चिरुमाला (भाग १ ते १०)

Submitted by मिरिंडा on 25 July, 2018 - 09:11

नोकरीत बदली होणं हे कुणालाच नवीन नाही . तसं ते मलाही नवीन नव्हतं. बँकेतल्या नोकरीतली बदली मात्र एखाद्या शहरात असली तर बरं वाटतं परंतू एखाद्या आडवाटेच्या खेड्यात असेल तर प्रत्येक बाबतीत आपली अडवणूक होत आहे असं
वाटतं. मे/ जून महिन्याच्या सुरवातीलाच बदल्या का होतात हे एक मला न सुटलेलं कोडं आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या राज्यात बदल्या होत असल्याने मी , माझी बायको लीना आणि दोन्ही मुलं यांना नेत नसे. उगाच त्यांना त्रास नको असं वाटे. खरंतर कोठेही जाण्याची तयारी आणि कामातली तत्परता पाहूनच मला बढती मिळाली होती. थोडक्यात , माझी इमेज बँकेत चांगली होती. मी कोणत्याच कामात कधीही तक्रार करीत नसे. त्याला कारण माझी आधीची नोकरी. तिथे जामनेरकर नावाचे आमचे बॉस होते. ते नेहमी सांगायचे . तुम्हाला येतय तेवढं काम करा. पुढची मदत करायला मी बसलोच आहे. अर्थात असा सल्ला फार थोड्या लोकांना मानवला. त्यातला मी एक.असो. ........तो सोमवारचा दिवस होता. अचानक हाती आलेल्या आदेशाने प्रथम मी विचलित झालो. हातातला आदेश उघडून पाहिला. त्यात माझी बदली रामनूर गावात झाली असल्याचे लिहिले होते. मी माझ्या वरिष्ठ साहेबांना भेटलो. त्यावर ते म्हणाले, " बदली रद्द करण्यासाठी आला असाल तर मी मदत करू शकत नाही. हे लक्षात घ्या. इतर काही माहिती हवी असेल तर देतो. " ते नवीन होते. त्यांना माझी फारशी माहिती नव्हती म्हणूनच ते असे म्हणाले. मग त्यांचा गैरसम्ज दूर करून मी म्हणालो, " मला थोडा जॉइनिंग टाइम वाढवून पाहिजे. निदान पाच दिवस तरी हवाय. " अर्थातच त्यांनी तो मान्य केल. कारण मी बदली रद्द करण्याची कोणतीही गळ घातली नव्हती. .......लवकरच मी घरी आलो. लीनाला सांगितल्यावर ती म्हणाली," म्हणजे एकटीनं सगळा भार सांभाळायचाय म्हणा की. " तिच्या तोंडावर थोडी काळजी दिसली. तिचा इंटरेस्ट वजा व्यथा मी जाणून होतो. म्हणून मी म्हणालो," या वेळेस मी
तुला आणि मुलांनाही घेऊन जाणार आहे. त्यामुळे सगळा भार तुझ्यावर पडणार नाही. ,... काळजी नसावी. " हे ऐकल्यावर तिचा चेहरा थोडा प्रफुल्लित झालेला दिसला.
रानमूरला मी स्वतः एकदा जाऊन येण्याचं ठरवलं. दोन दिवस आधीच वरूणराजांनी लहानसा शिडकावा करून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती. रामनूर एक साधारण वस्तीचे तालुक्याचे गाव होते. तालुक्याचे असले तरी गाव खेडेगावासारखे वाटत होते. तिथे शाळा होती. अगदी इंग्रजी माध्यमाची . त्यामुळे माझा प्रश्न सुटला होता. मुलगी सीनियर के जी मधे होती. मुलगा अजून लहान होता. साधारण मुंबई पासून सात आठ तासावरचे ते गाव. प्रथमदर्शनी मला आवडले नाही. स्थानिक लोक लेंगा शर्ट घालणारे , टोपी धारक होते. तिथे बँकेने आपली शाखा का काढली होती कुणास ठाऊक. पण तो माझा प्रश्न नव्हता. गावात बस स्टँडवर उतरल्यावर मी बँकेची चौकशी केली. जवळच असलेल्या एका बर्याापैकी
मोठ्या रस्त्यावर पंधरा मिनिटे चालल्यावर ब्रांच दिसली. तशी ब्रांच जवळ होती. ब्रांच म्हणजे एक बैठी चार पाच खोल्या असलेली इमारत होती. आजूबाजूला मात्र बरीच झाडे आणि जंगलासारखा भाग पाहून मला आश्चर्य वाटले. ब्रांचमधे जाऊन मॅनेजर शशिकांतनला भेटलो. हस्तांदोलन वगैरे झाल्यावर तो मला म्हणाला, " वैसे अकौंट होल्डर्स बहोत कम है. ब्रांच नया है , इसलिये लोनका पॉलिसी अभी तक तय नही हुवा है. आठ
दस फॅक्टरि है. उनके लोन अॅाप्लिकेशन्स पेंडिंग है. लोकल लोग भी टीक है. यहां बाहर की खबर जल्दी समझती नही है. अभी आप आनेवाला है
अच्छी बात है . कोई तकलीफ नही. हां , छुट्टी के दिन टाइम निकालना मुश्किल जाता है. " त्याने मला घरी चलण्यास सांगितले. .पण एका लहानश्या ओ ळखीवर त्याच्या घरी जाणं मला प्रशस्त वाटेना. ..... थोडक्यात तसं फारसं सांगण्यासारखं नसावं. मी परत एकदा हस्तांदोलन करून निघालो. जरा गावात चक्कर मारण्याचे ठरवले . साधारणपणे एखाद दोन , तीन मजली इमारती सोडल्या तर बैठी घरंच जास्त होती. लवकरच उन्हाची थाप लागू लागल्याने मी बस पकडून जाण्याचे ठरवले. बस यायला जवळ जवळ तास भर असल्याने आणि मला गावाची फारशी माहिती नसल्याने मी तिथेच बसून वेळ काढला. आता जागा पाहणं जरूरीचं वाटू लागलं. मी माझ्या एजंटाला भेटण्याचे ठरवले. मंध्यतरी मी स्टँडवरच्या कँन्टीन मधे मिसळ पाव खाऊन कशीतरी भूक भागवून घेतली . मी आळसटल्यासार खा बसून होतो. मुंबईच्या सुखसोयी आणि इथली स्वीकारलेली बदली यांनी निर्माण केलेली चिंता मला आता ग्रासू लागली. तात्विक दृष्ट्या कोठेही जाण्याची तयारी असणारा मी थोडा खट्टूच झालो. बसची येण्याची अजून तरी वाट दिसत नव्हती. स्टँडवर आता फक्त मी आणि दोन चार स्थानिक प्रवासी दिसत होते. सहज म्हणून मी
डोळे मिटले. थोडी डुलकी लागली. दहा पंधरा मिनिटांनी मला जाग आली. मग विचार आला, बस तर येऊन गेली नाही ? पण आजूबाजूच्या
प्रवाशांच्या संख्येत काहीच बदल दिसला नाही .
आता जवळ जवळ दीड तास झाला होता. बस येणार की नाही इथपासून माझ्या मनात शंका येऊ लागली. मी परत एकदा चहा घेण्याच्या विचारात असतानाच एक मोठा शेंदरी फेटा घातलेले , बाध्याने दणकट , थोडे म्हातारपणाकडे झुकलेले, मोठाल्या मिशा पिळत एक गृहस्थ माझ्या बाजूला आले आणि म्हणाले ," वाईच सरका की राव. " असे म्हणून त्यांनी हातातली काठी
बाकाच्या बाजूला लावली आणि शेजारी बसले. त्यांच्या हातात सामान नव्हतं. म्हणजे त्यांना कोठेही जायचं नसावं. अंगात एक सदरा , आणि धोतर. खिशातली चंची बाहेर काढून मला म्हणाले." घेता का थोडी ? " मी नाही म्हंटले. मग ते तंबाखू काढून चोळू लागले. बार भरून मला म्हणाले.
" गावात नवे दिसताय की राव . कुठून आला ? मुंबै ? " मी मानेनेच हो म्हंटले. त्यावर ते म्हणाले "बँकेत कामाला ? " त्यांनी कसे ओळखले कुणास ठाऊक . मी हो म्हणालो. थोडं थांबून मग म्हणाले," बस आत्ता नाही आहे. चार वाजल्याशिवाय बस न्हाई राव. " मी चरकलो . आणि म्हणालो.
पण बोर्डावर दीड चा टाइम दाखवलाय." त्यावर ते म्हणाले." अवो तो बोर्डावरला टाइम हाय. पन बस चार शिवाय न्हाई येनार. " ..... माझी
निराशा पाहून ते म्हणाले," असं बघा .ही काय तुमची मुंबै न्हाई. माजं म्हातार्यााचं ऐकाल तर माज्या घरी चला. चार घास खाऊन घ्या. काय
समजल ? म्या गावचा पाटील हाय. चला अनमान करू नगा. " मीही विचार केला. आणि बॅग उचलून त्यांच्या मागून चालू लागलो. मध्येच थांबून
बसच्या कंट्रोल रुममधे बसलेल्या माणसाला म्हणाले," भाऊ, साहेबान्ला घरी घेऊन जातोय. साहेब आल्याशिवाय बस सोडायची न्हाई. काय ......?" आतला माणसाने त्यांना अभिवादन करून हो म्हंटले. मी त्यांच्या मागोमाग चालू लागलो. ..........

मी पाटलांच्या मागे चाललो होतो. मध्येच एकदा थांबून मला म्हणाले," आणा ती ब्याग इकडं.." मी म्हंटले , " राहू द्या हो. मी आणतो की." त्यावर ते म्हणाले," अवंअसं कसं ,कुनि पाह्य्लं तर काय म्हनल ,पावन्यास्नी सामान घेऊन चालवतोय. " मग मात्र मी त्यांना म्हंटलं , " नाही नाही , ठीक आहे. " पण त्यांनी ऐकलं नाही. माझ्या हातातली बॅग घेऊन ते निघाले. आम्ही बराच वेळ चालत होतो. रस्ता म्हणजे रानातली पायवाटच होती. .... आजूबाजूला माजलेलं रान आणि त्यातली रानटी रंगीबेरंगी फुलं पाहात मी जात होतो. पाटील वयस्कर असले तरी त्यांचा चालण्याचा वेग माझ्य दुप्पट होता. मला फार भराभर चालावे लागत होते. हळू हळू आम्ही एका मोकळ्या मैदानावर आलो. आजूबाजूच्या माजलेल्या गवतातून वाट काढीत आम्ही एक लहानसे टेकाड ओलांडले. समोरच पाटलांचा दुमजली मोठा वाडा आपलं अंग पसरुन उभा होता. ई या इंग्रजी अक्षराची मधली दांडी जर काढून टाकली तर जो आकार होईल त्या आकाराचा वाडा समोर उभा होता.मुख्य दरवाज्याजवळ आल्या बरोबर पाटलांनी हळी दिली," अरे , हाय का न्हाई कोन ? अरे ए तुकाराम .............? " त्या बरोबर एक वाकल्या अंगाचा बु टका , तांबुस रंगाचा माणूस आमच्या पुढे येऊन उभा राह्य्ला. त्याने पाटलांच्या हातातली बॅग घेतली . मग पाटील माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले," या सायब, हा आमचा वाडा . मोप जागा हाय हितं. " असं म्हणून मला घेऊन ओटीवरच्या झोपाळ्या वर मला बसवून आत निघून गेले. मी इकडे तिकडे पाहात होतो. वाडा चांगलाच मोठा होता. आतल्या खोल्या थोड्या अंधारलेल्या होत्या. एका बाजूने वरच्या मजल्यावर जाण्याचा दगडी जिना होता. तेवढ्यात आतून एक नोकरासार खा दिसणारा माणूस आला. त्याने बरोबर एक स्टूल आणले होते.त्यावर एका थाळीत चिरलेले आंबे, थोडी द्राक्षं आणि थोडी जांभळं ठेवून तो आत निघून गेला. मग पाटील आले. म्हंणाले, " घ्या , खाऊन घ्या. पुरा वाडा दाखिवतो की तुमास्नी. तोपर्यंत जेवणाची तयारि होईल. " मी आंब्याच्या एक दोन फोडी खाल्ल्या. काही द्राक्षं आणि दोन तीन जांभळं खाल्ली. " ते पाहून पाटील म्हणाले, " तुमी शहरी मानसं म्हंजे खान्यात एकदम कच्ची. "
मग ते म्हणाले, "आता चला. वाडा दावतो ........." असं म्हणून मला घेऊन ते दगडी जिन्याने वर जाऊ लागले. मी त्यांच्या मागून जात होतो. वाड्याचा खालचा मजला जेवढा टापटीप होता तेवढा वरचा नव्हता. बर्यातच ठिकाणि धूळ साठलेली होती. वरच्या खोल्या बंद होत्या . एक दोन तुटकी बाकं आणि दोन खुर्च्या पडलेल्या होत्या. पाटील एकेक गोष्टी सांगत होते. " वरला भाग आमी वापरीत न्हाई. माज्या न्हान्पनी , लई मानसं वाड्यात वावरायची. समदेच एका घरात र्हा यचे की. नंतर एकेक जण भायर गेला. अन वाडा असा वोसाड पडला बघा. आता बलिवलं तरी बी येत न्हाईत. न्हाई तर येतो म्हनून खोटं तरी सांगत्यात. सुरवातिला आमी वाट बगायचो. मंग त्यात्ला खोटेपना ध्येनात येवू लागला. काय करनार ? " पाटील थोडे सद्ग्दित होऊन म्हणाले. मग त्यांनी खिशातला चाव्यांचा जुडगा काढीत समोरच असलेली खोली उघडली. खोली उघडल्या उघडल्या एक प्रकारचा कुबट वास आला. आणि बरेच वर्षांनी उजेड आत शिरला. आतला प्रचंड मोठा दिवाणखाना पाहून मला तशी भितीच वाटली. मानसाचा स्पर्श न झालेला तो दिवाणखाना जणू अंगावर आल्याचा भास मला झाला. आजूबाजूचे दोन दरवाजे त्या दिवाणखान्यातच उघडणारे होते. आत शिरून पाटलांनी पाठीमागच्या दोन खिडक्या उघडल्या. त्या बरोबर वार्यालचा मोठा झोत आत शिरला.
खिडकी मधून माझी नजर समोर असलेल्या डोंगरावरच्या किल्ल्यावर गेली . पडका का होईना पण किल्ला होता. मी पाटलांना विचारले. " इथे किल्ला पण आहे. म्हणजे गावाला इतिहास आहे, नाही का ? " त्यावर पाटील अभिमानाने म्हणाले," एकदा म्हाराज बी आले होते म्हन्त्यात किल्ल्यवर. " मी विचारले , " कोण महाराज ? " पाटील भडकून म्हणाले," ओ , म्हाराज येकच, शिवाजी म्हाराज. " मग स्वर खाली करून
म्हणाले," असं फकस्त आमी ऐकलंय बरं का . पन हितं बी एक राजा होता. त्यो होता कोणि कानडी फिनडी. त्यो गेल्यावर इंग्रज सरकारनी किल्ला आनी , त्ये खाली दिसतात का चार वाडे ?, ते बी ताब्यात घेत्ले. आता ते वोसाड पडून हाईत. हा त्या राजाचे वंशज हाईत म्हन्तात. पन
भायेरच्या देशात. जाऊ द्या , आपल्याला काय करायचंय म्हना चला जेवन तयार असंल. " असं म्हणून त्यांनी घाई घाईनी खिडक्या बंद केल्या.
बाहेर येऊन कुलूप लावून खाली निघाले. कदाचित त्यांना आणखीनही माहिती असावी ,पण मला देण्याची त्यांना इच्छा नसावी. मीही
मुकाट्याने खाली उतरलो.
जेवणाचा वेत साधाच होता. आतल्या खोलीत पाट मांडले होते. आता पाटलीण बाई स्वतः वाढीत होत्या. पाटलीण
बाई सुद्धा थोराड अंगाच्या नाकात मोठी नथ कपाळावर लालबुंद चिरी , हिरवे गार लुगडे , उंची पाटलांसारखीच. त्या जास्त बोलत नव्हत्या.
कदाचित मी त्यांना नवीन होतो,म्हणून असेलही. पण त्या हसल्या की दात मात्र एखाद्या हिंस्त्र पशू सारखे बाहेर येत होते आणि डोळे अकारण मोठे होत होते. अर्ध्या तासात जेवणं उरकली. मग पाटील मला म्हणाले, " आता वर दावला त्या दिवाणखान्यात निवांत पडा. " ,,,,,,,,, " पण
साडेतीन वाजायला आले आहेत " असें मी त्यांना म्हंटले. त्यावर ते म्हणाले , " अवो तुमी गेल्याशिवाय बस सुटलं कशी ? " असं म्हणून त्यांनी
मगाचचा जो नोकर होता त्याला वरचा दिवाण्खाना आवरून माझे अंथरून घालण्यास सांगितले. मी त्या नोकरामागे चुप चाप निघालो.
