काशियात्रे विषयी

Submitted by मइंडी on 14 August, 2018 - 21:56

पुढील वर्षी जान-फेब्रुवारी मध्ये वाराणसी ला जाण्याचा बेत करत आहे. सोबत आई-वडील (वय ५५-६०) आहेत ज्यांनी यापूर्वी कधीही महाराष्ट्र बाहेर प्रवास केला नाही.
आम्हाला साधारणतः ४-५ दिवस राहायचं आहे.
वाराणसीत राहण्यासाठी योग्य हॉटेल/धर्मशाळा जिथे मराठी जेवण मिळू शकेल.
काशी आणि गया व्यतिरिक्त अन्य भेट देण्यायोग्य स्थळे जी जास्त प्रसिद्ध नाहीत.
प्रवासातील इतर काळजी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे युपी टुअरिझमचे ( केरळ , काश्मिर आणि मप्रदेश ) केंद्र आहे. भरपूर पत्रके, नकाशे देतात. हवे असल्यास सर्व आयोजनही.
-
मी -आर्या यांचा लेख आहे मायबोलीवर.

धार्मिक ठिकाणी वाहनव्यवस्था, खानावळी, राहाण्याचे पर्याय भरपूर असतात त्यामुळे यात्रा कंपनीची गरज लागत नाही. हा अनुभव. संध्याकाळी पोहोचणाऱ्या रेल्वे टाळाव्यात. आपल्या प्रवासाच्या सुखसोयीसाठी वाटल्यास कार भाड्याने ठरवावी परंतू भाड्याचा वाद होणार नाही याची खात्री करावी. ते रोजचा तीनचार हजारचा इन्कम धरून असतात. निरनिराळ्या मार्गाने वसूल करायला बघतात.

नवीन ठिकाणी शक्यतो दुपारी बाराअगोदर पोहोचावे म्हणजे हॅाटेल/भक्त निवास रुम मिळण्यात अडचण येत नाही. फक्त त्या आठवड्यात कोणता उत्सव नसावा.
( जानेवारीत २०१९ हरिद्वारला कुंभ आहे)