टॉम यम कुन्ग मे नाम थाई सूप प्रकार

Submitted by अश्विनीमामी on 29 July, 2018 - 02:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

थाई सूप प्रकार म्हणजे अगदी लाइट पण चविष्ट नरिशिंग

साहित्यः व्हेन काढलेले नदीतले फ्रेश प्रॉन पक्षी कोळंबी चार पाच. चिकन स्टॉक दोन कप, मध्यम कापलेले लेमन ग्रास दोन टेबल स्पून. काफीर लाइम ची पाने चार तुकडे केलेले गलांगल पक्षी थाई आले. मशरूम्स तुकडे करू न ५० ग्राम. लिंबाचा रस दोन टेबल स्पून. फिश सॉस दोन टेबल स्पून. कापलेली लाल किंवा हिरवी फ्रेश मिरची. एक टी स्पून. चिली ऑइल एक टी स्पून(भाचा स्पेशल). कोथिंबीर सजावटी साठी.

क्रमवार पाककृती: 

कृती: एकदम सोप्पी. चिकन स्टॉकला उकळी आ णायची. त्यात लेमन ग्रास, गलांगल व मशरूम्स चे तुकडे घालायचे. मग रिव्हर प्रॉन घालून मध्यम आचेवर उकळी आणायची. प्रॉन शिजले पाहिजेत पण ओव्हरकुक करायचे नाही. रबरी होतील. मग लिंबाचा रस, फिश सॉस मिरची चे तुकडे चवीनुसार मीठ व चिली ऑइल घालून आपल्या आवडी नुसार सीझन करा. झाले. बोल मध्ये गरम गरम सूप ओतून वरून ताजी कोथिंबीर पेरून सर्व्ह करा. वरील साहित्यात दोन सर्विंग्ज होतील. आपल्याला हव्या त्या पटीत साहित्य वाढवून घ्या.

प्रॉन मधील काळी व्हेन नक्की काढा. ती खाल्ल्यास पोटाला त्रास होउ शकतो
मूळ रेसीपीत मीठ नाही. आपण चवीनुसार घालून घ्या. तुमच्या तिथल्या हिवाळ्यात थोड्या
एशिअन वॉर्म्थसाठी जीव तरसला तर हे सूप बनवून प्या. पट्टाया च्या तिथल्या बीच वर पडल्या सारखे आतून समाधान वाटेल.

वाढणी/प्रमाण: 
दोन ते तीन लोकांसाठी.
अधिक टिपा: 

हे मांसाहारी आहे. शाकाहारी व्हर्जन वर काम चालू आहे. पण फिश सॉसला पर्याय सापडलेला नाही.

माहितीचा स्रोत: 
ना पा कलिनरी स्कूल हेड शेफ, पटाया थायलॅन्ड.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अत्यंंत आवडत सुप .
हाटेलात गेलात तर तिखट अजिबात मागु नका ? जाम तिखट देतात राव .
खापुन खा Proud

अत्यंंत आवडत सुप .(शाकाहारी पर्याय ) . मागच्याच आठवड्यात पिले होते.
साऊथ ईस्ट आशियात यात काही लोकल मसाल्याची पाने घालतात. त्यामुळे त्याला वेगळीच टेस्ट येते. सर्दी, खोकला , घसा बसला असेल त्यासाठी हे सुप हा उत्तम उपाय आहे.