दिवाणखाना नोकराने उघडून मला अंथरूण तर घालून दिले, आणि तो गेला. दरवाजा लावून घेतला आणि विचार केला एवढ्या मोठ्या दिवाण खान्यात झोप लागणार तरी कशी. अगदी लहान जागा आणि अति मोठी जागा झोपण्या मधे भिती निर्माण करते असा विचार त्यावेळी माझ्या मनात आला. मी अंथरूणावर नुसताच बसून होतो. तरीही थोडी डुलकी आलीच. थोड्यावेळाने मी जागा झालो. पाहतो तो काय समोरच्या भिंतीवर एक मोठे पेंटिंग होते. त्यात वादळात सापड्लेल्या शिडाच्या होडिने प्रवास करणारी स्त्री दाखवली होती. उसळता समुद्र आणि होडीत बसलेली स्त्री , जिच्या दोन्ही भुंवया वर चढलेल्या. चित्राचा उद्देश लक्षात येईना. मघाशी बोलण्याच्या नादात या चित्राची दखल घेतली गेली नव्हती. नाही तर मी त्यांना प्रथम या चित्राबद्दलच विचारले असते. काही असो चित्रातील स्त्रीच्या भुंबया थोड्या सौम्य झाल्याचे मला वाटू लागले. आणि ते चित्र आता समोरच्या भिंती एवढे वाटू लागले. मी स्वतःला चिमटा काढून पाहिले , पण चित्राचा आकार खरंच वाढला होता. ते आता जवळ जवळ भिंतीभर पसरले होते. मी माझी नजर दुसर्यात भिंती कडे वळवली. पण तिथेही तेच चित्र दिसू लागले. आता मात्र माझ्या अंगाला हलकासा घाम येऊ लागला. मी प्रथम अंथरून सोडून माझ्या लगतच्या भिंतीला चिकटून दरवाज्याकडे सरकण्यास सुरुवात केली. हळू हळू ते चित्र तिसर्याू भिंतीवर उमटण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र मी धावत जाऊन दरवाजा गाठला. सगळं बळ एकवटून मी दरवाज्या उघडला. आणि एकदाचा बाहेर पडलो. मी मागे वळून चित्राचे काय झाले हे देखील पाहिले नाही. माझ्या धापा टाकणार्या हृदयाला कसा तरी थांबवीत
दगडी जिना उतरू लागलो. समोर पाहिले तर पाटील झोपाळ्यावर बसलेले दिसले. माझ्याकडे पाहून ते म्हणाले," काय सायव , लवकर झोप झालेली दिसत्ये. "
मी म्हंटले," छे हो. उगाच डुलकी लागली खरी. पण चार वाजलेले आहेत. आता निघावं म्हणतोय. " आता पुन्हा पाटील थांबवतात की काय असे मला वाटले. पण ते होकार देत म्हणाले, " चला तर मग. " त्यांना चित्रा बद्दल विचारायचे होते. पण मी मुद्दामच
विचारले नाही. मुकाट्याने बॅग घेऊन मी निघालो. तेही निघाले. आता आम्ही दोघेही चुपचाप चाललो होतो . थोडा वेळ गेल्यावर मी त्यांना न राहवून विचारले," पाटील एक विचारू का ? " बोला अशा अर्थी त्यांनी हातवारे केले. थोडे घाबरतच मी म्हंटले." वरच्या दिवाणखान्यात भिंतीवरच्या चित्राबद्दल काहीच सांगितले नाही ? " मग ते म्हणाले " चित्र ? कोनचं चित्र ? वर तर काय बी न्हाई " ते ताकास तूर लागू देईनात आणि एका दिवसाच्या ओळखीवर मला जास्त बोलवेना. आता स्टँड दिसू लागला होता. समोरच एक बस उभी होती. मी पाटलांच्या पाया पडलो. आणि त्यांचा निरोप घेऊन निघालो. बरोबर दिसलेले चित्रही मी घेतले होते. पूढे मला काही सुचेना. चित्रही मनातून जाईना

बस वेगात जात होती . माझे विचार मात्र मागे मागे जात होते. पाटलांचा विचित्र वाडा. त्यातलं ते चित्र. त्या चित्रातली ती स्त्री , मला आता तर पाटलीणबाईंसारखी वाटू लागली. हे चित्र नक्की कोणाचं आहे ? ते तिथे का होतं. आणी त्याचा आकार बदलणं, दुसऱ्या भिंतीवरतीही तेच चित्र उमटणं. या सगळ्याच गोष्टींचा मला तरी संदर्भ लागत नव्हता. नाही म्हणायला. पूर्वी एक पुस्तक असंच वाचनात आलं होतं , की पृथ्वीवरील कोणत्याही जागेचं चित्र तिथे न जाता काढता येण्याची कला अगदी प्राचीन होती म्हणे आणि मुख्य म्हणजे असे चित्रकार पाचेक हजार वर्षांपूर्वी होते असेही त्यात लिहिले होते. तसेच इतरही गोष्टींचा उलगडा त्या पुस्तकात होता. पण ते मला तरी काल्पनिक वाटले होते. आणि मला तसं चित्र पाहिल्याचा अनुभव नव्हता. पण हे मात्र काहीतरीच होते. माझ्या बुद्धिच्या बाहेरचे . माझ्या मेंदूला त्याची मर्यादा दाखवणारे होते. कितीही झटकायचे म्हंटले तरी विचार जाईनात. पण मला अजून एकदाही बदली रद्द करावी असे वाटले नव्हते. आपण शशिकांतन नक्की कुठे राहत होता , ते पाहायला हवं होतं. म्हणजे गावात राहण्याची काही सोय होऊ शकेल का याची कल्पना आली असती. असो. हळूहळू बसच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे म्हणा , किंवा माझा मेंदू विचित्र गोष्टींचा विचार करून दमला होता म्हणा, मला झोप लागू लागली. नशीब मला पाटलांच्या वाड्यावर रात्री राहण्याची वेळ आली नाही, हा त्यातल्या त्यात सुरक्षित विचार मी केला. डोंगराळ भागातला , जंगली दुर्गम रस्ता , तसं पाहीलं तर पाहण्यासारखा होता. पण मला चांगलीच झोप लागली. रात्री साधारण अकरा साडे अकराच्या सुमारास मी मुंबईला उतरलो. आता लवकर झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. जेमतेम जेवण करून मी खिडकीजवळच्या आरामखुर्चित रेळू लागलो. लीना मात्र लवकरच झोपेच्या आधीन झाली. ............ मला आता जागेच्या एखाद्या एजंटला भेटावे लागणार होते.मुंबईतली गोष्ट वेगळी होती.कुठेही राहून कामावर जाता येतं. पण गावातच बँक असल्याने मला तिथेच जागा पाहाणं भाग होतं. अजूनही माझ्या डोळ्यासमोरून पाटलीण बाईंची छबी हालेना. ..................... मलाही मग सारखी चाळवणारी झोप लागली. मध्येच स्वप्न पडलं. पाटलीण बाई दिसल्या आणि मला एका मोठ्य बंगल्याकडे त्या बोट दाखवीत आहेत असे दिसले. पाटलीण बाई मग फिकट होत होत उडू लागल्या. आणि मला जाग आली. पहाटेचे चार वाजले होते. मी पाणी प्यायलो. आणि आराम खुर्चित बसून राहिलो. आता मात्र माझी झोप उडाली होती.
माझा स्वतःचा विश्वार अदभुत गोष्टींवर मुळीच नव्हता. पण कालचा आलेला अनुभव मी पुन्हा पुन्हा मेंदूने निर्माण केलेल्या तार्किक पट्टीवर घासून पाहत होतो. सकाळ झाली. मी बँकेत गेलो. मला काही काम नव्हतं. माझी ऑर्डर व इतर औपचारिक गोष्टी पूर्ण केल्या. मग माझा खास मित्र जयंत वाडकर याला एजंट बद्दल विचारले. त्याने मला हरीदास नावाच्या त्याच्या ओळखीच्या एजंटचे
नाव आणि नंबर दिला. मी त्याला फोन कारण्यापेक्षा त्याच्याकडे व्यक्तिशः जाण्याचे ठरवले. माझ्याजवळ पाच दिवसांचा टाइम होता. तेवढ्या अवधीत जागा मिळवणं मला भाग होतं. बायको मुलांना नंतर आणतआलं असतं. हरिदासचं ऑफिस वडाळ्याला होतं. एका जुनाट तीन मजली चाळवजा बिल्डिंगमध्ये तो राहत असावा. मी अस्वच्छ जिन्यावरून चालत तिसऱ्या माळयावरच्या हरिदासच्या ऑफिसबाहेर चालत गेलो. तीन माळे पायी चढणं सोपं नव्हतं. तिथे लिफ्ट नव्हती. जुन्या बिल्डिंगना लिफ्ट नसे. दम लागल्याने मी जरा थांबलो. मग बेल वाजवली. एका काळ्या कभिन्न माणसाने दार उघडलं. गंमत म्ह्णजे त्याचे डोळे मात्र हिरवे होते. मी असा माणूस कधीही न पाहिल्याने त्याच्याकडे बघत बसलो. त्यावर तो त्रासिक मुद्रेने तो म्हणाला, " कोण पाहिजे ? " मी त्याचेच नाव सांगितल्यावर तो थोडा बाजूला झाला. मी आत शिरलो. आणि त्याच्यामगे एका खोलित प्रवेश केला. खोली कसली , ती तर अडगळीची खोली असावी काही तुटक्या फळ्या पडल्या होत्या. एक दोन रंगाची वापरलेली पिंपं पडली होती. भिंतींचा गिलावा उडाला होता. असो. त्याच्या समोरच्या खुर्चीत बसलो. मी माझी ओळख करून दिली. मग त्यावर तो म्हणाला. " असं पाहा , मी स्वतः रामनूरला कधीही गेलो नाही. सध्या माझ्याकडे एक जागा आहे. तो म्हणजे वाडावजा बंगला. फार जुना आहे. मी स्वतः पाहिलेला नाही. मात्र त्याचे मालक यूएस ला असतात. त्यांनी मला ही वाड्याची चित्रे पाठवलेली आहेत. म्हणून त्याने माझ्याकडे लॉपटॉप सरकवला. अतिशय अंधुक अशी खोल्यांही चित्रे पाहून मला काहीच अर्थ बोध होत नव्हता. ते पाहून तो म्हणाला, बंगल्यातल्या फक्त सहा खोल्या भाड्याने द्यायच्या आहेत. तीन खाली तीन वर. बाकी खोल्यांना कुलुपं आहेत. भाडं अर्थात्च पाच हजार रुपये आहे. आणि पन्नास हजार डिपॉझिट द्यावे लागेल. माझ्या नावाने पॉवर ऑफ ऍटर्नी आहे. पण मी स्वतः मात्र जागा पाहिलेली नाही. " मी थोडा विचारा पडलेला पाहून तो म्हणाला, " तुम्ही असं का करीत नाही त्याच गावाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जागा का पाहत नाही. तिथल्या जागा मात्र मी पाहिलेल्या आहेत. वीस एक किलोमिटर वर जिल्हा आहे. " मला त्याचं त्याने स्वतः जागा न पाहिल्याचे सांगणं आवडत नव्हतं. मला दुसरा पर्याय नसल्याचे सांगून मी त्याला त्या वाड्याचे नक्की करायला सांगितले. दुसऱ्याच दिवशी मी त्याला तीन महिन्याचे आगाऊ भाडे आणि डिपॉझिटचा चेक देण्याचे आश्वासन देऊन तेथून निघालो. मी घरी आलो आणि लीनाला सागितल्यावर तिने एवढा मोठा वाडा काय करायचाय म्ह्णून थोडावेळ माझ्याशी वाद घातला. तिचँ म्हणणँ बरोबर होतँ. एवढ्या मोठ्या जागेची साफ सफाई करणँ कठीण होत. तरीही बाई मिळेल या आश्वासनावर तिच म्हणण झुगारून दिलँ. तिने ते ऐकलँ कारण की तिला या वेळेला माझ्याबरोबर यायला मिळणार होतँ. जेवणानँतर मी झोपायला जाणार तेवढ्यात लीनाने मला एक बँद पाकीट आणून दिलँ. ते उद्या पाहू म्हणून मी गादीखाली ठेवून दिले. अर्थातच ते मी पाहण्याचे विसरलो. दिवसभरात मी दोन चेक तयार करून एक आगाऊ भाड्याचा आणि दुसरा डिपॉझिटच्या रकमेचा, असे तयार करून हरिदासला नेऊन दिले. दिल्यावर तो परत एकदा मला म्हणाला,” सर, तुम्ही जिल्ह्याच्या गावाला जागा घ्या. यायला जायला तुम्हाला गाडी असेलच. तुम्ही ऑफिसला येऊ शकता. “ ...............त्यावर मी म्हँटले ,” अहो , बँकेने मला गाडी नाही दिली तर माझी पँचाइत होऊ शकेल. “ मग त्याने मला एकूण सात चाव्या सुपूर्त केल्या. आणि म्हणाला,” पुढल्या महिन्यात याल तेव्हा इतर रजिस्ट्रेशनचे सगळे उपचार करून घेऊ. मी चाव्या खिशात टाकल्या आणि खुशी खुशी घरी आलो. अजूनही मी ते पाकीत फोडून पाहिलँ नव्हत. मोठा वाडा म्हणजे मोठी जागा , आणि शाखेतलँ मोठँ पद, या उतावीळ पणामधे मी पुन्हा रात्र तशीच घालवली. रात्री परत एकदा मला पाटलीण बाईँचँ स्वप्न पडल. मधेच जागा झालेला पाहून लीनाही उठली. तिने पाणि वगैरे दिले, तेव्हा मी तिला जवळ ओढून झोपलो. सकाळची वेळ अशीच गेली. बँकेत आज मला सेँड ऑफ पार्टी होती. लीनालाही घेऊन जायचँ होत. सँध्याकाळी पार्टी सँपल्यावर , साहेबाँनी परत एकदा मला बोलावलँ. मला म्हणाले,” मि.सांगलीकर , थोडं सावध राहून काम करा. खेडेगाव आहे. तसे लोक डाँबरट असतात, उद्योजकही तसेच, कर्जाची मँजुरी हेडॉफिसला पाठवताना काळजी घ्या. कोणत्याही द्बावाखाली काम करू नका. एखाद दुसरी चौकशी तुमच्या विरुद्ध झाली तरी हरकत नाही. ती कशीतरी मँनेज करता येईल .” लीना आणि मुलँ मिळालेल्या गिफ्टमुळे खूश होती. मी घरी आलो. उद्या सकाळी मला रामनूर करता निघायचे होते. लीना आणि मुलाना मी नँतर नेणार होतो. मी मात्र तिला आत्ताच न्यावँ अस वाटत होतँ. तिला समजावून साँगितल्यावर ती थोडी रागावूनच झोपली. अजूनही मी ते पाकीट उघडून पाहिले नव्हते.
झोप चाळवाचाळवीचीच लागली. लीना मात्र छान झोपली होती. सकाळ नवीन वातावरण घेऊन उगवली. मी एकच बॅग सध्या पॅक केली होती. अचानक मला पाकिटाची आठवण झाली . मी गादी वर करून पाहिली. पाकीट तसच पडून होतं. मी ते उघडणार एवढ्यात लीनाने आत बोलावले. पाकीट तसेच टाकून मी आत गेलो. लीना म्हणाली,' हे पाहा, जरा लक्ष द्या, हे तीन ड बे मुद्दाम बनवल्येत हा बस मधे बसल्याबरोबर खाण्याचा, हा दुपारचा आणि हा रात्री साठी. ......." माझं फारसं लक्ष नाही असं पाहून ती म्हणाली, " जरा लक्ष द्या हो, सारखा नुसता धांदरटपणा, तुम्हाला कामावर घेणार आहेत. जरा उशिरा गेलात तरी चालणार आहे. आणखीन हे पाहा ही केळी , संत्री
हे आंबे. ". माझ्या डोक्यात पाकीट असल्याने मी होकार भरत तिथून पळ काढला. बेडवरचं पाकीट नाहीसं झालेलं होतं. मी सगळीकडे पाहिलं पण
सापड्लं नाही. मग मात्र मी नाद सोडला. बरोबर साडेसातला निघालो, लीनाला जवळ घेऊन तिचा आणि मुलांचा निरोप घेतला. तेवढ्यात लीनाने एका कोपर्याेत पडलेलं पाकीट माझया हातात दिलं. " हे ठेवा , कालपासून विसरताय. " मी ते हातात घेऊन पँटच्या खिशात कोंबलं. मी घाईघाईने मुंबई सेंट्रल साठी बस पकड्ली. लवकरच रामनूरला जाणार्याब बसमधे बसलो. बस हालली. मुंबईचा निरोप घेऊन , मी पुन्हा केव्हा मुंबईला येणार याचा विचार करीत हातातला पेपर वाचीत बसलो. मला वाड्याबद्दल कुतुहल होतं. प्रथम बँकेत जाऊन हजर व्हायचं आणि दुपारी वाड्यावर जाण्याचे ठरवले. गंमत म्हणून पाट्लांचा विचार केला. पुन्हा ते मुंडासंवाले पाटील भेटणार का ? भेटल्यावर त्यांचे आभार मानायचे ठरवले होते. थंडगार वार्याावर मला डुलकी येऊ लागली. सुमारे अडीच तीनच्या दरम्यान रामनूर आलं. बाहेर पाय ठेवला आणि पावसाचे बारीक तुषार अंगावर आले. फार छान वाटत होतं. माझं स्वागत जणू पावसाने होत होतं. मातीचा छान खरपूस वास सुटला होता. पाटील मात्र कोठेही दिसले नाहीत. पावसाच्या हलक्या धारा अंगावर घेत मी ऑफिस गाठले. ............ सगळिकडे निसर्ग नुसता बहरून आल्यागत वाटत होता. एक प्रकारचा मादक वास नाकात घुसत होता. दुसर्याा कोणत्याही पर्फ्युमला तोंडात मारील असा वास होता . मी शशिकांतनच्या केबिन मधे शिरलो. .......................
शशिकांतन , साधारण माझ्याच वयाचा काळा रोम , चौकोनी चेहर्यातचा, गुबगुबित गालांचा , आणि सारखे डोळे हलवण्याची लकब असलेला बर्यारपैकी माणूस होता. तो पुष्कळच साधा असावा. स्वतःचं घर आणि बँक या पलिकडे तो विचार करीत नसावा. त्याला मी असं म्हणतोय, पण मी तरी कुठे घर आणी बँक याच्या व्यतिरिक्त विचार करीत होतो. पण माणूस नेहमी स्वतःला स्पेशल समजतो हेच खरं. सुरुवातीचे हस्तांदोलन झाल्यावर त्याने माझ्यासाठी चहा आणि त्याच्यासाठी कॉफी मागवली. नंतर त्याने तिथल्या स्टाफशी ओळख व्हावी म्हणून पत्येकाला केबिन मधे वोलावून त्याची ओळख आणि त्याचा बँकेतल्या कामातला रोल मला समजावून सांगितला. माझ्या हाताखाली एकूण बारा लोक होते. सर्वात शेवटी त्याने जुडेकर आणि गोळे यांची ओ ळख करून दि ली. त्यापैकी जुडेकर ख्रिश्चन होता आणि त्याचा इथल्या लोकांचा अभ्यास होता. इथली बरीच माहिती त्याला होती. आणि गोळे मात्र बँकेच्या नोकरी व्यतिरिक्त मांत्रिकाचं काम करी हेही त्याने मला सांगितलं. एवढ्या ओळखीवर मी जुडेकरला विचारले," इथे एक पाटील आहेत आणि बस स्टँडच्या पुढेच त्यांचा वाडा आहे. मी त्यांच्याकडे जेऊनही आलोय. " पुढे मी असेही म्हंटले की " पाटील एक प्रतिष्ठित आणि चांगले गृह स्थ आहेत ..........." त्यावर तो म्हणाला
"म्हणजे तुमी बी फसलात की आमच्या सासरेबुवांसारखे. " मी अचंबित झाल्याचे पाहून तो म्हणाला, " अवो पाटील वाडा हाय , पण तो ओसाड हाय तितं काय बी नाय. या गावालाच पाटील नाय न काय नाय. नंतर सांगतो सविस्तर " असं सांगून ते दोघे गेले

जवळ जवळ साडेचार वाजत आले. मी शशीला भाड्याने घेतलेल्या वाड्याची माहिती दिली. त्याने मला
त्याबद्दल फारशी माहिती नसल्याचे सांगितले. इथे असताना तो एकटाच एका घरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होता.मात्र ,त्याने जुडेकरला विचारायला सांगितले. शशी उद्याच मुंबईला निघणार असल्याने फार इंटरेस्ट दाखवीत नव्हता. त्याच्या चेहर्याावर सुटकेचे भाव दिसत होते.......... असो. मी मग जुडेकरला बोलावले. त्याला वाड्याबद्दल सांगितल्यावर तो म्हणाला," मी वाडा दाखवतो, आपण जाऊ. " त्याला मी माझ्याबरोबर घेऊन निघालो. बाहेर पाऊस अगदी सिरीयसली पडत होता. दोन चार दिवस आधी पासूनच पाऊस पडत असल्याचे जुडेकर म्हणाला. पावसाच्या पाण्याचा खळखळाट आणि डोक्यावर पडणार्याच धारा चुकवीत मी जुडेकरच्या छत्रीतून जात होतो. चालताना माझी बॅग सारखी मधे मधे येत होती. ते पाहून जुडेकर ने ती हातात धरली. पंधरा वीस मिनिटे चालल्यावर अचानक गाव मागे पडल्याची जाणीव झाली. आणि रस्त्याने जंगलात प्रवेश केला. आता आम्ही झाडांच्या गर्दीतून जात होतो. सूर्य कलला होता. पावसाने सगळेच वातावरण मादक झाले होते. समोरून येणारे कोणीही नसल्याने मी सहजच वाड्याचा विषय काढला. जुडेकर म्हणाला," साहेब खरं सांगू का , तुम्ही जिल्ह्याच्या गावी जागा पाहिली असतीत तर बरं झालं असतं. तसं या वाड्याबद्दल कोणीही चांगलं बोलत नाही. बाजूने आवाज करीत वाहणारी नदी हाच तेवढा जिवंतपणाचा मागमूस आहे. वाड्याच्या बरोबर मागे आणि नदीच्या जवळ आमच्या लोकांचं एक पडकं चर्च पण आहे. पण तिथे कोणी जात नाही. थोडा आड्बाजूला असलेला किल्ला पण मोडकळीला आलेला आहे. असल्या वातावरणात तुम्ही राहणार कसे ? तशी बँकेची गाडी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या गावाहून येणं तुम्हाला ठीक झालं असतं. " पण वाड्याबद्दल अशी काय अफवा आहे ते सांगता येईल का ? " मी असं विचारलं. त्यावर तो म्हणाला," साहेब डोक्यात असलं काही घेऊन राहाय्ला जाणार असाल तर कठीण जाईल. " त्याला जास्त काही सांगायचं नसावं असं दिसलं. मग आम्ही थोडावेळ काहीच बोललो नाही. अचानक जंगल संपलं आणि मोकळं माळरान लागलं. आता वाडा स्पष्ट दिसू लागला. वाडा दोन मजली होता.
