तुम्हाला असं कधी होते का ? भाग - २ .....

Submitted by प्रकाशपुत्र on 22 August, 2018 - 23:24

पहिला भाग इथे वाचा : https://www.maayboli.com/node/67162

मला एकदा झोपेत स्वप्न पडले (जागेपणी पण पडतात, पण त्याबद्दल नंतर कधीतरी ) आणि मला पक्के कळत होते की मी स्वप्नात आहे. मला 'Lucid Dreams' का काय ते पडतात, म्हणजे मला बऱ्याच वेळा मी स्वप्नात आहे हे स्वप्न बघत असताना समजत असते. तर या स्वप्नात मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो आणि त्याच्या नेहमीच्या घराऐवजी तो एका मोठया बंगल्यात रहात होता, एवढा मोठा बंगला कि गाडी आत आणि बाहेर जाण्यासाठी वेगळे रस्ते होते. बागेत माळी काम करत होता, घरासमोर Ferrari उभी होती आणि घराची Bell वाजल्यावर एका नोकराने दार उघडले ( नेहमी मित्राची बायको दार उघडते आणि चेहऱ्यावर "आला माझ्या नवऱ्याला बिघडवायला" असे भाव असतात). नेहमी लेंग्यात आणि बनियनवर असणारा मित्र एकदम सुट आणि टाय घालून आला.

मी त्याला सांगायला लागलो, " अरे अमित, तू आत्ता माझ्या स्वप्नात आहेस. हे जे सगळे आहे ते खरे नाहीये, त्यामुळे तुझा स्वप्नभंग होणार आहे, म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. पण चल , स्वप्न संपेपर्यंत मजा करू, तुझ्या Ferrari मध्ये फिरून येऊ. ". तो एकदम चिडला आणि म्हणाला, "मी काय हे सगळे घेऊ नाही शकत का ?". मी त्याला म्हणालो, "अरे, खरंच घेऊ शकतोस. पण कालपर्यंत इथे DSK विश्वची सात मजली इमारत होती आणि त्यात ५६ कुटुंबे राहत होती. त्यातल्या सगळ्या लोकांना हाकलून देऊन, एवढा बंगला उभा करायला काही वर्षे तरी लागतीलच कि ?" मग तो पण विचारात पडला.

एवढ्यात मी जागा झालो. स्वप्नाची आणि स्वप्नात असताना आपण स्वप्नात असल्याचे माहित असण्याची मजा वाटत होती. हे अमितला सांगावे म्हणून त्याच्याकडे निघालो. तिथे पोचलो तर काय, तोच मोठा बंगला आणि बंगल्याबाहेर अमित Ferrari मध्ये बसून माझाकडे बघून हसतोय. मला तर काहीच समजेनासे झाले कि हे चाललंय काय ?

आणि तेवढ्यात दारावरची बेल ऐकून मी परत एकदा जागा झालो. स्वप्ना मध्ये स्वप्न पडले होते. दार उघडले तर अमित लेंगा घालून उभा होता आणि मिसळ खायला जायचं का असं विचारत होता.

--प्रकाशपुत्र

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol भारीच तुमचे स्वप्न!

मला तर कधी कधी स्वप्न आहे हे कळत असते, पण थांबवता ही येत नाही, हलता ही येत नाही आणि मग दचकून जाग येते.

स्वप्नं लक्षात राहत नाहीत आत्ता.
पण स्वप्नात वजन नसल्यासारखे वाटणे (शक्यतो ताप आल्यावर) आणि उडत असणे अशी खरीखुरी वाटणारी स्वप्ने पडायची. लहान असताना पक्षी, कावळा बनल्याची पासून अनेक स्वप्नं पडत. बहुतेक गोष्टी ऐकताना शाप देऊन कुणाला तरी काही तरी केल्याची घटना त्यात असे. स्वप्नातच परत कसे यायचे याची काळजी वाटे, पुन्हा हे स्वप्न आहे असंही स्वप्नातच वाटे.
लहान असताना जबरदस्तीने लहानपणीच कुणीतरी लग्न लावतंय आणि मी पळून जायला बघतोय पण रस्ताच मिळत नाही असे एक स्वप्न नेहमी पडायचे. या सगळ्या स्वप्नात त्या त्या वेळी वाटणारी भीती असायची. कुठेतरी जाताना चुकल्याचे स्वप्न पडायचे. चांदोबा वाचल्यावर त्यातल्या गोष्टीतले स्वप्न बरेच दिवस पडायचे. एका गोष्टीत आभाळाएव्हढा राक्षस मला शोधत येताना स्वप्नात दिसायचा.

आभाळाएव्हढा राक्षस मला शोधत येताना स्वप्नात दिसायचा. >> तेवढा उंच राक्षस माझ्या मागे पळतोय असे स्वप्न नेहमी पडायचे Lol

मला खुप चित्रविचित्र स्वप्न पडतात आणि बहुतेक त्यातली सगळी नंतर आठवतातहि. तसेच मला सिरीयल सारखी स्वप्न पुर्वी पडायची म्हणजे तेच स्वप्न पण त्याचा पुढचा भाग.... Happy
तसेच मला बरेचदा अस वाटते की माझा एखादाच पार्ट खुप मोठा झालाय. आताच मी डोळे चोळत ऑफिसमधे बसलेय तर माझ्या हाताची बोटेच फक्त मोठी झाली आहेत खुप जाडजूड आणि डोळे नेहमी एवढेच पण त्या हातानमुळे खुप लहान.... असे का बरे वाटत असावे?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!! स्वप्न हा खरंच खूप मोठा विषय आहे. कुणी स्वप्न control करायचा कधी प्रयत्न केलाय का ?

नाही हो सस्मित, मी तेव्हा ३/४ वर्षांची असेन. तेव्हा लँडलाईन पण मोजकेच होते, मोबाईलची तर बातच नको Happy

तसेच मला सिरीयल सारखी स्वप्न पुर्वी पडायची म्हणजे तेच स्वप्न पण त्याचा पुढचा भाग....>>>

Wow! म्हणजे तुम्हाला टिव्हीची गरज नाही. आणि झोपेतच सिरियल्स बघितल्यामुळे दिवसा हवं ते करायला वेळ मोकळा.

मलाही अशी स्वप्नात स्वप्न पडतात. आणि त्यावेळी कळतही असत कि हे सर्व स्वप्नात आहे अन खर नाही.

काल स्वप्नात मी एअरपोर्ट वर अनवाणी गेलोय अन तिथे सिक्युरीटीवाल्यांना संशय येऊन माझ काटेकोर चेकींग केल

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!! स्वप्न हा खरंच खूप मोठा विषय आहे. कुणी स्वप्न control करायचा कधी प्रयत्न केलाय का ?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!! स्वप्न हा खरंच खूप मोठा विषय आहे. कुणी स्वप्न control करायचा कधी प्रयत्न केलाय का ?>>>
ख्रिस्तोफर नोलान ने केलाय.