने गेलो आणि आलो.
दोन्ही वेळा केबल कार केली नसती तरी चाललं असतं. केबल कार स्टेशन पासुन Universal studio पर्यंत पोचायला खुप चालवं लागतं.
सकाळी उत्साह होता सो काही वाटलं नाही पण संध्याकाळी केबल कार स्टेशन पर्यंत चालायला कंटाळा आला.
संध्याकाळी wings of time show सेंतोसा मद्धेच Siloso Beach वर असतो.
आमच्या सोबत चे बच्चे कंपनी खुप कंटाळल्या मुळे आम्ही नाही पाहिला हा शो.

दिवस ४:

१. झु. - १/२ दिवस
२. संध्याकाळी बुगीस. ( सिंगापूर ची तुळशीबाग )

आमच्याकडे कमी दिवस होते सो ईतकच पाहिलं.
काही टीप्सः
१. १ छत्री नक्की सोबत ठेवा.तिथे कधीपण कुठेपण पाउन पडतो. पण १ तासात गायब पण होतो.
२. तुम्ही शाकाहारी असाल तर जिथे जाणार तिथे खाण्याचे पर्याय्य आधीच शोधुन ठेवा. शोधाशोध करण्यात वेळ जातो.
३. China Town mall मद्धे सगळी टीकीट्स खुप स्वस्त आणि कॉम्बो ऑफर्स (E.g Universal studio + cable car ) मिळतात.आम्ही ४ ही दिवसाची तिकीट एकदम काढली होती.
Chinatown point
133 new Bridge road, Singapore.
3rd floor. (Take escalator from ground floor in front of MacD.)

४. मेट्रो ची छान सोय आहे सगळीकडे जर खुप चालायची तयारी असेल तर. आणि स्वस्त पण आहे.नाहीतर मग grab cabs. तुमच्या फोन मद्धे GRAB app टाकुन ठेवा. ४ , ६, १२ सीटर कॅब मिळतात.
५. Moveit या नावाचे अ‍ॅप पण मस्त आहे. तुमचा start आणि end point टाकला की त्यावर मेट्रो लाईन चे एकदम नीट डायरेक्शन मिळतात.
चुकायचं ठरवल तरी चुकणार नाही.
६.singtel sim card घ्या विमानतळावर unlimited data pack and call pack.कॅब बुकींग साठी लागेल.
७. स्वस्त सोवेनिअर्स, चॉकलेट्स ई घ्यायला मुस्तफा चांगले आहे. पण फार कचकच आहे.
८. ईडली सांबार, डोसा, भारतीय थाळी खायची असेल तर लिटील ईंडीया मद्धे जा..भरपूर पर्याय आहेत.

अजुन काही आठवलं तर टाकीन.

शुभेछा !!

व्हिसाचे काम झाल्याबद्दल अभिनंदन.

सिंगापूरला लिटल इंडिया आणि मुस्तफा सोडून इतर ठिकाणी हिंडा.

1. युनिव्हर्सल स्टुडिओ, सी वर्ल्ड आणि सेंतोसा एकाच ठिकाणी आहेत पण युनिव्हर्सल/सी वर्ल्ड, सेंतोसाला प्रत्येकी एक पूर्ण दिवस जातोच. समोरच्या काठावर विवोसिटी मॉल आहे तिथे थोडीफार शॉपिंग करता येईल.

२. नाईट सफारी करावी. रात्रीचं झू वेगळं वाटतं पाहायला.

3. मरिना बे सँड्स चे स्कायपार्क नि गार्डन्स बाय द बे. टूरिस्ट लोकांना कॅसिनोमध्ये एन्ट्री फ्री आहे. तिथे जाता येईल.

4. मरलायन, सिटी हॉल, esplanade, हा परिसर पायी हिंडणे. बाहेर फारच दमट असल्यास esplanade, सिटी हॉल एमआर्टी स्टेशन आणि मरिना सेंटर मॉल हे एका अंडरग्राऊंड मॉलने जोडले आहेत, तिथून ये जा करा.

5. बोट की पासून एक अर्ध्या तासाची बोट फेरी असते. ती करता येईल.

6. क्लार्क की ला हिंडता येईल रात्री.

7. चायनाटाऊनमध्ये भटकणे, बुद्धाज टूथ रेलिक मंदिर पाहणे, लोकांसाठी गिफ्टखरेदी.

8. बुगिस स्ट्रीट शॉपिंग सेंटरमध्ये खरेदी.

