स्मरावे किती तुला?

Submitted by शब्दरचना on 7 August, 2018 - 23:12

स्मरावे किती तुला
हाही प्रश्नच आहे,

ते स्मरणही आता
अभिशाप मज आहे,

चांदण्याचे मुकेपण
झेलतो रात्र-रात्र आता

वाराही बोचणारा
साहतो आता

श्वास अपरिचित माझे
मी मोजतो आहे...!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

स्मरावे किती तुला
हाही प्रश्नच आहे,

ते स्मरणही आता
अभिशाप मज आहे, >>>> सुरेख !