PPF अकाऊंट बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by sneha1 on 5 August, 2018 - 15:03

नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. भारतात असताना मी PPF अकाऊंट काढले होते, लग्ना आधीच्या नावाने. आता मी भारतात नाही, आणि अकाऊंट मॅच्युअर झाले आहे. मला आता पैसे काढायचे आहेत. तर कसे काढायचे ह्याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल का प्लीज? आणि मी न जाता काम कसे होईल?
धन्यवाद!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त साठ टक्के रक्कम काढता येते. एक फॅारम देतील तो भरून सही करून दिल्यावर काढता येणाऱ्या रकमेचा चेक तुमच्या नावे मिळेल किंवा तुमच्याच सेविंग अकाउंटला जमा केला जाईल.
खाते पूर्ण बंद नाही होणार.
//मी न जाता काम कसे होई////
कुणी फार्म पाठवाया हवा,द्यायला हवा.
तिकडे ब्रान्च असल्यास विचारा.

https://www.google.com/amp/s/www.basunivesh.com/2016/04/25/ppf-withdrawa...
इथे म्हटल्या प्रमाणे संपूर्ण पैसे काढता यायला हवे. 15 वर्षे खाते चालू केल्यानंतरच्या 1 एप्रिल पासून चालू होतात त्यामुळे तो वेळ धरा.

>>पण १५ वर्षे झाली तरी पूर्ण रक्कम मिळत नाही?<<

मिळते/मिळायला हवी. माझं स्टेट बँकेत पीपीएफ खातं होतं, मुंबईत असताना काढलेलं आणि इकडे येण्यापुर्वि आधीच्या कंपनीतले पैसे या खात्यामध्ये फिरवलेले. काहि वर्षांनंतर ऑल्मोस्ट विसरलेलो पण स्टेट बँकेचं लेटर आलं कि मॅच्युरिटी होउन बरीच वर्षं झालेली आहेत आणि त्यांनी जमा अस्लेल्या रकमेवर व्याज द्यायचंहि बंद केलेलं आहे. खातं बंद करुन पैसे घेउन जा. भावाकडे पिओए असल्याने त्याने सगळं पेपरवर्क तयार ठेवलेलं, मी अनायासे त्यावेळेस मुंबईत असल्याने ब्रँच मॅनेजरशी फोन वर बोलुन सगळ्या फॉर्मॅलिटीजची (पास्पोर्ट कॉपी इ.) खातरजमा केली आणि दुसर्‍या दिवशी जाउन चेक घेतला. स्टेट बॅंकेच्या अफाट कार्यक्षमतेचा माझा तो पहिला अनुभव. त्यांच्या मेन ब्रँचचा (हॉर्निमन सर्कल) कारभार अगदि जवळुन बघितलेला असल्याने हा एक सुखद धक्का होता... Happy

ppf खाते १५ वर्षे झाली असतील तर पूर्णपणे बंद करता येते. तुमचे त्याच बँकेत सेविंग / करंट खाते असेल तर तुमच्या नुसत्या सहीने काम व्हायला हवे. भारतातल्या नातेवाइकांकडून फॉर्म मागवून घ्या आणि सही करून पाठवून द्या. बरोबर इतरही आवश्यक कागदपत्रे जोडा.

त्याच बँकेत दुसरे खाते नसेल तर POA करावी लागेल.

तुमचे भारतात बॅक मध्ये (saving or NRO) खाते असल्यास ह्या फॉर्म ची प्रिंट काढा, दोन सह्या करा आणि भारतात जवळच्या नातेवाईकाला पाठवा. दोन दिवसात काम होईल.

https://retail.onlinesbi.com/sbi/downloads/PPF/FORM-C_(PPF%20WITHDRAWAL).pdf

लिंक्वर टिचकी मारल्यावर उघडत नसल्यास , लिंक दुसर्या विंडोपर पेस्ट करणे.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद! मी त्या ब्रॅन्च ला फोन लावण्याचा प्रयत्न केला आहे, पण कुणी उचलला नाही..
डॉक्युमेंट्स कोणत्या लागतील कोणाला माहिती आहे का? अकाऊण्ट वर लग्नाआधीचे नाव आहे म्हणून!
NRO अकाऊंट आहे, पण त्या बँकेत नाही.

राज, NRI असल्यामुळे काही प्रोसिजर मधे फरक पडला का?

तुम्हाला लग्नाआधीची सही अजूनही करता येत असेल तर account closure form सोडून काहीही documents लागायला नकोत. Account closure proceeds अश्याप्रकारे घेणार आहात? त्याच बँकेत जुन्या नावाचे खाते असेल तर त्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते का? ते पहा अथवा जुन्या नावाच्या दुसऱ्या बँकेच्या खात्यात( अजून असेल तर) DD जमा करता येईल. DD दुसरा कोणी pickup करणार असेल तर त्याच्या नावे Authorisation Letter द्यावे लागेल. जुन्या नावाचे अकाउंट dormant नको.

ते पैसे मिळवण्याची घाई नसेल आणि नवीन नावं इत्यादी असेल तर तुम्ही भारतात आल्यावर प्रत्यक्ष जाऊन काम करणे श्रेयस्कर. नवीन नावासाठी - पासपोर्ट (भारतीय पासपोर्ट असेल तर फक्त पासपोर्टच खरंतर चालायला हवा कारण त्यावर आई-वडिलांचे पूर्ण नाव, नवऱ्याचे पूर्ण नावं, तुमचे पूर्ण नावं आणि पत्ता ह्या सगळ्या गोष्टी असतात.) परदेशी पासपोर्ट असेल तर मग बँकेनुसार, marriage सर्टिफिकेट, pancard (updated नसेल तर लागू शकेल), बँक सांगेल ते documents लागतील.
NRO अकाउंट असेल तर NRE account पेक्षा जास्त सोपे, rupee अकाउंट असल्याने treatment साध्या saving account सारखीच असते, no big deal.

>>राज, NRI असल्यामुळे काही प्रोसिजर मधे फरक पडला का?<<
प्रोसिजरच्या बाबतीत नक्कि आठवत नाहि पण सर्विसमध्ये पडला हे खात्रीने सांगु शकतो. Wink

तुमच्या बाबतीत लग्नानंतर नांव बदललेलं असल्याने अ‍ॅडिशनल पेपरवर्क लागण्याची शक्यता आहे...