9. सिंगापूरच्या पूर्वेला चांगी व्हिलेज जेट्टीजवळ पुलाऊ उबिन नावाचे जुने बेट आहे. तिथे पूर्वी दगडाच्या खाणी होत्या, आता त्यात पाणी साठून सुंदर जेड ग्रीन तळी तयार झाली आहेत. तिथे दिवसभरासाठी सायकली भाड्याने मिळतात, त्या घेऊन तिथले चेक जावा वेटलॅंड रिझर्व्ह बघता येते. तिथल्या काठावर ब्रिटिशकालीन दगडी बंगला आहे. चांगी एअरपोर्टवरून ये जा करणारी विमाने येथून दिसतात. शिवाय एक सुंदर बोर्डवॉक आणि मचाण आहे. या बेटावर अतिशय सुरेख सिंगापुरी जेवण (कांपुंग स्टाईल - गावरान पद्धतीचे) मिळते. चिली क्रॅब इथे खावा.

10. लाऊ पा सा फूडकोर्ट. डाऊनटाऊनातल्या उंच बिल्डिंगमध्ये ही एकमेव जुनी वास्तू उरली आहे. हिची रचना थेट मंडईची आठवण करून देते. इथे संध्याकाळी साते खायला जावं. सोबत टायगर बीअर. Proud

11. तुम्ही जाल तेव्हा मूनकेकांचा सीझन सुरू असेल. नक्की खाऊन बघा आणि चायनीज आणि जापनीज गार्डन पण नक्की बघून या.

12. टूरिस्ट असल्यास इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरचा जीएसटी माफ होतो. जेथून खरेदी कराल तिथल्या दुकानदारांकडून योग्य ती रिसीट वगैरे घ्या. त्याचे काउंटर एअरपोर्टवर आहे.

13. परतताना हातात वेळ ठेवून इमिग्रेशन उरकून(हे अक्षरशः 2 मिनिटात होते) लौकर आत जा व ड्युटी फ्री मध्ये भरपूर शॉपिंग करा.

14. शक्यतो लोकल फूडकोर्ट ट्राय करा.

तुम्हांला शुभेच्छा.

स्मिता श्रीपाद यांनी सांगीतलेला कार्यक्रम एकदम योग्य आहे. फक्त काही बदल (मला सुचले ते) तुमच्या आवडीनुसार करु शकता
उदा... मुस्तफा मधे पाउलही ठेउ नका (२० पट बिग बझारमधे मेगा सेल दिवशी फिरल्यासारखे वाटते, आणी तेही उगाच अरे वा ईथे केप्रच लोणच पण ठेवतात की टाईप विविध भाषात कॉमेंट्स ऐकत)
सिमकार्ड एअरपोर्ट पेक्षा कुठल्याही मॉलमधे जाउन घ्या (पासपोर्ट सोबत ठेवा), एअरपोर्ट पेक्षा मॉलमधे स्वस्त प्रीपेड मिळतात). एम१, स्टारहब आणी सिंगटेल तिन्ही दुकाने जनरली आजुबाजुलाच असतील मॉलमधे, तेव्हा विचारुन स्वस्तात स्वस्त प्लॅन घेता येइल.
ग्रॅब, मूव्हिट, गो देअर एस जी अ‍ॅप्स टाकुन घ्या फोनमधे
डोसा उत्तप्पा जनरली कुठल्याही फुड मॉलमधे मिळतो, गुजराथी थाळी अथवा पंजाबी साठी लिटल ईंडिया उत्तम (पण एकदमच चेन्नईसारखा एरिया आहे तो, परदेशात आहात असे वाटणार नाही)

Square mall मधील 2डाॅलर जापनीज दुकानाला अवश्य भेट द्या<<<< daiso.. ते ऑर्चर्ड रोडवरच्या ion मॉलमध्ये पण आहे आणि विवोसिटीत पण. तिथे खरंच दोन डॉलरमध्ये काही अफाट सुंदर वस्तू मिळतात.

अरे हो, जनरली युनिव्हर्सलला जाणे वीकांतास टाळा (जाम गर्दी असेल आणि प्रत्येक राईडला खूप थांबावे लागेल)
१० ला सुरु होते युनिव्हर्सल, तर १० ला नक्की पोचा.. जितक्या उशिरा आत जाल तितकी मेन अ‍ॅट्रक्शन्स ची गर्दी वाढत जाईल

शॉपिंगकरता मी काहीच सांगु शकत नाही, मला सगळेच मॉल्स सारखेच वाटतात (तिच ती दुकाने असतात)

https://www.lazada.sg/ वर फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनच्या किंमतीबरोबर मॅच करु शकता. लझादा आणि लोकल मार्केट मधल्या किमती जवळ जवळ सारख्या असतात. $३०० पेक्षा जास्त खरेदीवर GST सिंगापुरकडुन एअरपोर्ट्वर परत क्लेम करता येतो पण त्याकरता १% चार्ज लागु शकतो.

