फोडणीचे खमंग डोसे

Submitted by प्रमोद् ताम्बे on 6 August, 2018 - 02:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : एक वाटी तांदळाचे पिठ , अर्धी वाटी रवा , पाऊणवाटी दही , चवीपुरते मिठ , तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल , एक चमचा मोहरी , एक चमचा जीरे ,चवीनुसार दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे , ५-६ कढीपत्त्याची पाने.

क्रमवार पाककृती: 

कृती : प्रथम एका पातेल्यात तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.
डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून ठेवावे.
गॅसवर एका मोठ्या कढल्यात तडका फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी व जिरे टाकून दोन्ही चांगले तड तडल्यावर त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे , ५-६ कढीपत्त्याची पाने घालून २-३ मिनिटे चांगले परतून घावे आणि ही तडका फोडणी ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.
आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.
हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.

वाढणी/प्रमाण: 
दोन व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खास असा खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.
दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.

माहितीचा स्रोत: 
कोकणातील आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खास असा खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.
दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.>>> अगदी या सहीत!

मी नाव बघून च इकडे कमेंट करायला आले... तर चाणाक्ष लोकांनी आधीच इथे येऊन चोरी पकडली आहे.....
काका अहो निदान पाकृ टाकायच्या आधी चेक तरी करत जा की कुठून आणि कोणाची रेसिपी घेऊन टाकताय ते...

मायबोली व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून कॉपी करून, वाक्यात जरा फेरफार करून टाकावे. शीर्षक तर बदलावेच बदलावे.