अशी कोणती गोष्ट आहे जी मला तुमच्याकडून शिकली पाहिजे?

Submitted by कटप्पा on 3 August, 2018 - 19:15

अशी एक गोष्ट जी सर्वांना तुमच्यापासून शिकली पाहिजे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्तिमानने तुझ्या मानगुटीला पकडून जोरात गिरक्या मारलेल्या दिसताहेत म्हणून सैरभैर होऊन असे धागे काढत सुटला आहेस.

रोज जिम मध्ये tutorials ऐकणे, गाणी ऐकण्यापेक्षा. असाच सहज म्हणून सुरू केले होते मागच्या वर्षी, आतापर्यंत थोडे थोडे करत नोड, केसांद्रा, मोंगो , काफ्का, स्पार्क कळायला लागलाय.

केसांद्रा, >> Lol भलतंच वाचलं हो मी .. थोड्या वेळाने समजलं तुम्हाला apache cassendra म्हणायचं आहे ते !
चांगली सवय !

चप्रस, मान गये.जिम मध्ये आपल्याला व्यायाम करायचा आहे या कल्पनेने गाणी सुद्धा कानाखाली उतरत नाहीत तिथे तुम्ही लिंडा बाईंना ऐकून घेता.आणि समजूनही घेता.

लिंडा नाही, edureka - youtube वर आहे. बेस्ट वाटले मला.
ब्लूटूथ हेडसेट घेतला, सुरुवातीला काही दिवस फक्त 10 मिन ऐकून बोर व्हायचे, पण रोज थोडा थोडा ऐकायचो, कळों वा ना कळों, कानावर पडत राहायचे, नंतर नंतर time वाढत गेला. आता 45 min पर्यंत ऐकतो.

ATM machine वापरताना किंवा card swipe (POS machine) वापरताना एका हाताने keypad झाकून दुसर्‍या हाताने PIN type करणे.

माझ्या कडून शिका खाण्या पिण्या वरील नियंत्रण.
एकदा तळलेले पदार्थ नाही म्हटले की माझ्या समोर सगळे जग, समोसा / कचोरी / बटाटेवडे / चकल्या/ करंज्या / अनारसे काय वाट्टेल ते मिटक्या मारत खात असेल, मी त्यापेक्षा मनापासून जास्त मिटक्या मारत शून्य तेलातील मिश्र डाळींचे धिरडे, शून्य तेलाची उसळ / भाजलेले शेंगदाणे खातो. साखरे बाबतीतही तसेच. माझ्या समोर जसा आस्वाद घेत लोक बासुंदी / लस्सी पितात तसाच आस्वाद घेत मी कारल्याचा रस / लिंबू पाणी सुद्धा एन्जॉय करतो.

आणि हे एकदा दोनदा नव्हे. महिनो न महिने / वर्षे. मी शेवटले सॉफ्ट ड्रिंक प्यालो त्याला दहा पेक्षा जास्त वर्षे झालीत.

बरोबर च्रप्स.
या करता मला कधीच सहन/इच्छा शक्तीची गरज भासली नाही.

तळलेले पदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक सोडणे सोपे आहे. सिगरेटचे व्यसन सुटले असेल तर बोला, ते कठीण काम आहे.

माझ्यात ऑफिसात उशिरा येऊन योग्य ते दुचाकी पार्किंग मिळवायला 3 गाड्या सरकवायची शक्ती आहे.पब्लिक प्रचंड गैरवापर करून गाड्या लावतं.मुद्दाम साईड स्टँड वर, तेही तिरकी गाडी लावून 2 स्पॉट व्यापणे.शेवटी आलेल्या माणसाला ड्रेन च्या वरचे पार्किंग मिळते ते नको असते.मग चांगल्या स्पॉट ला लावलेल्या ऍक्टिवा स्प्लेनडर सारख्या गाड्या मागून नीट उचलून, मेन स्टँड ला लावून जागा बनवते.(हे काम करायला सिक्युरिटी आहे पण लोक त्याला दडपतात.)