छोट्या गॅझेट मध्ये भारतात त्रास होत नाही. एल ई डी टिव्ही आणि सोन्यावर (पकडले गेले तर) भरपुर कर लागु शकतो.

wings of time show सेंतोसा---हा शो मस्त आहे.
डक टूर पण मस्त.
रस्त्यावर मस्त फळं मिळतात ती नक्की खा, फिरता-फिरता भूक लागली की.
तिथे छोटे पर्सनल पंखे मिळतात तो नक्की विकत घ्या.
युनिव्हर्सल चा virtual reality ride कितीही गर्दी असली तरी बुडवू नका.

<<<छोट्या गॅझेट मध्ये भारतात त्रास होत नाही. एल ई डी टिव्ही आणि सोन्यावर (पकडले गेले तर) भरपुर कर लागु शकतो.>>>
अधिकृतरित्या काय मर्यादेपर्यंत करमुक्त खरेदी करु शकतो...?
सोन्यातही आणि ई. गॅजेट्स मधेही...

<<<छोट्या गॅझेट मध्ये भारतात त्रास होत नाही. एल ई डी टिव्ही आणि सोन्यावर (पकडले गेले तर) भरपुर कर लागु शकतो.>>>
अधिकृतरित्या काय मर्यादेपर्यंत करमुक्त खरेदी करु शकतो...?
सोन्यातही आणि ई. गॅजेट्स मधेही..

सोने किंवा ई. गॅजेट्स टीव्ही सोडुन करमुक्त मर्यादा : : ५००००(फक्त सोन्यासाठी बायकाना लिमिट १ लाख )
फ्लॅट पॅनल टीव्ही : ३६.०५% काहीही सुट नाही. वापरलेला टीव्ही असेल तरी कायद्याने कर भरवा लागेल, घसारा क्लेम करता येतो.
१ किलो पेक्षा जास्त सोने विमानतळावर डिकलर करुन आणु शकत नाही जरी पुर्ण कर भरणार असेल तरी.
एक लॅपटॉप वर कर नाही.

गार्डन बाय द बे चा लायटिन्ग शो वर ब्रिज वर जाउन बघण्यापेक्शा मला खाली हिरवळीवर झोपून बघण्यात जास्त मज्ज्जा आली .
सेन्टोसा ला भरपूर वेळ ठेवा .आम्ही २ दिवस येउन जाउन होतो .

आमचा युनिवर्सलचं टायमिन्ग फार छान होतं . गर्दी असेल तर आम्ही सरळ दूसर्या राईड कडे वळायचो . कुठेही १० मि. पेक्षा जास्त थांबायला लागलं नाही.
लोकांच्या जेवायच्या वेळेला राईडस केल्या. भरभरून एन्जोय केलं युनिवर्सल.
सेन्तोसाला लूज राईड मला तर फार आवडली.
आम्ही सन्ध्याकाळी उशिरा ४डी शो बघायला गेलेलो .
नक्की आठवत नाही पण काहेतरी अनलिमिटेड ट्रीप्स च तिकिट होतं आमच्याकडे.
२ शोज ला ईतर लोक होती . त्यानंतरचे ३-४ वेळा शो बघायला फक्त आम्ही तिघचं.
नंतर मी कंटाळले तर नवरा आणि मुलगा आणि २ वेळा जाउन आले.

शक्य तिथे पायी फिरा . ट्रेन ने प्रवास करा , बस ने प्रवास करा . स्वस्त आणि मस्त.
मॉल्स मधे जरूर फिरा. मुस्तफामध्ये अजिबात नको. बुगीज स्ट्रीट शॉपिन्ग मस्ट .

