स्फुट - एक अविरत दमवणूक

Submitted by बेफ़िकीर on 14 August, 2018 - 12:03

स्फुट - एक अविरत दमवणूक
==========

एक अविरत दमवणूक.....
काढून टाकायची आहे शरीरातून

आरपार व्हावेसे वाटत आहे,
चरकातून!

मग निघालेला रस फेका...
दांभिकतेच्या प्राचीन गटारांमध्ये!
ज्यात वाहत असेल संधीसाधूपणा,
लाखो मुखवटे, कातडीबचाऊ स्वाभिमानांचे अवशेष!!

व्यक्तिमत्वात नसलेले पैलू,
कळपात सामील होऊन असल्यासारखे दाखवता येतात,
ह्याचा फायदा घेऊन हाती घेतलेल्या मशालींचे नपुंसक पुंजके!!

युगांचे ठिपके असलेले वापरलेले निरोध,
प्रत्येक उत्क्रांत संस्कृतीच्या व्यभिचाराचे स्त्राव,
जे जे काय असेल त्या गटारात,
त्यात फेका तो रस!

चिपाडे खायला घाला त्यांना,
जे वाट पाहत होते मी चिपाड व्हायची!

ते आभार वगैरे मानणार नाहीत,
यांत्रिकपणे गिळतील सगळे,
मग इकडे तिकडे वळतील!!

उलट त्यांचेच आभार माना,
चक्र सुरू ठेवल्याबद्दल!

एक आर्त पण घुसमटलेली,
वेदनांनी पिळवटलेली,
असहाय्य, अश्राव्य, अभिनिवेशरहित
किंकाळी निघेल.....

तेवढी जमली तर छापून आणा!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असांसदीय शब्द पेरले तर विद्रोही काव्य तयार होईल.
अधून मधून हाणा मारा कापा असे शब्द येऊ द्यात.

दमणवूक घालवायला एव्हढे सगळे करण्यापेक्षा स्कॉच चे दोन तीन पेग मारा! मानसिक, शारीरिक सगळा थकवा, निघून जाईल.
युगांचे ठिपके असलेले वापरलेले निरोध, प्रत्येक उत्क्रांत संस्कृतीच्या व्यभिचाराचे स्त्राव, जे जे काय असेल त्या गटारात, त्यात फेका तो रस!
हे असले वाचून मलाच आता एक तरी पेग मारावासा वाटतो!! दोन घेतो, तेव्हढेच जास्त बरे वाटेल.

अविरत दमवणूक वाईटच. त्यासाठी एखादी सनसनाटी घटना घडली कि लगेचच मायबोलीवर येण्याचे टाळावे. पैला धागा माझा या सिंड्रोमवर मात करावी. निवडणुकांचे निकाल लागायचेच ते लागतात. आपण धागा नाही काढला तरी ते बदलत नाहीत. एखादा मोठा मनुष्य निवर्तला तरी देशाचे व्यवहार काही काळात सुरळीत होत असतात. ताबडतोब येऊन धागा काढल्याने त्यात बदल होत नाहीत. आता मोदींचे भाषण चालू आहे. लोकांनी ते पाहिलेले आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली त्यावर चर्चा व्हावी असे वाटू लागल्यास त्यास आवर घालावा. अन्यथा ही अविरत दमवणूक चालूच राहील. इलाज नाही.

<<< हे असले वाचून मलाच आता एक तरी पेग मारावासा वाटतो!! दोन घेतो, तेव्हढेच जास्त बरे वाटेल.>>>
अतिशय सुंदर आणि प्रमाणिक प्रतिसाद. चिअर्स. Lol