IT return बद्दल माहिती हवी आहे

Submitted by अविका on 30 July, 2018 - 07:31

मला जरा IT return बद्दल माहिती हवी आहे.

१ - उद्याची शेवटची तारीख वाढवुन ३१ ऑगस्ट केली आहे असे ऐकले , ते खरे आहे का ???

२ - माझ्या मित्राचा TDS कापताना, त्याने कंपनीत रेन्ट रिसित दिला नाही तर जास्त कापला गेलाय, मग त्याचा रिफंड कसा मिळु शकतो, कारण रेन्ट फॉर्म १६ मधे कण्सिडर केले नाहीये

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकिताई,
लॉगिन केल्यावर 2nd स्टेप नंतर काहीच येत नाही

इ proceeding वर क्लिक केले कीं nothing to show असे येतेय

मला वाटते नो refund मुले आले असेल का intimation
सध्या खूप व्यस्त असल्याने टॅक्स assistant कडे जायला वेळ मिळत नाहीये

त्या ईमेलसोबतची पीडीएफ फाइल पहा. तुम्ही दिलेली माहितघ आणि आयकर खात्याने धरलेली माहिती असे दोन कॉलम्स असतील. ते सेम आहेत का पहा. असले तर रिटर्नबद्दल काही करायची गरज नाही.
Tax refund/ demand बघा.
माझा रिफंड रिटर्न व्हेरिफाय केल्यावर काही दिवसांत आला. १४३ वालं नोटिफिकेशन आता आलंय.

Intimation. Under section 143(1) म्हणजे नक्की काय?
टॅक्स payable झिरो होते, काय करायला हवे त्यावर

>>
Intimation. Under section 143(1) म्हनजे तुम्ही भरलेला कर आणी तुमच्याकडुन अपेक्शित असलेला कर यान्ची ताळमेळ. This is sent to every taxpayer once his tax filings are processed by I-T dept. It may ask for additional taxes to be paid by you or it can say that tax payable=0. (Sorry, I'm finding it hard to type marathi with this new keyboard)
टॅक्स payable झिरो होते, म्हणजे तुम्ही तुमचा कर पुर्ण भरला आहे किम्वा तुम्हाला कर भरन्याचि गरज नाही (त्या वर्ष्यापुर्ती). No action required from your end.

<<मला आज अचानक टीडीएस सर्टिफिकेट आले
त्यात कळले की 2000रुपये टीडीएस कट झाला आहे
बँक इंटरेस्ट 10000 पेक्षा जास्त झाली
ते रिफन्ड कसे मिळवता येतील>>

रिफण्ड म्हणजे कर जास्त कापला असेल तर तो परत घेणे. १० % टी.डी.एस. असतो. तुमच्या केसमध्ये बँकेला पॅन नम्बर न कळवल्यामुळे कदाचित २०% कापला असेल. जर तुमची लायेबिलिटी कापलेल्या करापेक्षा कमी असेल तरच रिफण्ड क्लेम करावा, नाहीतर तो क्लेम बेकायदेशीर आहे. रिफण्ड असेल किंवा नसेल; संपूर्ण व्याज इन्कम म्हणून दाखवणे आवश्यक आहे आणि त्याबरोबरच कापलेल्या कराचे क्रेडिट क्लेम करणे आवश्यक आहे.

<<मला आज अचानक टीडीएस सर्टिफिकेट आले
त्यात कळले की 2000रुपये टीडीएस कट झाला आहे
बँक इंटरेस्ट 10000 पेक्षा जास्त झाली
ते रिफन्ड कसे मिळवता येतील>>

जर तुम्ही कर भरत असाल तर हे व्याज तुमचे अधिक उत्पन्न झाले... जर तुमचा करभरणा शून्य / ५% असेल तर तुम्ही हा कर मागू शकता..जर तुमचा करभरणा २०%पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उरलेला कर अजून भरावा लागेल..

माझ्या भावाला १०००० टीडीएस एफडी व्याजवर लागला होता त्याला उरलेले २५००० भरावे लागले त्याचा करभरणा ३०% चा होता

ब्यांकेत कोणतातरी एक फॉर्म भरून द्यावा लागतो म्हणे. म्हणजे पैसे कटत नाहीत.

अर्थात, तुमच्या बँकेला कागदोपत्री सांगा, की मी माझा इन्कमटॅक्स रिटर्न वेगळा भरत आहे, इथे टीडीएस वजावट करू नका. तुमचा इंटरेस्ट जर १० हजार पेक्षा जास्त जमतोय तर तुम्ही बँकेत बरेच पैसे ठेवले आहेत. त्या बँकेच्या नोकरांना थोडं हलवा शेंडि धरून.

form 15 G भरावा लागतो.6० वर्षाखालील लोकांना.तरीही त्या फॉर्मनुसार जर तुमचे उत्पन्न (सॅलॅरी)जास्त असेल,तर 15 ग बँक स्वीकारत नाही.

शरद आणि राजू७६ +१.
हा मुद्दा लक्षात आला नव्हता.
अर्थात रिटर्नसाठी इन्कम मोजताना तुम्ही म्हणताय ते आपसूक व्हायला हवं.

अर्थात, तुमच्या बँकेला कागदोपत्री सांगा, की मी माझा इन्कमटॅक्स रिटर्न वेगळा भरत आहे, इथे टीडीएस वजावट करू नका >>>

असे नाहीय ते. जर तुम्हाला खात्री आहे की तुमची एकंदर मिळकत (तूम्हाला बँकेतून मिळणाऱ्या व्याजासकट) ही मिनिमम टेक्सेबल इनकम पेक्षा कमी असेल आणि तुम्हाला टॅक्स भरवाच लागणार नाही तर तुम्ही फॉर्म 15 G भरून देऊ शकता बँकेला. ( जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असेल तर फॉर्म 16 H.)

केवळ आपण इनकम टॅक्स रिटर्न भरत असू म्हणून हा फॉर्म भरता येत नाही.

शरद आणि राजू७६ +१.
हा मुद्दा लक्षात आला नव्हता.
अर्थात रिटर्नसाठी इन्कम मोजताना तुम्ही म्हणताय ते आपसूक व्हायला हवं.
>>
होय.

@अविका: वेगळं काहीच करावं लागणार नाही. नेहमीप्रमाणे रिटर्न फाईल करायचा (ऑनलाइन किंवा हार्डकॉपी कुठल्याही पद्धतीने). त्यात TDS चा एक सेक्शन असतो, त्यात आपण हा बँकेने कापलेला TDS टाकायचा. त्यातील कॅलक्युलेशन प्रमाणे आपणास भरावा लागणारा टॅक्स आणि एकंदर कापलेला TDS यातील फरका नुसार रिफन्ड मिळेल अथवा उर्वरीत टॅक्स भरावा लागेल.

केवळ आपण इनकम टॅक्स रिटर्न भरत असू म्हणून हा फॉर्म भरता येत नाही.
<<
या उत्पन्नावर मी इतरत्र टॅक्स भरत असून, तुम्ही परस्पर टॅक्स डिक्शन ऑन सस्पिशन (TDS Wink ) करू नका, असे तो फॉर्म सांगतो, असे माझे आकलन आहे. हे माझ्या चार्टर्ड अकाउंटंटाने सांगितल्यानंतर झालेले आहे. हा फार्म भरल्यानंतर ते इकडून कट अन तिकडून मिळकत अस्ला किचकटपणा बंद झाला.

बाकी डीटेल्स अकाउंटवाला अन सीए दोघे बघतात. मी जास्त डोके घालत नाही.

https://cleartax.in/s/form-13-tds-deduction
हे सर्टिफिकेट इन्कम tax वाले इश्यू करतात.
आमच्या ऑफिसच्या रेंंटवर निल टीडीएस /कमी रेटने टीडीएस व्हायचं. लँडलॉर्ड ते सर्टिफिकेट द्यायचा

उत्पन्न ५/१०/१५~ वगैरे लाखांत असेल त्याप्रमाणे छोटेमोठे रिटन फाइल करणाऱ्या लोकांकडे काम द्यायचे हे उत्तम कारण दरवर्षी फॅार्मस ,नियम बदलतात त्याप्रमाणे ते काम करून देतात.
अन्यथा स्वत: करायचे झाल्यास टॅक्ससंबंधी वाचन सतत ठेवावे लागते हे माझे मत. आउटसोर्स करूनही माहितीसाठी म्हणून वाचन करणारे ,अपडेट राहाणे उत्तमच.
पगाराव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून १५+ लाख
उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना योग्य करसल्लागाराची गरज लागते.
माहिती वाढवण्याचा आणखी एक उपाय - सीएनबीसी आवाज चानेलवरचा टॅक्सगुरु कार्यक्रम पाहणे. ( शनिवारी ७:३०, नंतर युट्युबवर )

मला काही शंका आहेत

१ - गेल्या वर्षी बँक वेबसाईटवरुन अकाऊंट ई-वेरीफाय केले होते व ऑनलाईन फोर्म १६ अपलोड करुन रीट्र्न फाईल केले होते
२ - या वर्षी ई-वेरीफाय नाही दाखवत बँक साईट, ई-फायलींग दाखवतेय, त्यावर क्लिक केले की ITR-1 SAHAJ INDIAN INCOME TAX RETURN साईट ओपेन होतेय.
३ - टॅक्स, रीबेट , रीफंड सगळे ठिक आहे, पण फॉर्म १६ अप्लोड नाही विचारत,

मग हे ईथेच सबमीट केले तर चालते का गेल्यावर्षी प्रमाणे त्या दुसर्या साईटवरुन करावे लागेल

काय फरक आहे दोघात

१५ जी/ एच फॉर्म भरुन दिला तरी बँक तुमच्या २६ ए एस मध्ये ( ज्यात तुम्हाला कोणाकडून किती मिळकत झाली आहे हे समजते. हा फॉर्म इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर लॉगईन करुन बघता येतो ) तुम्हाला दिलेला इंटरेस्ट दाखवते. त्या मुळे स्वतः रिटर्न्स फाईल करत असाल तर हा फॉर्म एकदा बघा. त्यात इंटरेस्ट दाखवले असेल तर तुम्हाला ते इन्कम म्हणून दाखवावे लागेल ( टि डी एस कापला नसेल गेला तरी )

आता माझा प्रश्न : फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडींग मध्ये होणारा नफा / तोटा दाखवतांना तो कसा दाखवायचा ?

{त्यात इंटरेस्ट दाखवले असेल तर तुम्हाला ते इन्कम म्हणून दाखवावे लागेल ( टि डी एस कापला नसेल गेला तरी )}
त्यात दाखवलेलं असो वा नसो, रिटर्न मध्ये दाखवावं हे उत्तम.
Derivative trading business income म्हणून दाखवावं लागेल असं मला वाटतं.

<<< {त्यात इंटरेस्ट दाखवले असेल तर तुम्हाला ते इन्कम म्हणून दाखवावे लागेल ( टि डी एस कापला नसेल गेला तरी )}
त्यात दाखवलेलं असो वा नसो, रिटर्न मध्ये दाखवावं हे उत्तम. >>>

उत्तम वगैरे काही नाही. कायदा म्हणतो अमुक उत्पन्न करपात्र आहे. मग ते करपात्र आहे. अर्थातच ते विवरणपत्रात दाखवायला लागणार.

<< Derivative trading business income म्हणून दाखवावं लागेल असं मला वाटतं. >>

बिझिनेस इन्कम. त्यातून बिझनेस साठी उपलब्ध असलेल्या वजावटीसुद्धा मिळतात!

मात्र 'डे ट्रेडिंग' इन्कम टॅक्स च्या दृष्टीने सगळ्यात वाईट. लॉस असो वा नफा, कर भरावाच लागतो. सर्व उलाढालीच्या ८ टक्के कर! तोटा झाला असला तरी!. कधीही डे ट्रेडिंग करू नये!!

सर्व उलाढालीच्या ८ टक्के कर!<<< उलाढालीच्या म्हणजे खरेदी किमती वर का?
ह्याला एक आॅप्शन आहे ना balance sheet देण्याचा?

तोटा इतर इन्कमच्या अगेन्स्ट वजा करता येतो ना, शिवाय पुढल्या वर्षी carry forward ?

समजा मी ठेवींवरील व्याज दाखवले नाही पण वर लिहिल्याप्रमाणे टिडिएस वगैरे सर्व गोष्टी डिपार्टमेंट ला समजतात. मी दाखवलेले उत्पन्न व ठेवींवरील व्याज पकडून मान्य वजावट, सूट जाऊन करपात्र ठरत नसेल तर चालेल का?

https://www.daytrading.com/taxes/india

इथले Cons हे ओढून ताणुन लिहिल्या सारखे वाटतात, जास्त पगाराच्या नोकरीचा तोटा जास्त कर भरावा लागतो टाइप.
पण एकूण माहिती चर्चेला साजेशी वाटते.

मुळात डे ट्रेडिंगवर उलाढालीवर ८% खर लागतो, हे पहिल्यांदाच ऐकतोय.
बिझिनेस इनकम मध्येच येईल. सेट ऑफ करायचे नियम कठोर आहेत एवढा फरक आहे.

गेल्या वर्षी बँक वेबसाईटवरुन अकाऊंट ई-वेरीफाय केले होते व ऑनलाईन फोर्म १६ अपलोड करुन रीट्र्न फाईल केले होते
२ - या वर्षी ई-वेरीफाय नाही दाखवत बँक साईट, ई-फायलींग दाखवतेय, त्यावर क्लिक केले की ITR-1 SAHAJ INDIAN INCOME TAX RETURN साईट ओपेन होतेय.
३ - टॅक्स, रीबेट , रीफंड सगळे ठिक आहे, पण फॉर्म १६ अप्लोड नाही विचारत,

मग हे ईथेच सबमीट केले तर चालते का गेल्यावर्षी प्रमाणे त्या दुसर्या साईटवरुन करावे लागेल

काय फरक आहे दोघात>>> हे सांगा की कोणी

ई व्हेरिफाय लगेच करतात का?
मी हे आउटसोर्स केलंय, त्यामुळे नक्की माहीत नाही.
ईव्हेरिफाय साठी मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड येतो.

<< मुळात डे ट्रेडिंगवर उलाढालीवर ८% खर लागतो, हे पहिल्यांदाच ऐकतोय.
बिझिनेस इनकम मध्येच येईल. सेट ऑफ करायचे नियम कठोर आहेत एवढा फरक आहे. >>

पहिल्यांदा ऐकल्यावर असा आश्चर्याचा धक्का बसतो. आणि उलाढाल याचा अर्थ केवळ खरेदी किंवा केवळ विक्री यातील जास्त रक्कम असे नाही; तर [उलाढाल = नफा + तोटा].

जर उलाढालीच्या ८ टक्के कर न भरता बॅलन्स शीट बनवून कर वाचवायचा असेल तर; कुणीही सी.ए. २० ते २५००० रुपये घेतल्याशिवाय डे ट्रेडिंग च्या केसला हात सुद्धा लावणार नाही.

तुम्ही स्वत:चे पैसे न वापरता लाखो रुपयांचे शेअर्स खरेदी करता किंवा विकता; याला speculative trading म्हणतात. याचे नियम साध्या बिझनेस रिटर्न पेक्षा वेगळे आहेत. हा शुद्ध जुगार आहे; म्हणून कायदा इतका कडक आहे.

उलाढालीवर Security Transaction Tax आणि SEBI Turnover Tax असतो. Intraday - जिथे फिजिकल डिलिव्हरी होत नाही तिथे Security Transaction Tax ०.०२५% आहे, तर SEBI turnover tax ०.०००२ % आहे.
ब्रोकरेज, वरील दोन कर, त्यावरील GST आणि Stamp Duty हे सर्व रोजच्यारोज वजा करूनच नफा / तोटा आपल्या अकाऊंटवर जमा / वजा होतो.

आयकर हा उलाढालीवर कसा असेल?
Speculative Trading वर नफा मिळाला असेल तर तो आपल्या इतर मिळकतीत अधिक करून ज्या स्लॅब मध्ये येईल त्या स्लॅब प्रमाणे आयकर भरावा लागतो.
Derivatives Trading असेल तर business income दाखवून आपण त्यातून expenses वजा करू शकतो, कसे की इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन चार्जेस, फोन बिल, तुम्ही कुठली सबस्क्रिप्शन्स घेतली असतील तर त्यांची fees वगैरे. आणि तोटा पुढल्या वर्षाकरता carry forward करू शकतो.

हे ८% कुठून आले?

Pages