सर्वाना धन्यवाद. (सर्वांचे धन्यवाद असे म्हटलेले नाही याची नोंद घ्यावी.)
एकच गॅजेट घ्यायचे आहे. गिम्बाल. टीव्ही नाही . सोने आनि मृत्तिका आम्हा संताना समान असल्याने तिथली माती आणीन . बादवे . अजून माती कुठे दिसलीच नाही क्लिप्स मध्ये Happy एकूण ४-५ दिवसात आटोपणार नाही असे दिसते Sad
मुस्तफाचे ' प्याकेज ' विडिओ क्लिप वरूनच लक्षात आले आहे. भारतीय जेवण. बिग नो....
मला नेताजींनी आझाद हिन्द सेनेची स्थापना केलेली जागा बघायची आहे. तिथे एस्प्लेनेड उभे आहे . नेताजींनी उभे केलेले मॉन्युमेन्ट माउंट ब्याटनने सिन्गापुर जपान्यांकदून जिंकल्यावर उद्ध्वस्त केले. आताशा काही भारतीयानी तिथे छोटे स्मारक केले आहे. मोदींचा फोटो पाहिला त्याचेजवळ फुले वाहताना. एस्पनेड गार्डन मध्ये कुठेतरी आहे. सापडेल. मला सिंगापूर म्हटले की नेताजी आय एन ए आणि सायांग सायांग रे हे ' सिंगापुर' १९५८ मधले गाणे आठवते.
विषयांतरः(आग्नेय आशियातला इतिहास फार कॉम्प्लेक्स आहे आपल्याकडे त्याची फार दखल नसते. आपले फक्त युरोपचा इतिहास , अमेरिके चा आणिइ आताआता मध्यपूर्वेचा. परवा इस्ट तिमोर या नवीन इन्डोनेशिया तून बंड करून झालेल्या देशाचा इतिहास वाचला . नवल वाटले. इतक्या कानाकोपर्‍यातल्या देशाना ही प्रदीर्घ इतिहास आहेत. तिमोरची गावे यु ट्युब वर पाहिलीच Happy वसाहतींचा इतिहास मनोरंजक आहे. सिंगापूरचा संस्थापक राफल चे चरित्र किती विलक्षण आहे ! कुठे कुठे निर्जन प्रदेशात काम केले आहे. ब्रिटीश थोर होते.)

तुम्हांला आग्नेय आशियाच्या इतिहासात रस असल्यास वेळ काढून सिंगापूर नॅशनल लायब्ररीला (बुगिस स्टेशनजवळ आहे. अगदी डाउनटाऊन भागात) नक्की भेट द्या असे सुचवेन. तिथे छोटी छोटी अनेक रंजक प्रदर्शने असतात, बसून वाचायला प्रशस्त जागा आहे, मेंबर नसलात तरी लायब्ररीत बसून वाचता येते. चौदा मजली लायब्ररीला रीडिंग एरियाला काचेची तावदाने असलेल्या भिंती आहेत, तिथून बाहेरचा व्ह्यूदेखील जबरी आहे.

ऑरचर्ड रोडवर takashimaya मॉलमध्ये किनोकुनिया नावाचे अजस्त्र पुस्तकदुकान आहे. तिथे तुम्हांला इतिहासविषयक अनेक रंजक पुस्तके सापडतील.

इतिहासाची आवड असेल तर फोर्ट कॅनिग जवळच बॅटल बॉक्स आणि चांगी वॉर मेमोरियल नक्की बघा. अजून 1/2 दिवस असतील तर इथली म्युसियमस नक्की बघा.

मी फोर्ट कॅनिन्ग हिल वर जे हॉटेल आहे तिथे राहिले होते. जबरी. तिथेच फार बघायला आहे. मर्लायन पार्क मध्ये संध्याकाळी मस्त वातावरण असते. बम बोटीत फिरून आलो की पार्कात फार मस्त खादाडी आहे. एक टिपिकल अमेरि कन फूड वाले रेस्टॉ मस्त आहे. मॅक व चीज, स्लाइ डर्स बीअर व हे ते . इतर पण खादाडी मस्त.

व्हीएत नामी फूड एकदम जबरी ट्राय करा. फ अ. कोल्ड कॉफी वगैरे पण. अर्धी म्युझीअम्स बघायची माझी राहिलीच आहेत.
सेवन इलेवन मध्ये फोन कार्ड मिळते. त्याने आमचे काम झाले. बर्‍यापैकी स्वच्छ व शिस्तीची मुंबईच आहे दुसरी. फॉरीन कंट्रीत आलो असे फार वाटत नाही. मेट्रो, बसेस एकदम सुखद प्रवास.

इंडिअन एनिथिन्ग अवोईड केले. बिकॉज आय वेंट फ्रॉम बिग इन्डिया. नाइट सफारी, व सी एक्वेरिअम युनिवरसल टॉप्स तरु णाईला आव्डेल फार चालावे लागते.

येस! नॅशनल म्युझियम बघण्यासारखे आहे. तिथूनच एक सुरेख वाट फोर्ट कॅनिंग हिलला वर चढत जाते. तिथला बॅटल बॉक्सचा शो बघण्यासारखा आहे.

श्रद्धा धन्य्वाद.
तुम्हांला आग्नेय आशियाच्या इतिहासात रस असल्यास वेळ काढून सिंगापूर नॅशनल लायब्ररीला (
>> मला रस असून काय उपयोग ? बरोबर इतिहासाचे औरंग्जेब आहेत.