स्मार्टफोन

Submitted by अतुल असवले on 18 August, 2018 - 09:40

सकाळी 7 चा मोबाईल गजर वाजला विवेक ने डोळे बंद ठेवूनच तो बंद केला ह्याला कला म्हणावी की सवय पण ठीक आहे ना माणूस वेळेवर काम करू लागला. विवेक उठला मोबाईल घेतला आणि त्याला सलाईन लावायला घेऊन गेला म्हणजे चार्जिंग ला माणूस एक वेळेस स्वतः पाणी पिण्याचे विसरेल पण मोबाइल ला चार्जिंग लावायला नाही.

विवेक तयार होऊन नाष्टा करायला आला आई ने बनवलेले कांदे पोहे तो खाऊ लागला पण तेवढ्यातच tiv tiv अस आवाज आला विवेक लगेच उठला आणि मोबाइलला कडे गेला आई मात्र त्या अर्धवट ठेवलेल्या प्लेट कडेच बगत होती.”विवेक आधी ते खाऊन घे बर” आई विवेक कडे बघत बोली पण विवेक मोबाईल च्या स्क्रीन कडे बघतच “थांब ग आई” अस वैतागून म्हणाला. यावर आई काय बोलणार आजकाल च्या मुलांना समोर काही बोलण्याची सोया कुठे उरली आहे. आई उठून किचन मध्ये गेली विवेक ने पोह्याची प्लेट हातात घेतली आणि मोबाईल जवळ जाऊन खात बसला तेवड्यात परत tiv tiv असा आवाज आला विवेक ने मोबाईल बघितला आणि हातातली प्लेट पटकन खाली ठेवली, बॅग उचली, आणि कॉलेज ला जायला निघाला “आई मी येतो ग” अस बोलून तो निघाला, आई धावत बाहेर आली “अरे चहा उकळा आहे थांब जरा. पिऊन जा” पण हे ऐकण्या आधीच विवेक कानात हेडफोन्स लावून आपल्याच धुंदीत निघाला होता. आई ने पण म वैतागून रागाने ती प्लेट उचलून आत किचन मध्ये ठवली.

विवेक संध्याकाळी कॉलेज वरून घरी आला “आई मी आलो ग ” आई त्याचा आवाज ऐकताच पाण्याचा ग्लास घेऊन आली “बाळा भूक लागली असेल ना काही खाणार का” अस म्हणताच “नाही ग आई मी खाऊन आलोय” मोबाइलला च्या स्क्रीन मध्ये बघतच तो बोलत होता. “तो मोबाईल आधी बाजूला ठेव” आई म्हणाली “हो ग आई आतच हातात घेतला ना कॉलेज मध्ये थोडीच घेऊन बसतो” विवेक म्हणाला. आता त्या आईला काय माहीत मुलगा कॉलेज मध्ये जाऊन शेवटच च्या बेंच वर बसून candy crush खेळत असतो किंवा कॅन्टीन मध्ये बसून selfie ते पण नाहीतर आपल्याकडे whats-app, Facebook, Instagram सारखे अनेक सोबती आहेतच. हे ऐकून आई काय बोलणार ती पण जेवणाच्या तयारी ला लागली जेवण बनवता बनवता “विवेक, बाबांना फोन कर बघ कधी येतायत” अशी आईने हाक मारली, पहिल्याच हाकेवर हो म्हंटल तर ती आजची जनरेशन कसली ना. विवेक मात्र आपल्या मोबाईल मध्ये chat करण्यात बिझी. आई ने दुसर्यांदा रागातच हाक मारली “विवेक ऐकतोयस ना…! बाबांना फोन कर बघ कधी येतायत” यावर विवेक चिडून म्हणाला “हो आई तेच करतोय ना फोन लागायला वेळ लागतो”. ह्या वर भोळी आई गप्पच बसली तिने पण विचार केला हो लागत असेल वेळ.

जेवणाची वेळ झाली हिते ही दोन वेळा हाक मारून विवेक काय आला नव्हता नंतर आई च त्याच्या जवळ गेली तेव्हा कुठे तो उठून जेवायला आला मात्र तेव्हा ही त्याचा जिवलग मित्र म्हणजेच मोबाईल सोबतच होता जेवायचं आधी त्याने फोन चार्जिंगला लावला. ते जेवायला बसले आई ने ताट वाढलं. विवेक पहिला घास खाणार तेवढ्यातच tiv tiv अस आवाज झाला कोणी तरी रिमोट च बटण दाबल्या सारखा विवेक हातातला घास घेऊन उठला आणि मोबाईल जवळ गेला फोन चार्जिंग वरून काढला आणि जेवत जेवत chat करू लागला “अरे बाळा जेवताने तरी फोन बाजूला ठेव” आई म्हणाली, “कामाचंच बोलतोय ना तुला काही नाही कळत” विवेक चिडून म्हणाला. आता आई मात्र दुखावली होती ज्याला स्वतःच्या हाताने कस खायचं शिकवणाऱ्या ह्या आईला काय माहीतच नाही ना. विवेकच हे बोलणं ऐकून मात्र आई विचारात पडली हा माझाच मुलगा बोलतोय की त्याचा हातातलं ते यंत्र…..

— अतुल लक्ष्मण असवले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चक्क आईचा अपमान? माता ही गाईसमान असते आणि गाईचा अपमान करणाऱ्याची काय अवस्था होते ते आपण जाणतोच. मॉर्निंग वॉक ला बाहेर पडुदे त्याला....