ॐकार स्वरुपा। नित्य निराकारा।
येतसे आकारा। भक्तांलागी॥
शुंडधारी दिव्य। सगुण सुंदर।
रुप मनोहर। वर्णवेना॥
मस्तकी मुगुट। झळके स्वर्णिम।
तेज अनुपम। नेत्रद्वयी॥
शुंड वक्राकार। रुळे दोंदावरी।
चतुर्भुजधारी। भव्य रुप॥
धरी करांमाजि। परशु कमळ।
मोदक निखळ। सत्प्रेमाचा॥
आशीर्वाद हस्त। उभारी प्रेमाने।
तेणे भक्तजने। आनंदली॥
झळकत कटी। रेशमी वसन।
सुवर्ण कंकण। मनगटी॥
पूजिता भक्तिने। ऐसा श्रीगणेश।
अपूर्व संतोष। भाविकांसी॥
नित्य समाधान। देई गजानना।
आणिक वचना। आर्जवचि॥
येतसे शरण। तूजलागी पूर्ण।
भावे लोटांगण। भक्तिप्रेमे॥
(-पुरंदरे शशांक)
श्रावण महिन्यात पावसाने धरलेला जोर कमी होऊन सुखद रिमझिम धारांची बरसात सुरु केलेली असते.
यानंतर भाद्रपदमासात चतुर्थीच्या दिवशी आनंदाची उधळण करत राजाप्रमाणे वाजत गाजत तो येतो.
अमाप आनंदाची खैरात भक्तजनांवर करत आणि सर्वाना सुखद अनुभूतीचा प्रसाद देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी तो येतोय.
हो, तोच आपला सर्वांचा लाडका, मूषकवाहन असलेला, लंबोदर, एकदंत, गौरीशंकरसुत गणपतीबाप्पा !!
तर मायबाप भक्तजनहो, बाप्पा येत आहेत हो .....
त्यांचे धूमधडाक्यात स्वागत करूया.
मायबोली गणेशोत्सव संयोजन समितीतर्फे (२०१८) ह्याही वर्षी विविध स्पर्धा आणि भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे..
तर मायबोलीकरांनो, तयार व्हा, सुखाच्या क्षणांसाठी, बाप्पाच्या स्वागतासाठी!!!
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
या या!
या या!
सुस्वागतम, आम्ही तयार आहोत __
सुस्वागतम, आम्ही तयार आहोत __/\__
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
जोरदार सुरुवात! ओव्या आणि बॅनर दोन्ही सुंदरच आहेत.
संयोजकांना शुभेच्छा !!!!!!
संयोजकांना शुभेच्छा !!!!!!
अरे वा! जोरदार सुरुवात.
अरे वा! जोरदार सुरुवात.
गणपती बाप्पा मोरया!!!
वाह मस्त सुरुवात...
वाह मस्त सुरुवात...
शुभेच्छा !!
शशांकदा ओळी सुंदर.
शशांकदा ओळी सुंदर.
बॅनर आणि घोषणाही सुंदर.
ओव्या मस्त जमल्यात, अगदी
ओव्या मस्त जमल्यात, अगदी मंगलमय, प्रसन्न! बॅनरही अगदी सुंदर आहे.
संयोजकांना शुभेच्छा!
वा! मस्त बॅनर! गणेशोत्सव
वा! मस्त बॅनर! गणेशोत्सव दण्यक्यात साजरा होऊ द्या!! संयोजकांना शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
सुरेख सुरुवात!!
सुरेख सुरुवात ! संयोजकांचे
सुरेख सुरुवात ! संयोजकांचे अभिनंदन आणि सर्व उपक्रमांसाठी शुभेच्छा.
वा वा! मस्त बॅनर आणि प्रसन्न
वा वा! मस्त बॅनर आणि प्रसन्न ओव्या! सुंदर नांदी झाली आहे गणेशोत्सवाची!
संयोजकांना शुभेच्छा! काहीही मदत लागली तर हक्काने कामाला लावा.
मोरया!
मस्त सुरूवात!
मस्त सुरूवात!
गणपतीबाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!
मेधा, स्वाती_आंबोळे धन्यवाद.
मेधा, स्वाती_आंबोळे धन्यवाद. बदल केला आहे.
अरे वा! मस्त आहे घोषणा,
अरे वा! मस्त आहे घोषणा, पोस्टर दोन्ही.
बॅनर मस्तच आहे.
बॅनर मस्तच आहे.
छानच !
छानच !
मस्त बॅनर आणि घोषणा!
मस्त बॅनर आणि घोषणा!
अरे वा ! घोषणा आणि पोस्टर
अरे वा ! घोषणा आणि पोस्टर दोन्ही मस्त . शाब्बास संयोजक !
गणपती बाप्पा मोरया
सुंदर प्रसन्न सुरुवात! मंडळास
सुंदर प्रसन्न सुरुवात! मंडळास शुभेच्छा!
मस्त सुरुवात!
मस्त सुरुवात!
संयोजकांना शुभेच्छा!
घोषणा आणि पोस्टर दोन्ही छान..
घोषणा आणि पोस्टर दोन्ही छान... संयोजकांना शुभेच्छा!
मस्त.... आता मी गणेशोत्सव मिस
मस्त.... आता मी गणेशोत्सव मिस नाही करणार
शशांकदा, मस्त ओव्या
संयोजक, शुभेच्छा!!
वा! सुंदर सुरुवात!
वा! सुंदर सुरुवात!
संयोजक मंडळाला शुभेच्छा
वाह वाह, अप्रतिम.
वाह वाह, अप्रतिम.
शशांकजी फार सुंदर.
या बाप्पा !
या बाप्पा !
छान. शुभेच्छा!
छान. शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया ...!
गणपती बाप्पा मोरया ...!
वा! अगदी प्रसन्न वाटले. ओळीही
वा! अगदी प्रसन्न वाटले. ओळीही खूप सुंदर लिहिल्या आहेत.
गणपती बाप्पा मोरया।
मोरया, बाप्पा मोरया
मोरया, बाप्पा मोरया
Pages