तुम्हाला असं कधी होते का ? भाग -१.......

Submitted by प्रकाशपुत्र on 16 August, 2018 - 21:51

मी एकदा घराबाहेर पोर्चमध्ये उभा होतो. वरती एक कोळ्याचे जाळे होते. अचानक मानेवरती एक कोळी पडला. त्याला झटकून काढायला गेलो तर तो खूप जोरात चावला. "विषाची काही reaction होईल का ?" या आधी 'आपण स्पायडर - मॅन होऊ का ? हा सुखद विचार पहिल्यांदा मनात आला' ----- तुम्हाला असं कधी होते का ?

खूप उत्तेजित होऊन हि आनंदाची बातमी मी बायकोला सांगायला गेलो. आपण सुपरहीरोची बायको होणार याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी तिने मला हे विचारलं कि , "ती कोळ्याची जाळी मी होऊनच कशी दिली ? " आणि "आता तरी मी जाळी साफ केलीय का ?". मी तिला हे पटवायचा खूप प्रयत्न केला की जाळी रोज जरी साफ केली तरी कोळी एका रात्रीत परत जाळी तयार करतो. दुसरा प्रश्न मात्र मी साफ टाळला, कारण जर उद्यापर्यंत मी स्पायडर मॅन नाही झालो तर परत पोर्चमध्ये जाऊन उभा राहावे असे म्हणतोय.
-- तुम्हाला असं कधी वेड्यासारखे वागावे असे वाटते का ?

एकदा मी आणि माझ्या मित्राने एक Investment Property विकत घेतली. सौदा पूर्ण करून आम्ही ती प्रॉपर्टी बघण्यासाठी गाडीतून चाललो होतो. ज्या रस्त्यावर ती प्रॉपर्टी होती त्या रस्त्यावर वळण्याआधी आमच्या समोरच आगीचे २-३ बंब त्या रस्त्यावर वळले. त्याक्षणी मी आणि माझ्या मित्राने एकमेकांकडे बघितले आणि आम्ही एकदम हसलो. आम्ही दोघेही असाच विचार करत होतो कि "च्यायला , आपल्याच प्रॉपर्टीला आग लागली कि काय ?"
--- तुम्हालाही असे कधी "मन चिंती ते वैरी न चिंती" असे विचार डोक्यात येतात का ?

अशाच उडपटांग गोष्टी असलेला दुसरा भाग इथे वाचा : https://www.maayboli.com/node/67238

--प्रकाशपुत्र

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तिला हे पटवायचा खूप प्रयत्न केला
>>> हे चुकीचं केले राव. बायकोशी वादात कोण जिंकलाय का कधी.

Investment Property विकत घेतली तेव्हा इंशुरन्स घेतला नाही का?

मला कोळ्यची जाळी फार आवड्तात.डास त्यात अडकतात.तो कोळी भक्ष सापडल्यावर कसे कोपर्‍यात ठेवतो ते बघण्यासारखे असते

आपण स्पायडर - मॅन होऊ का ? हा सुखद विचार पहिल्यांदा मनात आला' ----- तुम्हाला असं कधी होते का ? >> बरेचदा Happy

पण तसे कधी होणार नाही हे ही माहित आहे

बाप रे! असे वेडे विद्रे विचार तर माझ्या खूप वेळा डोक्यात येतात.
* एक असं यंत्र जे आपली कोणतीही इच्छा पुर्ण करेल.
* अशी शक्ती ज्या योगे डोळे बंद करून आपण ज्या जागेचा विचार करू त्या जागी निमिषार्धात पोहोचू.
* हवं तेव्हा गायब होण्याची कला अवगत झाली पाहिजे.
* मी ज्या गोष्टीवर नजर ठेविन (अगदी मासिकातल्या चित्रातल्या सुद्धा) तर त्या गोष्टी मला खरोखरच्या प्रगट होऊन प्राप्त व्हाव्यात. उदा. भुक लागली असता, मासिकातल्या एखाद्या चटकदार पदार्थावर मी नजर रोखून धरली तर तो पदार्थ मला समोर टेबलवर मिळावा.
* हिच नजर मी कुणावर रागाने रोखली असता, त्या व्यक्तिला आपोआप चोप मिळावा किंवा व्यक्ती खूपच वाईट असेल तर तिथल्या तिथे जळून खाक झाली पाहिजे

Lol

अशी शक्ती ज्या योगे डोळे बंद करून आपण ज्या जागेचा विचार करू त्या जागी निमिषार्धात पोहोचू.>> हे मला रोज वाटत..