बाहेरच्या बाजूचे गंजलेले लोखंडी गेट बरेच वर्षात कोणी उघडले नसावे. आम्ही दोघांनी त्याला जोर लावून उघडले. ते खडर्र्र्र्रर्र र र्र्र्र र्र .......... अस आवाज करीत अर्धवट उघडलं.
मी चाव्यांचा जुडगा काढला. मुख्य दरवाजापुढे पोर्च होता. दरवाज्याच्या कुलपात किल्ली घालून ती
फिरवू लागल्यावर लक्षात आलं किल्ली नावाच्या दाभणाचा कुलपावर काहीही परिणाम होत नाहीये. जुडेकरनेही प्रयत्न केला. तरीही जमलं नाही.
मग मी ते कुलूप दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवलं आणि जुडेकरने दोन्ही हातांनी किल्ली फिरवली. तेव्हा कुठे कुर्र....कुंई असा आवाज काढीत एकदाची कुलपाने मान टाकली,. आणि ते लटकू लागलं आता प्रश्न अडसराचा होता. सूर्याचे लाल किरण पडले होते. संधिप्रकाशात आकाशातली पक्षांची दाटी दिसू लागली. पावसाने मात्र मेहेर्बानी केली होती. त्यालाही कंटाळा आला असावा. सूर्याचे लाल पिवळे किरण आजूबाजूच्या ओलसर वातावर्णाने भिजले होते. मागच्या बाजूला जंगलाचा तुकडा जणूकाही उरलेल्या भागावर चिकटवलाय असं दिसत होतं. नाही म्हणायला नदीचा मात्र खळखळाट आता बर्याेपैकी ऐकू येत होता. पुन्हा आम्ही दोघांनी पाय रोवून दरवाज्याचा अडसर सरकवला. सकाळी येताना तो मला लावायला कसं जमणार होतं कुणास ठाऊक. दरवाजा एकदाचा उघडला. आतून दोन चार वटवाघुळ् उडत उडत बाहेर निघून गेली. अजूनही मला इथे राहण विचित्र वाटत नव्हतं. फक्त तसा थोडा विचार झाकळू पाहत होता.जुडेकरने माझी बॅग आत ठेवली. आणि हस्तांदोलन करून तो म्हणाला," चला साहेब मी निघतो. ........" आणि माझी अनुमती मिळताच तो भराभर चालत गेट मधून बाहेर पडला सुद्धा. मी आत शिरण्याऐवजी मागे पाहत बसलो. दूर जाणारा जुडेकरचा देह एवढीच काय ती त्या वातावरणातील मानवी हालचाल.
मी आत जाण्यासाठी पाय उचलला आणि आत ठेवल्यावर मला एखाद्या जाजमावर पाय ठेवल्यासारखा वाटला. पण ते जाजम नसून धुळीचा थार होता. मी माझ्या मोबाइलचा टॉर्च सुरु केला. त्या प्रकाशात विजेचे बटण शोधू लागलो. एका मोठया
लाकडी पुतळ्यामागे मला दिव्याची दोन बटणे दिसली. त्यापैकी एक दाबून मी लाईट लावला . त्या प्रकाशात मला असे दिसले की मी एका प्रचंड मोठ्या रेल्वे प्लॅट फॉर्मवर उभा आहे. एवढा प्रचंड हॉल मी प्रथमच बघत होतो. लांबलचक आणि चांगलाच रुंद हॉल माझ्या नजरेत मावत
नव्हता. तिथे जुनाट झालेला एक सोफा होता. दोन तीन खुर्च्या होत्या. सगळ्याच "अँटिक पीसेस " वाटत होत्या. बाजूच्या भिंतीजवळ एक लांबलचक लाकडी दिवाण होता त्याची एक बाजू अर्धगोलाकार होती. जिथे मी टेकून झोपू शकत होतो. त्यावर केव्हातरी घातलेली जुनाट गादी होती. सगळीकडे नुसता कुबट , उबट व जुनाट वास पसरलेला होता. आता मात्र माझ्या मनात आलं , आपण इथे राहणार ? लीना आणि मुलांना इथे आपण आणणार का ? माझ्या प्रश्नांना सध्या तरी उत्तरे नव्हती. मी माझ्या हातातली बॅग दिवाणावर ठेवली. थोडा आवाज झाला. कोणीतरी आल्याची नोंद जणू वाड्याने घेतली असावी. वाडा अजूनही तटस्थ होता. कदाचित माझ्या हालचाली न्याहाळत असावा. नाही म्हणायला.
माझ्या डो ळ्याच्या कोपर्याहतून लांबच्या भिंतीवरून काहीतरी सरकत गेल्याचे दिसले. कदाचित मोठी पाल असावी. तसा उजेड
पिवळा असल्याने, आ़जूबाजूच्या जुनाट पणात भर घालीत होता. दिवाणावरील गादी , मी प्रथम बॅग खाली ठेवून , खाली ओढली. त्यावर
पुन्हा बॅग ठेऊन मी बसलो. आता हे सर्व स्वच्छ करणं मला भाग होतं. कुठेही मला झाडू नामक चीज दिसेना. आता काय करायचं असा विचार करीत मी बॅग उघडली. कपड्यांच्या व्यवस्थित घातलेल्या घड्या त्यात ठेवलेले टिफिन बॉक्सेस, काही फळं मला दिसली. मी थोडे कपडे वरखाली केले. अचानक मला एक केरसुणीवजा झाडणी मिळाली. लीनाची मला कमाल वाटली. बायका हुषार असतात हेच खरं. ......चला, निदान थोडी साफसफाई करून मला घेता येईल. बाकी सर्व काम मी उद्या माणसं लावून करून घेणार होतो. मी त्यातल्या त्यात थोडा जमिनीचा भाग साफ करून घेतला. इतकी धूल उडाली की मला श्वास घेणं कठीन झालं. दिवाण आता बर्याेपैकी साफ झाला होता. आत्ता कुठे मला भुकेची आठवण झाली . मी आतला एक डबा बाहेर काढला. पण मला पाणी हवं होतं. म्हणजे कीचन शोधावं लागणार होतं. अजून् माझं लक्ष हॉलच्या लांबच्या भिंतीकडे गेलंच नव्हतं. जिच्यामागे कदाचित कीचन असू शकेल. मी तिकडे वळणार इतक्यात मोबाईल वाजला. एवढ्या शांत वातावरणात ती बेल म्हणजे हॉरर फिल्ममधे ऐकू येणारी किंकाळीच होती. मी दचकून फोन घेतला. लीनाचा फोन होता. तिला एकूण सगळ्ञ्याच
गोष्टींचं अप्रुप वाटत असल्याने ती आनंदात होती. मी फोन बंद केला आणि पुन्हा दिवाणावर ठेवला. आता पुढचा दरवाजा उघडा असल्याने
एखाद्या वादळासारखा वारा आत घुसत होता. पुन्हा ढग भरून आलेले दिसले. पावसाला सुरुवात होत होती. नदीचाही खळखळाट चांगलाच
ऐकू येत होता. मी दरवाजा लोटून घेतला परत उघडायचा म्हणजे मला एकट्यालाच उघडावा ला गणार होता. मला रात्री बंद करावा लागणारच होता , याचाही विचार मी केला. आत्ता कुठे मी लांबच्या भिंतीकडे वळलो. त्या भिंतीवर कुणातरी मोठ्या सरदार दरकदाराचे तैल चित्र होते. त्याच्या वरही बरीच धूळ जमली होती. नाही म्हणायला त्याचे ऊग्र , भेदक डोळे तेवढे स्पष्ट दिसत होते. हातात तल वार घेतलेला
सिंहासनाधिष्ठित योद्ध्याचा ते चित्र असावं . ते वटारलेले डोळे कोणत्याही बाजूने पाहिले तरी आपल्या कडेच पाह्त आहेत असे वाटत होते. मी त्याच्याकडे लक्ष न देता कीचन कुठे आहे ते पाहण्यासाठी बाजूच्याच कमानीखालून उजव्या बाजूला वळलो. अर्धवट अंधार असल्याने मला परत
दिसायला अड चण येत होती. तिथे हॉल ला एका बाजूला तीन व दुसर्याव बाजूला तीन अशा मोठ्या कमानी होत्या. आणी कमानींच्या बाहेर एक
इ आकाराचा कॉरिडॉर होता. जो दोन्ही बाजूंनी मुख्या दरवाज्याकडे येऊन मिळत होता. मला अचानक मोबाईलची आठवण झाली. मी मागे
भिंतीवरील चित्राकडे न पाह्ता, दिवाणावरचा मोबाईल उचलला. आणि कीचन कडे टॉर्चच्या प्रकाशात मार्गक्रमण करू लागलो. भिंती पलीकडे
परत एक मोठी कमान् होती. तिच्या खालून कीचन चा दरवाजा दिसत होता. टॉर्चच्या प्रकाशात मला कीचन दिसले. आत एक मोठा ओटा होता.
तिथे सध्या कसलीच सोय नव्हती. नाही म्हणायला जुन्या पद्धतीच्या चुली होत्या. ओट्याच्या वर एक भली मोठी खिडकी होती. ती सगळीच
पितळ्याची असावी. सध्या बंद होती. रंगी बेरंगी काचा पलिकडे दिसणं कठीण होतं. कदाचित तेथून वाड्याची मागची बाजू दिसत असावी. मी
भिंतीवरचे दिव्याचे बटण शोधले. दिवा लावला पिवळ्या प्रकाशात रिकाम्या घराचा येणारा भकासपणा माझ्या तोंडावर आला. ते फक्त म्हणायला कीचन होतं. काहीही सोय न दिसल्याने मी जरा नाराज झालो. दोन चार भले मोठे कोनाडे मात्र होते. एक भिंतीतलं फडताळ दिसत होत .
सगळ्या रंगांवर का ळ्या रंगाची पुटं असल्याने मूळ रंग समजत नव्हते. नाही म्हणायला तिथे लहानसं सिंक होतं . त्यात नळ दिसला. तो सोडता क्षणीच इतक्या जोरात सुटला , की एखादा राक्षस ओरडतोय की काय असा मला भास झाला. वाड्याच्या शांततेत परत मी आल्याची खबर गेली असावी. मी परत हॉलमधे आलो. माझ्या जवळ्च्या पाण्याच्या बाटलीत मी पाणि भरून आणले आणि दिवाणा वर बसून मी खाण्यास सुरुवात केली.

जेवण तर झालं. पुन्हा हात धुण्यासाठी कीचन मध्ये जाणं भाग होतं. पण आता मला भीती नव्हती. मी आत जाऊन परत बेतानेच नळ सोडला. हात धुतले. जेवणाची भांडी धुऊन ठेवली . येताना मी सहज सरदारांच्या चित्राकडे पाहिले. ते माझ्याकडे जास्तच उग्र नजरेने बघत असल्यासारखे वाटले. कदाचित माझं येणं त्यांना रुचलं नसावं. मग मी कीचनमधला लाईट बंद करण्यासाठी गेलो. एकवार नजर सगळीकडे फिरली. का कोण जाणे , मघाशी मोठ्ठे असलेले कीचन मला जास्तच चिंचोळे वाटू लागले. म्हणजे कोनाडे , फडताळ जागच्या जागीच होतं. पण मी जास्त विचार न करता लाईट बंद केला. बाहेर आलो. आता मात्र मी सरदारांच्या चित्राकडे बलपूर्वक पाहिलं नाही. दिवाणावर येऊन बसलो. बॅगेतली एक पातळ चादर (जी एकच होती ) काढली आणि दिवाणावर घातली. आता झोपण्याची तयारी करणं मला भाग होतं. मी सहज म्हणून मोबाईल उघडला. जेमतेम आठ वाजत होते. एवढ्या लवकर झोपावं की नाही तेच कळेना. म्हणून नुसताच बसून राहिलो. मग लक्षात आलं की पुढचा दरवाजा लावायचा आहे. मी उठलो. अर्धवट लावलेला दरवाजा मी मुद्दाम उघडला. त्याचे एक दार दोन्ही हातांनी कसेतरी उघडताच दुसरे दार मला उघडण्याची वेळच आली नाही. इतक्या जोरात वारा आला अन त्याने ते दार धाडकन उघडलं. बाहेर निव्वळ काळोख होता. बालचंद्र उगवलेला दिसला. आकाशात मेघांची भलतीच दाटी झाली होती . पावसाला सुरुवात झाली होती. ............नदीचा खळखळाट स्वच्छ ऐकू येत होता. जणू नदी माझ्या दरवाज्याला लागून वाहत होती. मी बाहेर पाऊल टाकले. पोर्चमध्ये आलो. लांबवर विजेच्या दिव्यांची मंद ओळ दिसत होती. तिकडे गाव असावं. माझी नजर आवाराकडे गेली. गेटपासून दोन्ही बाजूच्या कंपाउंडच्या भिंती दिसत होत्या. एका भिंतीजवळ काहीतरी जुनाट बांधकाम दिसत होतं. ते कदाचित मंदिर असावं. म्हणजे आवारात मंदिर होतं. मी ते पाहण्यासाठी वळणार एवढ्यात घरात "धपकन " काहीतरी पडल्याचा आवाज झाला. म्हणून मी मागे वळलो. पण आत काहीच दिसत नव्हते. आतून वरच्या मजल्यावर एका कमानी खालून जाणारा लाकडी जिना दिसला. पण तिथे काहीही नव्हतं. सध्यातरी माझा वरच्या मजल्यावरच्या खोल्या उघडून पाहण्याचा मानस नव्हता. नाहीतर मी खालच्या तीन खोल्या उघडून पाहिल्या असत्या. सकाळ पासून बसचा प्रवास , शिवाय बँकेतली दगदग , आणि एक प्रकारची नव्या परिसराची भीतीवजा रुखरुख, यांनी मी बराच दमलेला असल्याचे माझ्या लक्षात आलं. मी घरात परत आलो. जेमतेम जोर लावून दोन्ही दारे लावून घेतली. अडसर मात्र मला अर्धवटच सरकवता आला. मी पूर्ण सरकवण्याचा नाद सोडून दिला. ...............
आता मी दिवाणावर येऊन बसलो. परत माझी नजर चित्राकडे गेली. हे चित्र मला सारखे भेडसावणार की काय असे वाटून दिवाणाच्या अर्धगोलाकार बाजूच्या विरुद्ध बाजूला माझे डोके करण्याचे ठरवले. मला उशीशिवाय झोप येत नसे. एक वेळ गादी नसेल तरी चालते. असो मी माझे काही कपडे गुंडाळून त्याची उशी केली. मग लाईट न मालवण्याचे ठरवून तसाच अंथरूणावर पडलो. मला झोपायला पूर्ण अंधार लागत असे. यावर माझी आणि लीनाची बऱ्याच वेळा भांडणं झाली होती. असो. मी पडलो. माझं लक्ष आता माझ्या डोक्यावरच्या सिलींग कडे गेलं ते जवळ जवळ पंधरा ते सतरा फूट होतं. तिथे काही दगडी कोरीव काम केलेलं असावं . मला ते धड दिसेना मी तिकडे लक्ष दिले नाही नंतर अतिश्रमामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा मला पंधरा वीस मिनिटात झोप लागली. अतिविशाल जागेत आणि अतिलहान जागेत मांणसाला भीती वाटते. माझा दिवाण इतर फर्निचर जिथे होतं तिथून हॉलचा उरलेला भाग बराच मोठा होता. मला झोप तर चांगली लागली होती. पाच सहा तासांनी माझी झोप उघडली. ती मला बाथरूमला जायचे असल्याने . मी जागा झालो. अचानक डोळ्यावर आलेल्या प्रकाशाने माझे डोळे प्रथम दिपले. मग लक्षात आलं की आपण वेगळ्याच ठिकाणी आहोत. मला अजूनही बाथरूम कुठे आहे माहित नव्हतं. आता आली का पंचाईत. मी विचार केला. हे बाथरूम नक्की कुठे असेल. मला अंदाज येईना . पुढचा दरवाजा उघडून मी बाहेर जाऊ शकत होतो. पण तो उघडणार कसा ? हॉलची कोणतीही खिडकी मी उघडलेली नव्हती. पावसाचा दमदार आवाज येत होता. मी माझ्य मोबाईलचा टॉर्च चालू केला. कीचन जवळ गेलो, पण चित्राकडे न बघता. टॉर्चच्या प्रकाशात एक दरवाजा सताड उघडा दिसला. तिथे बाथरूम
वजा एक खोली होती. आतली खिडकी तुटलेली होती. टॉर्चच्या प्रकाशात मला तिथे संडास दिसला. तुटलेल्या खिडकीतून भन्नाट वारा आणि पावसाच्या धारा आत येत होत्या. मी कसातरी वापर करून बाहेर आलो. तिथे नळाची सोय नव्हती. मी दरवाजा लावून घेतला. पण माझ्या माघारी तो परत थाडकन उघडला. परत अंथरूणावर पडलो पण आता मात्र झोप येईना. या जागेची पूर्ण माहिती करून घेतल्याशिवाय इथे लीनाला आणि मुलांना आणणं कठीण असल्याची मला जाणीव झाली. तरीपण पंधरा जून पर्यंत त्यांना आणणं भाग होतं. शाळा उघडणार होती. आज तीन जून . अजून माझ्या हातात दहा बारा दिवस होते. बहुतेक मी चार वाजेपर्यंत जागा होतो. मग मात्र मला परत पेंग आली. सकाळचे
सात वाजले होते. मी खडबडून जागा झालो. बाहेर जेमतेमच उजेड होता. सूर्य पण आळसावल्यासारखा उगवला होता. पुढील दरवाज्याच्या फटीतून उजाडल्याची जाणीव झाली. पक्ष्यांचा आवाजही येऊ लागला. म्हणजे मला समजू लागला.
मी उठून सर्व जोर एकवटून पुढचा दरवाज्या उघडला. पावसाच्या पागोळ्यांचा टर्ररर ......... टप असा आवाज येत होता. मी बाहेर पाऊल टाकलंं. नदीवरून येणारा भन्नाट वारा पाहून मला बरं वाटलं. बँक अकराशिवाय उघडणार नव्हती. बँकेच्या मूळ
चाव्या माझ्याकडे दिलेल्या होत्या. सेफसहित सगळयाच चाव्या मला सांभाळणं भाग होतं. प्रथम विचार आला तो चहाचा. तो कोण देणार होतं.
