मैत्री

Submitted by Asu on 4 August, 2018 - 23:06

मैत्री

मैत्री असावी अशी -
फुलासारखी उमलणारी.
कस्तुरीसारखी दरवळणारी.
पाण्यासारखी पारदर्शी,
आल्या रंगात रंगणारी.
मैत्री असावी अशी -
जीवाला जीव देणारी.
एकमेकां समजून घेणारी.
सुखात सुखावणारी अन्
दुःखात दुखावणारी.
मैत्री असावी अशी -
चुकल्यास कान धरणारी.
जिंकल्यास पाठ थोपटणारी.
संकट समयी सावरून,
आयुष्य तोलून धरणारी.
मैत्री असावी अशी -
सागरातल्या दीपगृहासारखी,
जहाजातल्या होकायंत्रासारखी.
मैत्री असावी मैत्री सारखी,
नसावी दुसऱ्या कशासारखी.
कारण, मैत्रीसारखे नाते दुसरे,
या जगती नाही.
सर्व नाती घुसळून उभरे,
लोणी जसे काही.

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults