IT return बद्दल माहिती हवी आहे

Submitted by अविका on 30 July, 2018 - 07:31

मला जरा IT return बद्दल माहिती हवी आहे.

१ - उद्याची शेवटची तारीख वाढवुन ३१ ऑगस्ट केली आहे असे ऐकले , ते खरे आहे का ???

२ - माझ्या मित्राचा TDS कापताना, त्याने कंपनीत रेन्ट रिसित दिला नाही तर जास्त कापला गेलाय, मग त्याचा रिफंड कसा मिळु शकतो, कारण रेन्ट फॉर्म १६ मधे कण्सिडर केले नाहीये

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसेच मागच्या वर्षी किंवा त्या आधी रिटर्न फाईल केले नसतील तर यावर्षी फाईल करताना दंड वगैरे आहे का किंवा काय प्रोसिजर आहे याविषयी सुद्धा सांगितले तर बरे होईल.

(कृपया "सीए ला भेटून विचारा", "गुगल करा", "आयटी च्या वेबसाईटवर पहा" अशी किंवा तत्सम उत्तरे नको आहेत)

Youtube वर खूप छान माहिती आहे ती पाहून तुम्ही IT रिटर्न्स भरू शकता. प्रत्येक भाग व्यवस्थित समजावून सांगितला आहे.

अविका, १ चं उत्तर हो आहे.

परिचित , तुमच्यासाठी मी गुगल केलं. इथे माहिती मिळाली. (तुम्ही आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या आधीच्या वर्षांबद्दल प्रश्न विचारताय असं गृहित धरलंय)

आ.व.२०१७-१८ चे रिटर्न्स मुदतीनंतर फाइल करण्यासाठी दंडही भरावा लागेल.

भरत, धन्यवाद. माझा पूर्वीच्या कंपनीतील कलीग आहे. मागचे तीन वर्षे जॉब मध्ये नाही. आता परत जॉब जॉईन करतोय. तर त्यावरून त्याच्याबरोबर चर्चेतून हे मुद्दे आले. मी म्हणालो तू जरी जॉब मध्ये नव्हतास तरी रिटर्न्स भरायला हवे होतेस. तर तो म्हणाला इन्कमच नाही तर रिटर्न भरायचा प्रश्न येतो कुठे. पण आता तो जोब बघतोय. जर तो जॉबला लागला (समजा येत्या काही महिन्यात) तर त्याला पुढच्या वर्षी रिटर्न भरताना दंड बसेल का? तो बसू नये म्हणून आत्ताच यावर्षी काय करता येईल का?

पुढच्या वर्षी कोणत्या वर्षीचं रिटर्न भरणार आहे? त्या वर्षीचं जेव्हा इनकम असेल आणि वेळेत भरलं असेल, तर नाही लागणार दंड.

हा नियम त्यांनी आत्ताच कडक केलाय. मी २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षांसाठीचे निल टॅक्स वाले रिटर्न्स मार्च २०१८ मध्ये भरलेत.

ज्या वर्षी टॅक्सेबल* इनकम नाही, त्या वर्षीचं रिटर्न फाइल केलं नाही तरी चालावं. मीही अनेक वर्षांनी रिटर्न्स फाइल केलेत.

इन्कम असो नसो ज्या त्या वर्षी रिटर्न्स भरायलाच हवेत (अन्यथा दंडास पात्र) वगैरे अशी माझी (गैर)समजूत होती. पण आपल्या प्रतिसादामुळे बऱ्याच गोष्टी क्लीअर झाल्या. धन्यवाद.

अरे काय हे

ओ परिचित तुम्हाला हवे होते तर तुम्ही काढायचा की वेगळा धागा हा कशाला हायजॅक केला

मला कुणी सांगा प्लिज

भरत थँक्स एकाचे उत्तर दिल्याबद्दल

सिम्बा, मराठी टायपिंग साठी थँक्स

मिळकत असो-नसो, आयटीआर फाईल करायला हवा. नंतर जबर दंडापेक्षा हे केव्हाही उत्तम.

आयटीआर ची तारीख ३१ ऑगस्ट झाली आहे

दुसर्‍या मुद्द्याकरता त्या कलीग ला त्यांच्या कंपनीच्या फायनान्स टीमशी बोला म्हणावं. जर रीसीट्स असतील तर ते टॅक्स रिबेट रीकॅल्क्युलेट करून तश्या अमेंडमेंट्स करतात. अर्थात कंपनीनुसार या पॉलीसीज बदलतील- उदा. माझ्याइथे सॅलरी झाल्यापासून पहिल्या १० दिवसांत तक्रार केली तर लगेचच (ओव्हर फोन कॉल) सॉल्व करतात... अर्थात काय जे डॉक्युमेंटेशन लागेल ते ई-मेल वर द्यायला लागतंच आणि लगेच पुढल्या १/२ दिवसांत उरलेले पैसे आणि रिव्हाईज्ड सॅल स्लिप आणि आयटी-काँप्युटेशन स्लिप मिळते

योकु
The Income Tax Department mandates the filing of an ITR if your gross total income exceeds Rs.2.5 lakh before any deductions, exceeds Rs.3 lakh for those above the age of 60, or Rs.5 lakh for those above the age of 80 years.

Also, if you are an Indian resident and have assets or investments outside the country, it is mandatory for you to file returns even if your income is not taxable. If you don’t fall in any of these categories, it’s not mandatory for you to file an ITR.
https://indianexpress.com/article/business/why-file-itr-even-income-non-...
जर यात बसत नसाल तर रिटर्न फाइल नाही केले तरी चालेल.
रिटर्न फाइल करण्याचे अन्य फायदे आहेत. पण उत्पन्न करपात्रतेच्या मर्यादेत येत नसेल तर त्यासाठी द़ंड लागू नये.

>> माझ्या मित्राचा TDS कापताना, त्याने कंपनीत रेन्ट रिसित दिला नाही तर जास्त कापला गेलाय, मग त्याचा रिफंड कसा मिळु शकतो, कारण रेन्ट फॉर्म १६ मधे कण्सिडर केले नाहीये

ITR फाईल करताना हा रिफंड मिळवता येतो. इथे वाचा कसा करायचा:
https://www.quora.com/Can-I-claim-HRA-during-ITR-Filing

वेबमास्टरनेच दरवर्षी एप्रिल महिन्यात असेसमेंट वर्ष अमुक ( ३१ मार्चला संपलेले मागील आर्थिक वर्ष) असा धागा काढावा.
बाकी स्पेशल धागे कितीही निघोत.

माझ्या माहितीनुसार ज्यांचे उत्पन्न २.५ लाखाचे वर आहे आणि/अथवा ज्यांचे PAN कार्ड काढलेले आहे त्या सर्वाना रिटर्न भरावे लागतात. कारण एखादे वर्षी उत्पन्न नसेल तरी पण PAN कार्ड असल्याने तुम्ही करदाते आहात हे त्यांच्या रेकोर्दावर असतेच. मग तुम्ही विसरून रिटर्न भरला नाही, की कर नाही म्हणून रिटर्न भरला नाही, की उत्पन्न दडवून कर चुकवण्यासाठी भरलेला नाही हे त्याना कसे कळणार ? तुमच्या pan एन्ट्री समोर नील आले की तुमची चौकशी होणार आणि तुम्हा ला आता त्यांचे मेल्स येतात. संगणीकरणा नन्तर हे मॉनिटर करणे ' बिग ब्रदर ' ला खूप सोपे झाले आहे..:)

<एखादे वर्षी उत्पन्न नसेल तरी पण PAN कार्ड असल्याने तुम्ही करदाते आहात हे त्यांच्या रेकोर्दावर असतेच>
एखाद्या वर्षी तुमचं उत्पन्न करपात्र नसेल, तर त्या वर्षासाठी तुम्ही करदाते नसता.
(इथे उत्पन्न म्हणजे ग्रॉस इनकम, डिडक्शन्स क्लेम करायच्या आधीचं.)
तुम्ही पॅन असूनही रिटर्न फाइल केलं नाही, म्हणून तुम्हांला नोटिस येईल, असं नाही.
आयकर खात्याकडे अनेक संस्था (बँका, म्युच्यल फंड्स, कंपन्या, पोस्ट ऑफिस, रजिस्ट्रार ऑफ प्रॉपर्टीज) अ‍ॅन्युअल इन्फर्मेशन रिपोर्ट फाइल करतात. त्या त्या प्रकरणी ठरलेल्या मर्यादेच्या वर व्यवहार करणार्‍यांची माहिती त्यात असते. उदा : तुमच्या खात्यात इतकी रक्कम वर्षभरात जमा झाली, तुम्ही इतक्या रकमेचे म्युच्यल फंड युनिट्स विकत घेतले, इ.इ.) यात तुमचं नाव आलं आणि तुम्ही रिटर्न फाइल केले नसले तर नोटिस येते.
तुमच्या नावावर टीडीएस असेल आणि रिटर्न फाइल केले नसेल, तरीही येते.
याच्या उत्तरात रिटर्न फाइल करणे आणि उत्पन्न करपात्र नसल्याने ते फाइल केले नाहीत (मग त्या त्या व्यवहारांचा स्रोत काय ते सांगणे असे पर्याय असतात).थी)
रिटर्न फाइल करण्याचे कराशी संबंध नसलेले अनेक फायदे आहेतच. (लोन , व्हिजा, क्रेडिट कार्ड, इ.साठी, )
पण याचा अर्थ ज्याचा पॅन आहे त्या प्रत्येकाने सरसकट रिटर्न फाइल करणं अनिवार्य आहे असं नाही. अनिवार्यतेच्या ज्या अटी आहेत, त्यात बसत असाल तर करायलाच हवं.

माझं झालं फाइल करून. मी सरळ सी ए फर्म ला काम देते. आणि नंतर त्यांची फी पे करते. हैद्राबादचा सी ए उल्लू होता. त्याने फार घोटाळे केलेले त्यामुळे इथे मुंबईत येउन सर्व शिस्तीत काम करून टाकले. रिटर्न फाइल झाले की एक मानसिक ओझे उतरले असे वाटते.

माझ्या मुली चे काही उत्पन्न नाही तिने रिटर्न भरणे गरजेचे आहे का?

मी ऑनलाईन भरते, खुप सोपे आहे, फक्त ५ मिनीटांत होते. फॉर्म १६ अपलोड केला, अन बाकीचे डिटेल्स भरले की झाले. (अर्थत माझा ITR1 आहे त्यामुळे ईतके सोपे असावे कदाचित )

बादवे, खरोखर एक महिना एक्सटेंड झालेय का, आमच्याकडे काहि लोक बोलत होते की आजच शेवटची तारीख आहे.

ho date extend zali ahe 31 August.
Return file kartana tu te deduct karu shaktes.

देवकीताई थँक्स☺️

मी जुलै च्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात करते ITR file, सो हे माहीत नव्हते

सरकारी किंवा निवडक खाजगी बॅकेचे नेट बॅकिंग असेल तर बॅकेच्या साईटवर लॉगिंग झाल्यावर तेथे एक option आहे

आधार कार्ड जर मोबाईल ला जोडले असेल तर मोबाईल मध्ये OTP चा पर्याय आहे.

काहीच पर्याय नसल्याल रिटर्न ची कॉपी प्रिंट करुन त्यावर हस्ताक्षर करुन बेगलुरुला IT Office चा पोस्टाने पाठवणे.