मी ज्या गोष्टीवर नजर ठेविन (अगदी मासिकातल्या चित्रातल्या सुद्धा) तर त्या गोष्टी मला खरोखरच्या प्रगट होऊन प्राप्त व्हाव्यात. उदा. भुक लागली असता, मासिकातल्या एखाद्या चटकदार पदार्थावर मी नजर रोखून धरली तर तो पदार्थ मला समोर टेबलवर मिळावा.>> अगदी अगदी

शाका लाका बुम बुम फीलीन्ग Happy

हिच नजर मी कुणावर रागाने रोखली असता, त्या व्यक्तिला आपोआप चोप मिळावा किंवा व्यक्ती खूपच वाईट असेल तर तिथल्या तिथे जळून खाक झाली पाहिजे>>>> Lol

मलापण 'शरारत' सिरियलसारखं ' श्रिंग बिंग सर्वलिंग,भूत भविष्य वर्तमान बदलिंग' करता यावं असं वाटतं. खुऽऽऽऽप काही करता येईल. मला तर इलेक्ट्रिक शाॅक द्यावासा वाटतो काही लोकांना. Just with a चुटकी.

अशी शक्ती असती माझ्याकडे तर मी गुन्हेगार, बलात्कारी, सडकसख्याहरींना एका मिनटात शिक्षा केली असती.
खटक्यावर बोट जाग्याव पलटी Proud Lol

हिच नजर मी कुणावर रागाने रोखली असता, त्या व्यक्तिला आपोआप चोप मिळावा किंवा व्यक्ती खूपच वाईट असेल तर तिथल्या तिथे जळून खाक झाली पाहिजे >>>>
आणि * हवं तेव्हा गायब होण्याची कला अवगत झाली पाहिजे. >>>> + १०००० हे मला प बरेचदा वाटते.

दक्षिणा, नमस्कार_/\_
तुमचा स्वभाव किती छान आहे. तुमचे सगळे लिखाण मला आवडते. मी कुठल्याही अमानवीय अनुभवावर शंका घेणार नाही. तसेच मी जर पाकृ टाकल्या तर फोटो नक्कीच टाकेन.
कृपया माझ्याकडे रागाने बघू नये ही नम्र विनंती. _/\_

प्रकाशपुत्र हा ऋन्म्याचाच डू आयडि असून, कटप्पाने काढलेले तुम्हाला अमुक तमुक का? पद्धतीचे धागे काढून पुनश्च एकदा पापिलवार होण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय, असे मला तरी 'होते आहे'.

तुम्हालाही असेच होते आहे काय?

कोड्यात बोलणा-या सर्व बायकांचा पुढच्या जन्मी सूड घ्यावा असं वाटतं. एक तर नीट काही सांगत नाहीत.
उदा. आज विचारणार आहेस ना ?
या प्रश्नाला काय , कुणाला असे प्रतिप्रश्न करायचे नसतात. केले तर टोमणे. म्हणजे आता हे पण सांगायला लागणार का ? काय बाई !!
बरं नाही विचारावे तर कुणाला आणि काय विचारायचे या विचारात दिवसभर डोकं दुखू लागतं.
पुन्हा घरी आल्यावर विचारलं का ... नाही म्हटले की मग कपाळाला हात लावणे.
अंत पाहील्यानंतर कळतं की कुणी तरी आपल्या घरात पडून असलेल्या एखाद्या दहा हजाराच्या वस्तूला (वॉकर इ) पाचशे रूपये देऊ केलेले असतात. तेव्हां विचारशील का या प्रश्नाला आपण हो हो म्हणून वाटेला लावलेले असते.

डागदार भाऊ _/\_
कोड्यात बोलणाऱ्या पुरुषांबद्दल आपली तक्रार नाही हे बघून जीव भांड्यात पडला.
हुश्श!

>>>मी ज्या गोष्टीवर नजर ठेविन (अगदी मासिकातल्या चित्रातल्या सुद्धा) तर त्या गोष्टी मला खरोखरच्या प्रगट होऊन प्राप्त व्हाव्यात. >>>>

नको, नको. मासिकात खुपश्या चटक चांदण्यांचे फोटो देखील असतात हो !