उपाशी बोका, हो सिगारेटच / निकोटिन चे व्यसन यशस्वीपणे सोडले. त्यालाही बरीच वर्षे झालीत.

जशास तसे राहणे ही माझी सवय आहे. मग काहीही करावे लागले तरी बेहत्तर अद्दल घडवल्याशिवाय राहत नाही. यात आपले नुकसान झाले तरी चालेल. घर जळाले तरी चालेल पण समोरच्याला बेघर केल्याशिवाय राहत नाही.

पुंबा, खालील धाग्यावरिल माझे दोन मोठे प्रतिसाद वाचा. त्यात एका पुस्तकाची लिंक दिली आहे. त्याची हार्ड कॉपी मिळवल्यास उत्तम, लिंक मध्ये PDF आहेच.
https://www.maayboli.com/node/59156?page=1

जाहिर रित्या , खाजगीत, ऑफिस येथिल आयुश्यातले लहान- मोठे होणारे अपमान, पाण उतारे मुकाट गिळून चेहेरा शक्य तितका मख्ख ठेवणे.

मी शेवटले सॉफ्ट ड्रिंक प्यालो त्याला दहा पेक्षा जास्त वर्षे झालीत.
>>>>>

आणि मी शेवटची दारू प्यायलो त्याला दहा पेक्षा जास्त वर्षे झालीत Happy

मला ऑनलाईन फ्लर्टींग उत्तम जमते. आणि अ‍ॅक्चुअली ती शिकायला माझ्याकडे रांग लागायची. पण मी कधी कोणाला उगाच फार टिप्स दिल्या नाहीत. कारण गैरवापर झाल्यास मला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते.

रुन्म्या,

एकादा चहाचा चमचा आहे का तुजपाशी?

माझ्यात ऑफिसात उशिरा येऊन योग्य ते दुचाकी पार्किंग मिळवायला 3 गाड्या सरकवायची शक्ती आहे.
>>> हे कटप्पा कसे शिकणार ☺️

मी देखील सिगरेट सोडून 7 वर्षे झाली.
>>>
मी गुडंगगरम प्यायचो.
आणि तिथेच थांबलो.
बिडीचा आयुष्यात एकच झुरका मारलाय. चव बघायला. पुढे आवडलीच नसल्याने प्रश्नच नाही.
पण शॅम्पेन प्रकारचे मद्य आवडूनही संयम राखला हे विशेष.

आरारा, चहाचा चमचा प्रकरण समजले नाही. असेल स्वयंपाकघरात.

मला जगाची पर्वा न करता जगता येते.
अहंकारलेस जगता येते.
दारू सिगारेट तंबाखू वगैरे कुठल्याही व्यसनाचा सहारा न घेता जगता येते.
देवावर विश्वास न ठेवता जगता येते.
जातपात धर्म प्रांत (दुसरयाचीच नाही तर स्वत:चीही) न मानता जगता येते.
स्वत:च्या आयुष्याची तुलना दुसरया कोणाशीही न करता समाधानाने जगता येते.

पार्टीमध्ये सगळे बिअर पीत असताना स्वतः फक्त सॉफ्ट ड्रिंक घेणे. सगळे दारू सुरु करण्यासाठी फोर्स करत असताना संयम राखत नकार देणे. पार्टी पूर्ण संपेपर्यंत झालेली चर्चा, किस्से आणि इतरांची गुपिते लक्षात ठेवणे.

अन्जली ती एक लवंग वाली सिगरेट आहे. त्याने सर्दी कमी होते असे (जाणकार लोकांचे???) मत आहे.
हि सिगरेट पेटवली की बराच वेळ चालते... उदबत्ती सारखी. झुरका घ्यायला जरा शक्तीच लावावी लागते.
आणि झुरक्यानंतर ओठांवरून जीभ फिरवली असता, चव गोड् लागते.. Happy

Pages