येताना दूध आणलं असतं तर निदान दूध पिता आलं असतं. पण गॅस नाही याचीही जाणीव झाली. काहीही असो. मी दात घासून चेहरा साफ केला. बाहेर पडून वाड्याच्या भोवती चक्कर मारायला बाहेर पडलो. काल दिसलेली मंदिरासारखी जागा प्रथम पाहिलि. ते एक तुटलेलं शिवमंदिर होतं. आतली पिंडी पन्हळीसहित शाबूत होती . पण छत मात्र अर्धवट कोसळलेलं होतं. सगळीकडे चिखल राड झाली होती. मी पायात काहीच न घातल्याने पाय चिखलाने माखले होते. मंदिरापुढे मी गेलो. तिथून थोड्या लांबवर असलेल्या नदीचे पात्र दिसत होते. आणि जुडॅकर म्हणाला त्याप्रमाणे एक तुटके चर्चही दिसले. आता पाऊस पूर्ण थांबला होता. मग मी गेटच्या डाव्या बाजूला फेरी मारली. त्यातल्या थोड्या भागात तुटलेले चिरे पडलेले होते. मला कळेना असा कोणता भाग होता जो ढासळलेला होता. असो. डाव्या बाजूच्या मागील बाजूस लांबवर डोंगरावर मला किल्ल्याचा भाग दिसत होता. जो मी पाटलांच्या वाड्यातून पाहिलेला होता. इथेही वारा जोरात वाहत होता. आता मात्र घड्याळाने साडे नऊ झाल्याचे दाखवल्याने मी काढता पाय घेत हॉल मध्ये आलो. केरसुणीने थोडा हॉल साफ केला. आतमध्ये उजेड सगळीकडे पसरला होता. अजून मला बँकेत जायला बराच वेळ होता. अर्थात, मी साडेदहा पर्यंत जाण्याचे ठरवले. मग तसे काहीच काम नसल्याने मी माझ्याजवळच्या चाव्यांचा जुडगा घेऊन कमानिंमागच्या तीन खोल्या उघडण्याचे काम सुरू केले. माझ्या बॅगेत खोबरेल तेलाची बाटली असल्याने तिन्ही कुलुपांमध्ये तेल टाकले. हॉलच्या डाव्या बाजूच्या कमानींमागे दोन खोल्या होत्या. आणि उजव्या बाजूला एकच खोली होती. कीचन मध्ये जाऊन ओट्यावरची खिडकी उघडण्याचा प्रयत्न करणं मला भाग होतं. ओट्यावर कसाबसा चढून भल्या मोठ्या खिडकीच्या तावदानाशी मी कुस्ती करीत राहिलो. माझा
जवळजवळ अर्धातास गेला. मी चांगलाच घामाघूम झालो. शेवटचा प्रय्त्न म्ह्णून मी तावदान जोरात ढकलून पाहिल. तावदान तर उघडलं . पण माझा तोल जाऊन मी ओट्यावरून घसरलो. आणि जेमतेम स्वतःला सावरीत अर्धवट उघड्या खिडकीतून बाहेर पाहिले, तर एक मोठा
वड आपल्या अजस्त्र पारंब्या सांभाळीत एका बंद मोठ्या विहिरीवर झुकलेल्या स्थितीत उभा असलेला दिसला. म्हणजे इथे विहीर आहे तर.
आता मात्र मी हॉलमध्ये आलो. खोल्या आल्यानंतर उघडण्याचे ठरवले. साबण वगैरे घेऊन मी बाथरूम मध्ये जाऊन अंघोळ उरकली. माझी काही स्तोत्र होती ती पुटपुटत मी बाहेर आलो. कपडे केले. आणि जुडेकरला फोन केला. त्याला मला घ्यायला येण्यासाठी सांगितल. तो
येईपर्यंत मी दिवाणावर बसून राहिलो. शेवटच्या कमानीमधून वर जाण्यासाठी लाकडी जिना होता. त्याने मला वर जायचे होते. मी वेळ जावा म्हणून जिन्याजवळ आलो. जिना काळ्या तेलकट रंगाचा असावा . मी कठड्याला हात न लावता जिना चढू लागलो. इतकी धूळ त्याच्यावर जमलेली होती. आश्चर्य म्हणजे जिन्याच्या शेवटच्या पायरी जवळ एक दरवाजा होता. नशीब त्याला कुलूप नव्हतं. आता तो दरवाजा कडी उघडून ढकलण्याचा प्रयत्न केला तर तो उघडेचना. मी घड्याळ पाहिल. दहा वाजून गेले होते. जुडेकर लवकरच येईल म्हणून मी दरवाजा उघडण्याचा नाद सोडून देऊन पुन्हा दिवाणावर येऊन बसलो. आता मला चैन पडेना कधी बँकेत जातो असे झाले होते. मी पोर्च मधून बाहेर येऊन जुडेकरची वाट पाहत राहिलो. जवळ जवळ पावणे अकरा वाजता जुडेकर आला. आला म्हणजे मला जंगलाच्या रस्त्यातून वाड्याकडे येताना मला दिसला. मला थोडा रागच आला होता. पण मी विचार केला, ही मुंबई नाही. इथे प्रत्येक गोष्ट सावकाश होत आसणार आणि मला त्याची सवय करून घ्यावी लागणार होती. तरीही मी दोन लिस्ट बनवल्या एक बँकेत पुरी करण्याची कामं आणि घरची कामं. त्यातल्या घरातल्या कामांची लिस्ट मी जुडेकरला देणार होतो. जुडेकर दाराशी आला . त्याने अभिवादन केले आणि म्हणाला. " सर , आपल्यासाठी थोडा नाश्ता आणलेला आहे , तो करून घ्या. " असे म्ह्णुन त्याने तो नाश्त्याचा डबा माझ्यसमोर उघडला . मी खूष झालो. माझा त्याच्यावरच राग कुठल्या कुठे पळाला. लवकरच दरवाजा बंद करून आम्ही बँकेत जाण्यासाठी निघालो. पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली. जंगलाच्या रस्त्यावर आल्यावर मी मागे वळून वाड्याकडे पाहिलं. तो आता एखादा सरदार कसा प्रतिकारासाठी घट्ट उभा राहतो तसा दिसू लागला. जणू विरोधा हा त्याचा आत्मा होता. मी जास्त विचार न करता बँकेत पोहोचलो. माझा हा पहिला दिवस सुरू झाला. सगळी माहिती घेऊन कामाला सुरुवात झाली होती. बँकेतला बहुतेक स्टाफ बाहेरून आलेला होता. आणि त्यातले सगळेच जिल्ह्याच्या ठीकाणी स्थायिक झालेले होते. फक्त मी सोडून. अचानक लीनाचा फोन आला. मी तिला सगळं काही ठीक असल्याच सांगितल. तिच्या सूचना संपेनात , मग मीच कामात असल्याचे सांगून फोन बंद केला. तिला लवकरात लवकर यायचं होतं. मी तिला पुढील रविवारी घेऊन येण्याचे वचन दिल. मलाही ती यायला हवीच होती. घरातल्या सगळ्या गोष्टी पाहत बसण्याचा मला कंटाळा येत होता. हेड ऑफिसला पण मी सब कुछ ठीक असल्याच कळवल. सगळाच स्टाफ ठीक होता. त्यांना मराठी बॉस आल्याने आनंद झालेला दिसला. पण काम काढून घेण्यात मी शशीपेक्षा जास्त कडक होतो. असो. आज जेवणाचा प्रश्न आला नाही. जुडेकरने घरातून जेवण आणले होते. ते मी घेतले. तो जमेल तेवढी माझी सेवा करीत होता. मी हेड ऑफिसला गाडी बाबत विचारणा केली. ती लवकरच जिल्ह्याच्या ठिकाणची शाखा देईल असे मला कळवण्यात आले.
जिल्ह्याच्या ठिकाणी संपर्क साधल्यावर मला गाडी चार पाच दिवसात मिळेल असे सांगण्यात आले. परंतु ड्रायव्हरची पोस्ट माझ्या साठी नसल्याने , मलाच गाडी चालवावी लागेल किंबा मी लोकल ड्रायव्हर ठेवल्यास मला त्याचे पैसे मिळतील असेही सांगण्यात आले. आता संध्याकाळचे पाच केव्हा वाजले
मला कळलेच नाही. सगळा स्टाफही जाण्याच्या तयारीत असताना मोठा आवाज काढीत एक उंच धिप्पाड गृहस्थ बँकेत शिरले. त्यांनी आमच्या एका कौंटरवरील माणसाला विचारले. " कुठे आहेत मॅनेजर ? , आं ...... कुठे आहेत? " माझ्या केविनचा दरवाजा ढकलून ते परवानगी न घेता
आत शिरले. मला थोडा राग आला. पण तो गिळून मी त्यांना बसायची खूण केली. त्यावर चिडून ते म्हणाले, " बसायला नाही आलो मी, माझ्या
लोन ऍप्लिकेशनचं काय झालं ते सांगा आधी. मागचा तो मद्राशी गेला काय ? पैसे खाऊ लोक आहात तुम्ही सगळे, काय समजलात ? .........
ते आणखीनही काही बोलणार होते. तेवढ्यात मी बेल दाबून जुडेकरला त्यांच्यासाठी पाणी आणण्यास सांगितले. त्यांची बडबड चालूच होती. मी त्यांच्या लोनचे पेपर्स मागवले. लोन अगेन्स्ट स्टॉक , ची ती केस होती. अजून बँकेचा अहवाल बाकी होता. चार पाच महिने झाले होते.
मी स्वतः वर ताबा ठेवीत म्हंटले , " आम्ही हेड ऑफिसच्या अहवालाचीच वाट पाहत आहोत. " असे म्हणताच ते भडकून म्हणाले, " हे पाहा , तुम्हाला नसेल द्यायचं तर तुमच्याच बँकेच्या डिस्ट्रिक्ट शाखेतून घेईन. लक्षात ठेवा माझे हात वर पर्यंत पोहोचले आहेत. " काही कारण नसताना मला दिलेली धमकी अजिबात आवडली नाही. मी शक्यतोवर ताबा।ठेवून म्हणालो, " आय ऍम हेल्प्लेस, मि. शितोडीकर. मला अहवाल मिळाल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. आपण जाऊ शकता. " असे म्हंटल्याबरोबर ते चवताळून म्हणाले, " मला घालवताय तुम्ही पण लक्षात ठेवा तुम्हाला घालवल्याशिवाय मी राहणार नाही. असे म्हणून तो धिप्पाड माणूस केबिनचा दरवाजा उघडून तावातावाने निघून गेला. तो गेल्यावर आमचे आसि. मॅनेजर आत आले आणि म्हणाले, "सर तुम्ही योग्य उत्तर दिलेले आहे. एवढंच की हा माणूस वरून दडपण आणण्याची शक्य्ता आहे. " मी ठीक आहे म्हणालो आणि आम्ही हळूहळू सगळेच निघालो. जुडेकर आत आला माही बॅग घेत निघाला मी त्याच्या
मागोमाग निघालो. माझं डोकं त्या धिप्पाड माणसामुळे भणभणत होतं. मी आणि जुडेकर काहीच बोललो नाही. मात्र जाताना जुडेकर म्हणाला
" सर उद्या मी जिल्ह्याच्या गावी जाऊन तुमचं गॅस कनेक्शनच काम करीन. बहुतेक आठ्वडाभरात गॅस नक्की येईल. आणखी एक सर. मी आपल्याला रात्रीचा जेवणाचा डबा घेऊन येईन. माझी बायको करून देणार आहे. फार कशाला सर आपल्या मिसेसना यायला उशीर झाला तर आणि गॅस आला तर ती घरी येऊन जेवणही करून जाईल. " मला त्याच्या आदरातिथ्याचे आश्चर्य आणि कौतुक वाटलं. आपण करू का एखाद्यासाठी एवढं. असा विचारही माझ्या मनात आला. आम्ही निघालो. अर्ध्या तासात आम्ही वाड्यावर पोहोचलो. जाताना परत एकदा त्याने
माझ्या जेवणाचं आश्वासन दिलं. आज येताना दोन तीन थंडपेयांच्या बाटल्या घेतल्या होत्या.

मी घरात शिरलो. साडेसहा झाले होते. सूर्य मावळतीला चालला होता. जुडेकरने बॅग ठेवली आणि तो निघाला. तो परत आठ वाजेपर्यंत डबा घेऊन येणार होता. तो गेला आणि मी उघड्या दिसणाऱ्या संधिप्रकाशाकडे पाहत राहिलो. कपडे बदलून फ्रेश होऊन मी परत दिवाणावर बसलो. प्रथम मी थंडपेयाची एक बाटली उघडली. शांतपणे पेय्य रिचवीत राहिलो. मला परत एकदा संध्याकाळच प्रसंग आठवला. कोण हा शितोडीकर. माझ्या पहिलयाच दिवशी भांडण करून जाणारा. खरंतर ते एकतर्फी भांडण होतं. मी फारसा प्रतिसाद न दिल्याने ते वाढले नाही आणि म्हणूनच त्याला जास्त राग आला असावा. माझ्या डोक्यातून तो जाईना. मग मी सकाळचे राहिलेले काम पुरे करण्याचे ठरवून लाकडी जिन्याने वर निघालो. सर्व जोर एकवटून मी जिन्यावरच्या दरवाज्याची कडी काढली आणि दरवाजा उघडला. थोडासा कुबट वास आणि धूळ मिश्रीत मातीचा भपका आला. मी डाव्या बाजूला वळलो. बाजूच्याच भिंतीमध्ये एक अर्धवट खिडकी उघडी होती. ती बहुतेक बाजूच्या भागातील कॉरिडॉर मध्ये उघडत होती. मी ती ढकलून पाहिली. पण ती उघडेना मग लक्षात आलं तिला तार खिळवून ती बांधली होती. असो. अर्धवट पडलेल्या मंद संधिप्र्काशात पलिकडचा भाग दिसत होता. तिथेही जिना असावा पण तो लहान आणि पायाखाली बसवलेल्या दरवाज्यापुरता मर्यादित असावा. नक्कीच तिथे दरवाजा होता. पण खालच्या खोल्यांमध्ये जाणारा की आणखीन कुठे .......? मला अंदाज येईना मी डोळे फाडून पाहत होतो. तो तो काळोखाच्या भरण्यामुळे कमीत कमी दिसत होते. मग पुन्हा एकदा सुट्टीच्या दिवशी वर येऊन पाहण्याचे मी ठरवले. वाड्यात कोठेच काही आवाज नव्हता........... माझ्या पायांचा आवाज सोडून . माझ्या बरोबर आणलेले दूध मी एका थंडपेयाची बाटली विसळून त्यात भरले. आणि किचनमधल्या ओट्यावर ठेवून आलो. लाईट लावला. आणि दिवाणावर पडून राहिलो. आता काय करायचं ? रोजचं जेवण जुडेकरला सांगणं योग्य नव्हतं. एखादा तरी स्टोव्ह आणि केरोसिनचा डबा आणावा लागणार होता. .......बाहेर पुन्हा पावसाने झिम्मा खेळायला सुरुवात केली . जुडेकरला उगाचंच आपण हो म्हंटलं. असं वाटलं. पण मग मी जेवणाची काय व्यवस्था करणार होतो .......? काही नाही . हेच उत्तर पुन्हा पुन्हा आदळतराहिलं. तरीही मला कोणत्याही दृष्टीने , आपण ही बदली उगाच स्वीकारली असे वाटले नाही. अजून तरी मला आशा होती. आजपर्यंतच्या बदल्यांमध्ये सुद्धा प्रतिकूल परिस्थिती होती. पण अगदी जेवणाची पंचायत व्हावी असं कधी घडले नाही. माझा तेवढ्यात डोळा लागला. फक्त पंधरा वीस मिनिटंच झाली असतील . मी जागा झालो तो मुख्य दरवाज्याची कडी वाजल्याने . धपडत उठून मी दरवाजा उघडला. जुडेकरच आला असणार याची खात्री असल्याने मी परत दिवाणाकडे वळलो. जुडेकरचा आवाज न आल्याने मी पुन्हा वळलो. पाहतो तर काय, बाहेर एक खेडूत माणूस उभा होता. रात्रीच्या अंधारात त्याचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. डोक्यावर तरटाच्या पिशवीसारखं काहीतरी ओढलेलं. अर्धी चड्डी घातलेला तो माणूस , त्याच्या हातात विळा होता. म्हणजे मासे सोलायचा. माझ्या कडे पाहून तो विचित्र हसला. प्रथम माझी प्रतिक्रिया दरवाज्या बंद करण्याची झाली. " सायेब, हितं राह्य्ला आला जनू तुमी . मच्छी गावली नाय म्ह्नूनशान हितं शिरलो. म्हंनलं वाईचं थांबावं. तसा मी हितं येत न्हाई. " आता मी भानावर आलो. त्याला आत यायला सांगावं का याच विचार करीत राहिलो. तो आत न येताच म्हणाला, " काय हाय ना , हा भुताटकीचा वाडा हाय. तुमी कसं काय ऱ्हाताय काय कळना मला. ........." तो थांबला आणि म्हणाला, " हितं बसू का ? ...... " मी काही बोलायच्या आतच त्याने बाहेरच बसकण मारली. तो सारखा आत बघत होता. माझं न बोलणं आणि सतत त्याच्याकडे पाहत राहणं यांने तो थोडा घाबरल्यासारखा दिसला. त्याने मग विडी काढली आणि ती शिलगावून तो झुरके घेत बसला. तेवढ्यात पोर्चमध्ये शिरणारा जुडेकर दिसला. त्याच्या हातात डबा होता. त्याने खेडुताला बसल्याचे पाहिले आणि तो एकदम रागाने त्याला म्हणाला, " ए चल , चल नीघ इथून " मग माझ्याकडे वळून म्हणाला, "अवो , साहेब असं कोणालावी घेऊ नका घरात. " त्या माणसाने धडपडत डोक्यावर तरट टाकलं आणि तो गेटामधून बाहेर पडला.