मानव भाऊ
पुरूष कुठे असे कोड्यात बोलतात. ते बिचारे सगळं थेट बोलून फसतात. तुम्ही माझ्या बोटातून हे वदवून घेताय का ? Lol

अशी शक्ती ज्या योगे डोळे बंद करून आपण ज्या जागेचा विचार करू त्या जागी निमिषार्धात पोहोचू.>> हे मला रोज वाटत..
>>>
हो मी तर पुढे स्वप्न रंजनही करते की तसं झालं तर मी एक दिवस आईकडे एक दिवस नवर्‍याकडे राहीन. रोज अमेरिकेत येउन जॉब करेन Proud
आणि मला हे पण वाटतं की फक्त माझ्या एकटीकडेच ही पॉवर असायला हवी

मला अदृश्य होण्याची शक्ती मिळावी हे पण वाटतं मला म्हणजे मी अदृश्य होउन दहशतवाद्यांचे प्लॅन्स उधळून लावेन असं वाटतं मला Proud
माझी एक मैत्रीण फार सुरेख स्वयंपाक बनवते पण ती मला नेहमी जेवायला बोलवत नाही म्हणून मग गपचुप अदृश्य होउन तिचा स्वयंपाक खाईन असं पण वाटतं मला Lol

प्रकाशपुत्र हा ऋन्म्याचाच डू आयडि असून, कटप्पाने काढलेले तुम्हाला अमुक तमुक का? पद्धतीचे धागे काढून पुनश्च एकदा पापिलवार होण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय, असे मला तरी 'होते आहे'.
>>>>>>>>

उद्या मी मेलो तरी दहा वर्षांनी एखादा दणादण धागे काढणारा आयडी ऋन्मेष आहे अश्या अफवांना लोकं सर्रास बळी पडणार Happy

येनीवेज,
@ अद्रुष्य होणे,
हे मला शाळेत असताना फार वाटायचे. आणि पौगंडावस्थेला अनुसरून अद्रुष्य झाल्यावर आपल्या आवडत्या मुलीला डोळे भरून जवळून बघता येईल, तिच्या शेजारी जाऊ बसता येईल, तिला संकटांपासून (म्हणजेच ईतर मुलांच्या नजरेपासून) वाचवता येईल असेच विचार मनात यायचे. पुढे तुषार कपूरचा गायब पिक्चर पाहिला आणि या विचारांची लाज वाटू लागली. किंबहुना आपण तुषार कपूरसारखा विचार करतो याचे जास्त वाईट वाटले.

कोळी चावल्यावर स्पायडर मॅन होणे हा विचार मनात येणे फार छान आहे.
लहान असताना मी कोळी या प्राण्याला झुरळाईतकेच घाबरायचो. मात्र स्पायडरमॅन चित्रपटानंतर माझ्या मनातली कोळ्याबद्दलची भिती गेली.
तेरी मेहेरबानिया बघितल्यावर काही काळ कुत्र्यांचीही भिती वाटेनाशी झालेली. त्यानंतर मग एक चावला.

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार. प्रत्येकाला व्यक्तिगत उत्तर देऊ शकत नाही याबद्दल क्षमस्व

प्रकाशपुत्र हा ऋन्मेऽऽष चा डु आयडी नाही. आत्तापर्यंत मी काही लेखन केलय , पण कधी छापून आणले नाही. त्यामुळे मी ऋन्मेऽऽष नाही.
आता हे सगळे ऋन्मेऽऽष पण म्हणू शकतो त्यामुळे 'मी तो नव्हेच' हे सिद्ध करायला काही पुरावा नाही. एक ऋन्मेऽऽष जाणे आणि एक मी जाणे कि 'मी हा मीच' आणि 'मी तो नव्हेच'

तेरी मेहेरबानिया बघितल्यावर काही काळ कुत्र्यांचीही भिती वाटेनाशी झालेली. त्यानंतर मग एक चावला. >> हा हा हा

मला ना सतत वाटायचे, कि मी काही जंगली प्राण्यांना माझ्या नजरेने माझे पाळीव मित्र बनवावे जसे त्या महाराजा सिनेमात गोविंदा करतो हत्ती वाघ वेगेरेना ... अगदी तसाच माझा मनसुबा असा होता कि काही खास प्राण्यांना असे संमोहन करून स्वतःचे पाळीव जंगल उभारावे ...
( सरपटणारे सर्व प्राणी सोडून ) मी प्राणी प्रेमी आहे .... हा हा हा ...

हवं तेव्हा गायब होण्याची कला अवगत झाली पाहिजे.>>> दक्षिणा, ही कला बऱ्याचजणांना साध्य झालीए आजकाल. फक्त ते आपल्याला हवं तेव्हा गायब होतात ईतकेच. Lol