तीन चार दिवस असेच गेले. यथावकाश स्टोव्ह आणि केरोसिनचा डबा आला. एक दोन चादरी
आणल्या. सध्या पावसामुळे म्हणा किंवा अतिशय खुलं वातावर्ण असल्यामुळे म्हणा , जबरदस्त वारा वाहायचा , थंडीही वाजायची. मी थोडा
वाड्याला रुळल्यासारखा झालो. आणि कदचित वाडा मला. पण वाडा तटस्थ होता. अजूनही घरातल्या भिंती काहीही प्रतिक्रिया देत नव्हत्या. म्हणजे कसं आहे . आपल्याला घराच्या भिंतींची कधी जाणीव होते का ? नाही ना ? इथे तसं होत नव्हतं घरात शिरल्यावर कुणातरी अज्ञात आणि परक्या वातावरणात आपण जगत असल्याची भावना मला येत होती. अर्थात मला अजून आठवडा होत होता. .......मी बँकेत जात होतो. लीनाचे सारखे फोन आणि सूचना येत होत्या. मी न कंटाळता त्याना प्रतिसाद देत होतो. माझ्या इच्छेप्रमाणे मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना नवीन माती टाकून काही झाडं , तुळस वगैरे लावली गेली . लीना यायच्या आत तिला आवडेल असं वातावरण मला तयार करायचं होतं. वाड्याचं शक्यतोवर जुनाट रूप घालवून सहन होईल इतपत तरी रुप बदलायचं होतं. फक्त मी अजून वाड्याच्या मागच्या बाजूला गेलो नव्हतो. मी जुडेकरला शनिवारी रात्री राहाय्ला बोलावले. तो आधी नाही म्हणत होता. पण माझा फार आग्रह दिसल्याने तो तयार झाला. अजून तरी गाडी मिळण्याची चिन्हे दिसेनात. त्यामुळे रोज जुडेकर येत जात असे. हळूहळू जुडेकर शिवाय मला चैन पडेनासे झाले. त्याच्या बायकोचा डबा चालूच होता. मी जुडेकरला काहीतरी भेटवस्तू देण्याचे ठरवले. गॅसचं काम अजून चार दिवस तरी होणार नव्हतं. ते पुढल्या आठवड्यावर गेलं. शनिवार उजडला. मी बँकेत गेलो. तशी बँकेत फार गर्दी कधी नसायचीच. त्यामुळे फार कॅश जमत नसे. आज बाथरूम संडास नीट करून घ्यायचे असल्याने प्लंबरला घेऊन येण्यास जुडेकरला सांगितलं. जुडेकर डबा घेऊन येणार होता. आज प्रथमच मी स्वतः चालत घरी आलो. मला माझ्या कपडे धुण्याची आठवण झाली. मी त्याप्रमाणे कपडे भिजवले. मग माझी पँट जी मी इकडे येताना घातली होती. सवयीप्रमाणे मी सगळे खिशांमध्ये हात घालून पाहिलं. एका खिशात मला कागदाच बोळा लागला. मला स्वतःची लाज वाटली. शाळकरी पोराप्रमाणे मी खिशात कागदाचा बोळा घुसडला होता. मला येऊन आता जवळ जवळ चार पाच दिवस झाले होते. मी कुतुहल म्हणून बोळावजा कागद बाहेर काढले. ते एक बंद पाकीट निघाले. मग मला एकदम आठवले. मी आधी त्या पाकीटाच्या मागचे पुढचे भाग पाहिले. पण ते कोणी पाठवल होत हे कळत नव्हतं. मी ते उघडल. त्यात अर्ध्या वहीच्या पानाचा घडी घातलेला कागद निघाला . आत फक्त एकच वाक्य लिहिलेले आढळले. "का जातोयस तू वाड्यात............? खाली सही नाही काही नाही. मागची बाजू पाहिली . तिथेही काही लिहिलेल नव्हतं. मी त्याचा वास घेऊन पाहिला. पण तसा काही वास वगैरे आला नाही. मी पुन्हा पुन्हा विचार करू लागलो. कोणी लिहिले असेल ? गोळेनी तर नाही ? (गोळे मांत्रिक होता ) पण इथे यायच्या आधीची ती चिठ्ठी होती . मी सध्या चिठठी दिवाणावर ठेवली . कपडे भिजवले. जेवणाचा डबा यायला अजून बराच उशीर होता. अजून दिवस नीट मावळला नव्हता. आता मला नदीबद्दल कुतुहल नव्हतं की वाड्याच्या वातावरणाबद्दल. मी दिवाणावर पडून राहिलो. मग मी उठून खालच्या दोन खोल्या उघडून पाहायच ठरवल.
पहिल्या कमानीखालून गेल्यावर लागणाऱ्या पहिल्या खोलीचे कुलुप लवकरच उघडले. दरवाज्या
नेहेमीप्रमाणे बराच जोर केल्यावर उघडला. माझ्या डाव्या बाजूला असलेली खिडकी बंद असून मोठी होती. इथे प्रत्येक खिडकी मोठी होती.
बंगल्याचे डिझाइन करणाऱ्याला खिडक्यांबद्दल विशेष प्रेम असाव अस दिसल. फक्त या काचा साध्या म्हणजे पारदर्शक होत्या. कदाचित नंतर
लावलेल्या असाव्यात. तिथून येणाऱ्या संधिप्रकशात आत एक मोठा म्हणजे प्रचंड आकाराचा बेड दिसला. ज्याचं नक्षिकाम वेगळंच होतं. त्यावर
टाकलेल्या गाद्या मात्र बऱ्याच जुन्या होत्या. बेडच्या एका बाजूला एक भला मोठा आरसा होता. सगळं फर्निचर कसं चॉकलेटी काळया रंगाचं असावं. बेडवर मच्छरदाणी लावण्याही सोय होती . त्याच्या दुसऱ्या बाजूला एक विचित्र तोंडाचा पक्षी होता‍. ज्याच तोंड घुबडासारखे होत आणि त्याचा एक पाय वर उचलेल्या आणि मारण्याच्या पवित्र्यात होता. त्याच्या चोचीच्या आत दात असावेत. पक्षाचे पंख पसरलेले होते. तो जवळ जवळ दीड ते दोन फूट उंचीचा होता. मी त्याचे निरिक्षण करणयात गुंतलो होतो. हळूहळू संधिप्रकाश कमी होत होत लालसर पिवळा झाला. आतल्या सगळ्याच वस्तूंवर एक प्रकारची गूढ छाया पसरली. गाद्या नक्की किती जुन्या होत्या कुणास ठाऊक त्याही मला नवीन करून घ्याव्या लागणार होत्या. मी खोलीतून बाहेर आलो. येताना सहज लक्ष गेले . बेड समोरच्या भिंतीवर एक दरवाज्या होता. तो कुठे जात होता कुणास ठाऊंक . मी तो सध्या न उघडण्याचं ठरवलं. ............. खोलीतून बाहेर आल्यावर मी परत दिवाणावर बसून एक थंडपेय्याची बाटली उघडली. आजकाल मी थंड पेय्यच्या बाटल्या आणि बिसलेरी पण आणित होतो. पुन्हा इकडे तिकडे वेळ घालवून मी सरदारांच्या चित्राकडे पाहिले. त्यांच्या नजरेतला क्रुद्धपणा तसाच होता. मी तिकडे दुर्लक्ष करून कीचनमध्ये गेलो. मंद होत जाणाऱ्या संधिप्रकाशात मला विहिरीवरच वड वाऱ्यामुळे गदागदा हलत असल्याचे दिसत होते. अर्धवट उघड्या खिडकीतून वारा वेगान आत घुसत होत. मी लाइट लावला. पुन्हा भिंतींकडे पाहिले . त्यांचा रंग जसाच्या तसाच बुरसटलेला काळसर होता. इथे झोपेपर्यंत वेळ घालवणं कठीण होतं. कीचनमधला लाइट तसाच ठेवून मी हॉलमध्ये आलो. समोरच्या एक दोन खुर्च्यापण मी साफ केल्या होत्या. त्यावर बसून मी माझ्या बॅगेतली डायरी काढली. मला डायरी ठेवायची जुनी सवय होती. मी दिवाणावर पडलेली चिठ्ठी उचलून डायरीत ठेवली आणि डायरी लिहायला घेतली. मोबाईलच्या सहाय्याने काही फोटो पण काढले. बाहेर चांगलाच काळोख पडला होता. घरात बसण्या पेक्षा बाहेर फेरी मारून यावं असा विचार करून मी छत्री (नवीन घेतली होती बरं का )घेऊन दार उघडले. पाऊस दमल्यासारखा थांबला होता. समोरचं काहीच दिसत नव्हतं. तरीही मी तसाच बाहेर पडलो. पोर्चच्या उजव्या बाजूने बाहेर पडलो. अंगावर थंडगार वारा आला. ओलसरपणामुळे तो सुखावह वाटला. मग मी शिवमंदिरापर्यंत गेलो. आतल्या पिंडीवर काहीही परिणाम दिसला नाही. ती जशी होती तशीच दिसली . किती वर्षांपासुन ती तिथे होती कुणास ठाऊक. माझी नजर सहज वाड्याकडे गेली. जो भाग मला भाड्याने दिला नव्हता. तिथल्या बाहेरच्या बाल्कनीसारख्या भागात बांबूचे जुनाट फर्निचर भरून ठेवले होते. तिथे असणारे दोन दरवाजे आणि खिडक्या जेमतेमच दिसत होत्या. त्या मजल्यावर मात्र कळसासारखा भाग होता. त्यावर ध्वज लावण्याची काठी असावी असे वाटले. सर्वच वातावरणात एक प्रकारची तटस्थता आणि निर्जिव पणा भरून राहिला होता. या सर्व वातावरणात जिवंतपणाची माझीच हालचाल असावी असे दिसले. मी माघारी वळलो. घरात परत आलो. आणि कीचन मध्ये गेलो. तिथला लाइट मी तसाच ठवला होता. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्याने मी डायरी लिहायला घेतली. अर्धा तास तसाच गेला. तेवढ्यात कडी वाजली.. घाईघाईने मी दरवाज्या उघडला. बाहेर जुडेकर उभा होता. तो आत आला.
त्याने आणलेला डबा मी उघडला. तो दोघांसाठी होता. अर्ध्यातासात आमची जेवणं झाली. मग त्याने बाहेर जाऊन सिगारेट ओढली. मला सवय नसल्याने म्हणा किंवा माझा मान राखण्यासाठी म्हणा त्याने तसे केले असावे. तेवढ्यात माझा मोबाइल
वाजला. लीनाचा फोन होता. औपचारिक बोलणे झाल्यावर तिने मला एक घटना सांगितली. आजच संध्याकाळी एक भिकारी आला होता.त्याच्या अंगावर अक्षरशः चिंध्या होत्या. हातात सापाच्या आकाराची काठी होती. आणि त्याचे डोळे खूप खोल गेलेले दिसत होते. जिवंतपणाची थोडीशी खूण दाखवणारे डोळे मात्र अमानवी वाटत होते. त्याच्या हातात झोळी होती. त्याला भिक्षा घातल्यावर त्याने झोळीमधून तांदुळाचे दाणे आपल्या घरावर टाकले आणि काहीतरी पुटपुटत तो निघून गेला. तिला भीती वाटल्याचे ती म्हणाली. फोन बंद झाल्यावर माझ्या विचलित झालेल्या मुद्रेकडे पाहत जुडेकर म्हणाला, " काय झालं सर ? काही गंभीर आहे का ? " मी उडवून लावत त्याला म्हणालो, " जुडेकर उद्या बरीचशी कामं व्हायला हवीत. मग आम्ही दोघांनी मिळून उरलेल्या दोन्ही खोल्या उघडल्या. पण त्याही पहिल्या खोलीसारख्याच होत्या. दोन्ही कडे तोच प्रकार होता. उद्या त्याही साफ करवून घेण्याचे ठरवले . लीनाचा अनुभव जर त्याला सांगितला असता तर त्याने त्याचा कदाचित वेगळाच अर्थ काढला असता. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने आम्ही दोघेही उशिरा उठलो. आमचा चहा वगैरे होईपर्यंत प्लंबर आणि सुतार येऊन उभे राहिले. ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. तसे मी जुडेकरला सांगितलेही . पण त्याने लक्ष न देण्यचे सुचवले. मध्यंतरी जुडेकरची बायको आली. ती स्कर्ट घातलेली एक टिपिकल ख्रिश्चन महिला होती. मध्यम वयाची ती स्त्री आल्याबरोबर तिने आवरा आवरीला सुरुवात केली. तासाभराच्या आत हॉलला आणि एकंदर जागेलाच राहण्यासारख्या जागेचे स्वरूप प्राप्त झाले. जुडेकरने आजच्या दिवसात बऱ्याच गोष्टी साधल्या होत्या. कीचन मध्ये ही एक दोन लाकडाच्या मांडण्या तयार करून घेतल्या. आता फक्त गॅसची सोय
व्हायला हवी होती. जुडेकरच्या बायकोने स्वैपाक केला होता. पुष्कळसा आपल्या घरच्यासारखा केला असल्याने जेवणाने समाधान मिळाले.
गावातली शाळा मिशनरी असल्याने जुडेकरच्या मदतीने शाळा प्रवेशाचे कामही सोपे झाले. जुडेकर देवासारखा धावून आला होता हेच खरे.
असो, संध्याकाळच्या सुमारास एक विचित्र घटना घडली. कामगार गेलेले होते. जुडेकरही जाण्याच्या तयारीत होता. त्याचे व त्याच्या बायकोचे मी परत परत आभार मानले. ते निघणार तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. आणि एक कुठूनसे ,काळी टोपी आणि काळी कफनी घातलेले ,फकीर बाबा "अल्ला ..... असे मोठयाने ओरडत , हातातली चमत्कारीक आकाराची काठी आपटत थेट पोर्चमध्ये घुसले. जुडेकरलाही ते आवडले नाही. ते मला पाहून म्हणाले, " बच्चा , तू यहां रहने आया, सम्हलके रहना, ये जगा रहनेलायक नही है. फिर भी मै तुम्हे ये उदी देता हूं , जो शाम इसी वक्त आगमे डालना फिर करिश्मा देखना. सारी तकलिफे दूर होगी. तेरे बाल बच्चे और बिवी छे महिनेके बाद दुखी होंगे. समझे ? " असे ओरडून जाऊ लागले. मी त्यांना आणखी काही विचारणार होतो. पण ते " अभी कुछ नही बताउंगा , अभी कुछ नही बताउंगा असे मोठ मोठ्याने ओरडत नदीच्या दिशेने निघून गेले. मग जुडेकर मला म्हणाला, " सायबानू, ह्ये मनावर घेऊ नका हां. असलं कायपन होत नाय. आनी ती उदी वापरू नकासा उगा तकाटा कशापायी. " असे म्ह्णून ते गेले. मी त्यांच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिलो. ते गेले आणि अचानक मला एकटे वाटू लागले.

मी घराचा दरवाजा लावून घेतला आणि वेळ पाहिली. आठ वाजत होते. कामगार आणि त्यांची कामे यामुळे दुपारी विश्रांती मिळाली नव्हती. रात्रीचा स्वैपाक तयार होता. बाहेर पावसाने गुधडा घालायला सुरुवात केली होती. बरोबरीने वीजही साथ देतअसल्याने एक प्रकारचा राक्षसीपणा वातावरणात पसरला होता. दिवाणावर बसण्यासाठी मी गेलो , तिथे मला उदीचे खडे आणि त्यांची रेव दिसली. त्यातले काही खडे उजेडात चमकत होते. पिवळसर तांबुस रंगाचे खडे मी गोळा केले . एका पेपरात गुंडाळून त्याची पुडी बनवली आणि ती समोरच्याच खुर्चीवर ठेवली मला अचानक फकिराची आठवण झाली. तो म्हणाला ते किती विरोधी होतं हे आठवलं. सब तकलिफे दूर होगी आणि त्याच बरोबर छे महिने के बाद बिवी बच्चे दुखी होगे , हे मला पटेना. तसाही माझा बुवा, बापू आणि फकीर आणि साधू यांच्यावर बिलकुल विश्वास नव्हता. जास्त विचार न करता मी दिवाणावर आडवा झालो आणि डोळे मिटले.बघता बघता मला डुलकी लागली. सारख्या होणाऱ्या दगद्गीने मला डुलकी लागली असावी. अचानक विजेच्या " धडाम ढुम ........ कड कड कड ............" असा आवाज झाल्याने मलाजाग आली.मी मोबाइलमधे वेळ पाहिली. जेमतेम नऊ वाजत होते. मी एकवार माझ्या भोवतालच्या वातावरणाकडे नजर टाकली. आता बऱ्यापैकी साफ सफाई झाली होती. अर्थातच भिंतींचा काळेपणा गेला नव्हता. उठून मी समोरची दरवाज्याच्या बाजूची कमानी खालची खिडकी उघडली . बाहेर पावसाच्या जाड जाड धारा पडत होत्या. आवाजही फार येत होता. जवळच असलेली उघडी बेड रुम मी आत जाऊन पाहिली. गाद्या नसल्याने बेड उघडावाघडा दिसत होता. कपडे न घातलेल्या एखाद्या मल्ला सारखा. मी आत शिरलो , पण मला त्या बेडवर बसावेसे वाटेना. आता नवीन गाद्या येतील तेव्हाच त्याचा वापर करता येईल . असा विचार करून मी ती खोली लावून घेतली........ स्वैपाकघरात जाऊन तयार पण रिकाम्या मांडण्या दिसल्या साफ केलेले फडताळ मी उघडले. उगाचंच आत हात घालून फिरवून पाहिला. ते स्वच्छ होते. मग ओट्यावरची भाजी गरम करण्यासाठी वातींचा स्टोव्ह पेटवला. भाजी गरम करून डिशमध्ये पोळी आणि भाजी घेऊन मी परत दिवाणावर येऊन बसलो. खाण्यासाठी मी तोंडात घास घालणार तेवढ्यात माझी नजर सरदार साहेबांच्या फोटोवरून फिरली. त्यांचे डोळे उग्रच होते. पण फोटो मात्र चांगलाच चकाकत होता. मला जरा आश्चर्य वाटलं. मग लक्षात आलं की कामगारांनी तोही स्वच्छ केला होता. मी लक्ष न देता जेवायला सुरुवात केली. अचानक मोबाईलचा रिंगटोन वाजला. " घर आया मेरा परदेसी ............" हे गाणं होतं. मला ते अजिबात आवडलं नाही. निदान आत्ता तरी. लीनाचा फोन होता. तिने वाटेल ते गाणे रिंगटोन म्हणून ठेवले होते. तिचा आवाज आला जरा बरं वाटलं दुसरी कोणीतरी व्यक्ती माझ्याबरोबर असल्याचे जाणवले. आठवडाभराच्या घरातल्या एकूण कामाचा तिने आढावा घेतला. एरवी मी चिडलो असतो . पण ती एकच व्यक्ती अशी होती की मला घरदार असल्याची जाणीव करून देत होती. तिला मी कधी बोलावणार आहे यावर तिने बराच वाद घातला पण मी तिला आणखीन आठदहादिवस लागतील असे सांगितल्यावर ती नाराज झालेली दिसली. असो ती त्यावर परत काहीतरी वाद घालेल या भीतीने मी फोन बंद केला.
लवकरच माझं जेवण झालं . मी भांडी घासून टेवली. नळ एकदम जोरात होता. कुतुहल म्हणून मी स्वैपाकघराची खिडकी उघडली. माझ्या तोंडावर पावसाची झड आली. समोरच्या काळोक्या वातावरणात मी पाहण्याचा प्रयत्न केला. विहिरीवरचा वड गदा गदा हालत होता. भयानक वारा आणि पाऊस यांना घाबरून मी खिडकी बंद केली. बाहेर येऊन मी पुढचे दार उघडे टाकले. मी बाहेरच्या एका पायरीवर बसलो. समोरचा जंगलाचा पॅच आकाशापेक्षा जास्त काळा दिसत होता. जंगल ते वाडा एकही झाड नव्हतं. मध्ये झाडंच उगवली नव्हती का , काही वर्षांपूर्वी एकाद्या आगीत मधली झाडं जळून गेली होती.मला कळेना. धुंवाधार पावसामध्ये तसं अंधूकच दिसत होतं. नदीचाही जोरदार आवाज येत होता.मी आवारातल्या मंदिराकडे पाहिलं. ते तटस्थपणे बसलेलं होतं. जणू घट्टपणे बस असे मला सांगत होते. मला थोडा धीर आला. खरचं आपण न डगमगता इथे राहिलं पाहिजे. एखादी वास्तू बिनवापराची असली म्हणून काय झालं. आता अंगावर पाणी जास्त उडू लागल्याने मी परत घरात आलो. आता मला झोप येत नव्हती. मी वरच्या मजल्यावर जाण्याचे ठरवले.
……………………………………… मुख्य दरवाज्या लावून घेतला. मी जिन्याने वर जाऊ लागलो. वरही तशाच खोल्या होत्या. फक्त बाजूचा भाग जो मी घेतला नव्हता
तिथे असलेल्या खिडकीतून मी आत डोकावून पाहिले. काळोखाशिवाय मला काहीही दिसत नव्हते. मग मी कॉरिडॉरमधला दिवा लावला. त्या
पिवळ्या प्रकाशात अंघुक दिसू लागले. खिळवलेल्या खिडकीच्या अर्धवट उघड्या फटीतून मी आत पाहत होतो. आतला जिना त्याचा कठडा मी
अंदाजानेच ओळखला. अचानक कसली तरी सावलीसारखी हालचाल जाणवल्याने मोबाइलचा टॉर्च सुरू केला. एक काळंकुट्ट मांजर आपली शेपूट फुगवून माझ्याकडे टक्क पाहत होतं. त्याचे हिरवे डोळे विचित्र रितीने चमकत होते. मग मात्र मी अर्धवट खिडकी उघडण्याचा प्रयत्न सोडून दिला. त्याने माझ्यकडे पाहून " म्यांव " केलं . मी खिडकीची फट आणखिनच कमी केली. दिवसा उजेडीच पाहावं लागेल असे स्वतःशी पुटपुटत मी
वरच्या खोल्या उघडण्याचे काम हाती घेतले. वरच्या मोठ्य खोलीत खालच्या सारखाच एक बेड होता. मात्र तो लहान होता. त्याला मच्छरदाणी
बांधण्याची सोय नव्हती. आत नशिबाने कोणताही लाकडी अथवा दगडी पुतळा नव्हता. मी दरवाज्या लावण्यासाठी मागे वळलो आणि आत कुठून
तरी काहीतरी पडल्याचा आवाज झाला. मी विशेष लक्ष न देता दरवाज्या लावू लागलो. पण तो लागेना काहीतरी अडत असावं म्हणून मी खोलीतला लाइट लावला. आणि जे दृष्य मी पाहिले ते विचित्र होते. एका भिंतीत बसवलेल्या कपाटाचे दार अर्धवट उघडे होते. आणि दाराजवळ
एक मानवी कवटी पडलेली दिसली. बाहेर पाऊस असूनही मला घाम फुटला. असलं दृश्य मी कधीच पाहिलं नव्हतं. मानवी कवटी फक्त शाळेत असताना प्रयोग शाळेत आणि रस्त्यावरच्या जादुगाराकडे पाहिली होती. तिच्यामुळेच दरवाज्या लागत नव्हता. आता तिला हात लावून ती बाजूला करणं मला भाग होतं. मला आता भीती आणि किळस या भावना एकदम आल्याची जाणीव झाली. ................ थोडावेळ मी पलंगाला धरून उभाच राहिलो. मी त्याच खोलीत कुठे काठी सापडते का ते पाहू लागलो. आपण कशाला हात लावा. मला काठी सापडेना. असलं काही अचानक समोर येईल याची मला कल्पनाही नव्हती. बरं झालं लीना आली नव्हती. माझ्या मनात आलं शेजारच्या भागातली खिडकी उघडी असती तर त्यातून ही कवटी तिथे टाकता तरी आली असती. अचानक पुन्हा मांजाराचा "म्यांव " असा आवाज आला. ते कुठे आहे पाहण्यासाठी
मला या खोलीचा दरवाज्या बंद करूनच जाता आलं असतं. मी पुन्हा पलंगाखाली काही सापडतंय का ते पाहू लागलो. तिथे एक लोखंडाची
सळई पडलेली दिसली. ती मात्र माझ्या डवल उंचीची होती . आता ती वापरून कवटी सरकवावी लागणार होती. मी लवलवणारी सळई मोठा आवाज करीत बाहेर काढली. कशी तरी ती कवटी पर्यंत नेली आणि एकदाची कवटी सरकवली. कवटी अगदीच जीर्ण झालेली होती. मी हात लावला असता तर थोड्या भागाचा भुसाही झाला असता. तिच्यात भरलेली माती किती वर्षांची होती कुणास ठाऊक. हातातली सळई मी तशीच
घाबरून परत टाकली तिचा परत आवाज झाला . मी दरवाज्या जवळ जाऊन जवळ जवळ बाहेर उडीच मारली . आणि खोलीला एकदाचं
कुलुप घातलं. उद्याच्य उद्या हिची विल्हेवाट कोणालाही न सांगता (त्यावेळेला माझ्या मनात जुडेकर होता ) लावली पाहिजे. मी विचित्र मानसिक अवस्थेत खाली आलो. दिवाणावर बसलो. सहज म्हणून माझी नजर सरदार साहेबांच्या चित्राकडे गेली. त्यांचे डोळे मला विशेष लकाकताना दिसले. निदान मला आत्ता तरी तसा भास झाला होता. ही कवटी कोणाची असेल. इथे असं आही निघेल याची मला कल्पनाही नव्हती. ती कवटी आत्ताच नष्ट केली पाहिजे . अशी मला निकड भासू लागली. कारण सबंध रात्र मला काढायची होती.
रात्रीची झोप चाळवाचाळवीत गेली. मध्येच स्वप्नात फकीर बाबा यायचे आणि म्हणायचे , " देख तूने उदी आगमे डाली नही अबतक . तू पछताएगा. जल्दी कर. उदीको आग दिखा दे. ........... " आणि एकदम अंगावर यायचे. मग झोप उघडायची. मी लाइट उघडा ठेवीतच होतो. जाग आली की माझं लक्ष सारखं जिन्याकडे जात होतं. मध्येच उठून मी वेळ पाहिली. रात्रीचे दोन वाजत होते.
आश्चर्य म्हणजे अशा वाड्यांमध्ये एखादं तरी ठोक्याचं घड्याळ असतं पण ते दिसलं नाही. पुन्हा झोपायचा प्रयत्न केला . सरदार साहेबांच चित्र
दिसू नये म्हणून मी दिवाणावर उलटा झोपत असे. कशी तरी सकाळ झाली. आळसटल्यासारखा मी उठलो. चहा केला. तयार झालो आणि
जुडेकरची वाट बघत राहिलो. दहा साडेदहाला जुडेकर आला. आम्ही दोघे मग बँकेत गेलो. दिवस कंटाळवाणा गेला. सारखी झोप येत होती .
नियमित कार्यालयीन काम चालू झालं होतं . तीनचार दिवस असेच गेले. अचानक एक दिवस जुडेकर माझ्या केबिनमध्ये आला. आणि त्याने मला उद्या गॅस सिलिंडर मिळणार असल्याची बातमी मला दिली. मी त्याला कनेक्शन वगैरे कामं करून घेण्यासाठी वाड्याची चावी दिली. संध्याकाळी घरी गॅस आलेला दिसला. आता रंगकाम बाकी होतं ते करण्याचं ठरवलं . अर्थातच जुडेकरने पुढाकार घेऊन तेही करून दिले. सध्या तरी पांढरा रंग दिला होता. काही का होईना सगळ्या खोल्या स्वच्छ झाल्याचे दिसले. लीना येईपर्यंत बहुतेक सगळी कामं होतील याची खात्री झाली . मध्यंतरी मिशनरी स्कूलच्या प्रिन्सिपॉलने मला भेटायला बोलावलं. मी गेलो. गावातच असलेलं एक जुनाट चर्च आणि त्याच आवारात असलेली शाळेची दुमजली इमारत एखाद्या म्हाताऱ्या माणसाने अंगावर पांढरी शाल गुंडाळून बसावं अशी दिसत होती. शाळेचा रंगही
पांढराच होता. प्रिन्सिपॉलच्या केवीनकडे मी आणि जुडेकर गेलो. जुडेकरला बाहेर त्यांबण्यास मी सांगितले, पण तो म्हणाला मी बरोबर आलो तर तुमचे काम जास्त चांगले होईल. शाळेच्या प्रमुख एक म्हाताऱ्या नन होत्या. त्या जुडेकरला ओळखत होत्या. आम्ही दोघे केबिनमध्ये गेलो.
बसल्यावर नन मॅडम त्यांच्या अशुद्ध मराठी मध्ये म्हणाल्या, " तुमी एकलच यायला हवं होतं. . याला बरोबर कशाला आणला... ? " मी जुडेकरला बाहेर जाण्याची खूण केली. तो नाराज दिसला. पण गेला. मग मी मॅडमना सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर त्या म्हणाल्या, " आमचं स्कूल मिशनरी आहे. तुमच्या मुलांना आमची सिस्टिम घ्यावी लागेल. इथे रोज प्रभूची प्रेयर चालते. आनी बायबलपन सिकवले जाते.
ते तुमाला चालेल काय ? आनी इंग्लिशमध्ये बोलावं लागेल. " मी ते मान्य केलं. फक्त मुलांची मुलाखत घेऊन मगच प्रवेश द्यायचा की नाही ते ठरवले जाईल. आता फक्त लीनाला आणि मुलांना आणायचे होते. ते मी येणाऱ्या रविवारी करण्याचं ठरवलं. शनिवारी संध्याकाळच्या बसने जाऊन रविवारी त्यांना घेऊन येण्याचे लीनाला मी फोन करून कळवलं. तिलाही ते एक्साइटिंग वाटलं. आजपर्यंत मी माझ्या कोणत्याही बदलीच्या ठिकाणी घेऊन तिला गेलो नव्हतो. मध्यंतरी जुडेकरने एक माळी आणून वाड्याच्या समोरच्या मोकळ्या जागेत लाल माती टाकून काही झाडं लावली होती. त्यात फुलझाडंही होती. तुळसही मुद्दाम लावली होती. अचानक लीनाने माझ्या आईचा फोन आल्याचे सांगितले. आता तिला इथे आणणं शक्य नव्हतं. म्ह्णून मी लीनाला तिला कळवायला सांगितलं. त्यावर आई नाराज झाल्याचे तिने सांगितले. मला सध्यातरी म्हातारी माणसं घरात नको होती. कदाचित मी तिथेच चूक केली की काय कोण जाणे. कारण पुढे जे घडलं तेव्ह मला हे प्रकर्षाने जाणवलं.
असो. एकदाचा शनिवार आला. मी बँकेतून लवकर निघून मुंबईसाठी बस पकडली. जाण्या आधी जुडेकरला वाड्यावर राहण्यासाठी सांगितलं
पण तो नाही म्हणाला. तेवढं मात्र सांगू नका असं चक्क त्याने मला सांगितलं. मी त्याला परोपरीने समजावून सांगितलं . पण त्याची इच्छा दिसली नाही. मग मी सोडून दिलं. ..............
बस वेगात जात होती. मी बस सुटताच सहज बस स्टँडकडे पाहिलं . मला पाटील दिसले. मी त्यांना हाक मारायचा प्रयत्न केला. पण त्यांना ऐकू आलेलं दिसलं नाही. मी मात्र आल्यावर त्यांचा वाडा शोधून काढायचं ठरवल. रात्री अकरा वाजता घरी पोहोचलो. लीनाला बरं वाटलेलं दिसलं. तिने हरिदासचा फोन आल्याचं सांगितलं. म्हणजे मला रजिस्ट्रेशन करण्यासाठी यावं लागणार होतं. रात्री उशिरापर्यंत लीनाला जवळ घेऊन नवीन ठिकाणचे वातावरण समजावून सांगितले. उद्या जाण्याच्या उत्साहात झोप जरा बेताचीच लागली. सकाळ झाली मी दुपारी एकची बस पकडण्याचे ठरवले. तोपर्यंतचा वेळ तयारीत गेला. एक घर बदलायचं म्हणजे काय काय तयारी करावी लागते हे पाहून मला फक्त वेड लागण्याचं बाकी होतं. कसेतरी आम्ही जेवण केले. कपडे घातले. आणि दहा पंधरा मिनिटात निघण्यासाठी असताना दरवाज्याची कडी वाजली. कोण आलं असेल यापेक्षा उशीर होणार नाही ना याची जास्त काळजी वाटली. सोसायटीचे सेक्रेटरी लेले आले असतील तर म्हाताऱ्याला काही बाही सांगून घालवावे लागेल हे लगेच मनात आले. काही दिवसांपूर्वीच लीनाने पुढील सहा महिन्यांचा चेक दिला होता. कपाळावर थोड्या आठ्या आणून मी जरा जोरातच " कोण आहे ...........? " असे विचारले. दरवाज्या उघडला. ,,,,,,,,,,,,,,,,,,पाहतो तो काय .....? समोर उभ्या असलेल्या माणसाला जिवंत माणूस म्हणावे की जिवंत प्रेत म्हणावे हे ठरवण्याच्या आतच त्याने खुणेने जेवायला पाहिजे असे सांगितले. त्याच्या हातातला काळा कुट्ट पडलेला कटोरा अंगावरील चिंध्या आणि त्यातून दिसणारे किडकिडित अंग पाहून मला शिसारी आली त्याच्या दुसऱ्या हातात सापाचे तोंड असलेली काठी होती. त्याचे डोळे जास्तीत जास्त निस्तेज होते. डोळ्याभोवती नुसती काळी वर्तुळे नव्हती तर तिथे काळे खड्डे पडलेले होते. खांद्यावर एक फाटकी झोळी होती. गळ्यातल्या रंगी बेरंगी दगडांच्या माळा त्याच्यापेक्षा जास्त वजनदार वाटत होत्या, कारण त्याचीमान त्यांचं वजन पेलत नव्हती. त्याने एक हात वर केला. आणि मला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला. मी त्याला पाहून दरवाज्या लावणार होतो , तेवढ्यात आतून लीना आली. आणि त्याला पाहून तिने मला हाच माणूस काही दिवसांपूर्वी आल्याची आठवण दिली. मी त्याल पकडून बाहेर काढू लागलो तर लीना म्हणाली, " अहो तो एक प्रकारचा अघोरी साधू आहे त्याने आपल्या घरावर काही केलं तर आपल्याला अतिशय त्रास होईल . त्याला काय हवंय ते द्या आणि जाऊ द्या. " पण मी ऐकायला तयार नव्हतो. मी त्याला गेटमधून बाहेर ढकलला . तो तोल सावरीत धडपडत उभा राहिला. आणि म्हणाला, " तूने ये अच्छा नही किया , वहां जाओगे तभी पछताओगे. आणखी वेगळ्याच भाषेतले शब्द बडबडत तो निघून गेला. मी रागाने फुनफुनत माघारी आलो. जायच्या वेळेला त्याचं येणं मला अजिबात आवडलं नाही. दहा पंधरा मिनिटात आम्ही शेजारी राहणाऱ्या मिश्रा अंकलकडे चावी दिली. आणि सामान घेऊन निघालो.
एस. टी एकदाची मिळाली.

बसचा प्रवास लीना आणि मुलांना अतिशय आवडला. मुलं बसमध्ये कधी न बसल्याने खिडकीतून बाहेर पाहण्यात त्यांचा बराच वेळ गेला. पावसामुळे झालेली हिरवी गार शेते , जंगले आणि डोंगर दऱ्या पाहताना त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते. अधून मधून हे गाव कोणतं , ते गाव कोणतं असं विचारत होते. मला काहिच माहिती नसल्याने ते नाराज होत होते. रात्रीचे नऊ वाजत होते. आम्ही रामनूरला उतरलो. पावसाची झोंड उठली होती. आम्ही आमच्या छत्र्या उघडून स्टँड वर पाऊस कमी होण्याची वाट पाहत बसलो होतो. बराच वेळाने पाऊस थोडा कमी झाला. जुडेकरला आधी सांगितल्यामुळे तो तेवढा थोड्याच वेळात स्टँडवर आला मग मंद दिव्यांचा प्रकाश असलेल्या रस्त्याने आम्ही चौघांनी चालायला सुरुवात केली. जंगलाचा रस्ता थोडा भीतीदायक होता. पण तोही लवकरच संपला. हातातलं सामान आता जड वाटू लागलं होतं. जुडेकरला त्रास होत असेल असे वाटून मी थोडावेळ थांबण्याचे ठरवले. पण जुडेकर नाही म्हणाला. मग आम्ही चालत राहिलो. जंगल संपवून आम्ही मोकळ्या मैदानावर आलो. समोर दिसणारे वाड्याचे गेट पाहून लीना म्हणाली, अहो हा वाडा खूपच मोठा आहे, नाही ? " मी मानेनेच होकार दिला. आम्ही गेटपाशी पोहोचलो. जुडेकरने हातातले सामान खाली ठेवून गेटचे कुलूप उघडले. मग मुख्य दरवाज्याचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. सगळे लाइट लावले. प्रचंड मोठ्या हॉलला पाहून लीना म्हणाली, " हा म्हण्जे अगदी रेल्वे प्लॅटफॉर्म वाटतोय. " मी पुन्हा होकार भरला. सामान आत ठेवल्यावर जुडेकर म्हणाला, " सर मी आता निघतो. उद्या सकाळी येईन . " मी त्याला आग्रह केला. पण तो थांबायला तयार झाला नाही. तो गेल्यावर प्रथम लीना स्वैपाकघरात गेली. बायकांच्या सवयी प्रमाणे तिने " इथे काहीच व्यवस्था नाही ...... " असे म्हंटले. त्यावर मला मी काहीच तयारी केली नाही असे वाटले. अचानक मला कवटीची आठवण झाली. मी विचलित झालो. पण अशा रात्रीच्या वेळेस मी काही करू शकत नव्हतो. दहा वाजत होते. लीनाने जेवण तयार केले. आम्ही थोड्याच वेळात जेवून झोपण्याच्या तयारीला लागलो. खालच्याच मोठ्या बेडरूममध्ये आम्ही एकत्र झोपण्याचे ठरवले. माझ्या मनात परत परत ती कवटी नष्ट करण्याचे विचार येत राहिले. लीना आणि मुलं दमल्यामुळे लवकरच त्यांना झोप लागली. मलाही झोप येतच होती. मी हळूच दरवाज्या उघडला. तरीही आवाज आलाच. लीना जागी झाली. " काय चाललंय हो तुमचं ? " विचारल्यावर मी थोडा दचालो. पण स्वतःला सावरीत म्हणालो, " पाणी प्यायचंय म्हणून उठलोय. तू झोप . " ती लगेचच झोपेच्या आधीन झाली. मी ते निमित्त साधून वरच्या मजल्यावर गेलो. ती खोली उघडली. लाइट लावला. आणि दरवाज्याच्या मागे पाहिलं. तिथे कवटी नव्हती. ........ ते पाहून मला भीती वाटली. मी सगळ्या खोलीभर कवटीचा शोध घेतला. पण सापडली नाही. मग अर्धवट उघडे फडताळ पूर्ण उघडले. आतल्या खणांमध्ये मातीचा बोट बोट थर साचला होता. इथे फक्त कवटी कशी आली. मला कळेना की कोणी मुद्दाम करीत होतं. मग मनात प्रश्न आला, को ण क र णा र ? इथे कोणीही येण्याची शक्यता नव्हती. आपण त्वरा केली नसल्याचे माझ्या लक्षात आले. मी पुन्हा एकदा फडताळ उघडले. हाताला घाण लागणार हे माहीत असूनही मी फडताळाच्या खालच्या खणांतून हात फिरवला. मग वरच्या खणात हात फिरवला. माझ्या हाताला एक दगड लागला. जो बराच बारिक होता. मी तो बाहेर काढला. आणि दिव्याच्या प्रकाशात तो पहिला. तो फकीरबाबांनी दिलेल्या उदी मधला चकाकणारा तांबूस रंगचा खडा होता. म्हणजे फकीर बाबांचा यात संबंध असेल की काय मला शंका येऊ लागली. कदाचित एखाद्या उंदराने किंवा त्या दिवशी दिसलेल्या मांजराने कवटी नेली असावी असेही मला वाटले. मी बाहेर आलो कुलुप घातलं आणि बाजूच्या खिडकी कडे आलो. जिथून पलिकडचा भाग दिसत होता. पण तिथली खिडकी जशी मी बंद केली होती तशीच होती. हातातला खडा घेऊन मी हात धुवायला बाथरूममध्ये गेलो. खडा मी इतर खड्यांमध्ये ठेवला आणि आता पुडी भिंतीतल्या एका मोठ्या कोनाड्यात ठेवली. ......... दमलेले असल्याने सगळ्यांच्याच झोपा उशिरा उघडल्या. सकाळ प्रसन्नता घेऊन उगवली. मला आणि लीनाला चहा घेताना फार बरं वाटलं . मला बरं वाटलं कारण लीना आली होती. मागचे पंधरा वीस दिवस माझे एकट्याने जात होते. जेवणाची पंचाईत होत होती. ती आता होणार नव्हती. अजूनही माझ्या मनात कुतुहल मिश्रीत भीती होती, की कवटी नक्की कुठे गेली. असो. लीनामुळे मला नाश्ता मिळाला. तिला जुडेकर आवडल्या नसल्याचं तिनी सांगितलं. जुडेकर एक पस्तिशी उलटलेला चिवट , लोखंडाच्या कांबीप्रमाणे शरीरयष्टी असलेला माणूस होता. तो फक्त क्लास फोरच नाही तर क्लास थ्रीचीही कामे करीत असे. एक दिवस मला ते धोकादायक वाटलं. म्हणजे हा काहीही करू शकतो. पण त्याने माझ्यावर केलेले उपकार आणि माझी घेतलेली
काळजी आठवल्याने मी तो विचार झटकून टाकला.
मुलं उठली होती . दोघेही दुध वगैरे प्यायल्यानंतर बाहेर खेळायला गेली. नुकतीच पावसाने उघडीप घेतली होती . लावलेल्या बागेतील फुलझाडांची रोपे आता अंग धरीत होती. त्यामुळे परिसर चांगला दिसत होता. थोड्यावेळाने जुडेकर आला
आणि थोडा खूष दिसत होता. मी त्याला विचारले, " आज काय विशेष ? " त्यावर तो म्हणाला "सर दोन चार दिवसात तुम्हाला गाडी मिळेल.
म्हणजे तुम्ही बँकेत पटकन येऊ शकता. फक्त ड्रायव्हर मिळणार नाही असं मी ऐकलंय. " नंतर खरोखरीच येणाऱ्या गुरुवारी मला जिल्ह्याच्या कार्यालयात बोलावले आणि गाडीच्या चाव्या आमच्या मोठया साहेबांनी सुपूर्त केल्या. तो ओडिसी होता. त्यांचं नाव मोहंती होतं. ते मला म्हणाले,
" मि. सबनीस खरंतर तुमच्या पोस्टला गाडी देण्याची पद्धत नाही, पण तुमचं काम आणि रामनूर सारखं लहान गाव पाहून गाडी देण्यात आलेली आहे. ड्राइव्ह मात्र तुम्हाला करावं लागेल. " मी त्यांचे आभार मानले. आणि गाडीची चावी खिशात ठेवून बाहेर पडलो. केव्हातरी कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर मी गाडी शिकलो होतो. मला फक्त आता सरावाची गरज होती. तसेही मी राहत असलेला भाग सराव करण्यासाठी योग्य होता.
त्यादिवशी मी संध्याकाळी गाडीने घरी आलो. गाडी रुबाबात पोर्चमधे उभी केली. ती एक फॅमिली कार होती. काहीही असो, मला गाडी मिळाली
या आनंदात लीनाने तिची पुजा केली आणि काहीतरी गोडधोड करण्याच्या तयारीला ती लागली. आता सगळ्या जागेलाच एकूण आवाज आणि अस्तित्व निर्माण झालेलं होतं. इतके दिवस मौन व्रत घेतलेला वाडा आता मुलांच्या, लीनाच्या आणि माझ्याही मोठयाने बोलण्याने गजबजल्यासारखा वाटू लागला. ..................
असेच काही महिने गेले . मुलांच्या शाळा व्यवस्थित चालू होत्या. लीनाला मात्र कंटाळवाणं वाटू लागलं. शेजारपाजार नसल्याने दुपारच्या मोकळ्या वेळात काय करावं तिला समजेना. आताशा ती सगळ्या खोल्या उघडून आणि स्वच्छ करून घेत होती. एक तात्पुरत्या स्वरूपाची मोलकरीणही मिळाली. वाड्याला बाहेरूनही रंग दिला गेला. परत ती जुडेकरची मेहेरबानी म्हणावी लागली. आजकाल घरी येताना लांबून वाडा चमकत असल्यासारखा मला दिसू लागला. हळूहळू मी वाड्याच्या प्रेमात पडलो. आणि लीनाही. लवकरच मी पाटील , फकीरबाबा आणि तो भिकारी यांना विसरून गेलो. मध्यंतरी एकदा रजा घेऊन मी हरिदासला भेटून आलो . वाड्याच्या कागदपत्रांचे रजिस्ट्रेशन वगैरे करून आलो. हरिदास माझ्या सुखी चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्याला मी वाड्यासंबंधात काही समस्या सांगेन असं वाटलं. पण माझी काहीच तक्रार नसल्याने तो थोडा आश्चर्य चकित झाला. ........ दिवस चांगले चालले होते. मुलांची अभ्यासातली प्रगतीही समाधानकारक होती. एक दिवस माझ्या मनात आलं. स्टाफ आणि गावातले प्रतिष्ठीत लोक आणि जिल्ह्याच्या कार्यालयातील मुख्य मॅनेजर यांना पार्टी द्यावी. म्हणजे सगळेच घरी येतील, ओळखी वाढतील आणि गावात माझ्या येण्याचं कौतुकही होईल. तसंच बँकेचंही नाव होईल. ऑफिस स्टाफला मी माझी योजना सांगितली. आमचे असि. मेनेज पै फारच खूष झाले. ते म्हणाले, " सर अशी पार्टी आजपर्यंत कोणीच दिली नव्हती. मुलांच्या चांगल्या प्रगतीमुळे त्यांना वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिकेही मिळाली. मला आता प्रिन्सिपॉल नन मॅडम व्यक्तिशः ओळखू लागल्या. वर्ष पूर्ण होत आल्याने मी आनंदात होतो. आजपर्यंतच्या बदल्यांमध्ये इतकं चांगलं गाव मला मिळालं नसल्याचं वाटू लागलं. .......... पंधरावीस दिवस तसं काही खास घडलं नाही. कर्ज मागणारेही स्वस्थ बसले होते. नेहेमीचं रुटीन चालू होतं. एक दिवस गोळे माझ्या केबीन मध्ये आला संध्याकाळचे पाच वाजत होते. त्याने केबिनचा दरवाज्या अर्धवट उघडा ठेवला होता. मी मान वर केली. प्रश्नार्थक मुद्रेने त्याला काय विचारले. " सर ही माझी मिसेस. .... " असं म्हणून आत आलेल्या एका स्त्रीची ओळख करून दिली. तिचा चेहरा अतिशय मोहक होता. ओठ रक्तासारखे लाल आणि जाड होते. इतके जाड ओठ स्त्रीचे मी प्रथमच पाहत होतो. एकूण बांधा अतिशय कमनीय आणि आकर्षक होता. भरगच्च छाती जिला मुद्दाम करकचून बांधले होते असे मला वाटले. भडक लाल साडी त्यावर घातलेला निळाशार ब्लाउज . तिला पाहून हिला कुठेतरी पाहिलेले असल्याचा भास झाला. मग आठवले तिचा चेहरा पाटलांच्या वाड्याच्या वरच्या खोलीत असलेल्या चित्रातल्या स्त्रीप्रमाणे भासत होता. मी एकटक पाहत राहिलो. ती गालातल्या गालात हसत होती. उगाचच जुजबी शब्द बोलून मी त्या दोघांना घालवले. ....... ̱ गोळे गेला होता . पण त्याची बायको माझ्या डोक्यातून जाईना. संध्याकाळी मी घरी गेलो. मुलं आणि लीना अतिशय खूश दिसले. मी त्यांना गावात फेरफटका मारायला घेऊन गेलो. गाव लहान असलं तरी बरं होतं. लहान मुलांसाठी पार्कही होती. मग येताना आम्ही नदीवर गेलो. नदी जोरात वाहत होती. नदीच्या पलीकडच्या तिरावर किल्ला दिसला. तो थोडा पडका वाटला. असल्या खेडेगावात त्याच्याकडे कोण लक्ष देणार. मुंबईसारख्या शहरात सुद्धा जुन्या इमारती दुर्लक्षित राहतात. येताना जुडेकरचे घरही पाहिले. त्याला मुलं नसल्याने त्याच्या बायकोला मुलांना कोठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. त्याची फक्त बायको लीनाला आवडली. गावात नदीचे नाव रौरव असल्याचे कळले. हे काय नाव ? माझ्या मनात आलं. रौरव हे नाव नरकाचे असल्याचे माझ्या लक्षात आले. कारण माही आई पोथ्या पुराणं वाचीत असे. त्यात रौरव , कुंभिपाक अशी नरकाची नावे नमूद केली होती. असेही ऐकले की त्या नदीचे पाणी कोणी पीत नाही कारण ते विषारी आहे असा समज गावकऱ्यांचा होता. रात्री साडेआठच्या आसपास आम्ही घरी आलो.
दुसर्याक दिवसापासून मी झपाटल्यासारखे काम करू लागलो. माझं काम पद्धतशीर असल्याने लवकारच मी स्टाफचा आवडता झालो. कामाला शिस्त आल्याने काम सोपे झाले. हेड ऑफिसला जाणारी माहिती वेळेवर जाऊ लागली. सगळेच जण झोकून काम करू लागले. वेगवेगळ्ञा मिटिंग्ज मी हाताळू लागलो. मोहंती साहेबांचे मत माझ्या बद्दल चांगले झाले. ...... आता माझ्या मनाने पार्टीचे देण्याचे घेतले. गावातल्या प्रतिष्ठीत लोकांची यादी केली गे ली . आमचे मॅनेजर उत्साहाने हे काम करू लागले . पार्टीचा दिवस सत्ताविस डिसेंबर ठरवला गेला. पार्टी माझ्या वाड्यासमोरच्या मोकळ्या मैदानात देण्याचे ठरले. जिल्ह्याच्या गावातून केटरिंगचा
कॉन्ट्रॅक्टर आला. जास्त उत्साहाने जुडेकर काम करीत होता. पण एक गोष्ट मला खटकली. लोनचे काम तो फार उत्साहाने करीत होता. मी त्या
त्या माणसांचे आगत स्वागत जुडेकर जरा जास्तच लक्ष देऊन करीत होता. हाच जुडेकर पूर्वी हेडऑफिसला होता. एक दोन वेळा मोहंती साहेबांकडूनही त्याला जास्त महत्व दिले गेल्याचे लक्षात आले. तो प्रत्येक मिटिंगला माझ्या बरोबर येत असे. एका मिटिंगनंतर मी मोहंती साहेबांच्या केबिनमधून बाहेर पडत होतो. जुडेकर हेडऑफिसमध ल्या श्रीवास्तवशी बोलताना आढळला. श्रीवास्तव बोलत होता, " अरे यार,
चांदीका क्या हुवा ? "असे म्हणून त्याने अंगठा तर्जनीवर चोळला ते पाहून मला संशय आला. पण मी ती गोष्ट तेवढ्यावरच सोडून दिली. निदान्
ती गोष्ट सोडल्याचे मी जुडेकरला दाखवले. ...........अचानक मग प्रत्येक महिन्यात माझ्याकडे कर्जाचे अर्ज जास्त संख्येने येऊ लागले. मी सहज
म्हणून मागचे रेकॉर्ड पाहिले. मी यायच्या आधी पर्यंत असे अर्ज क्वचितच आलेले आढळले. आता मला जुडेकर कडे लक्ष ठेवणं भाग होतं. असो.
पार्टीचे सगळे नियोजन पै (आमचे असि. मॅनेजर ) पाह्त होते. डिसेंबरचा महिना उजाडला. अचानक एक दिवस गोळेनी घरी येण्याचा आग्रह केला.
मला त्याची धास्ती वाटत असे. मी अर्थातच नाही म्हंटले. त्याला ते फारसे आवडले नसावे. पण तो तसं काही म्हणाला नाही किंवा त्याच्या रोजच्या कामात फरक पडलेला दिसला नाही. वाढ्यासमोरचे मैदान साफ करून घेतले. तिथे एक जाजम अंथरले. त्यावर रेडकार्पेट घातले. एक लहानसे स्टेज बांधले. सगळी व्यवस्था अर्थातच जुडेकर करीत होता. ..............एका शनिवारी असाच बँकेतून बाहेर पडत होतो. तेवढ्यात गाडीत बसता बसता मला मुंबईला आलेला भिकारी मला परत दिसला. माझ्याकडे पाहून त्याने विचित्र हातवारे केले. आणि झोळितले धान्य त्याने माझ्या गाडीच्या दिशेने फेकले. माझ्या अशा गोष्टींवर बिलकुल विश्वास नव्हता. जुडेकर घाबरलेला दिसला. तो म्हणाला," सर हा भिकारी वीसेक
वर्षांपूर्वी गावात दिसत असे. तेव्हा मी लहान होतो. आणि त्याला गावकर्यां नी इथून घालवला होता. ही लक्षणं चांगली नाहीत. .........मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले

मी घरी आलो. रात्री लीनाला त्या भिकाऱ्याबद्दल सांगितल्यावर ती थोडी गंभीर झाली. तिचं म्हणणं मी त्याला धक्काबुक्की करून घालवायला नको होतं. भीक म्हणून काहीतरी देऊन घालवायला पाहिजे होतं. त्याने फेकलेल्या धान्याने तिचा चेहरा ढगाळल्यासारखा झाला.
आपल्याला मुलं आहेत , त्यांना त्याने काही केल तर .....? ही तिची काळजी मला रास्त वाटली. ती रात्र जरा विवंचनेतच गेली. शेवटी मी तिला जवळ घेऊन पुन्हा असं न करण्याचं वचन दिलं . तेव्हा कुठे ती झोपली. .........सध्या नवीन गाद्या आल्याने तिन्ही बेडरूम , म्हणजे खालच्या , वापरण्यासारख्या झाल्या होत्या. पण मुलं लहान असल्याने आम्ही त्यांना घेऊनच झोपत होतो. सध्या पावसाळा नसल्याने वातावरण आल्हाददायक होतं. मी वेळेवर घरी येत होतो पार्टीच्या याद्या तयार झाल्या. हा गोळे कोण होता मला कळत नव्हते. बँकेतलं काम सांभाळून तो मांत्रिकाचं काम कसं करीत होता, मला कळत नव्हतं. मला माझ्या लहानपण्चा प्रसंग आठवला............आमच्याच आळीतल्या एका मारवाड्याच्या सुनेला भुताने झपाटल्यामुळे भूत उतरवणारा एक मांत्रिक आला होता. त्याचं नावही गोळे होतं. वडील त्या रात्री मारवाड्याकडे बसले होते. सून मोठमोठ्याने ओरडत होती. आणि सासर्याला शिव्या देत त्याच्या अंगावर धाऊन येत होती. तिचे केस चेहऱ्यावर पसरले होते. तिचे चढलेले डोळे फार विचित्र दिसत होते. थोड्यावेळाने मांत्रिक आला त्याने काही लिंबं कापली आणि छोटासा यज्ञ केला त्यात त्याने वेगवेगळ्या पदार्थांची आहुंती दिली होती. काही काळ्या बाहुल्या तारेने बांधून तो " ओम फट स्वाहा " असे म्हणून हातातले राळे सारखे पदार्थ तो आहूती म्हणून देत होता. विचित्र तिखट वास पसरला होता. सुनेच्या तोंडावर आगीच्या लाल पिवळया ज्वाळांचा उजेड पडला होता. तेवड्यात त्याने एक लहानसा पक्षी आणला होता तो कापून त्याचीही " ओम भूत भूतेश्वराय नमः स्वाहा , असे म्हणून त्याचीही आहुती दिली. वातावरण विचित्र होते. भीतीदायक होते. तरीही सुनेचे भूत सोडून जात नव्हते. शेवटी मांत्रिकाने भुताला काय घेणार आणि हिला सोडणार असे विचारल्यावर ते म्हणाले " र क्त " . मग मांत्रिकाने एक मोठी बाटली काढली . आणि त्याला त्या बाटलीत उतरण्याचे सांगितले , तेव्हा त्याने प्रथम रक्ताची मागणी केली. ते म्हणाले, " तू लबाड बोलतोयस, आधी त्या बाटलीत रक्त दे , मग त्या बाटलीत मी शिरेन." असे म्हंटल्यावर किती रक्त पाहिजे ते विचारले. त्यावर त्याने पन्नास थेंब असे उत्तर दिले. मांत्रिक असल्या गोष्टींना तयार असतात असे दिसले. त्याने सांगितले मी प्रथम फक्त पंचवीस थेंब देईन . मग तू बाटलीत उतरायचं. भुताला ते पटेना शेवटी ते तयार झाले. त्याने आपल्या मनगटाच्या वरच्या भागावर लखलखता सुरा मारला आणि मोजून पंचवीस थंब बाटलीत टाकले . आणि एकदाचे भूत सुनेच्या केसातून खेचून बाटलीत भरले. मग त्याने पटकन बाटली लाखेने सीलबंद केली. मी स्वतः बाटलीत भरलेले भूत तेव्हा पाहिले होते. पांढऱ्या रंगाचे मोठ मोठ्या मिशा आणि दाढी असलेले भूत त्यात तरंगत होते. भुताने आकांडतांडव केलं . कमी रक्त दिल्याने ते मांत्रिकाकडे मुठी आणि दात आवळून काहीतरी बडबडत होते. वडील मला बरेच रागावले . असल्या गोष्टी मुलांनी पाहायच्या नसतात असे म्हणत ते मला घरी घेऊन आले. मी त्यांच्या नकळत तिकडे गेल्याने ते रागावले होते. असो. त्या मांत्रिकाचे नाव गोळे होते. अर्थात ह्या गोळेचा त्याच्याशी काही संबंध असेल असे वाटत नाही........
जेवणाची ऑर्डर दिली गेली. सगळ्या स्टाफचा उत्साह ओसंडून वाहत होता. माझ्या डोक्यात परत गोळेची बायको थैमान घालू लागली. पार्टी झाल्यावर मी जुडेकरला लोनचे अर्ज जास्त कसे येतात हे विचारण्याचे ठरवले. अजून दोन आठवडे होते. मी लोनच्या अर्जांची काळजीपूर्वक छाननी करीत होतो. शक्यतोवर काही ना काही हरकत घेऊन अर्ज निकाली काढीत होतो. जुडेकरच्या चेहऱ्यावर जरादेखिल प्रातिक्रिया उमटत नव्हती. खरंतर मला हे प्रकरण जिल्ह्याच्या मुख्य ऑफिसकडे जावं अशी इच्छा होती. तसं काहीच झालं नाही. पण लोनचे अर्ज मात्र येतच राहिले. कोणितरी मुद्दाम करीत असल्याचे मला जाणवत होते. पण मी तिकडे लक्ष देत नव्हतो. काही नाही तरी निदान मला मुख्य ऑफिसकडून विचारणा व्हावी असे वाटत होते. म्हणजे मी माझी भूमिका आणि मला आलेला संशय व्यक्त करीन . पण तसं काही झालं नाही. एक दिवस गोळे केबिनचा दरवाज्या ढकलून आत आला आणि म्हणाला, " सर उद्या माझ्याकडे सत्यनारायणाची पुजा आहे , मॅडम आणि मुलांना घेऊन तीर्थप्रसादाला जरूर या. " मी होकार दिला. तो जायच्या आधी मला त्याच्या तोडावर दोन तीन जखमेच्या खुणा, म्हणजे चावल्यासारख्या दिसल्या . मी त्याला विचारले, " तुझ्या तोंडावर या चावलेल्या खुणा कशा ? " त्यावर तो म्हणाला, " सर मी राहतो तिथे
डांस फार आहेत. " मग तो गेला. मी यावर काही विशेष विचारलं होतं असं मला वाटलं नाही. पण गोळे अचानक माझ्याशी जेवढ्यास तेवढं
बोलू लागला. त्याविषयी मी जुडेकरला विचारलं तेव्हा तो म्हणाला, " सर लक्ष देऊ नका, तो असाच आहे बोलेल पुढे केव्हातरी. त्याची मंत्र तंत्र साधना चालते म्हणून तो कधी मधी असा विचित्र वागतो. आमच्याशीही असाच वागतो. आम्ही लक्ष देत नाही. " मी घरी गेलो. काही काही गोष्टी मला विचित्र वाटू लागल्या. एक म्हणजे हरिदास एजंटचं वाग्णं , तो भिकारी, फकीर बाबा, जुडेकरचं अति उपयोगी पडणं , कवटी सापडणं आणि नाहीशी होणं, गोळेची बायको, गोळे , मोहंती साहेबांनी मला गाडी देणं, लोनचे अर्ज भारंभार येणं , जुडेकर आणि श्रीवास्तव यांचा संबंध .
मी यात काही लिंक सापडते का पाहू लागलो. पण यात नक्कीच लिंक असावी. घरी गेलो. लीनाचा चेहरा भेदरलेला दिसला. मी विचारलं तेव्हा तिने मला बाथरूम मध्ये येण्यास सांगितलं. मी बाथरूममध्ये डोकावलो. मला काहीच दिसेना " कुठे काय .......? इथे तर काहीच नाही " त्यावर
चिडून लीनाने म्हणाली " जरा पाणी जाणाऱ्या पाईपच्या मागे बघा. ........ " तरी मला काही दिसेना. मी मुद्दामच काही बोललो नाही. मग मी मोबालचा टॉर्च चालू केला. त्या प्रकाशात मला तिथे कवटी पडलेली दिसली. खरं तर मीही घाबरलेलाच होतो. पण माझं आश्चर्य दाबून मी लीनाला म्हणालो, " गंभीर आहे खरं हे प्रकरण . पण आपण काय करू शकतो. नाही का ? मी हरिदासला विचारतो. काही झालं तरी आपल्याला ही कवटी काढून बाहेर फेकून दिली पाहिजे. " मलाही चांगलीच भीती वाटत होती त्यावर लीना आणखीन मागे होत म्हणाली, " हो . पण सध्या
काय करायचं ....? " मी म्हंटले, " काय म्हणजे ....? कवटी बाहेर फेकून द्यायची. " मी बाहेर आलो. एक प्लस्टिकची पिशवी धेतली ती हातात घातली आणि अंग शहारत असतांनाही ती कवटी तशीच धरून बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकून दिली. थंडीचे दिवस होते पण मला घाम फुटला होता. बाहेर आल्यावर लीना म्हणाली, " बरं झालं मुलांना दिसली नाही ते. मला वाटतं आपण वास्तुशांत करून घ्यावी. " मी विचार केला आणि म्हंटलं. , " अगं पण घर आपलं थोडंच आहे, आपण इथे भाड्यानि राहतो. तरीपण पाहतो एखादा भटजी.... " ते तेवढ्यावरच थांबलं. माझ्या मनात गोळे चा सल्ला घ्यावा असं आलं. पण बाहेर बभ्रा होईल. आणि पार्टी मध्ये विग्न येईल. " किंवा गोळेच्या हातात निष्कारण एक निमित्त येईल. आणि एकदा का मी या गोष्टीत अडकलो की मग यातून सुटका होणार नाही , असे वाटून मी भटजी पाहण्याचे ठरवले. गोळेकडे सत्यनारायणाच्या पुजेला एकटाच निघालो. त्यावर लीना म्हणाली, " हे काय मला आणि मुलांना घेऊन जाणार नाही ? " मला ती बरोबर नको असल्याने आणि गोळे जेवढ्यास तेवढे बोलत असल्याने मी तिला म्हंतलं., " अगं तसाही तो क्लास फोर आहे, त्याच्या घरी तुझं काय काम ? नाही का ? " लीनाला राग आला होता. "मग जुडेकरकडे तरी कशाला घेऊन गेलात , तोही क्लास फोरच होता.
तुम्ही बरे आता क्लास फोर क्लास थ्री करायला लागलात. तुम्हाला तर सगळे सारखेच असं तुम्ही म्हणायचात ना ? " मी जरा चीड आली .
मी म्हंटलं, " मी नाही म्हंटलय ना . मग आता पुरे. वाद नकोय मला. " ; तिला नाराज करून मी निघालो. पण मनापासून नाही. गोळेकडे गेलो. त्याने मुलं आणि बायको का आली नाही म्ह्णून काही विचारलं नाही. आत्ताही तो जुजबी बोलत होता . मी पण प्रसाद घेऊन लगेचच निघालो.
जाताना एस. टी स्टँड जवळच असल्याने आणि मला वेळ असल्याने मी पाटलांचा वाडा शोधण्याचं ठरवलं. स्टँडजवळ गाडी पार्क केली आणि
तिथे उभं राहून मी कोणत्या वाटेने पाटलांबरोबर गेलो ते आठवू लागलो. तिथल्याच कंट्रोलरच्या कार्यालयात चौकशी केली. त्यावर तिथले लोक माझ्याकडे एखाद्या वेड्याकडे पाहतात तसे बघू लागले. पाटलांचं नाव घेतल्यावर ते म्हणाले, " अहो असे पाटिल बिटिल कोणी नाही हो
या गावाला. तुम्हाला भास झाला असेल. ..... " मी मग त्यांच्या नादी न लागता मी गेलेल्या पायवाटेवरून चालू लागलो. पुढे लागणारं टेकाड
वगैरे ओलाँडून समोर पाहिले तर तिथे एक पडका वाडा होता. त्याचा वरचा मजलाही एका बाजूने पडलेला होता. मोठ्मोठाले गवत उगवलेले
दिसले. बाहेरचे गेट गँजलेले दिसले. दरवाजे केव्हाच पडलेले असावेत. आतला हॉल जिथे मी बसलो होतो तिथेही गुडघा गुडघा गवत उगवलेले दिसले. माझी चाहूल लागताच आतून चार पाच वटवाघळे चिर्र चिर्र असा आवाज करीत बाहेर उडाली. पण आत काही दिसले नाही
वरच्या मजल्यावर जाण्याचा जिनाही मोडलेला दिसला. मग मला भास झाला का ? माझँ मन मानायला तयार होईना. मी मागे वळणार, तेवढ्यात एक कँबरेत वाकालेले , काठी धरलेले , खोल डोळ्याँचे गृहस्थ दिसले. त्याँनी विचारलँ, " काय कुनाल शोधतोस ? पाटलाला ?"
मी हो म्हणालो. त्यावर ते म्हणाले," म्हँजे तू बी फसलास म्हनायचा. त्याचँ काय हाय , तीस चाळीस वर्सामागँ होता के पाटील. त्याचा पोरगा
मँम्हईला गेला. तो परत आलाच नाही. मँग हा खँगला आणि मेला की. एकटाच होता. काय करनार . पुढ गाववाल्यानी आपल्या खरचानी
त्याला नेला मशानात. . पन त्याची पोराला भेटन्याची विच्छा पुरी झाली नाय. म्हनून त्यो मँम्हईची गाडी आली का पकडतो कुनाला तरि
आनी घेऊन येतो वाड्यावर. घेतो समाधान करून . दुसरँ काय.........." " अहो पण मी त्याँच्याकडे खाल्लँ , जेवलो. ते देखिल खोटँ. ?
हासत हासत म्हातार बाबा म्हणाले," व्हतँ असँ कधी कधी, दुसरँ काय ?" आणि ते वाड्यामागे निघून गेले . आणि दिसेनासे झाले. सँध्याकाळचा काळोख पडला होता. कदाचित म्हातारबाबा म्हँजेच पाटील होते की काय , मला समजेना.
मला अजूनही त्या म्हातारबाबाचं म्हणणं पटलं नव्हतं. ज्याअर्थी मी जेवलो होतो त्या अर्थी तिथे काहीतरी असणारच.मी रात्रीच्या वेळेस जायचे ठरवले. मी घरी गेलो. गेल्याबरोबर लीना माझ्यवर कडाडली. . " तुम्हाला न्यायचं नव्हतं तर ठीक आहे, पण उशिर कितीझालाय पाहिलत का. मुलं हिरमुसली ती वेगळीच. " मी जास्त लक्ष दिले नाही. अजूनही माझ्या डोक्यातून ती कवटी गेली नव्हती. थोड्यावेळाने लीनाने मला भटजींची आठवण केली. मी त्यांच्याकडे केव्हा जाणार या विचाराने ती काळजीत पडली. मी दुसऱ्याच दिवशी जायचं ठरवलं. आता पुन्हा मला गोळेची मदत घ्यावी लागणार होती . मी जुडेकरला विचारले, त्यावर तो म्हणाला, "गोळेला विचारून सांगतो. पण कोणाकरता पाहिजे असं विचारलं तर काय सांगू ? कारण माझ्याकरता तर नक्कीच नको आहे. " मी त्याला माझं नाव सांगायला सांगितलं. त्यात एक धोका होता. गोळे त्या भटजीला कशाकरता बोलावले ते विचारेल. मी गावातल्या एका मंदिरात संध्याकाळी जायचे ठरवले. तिथल्या शंकराच्या मंदिरातील पुजाऱ्याला विचारल्यावर तो म्हणाला, " वास्तुशांत ? कुठे करायची ? तुमच्या वाड्यावर. ठिक आहे, पण मी जेवणार नाही. " मी का ते विचारल्यावर तो पुढे म्हणाला," या वाड्यावरची ही तिसरी वास्तुशांत असेल. एकदा माझ्या आजोबांनी केली. जवळ जवळ साठ ते सत्तर वर्षांपूर्वी , ते तिथे जेवले आणि थोड्या दिवसातच त्यांना देवाज्ञा झाली. दुसरी माझ्या वडिलांनी केली ती तीस पस्तिस वर्षांपूर्वी . तेही तिथे जेवले आणि थोड्याच दिवसातच तेही गेले. त्यामुळे मी जेवणार नाही. जेवायला दुसरे ब्राह्मण आणीन . चालेल का सांगा. " मला यातली काहीच माहिती नसल्याने मी होकार दिला. मग तो म्हणाला," हो पण अवकाशात आग्नी आहे की नाही हे पाहावे लागेल , तात्पुरते सतरा डिसेंबर तारीख आपण पक्की करूया. दोन दिवसांनी या. म्हणजे नक्की सांगतो. "पार्टीच्या आधी एक आठवडा वास्तुशांत करण्याचे ठरले. मी भटजी जेवणार नाहीत हे लीनाला सांगितले नव्हते.आगाऊ रक्कम म्हणून गुरुजींना शंभर रुपये दिले. लीनाला बाकी सगळे सांगितले. त्यावर ती म्हणाली , "आपण पार्टीच्याच दिवशी वास्तुशांत केली तर काय बिघडणार आहे ? त्यादिवशी सगळेच असतील. " मी नाही म्हंटले, कारण मला ही बाब गोळे पासून लपवायची होती.
दोन दिवसांनी मी परत भटजींकडे गेलो. यावेळी त्यांनी त्यांच्या घरी नेले. मंदिराच्या मागेच ते राह्त होते. जेम तेम दोन खोल्या .
पण अत्यंत नीट नेटक्या ठेवलेल्या. त्यांनी पंचांग काढ्ले. ते पाहून मला म्हणाले, " बघा आपण सतरा डिसेंबर म्हणतोय, पण त्यादिवशी महामहा वारूणी योग आहे. पण तेव्हा अवकाशात अग्नि नाही. त्यामुळे तो मुहूर्त बाद झाला. आता अग्नी असलेले दिवस म्हनजे सत्तावीस , दोन जानेवारी, तीन फेब्रुवारी. बोला कोणत्या दिवशी करु या. तुमची इच्छा असेल तसं. " मग मात्र मी सत्तावीस तारीख पक्की केली. मी भटजींना
नाव विचारले .त्यांचं नाव राजेश्वरशास्त्री पारलोके. सर्व तयारी आणण्ञाची त्यांची तयारी होती. एकूण खर्च एक हज्जार रुपये येणार होता. खरंतर मला त्यादिवशी वास्तुशांत नको होती. कारण गोळे आणी जुडेकर यांच्या गैर हजेरीत मला ती करायची होती. पण आता इलाज नव्हता. घरी आलो लीनाला सांगितले. तिला जरा बरं वाटलं. आता मला जुडेकर ला तयारी करण्यास सांगायचे होते. एक खास मांडव वास्तुशांतीसाठी मी
दोन दिवस आधी घालून घेतला. आदल्या दिवशी लीनाचा मूड जरा बरा होता. म्हणून मी मुलं झोपल्यावार बाजूचया बेडरूममधे बोलावलं. तिला जवळ घेऊन चुंबनं वगैरे घेतली. तिला मी जवळ असल्याने घाबरण्याचे काही कारण नाही. असे म्हंटले, ती पौर्णिमा असल्याने चंद्राचा प्रकाश
बेड जवळच्या खिडकीतून आत येत होता. नदीचा आवाज आणि थंडी यामुळे तिचा ही मूड चांगला झाला होता. ती मला बिलगली. एकमेकांच्या
ऊष्ण श्वासांमधे आम्ही बराच वेळ अडकलो. मग वस्त्रांची अडचणही दूर झाली. तिच्या उघड्या गोर्याध शरीरावरून माझे हात फिरू लागले. एक
प्रकारचं मादक वातावरण तयार झालं. आता खिडकी कडून मी तिला उचलून घेऊन बेडवर आणून ठेवलि .एकमेकांच्या शरिराच्या गंधांमधे आम्ही बाजूचे जग विसर लो. लवकरच प्रणयाच्या चरम सीमेवर असताना ती एक दम चित्कारली. " ते पाहा कोण उभं आहे तिथे .........." मी तिला जास्तीत जास्त जवळ घेत म्हंटले , " चल कोणी नाही. ............" असे म्हणून मी तिच्या उघड्या छातीवरून हात फिरवीत चुंबनं घेत राहिलो. पण तिचे शरीर एकद म आक्रसल्यासाराखे झाले. तिने मला दूर ढकलले. मी धडप डत उठलो. हाफ पँट चढवीत ति च्या बोटाच्या दिशेने पाहिले. तिथे
एक पाठ मोरी काळसर सावली उभी होती. आता माझेही श्वास दुरून धावून आल्याप्रमाणे जोरात होऊ लागले. हळू हळू आणखी दोन सावल्या
तिथे दिसू लागल्या. मी माझ्या मागच्या बाजूला असलेले दिव्याचे बटण दाबले. पण लाइट गेलेल असावेत. त्यामुळे आत येणार्या चंद्र प्रकाश्याच्या
उजेडात त्या सावल्या आणखी वाढू लागल्या. लीनाची तर शुद्धच हरपली. मी सावकाश तिला उचलून बाकी कपडे तसेच टाकून तिला विवस्त्र
अवस्थेत खोलीबाहेर घेऊन मुलांच्या खोलीत आलो. तिच्या अंगावर प्रथम मी पांघरून घातले. हळू हळू ती भानावर आली. तिने फक्त एकच सावली पाहीलि होती म्हणून बरं. तिला कपाटातून दुसरे कपडे घालायला देऊन आम्ही खोलीचा दरवाज्या बंद करून झोपलो. आमच्या दोघांची ही झोप जवळ जवल गेलेली होती. पहाटे केव्हातरी डोळा लागला. आणि जाग आली तेव्हा आठ वाजले होते,. त्याच दिवशी भटजी नऊ वाजता येणार होते. तासाभराच्या आत कसे तरी सावरून आम्ही भटजींची वाट पाहत बस लो. साडेनऊ वाजता जुडेकर आला. मी त्याला आज
वास्तुशांत असल्याचे सांगितले. त्याने भटजी कोण विचारल्यावर राजेश्वर शास्त्री असे सांगितले. त्याव्र तो म्हणाला," हे भटजी ऐन वेळेवर न येण्याबद्दल प्रसिद्ध आहेत असे तो म्हणाल्याने मला चांगलीच काळजी वाटू लागली. त्यात रात्रिचा प्रसंग अधून मधून डोक्यात येत राहिला.

दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही उशिरा म्हणजे आठ वाजता उठलो. अचानक माझ्या ज्येष्ठ बंधूंचा फोन आला . ते सपत्निक येणार असल्याचे म्हणाले. अर्थातच त्यांना आणण्याची जबाबदारी जुडेकर वर सोपवली. बँकेतला काही स्टाफ मी या कार्यक्रमाला बोलावला होता. त्यादिवशीच्या कार्यक्रमात आम्ही थोडा बदल केला होता. तो म्हणजे पार्टी सकाळी न ठेवता संध्याकाळी सहा वाजता ठेवली. म्हणजे जास्त गर्दी होऊ नये. भटजी नऊ साडेनऊ पर्यंत येणार् होते. आम्हाला झोप नसल्याने आमचे डोळे चुरचुरत होते. सध्या साडेनऊ पर्यंत आवरणार कसे हा प्रश्न होता. तरीही जुजबी कामं करीत होतो. पावणे नऊ च्या सुमारास जुडेकर आला. आल्य आल्या त्याने कोण भटजी ठरवलाय ते विचारले. पारलोकेचे नाव ऐकताच तो म्हणाला, " काय सर, तुम्ही नेमका नको त्या भटजीला बोलावलात. तो वेळ तर सोडाच , न येण्याबद्दल प्रसिद्ध आहे. " आता मात्र माझी पाचावर धारण बसली . आता काय करावं. मी जास्त लक्ष जुडेकरच्या बोलण्याकडे न देता त्याला काही कामं सांगितली. तो माझ्या ज्येष्ठ बंधूंना आणण्यासाठी गेला. थोड्याच वेळाने गोळे पण आला. तो फारसं बोलत नसला तरी ठरवून दिलेली कामं करीत होता. दहा वाजायला आले. आमचे ज्येष्ठ बंधूही आले. त्यांना त्यांची खोली दाखवली. ते वाडा पाहून फारच खूष झाले. त्यांना मूलबाळ नसल्याने ते आणि वहिनी एकटेच आले होते. आल्या आल्या त्यांनी माझ्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या भेटी आणि खाऊ देऊन खूष केले. एकूण वातावरण आता जास्त प्रसन्न वाटू लागले. प्रत्येकाला आपले भाऊ बहीण आल्यावर आनंद होतोच. अर्थातच बायकोचा भाऊ त्याला अपवाद असतो. असं म्हंटलं म्हणून रागावू नका , मी पण तुमच्यासारखाच आहे. असो. ..............अजून भटजी काही आले नाहीत. साडेदहाच्या सुमारास मी त्यांच्या येण्याची आशा सोडली. मग त्यांच्याकडे जाऊन यायचं ठरवलं. मी निघालो आणि गेटमध्ये भटजी शिरताना दिसले. पण त्यांनी चेहरा वळवल्यावर मला ते वेगळे असल्याचे दिसले. त्यांचं नाव पाठक होतं. आल्या आल्या ते म्हणाले, " पारलोके गुरुजींची तब्बेत बिघडल्याने त्यांनी मला हे काम दिलय. " जुडेकर तिथेच उभा होता. माझ्या कानाशी लागून तो म्ह्णाला , " हेच तर गोळेचे भटजी आहेत. हे झाड फूंक पण करतात, म्हणून तर त्यांचं आणि गोळे चं जमतं. ..... " माझी निराशा झाली. पण ती न दाखवता मी त्यांचं स्वागत केलं. आता गोळेला तर सगळं कळणार होतं. . ... असो. त्यांनी हॉलमध्येच सगळे विधी करणार असल्याचे सांगितले. मग मी म्हणालो, " अहो पण बाहेर मांडव घातलाय , तिथेच बरं पडेल. " त्यावर ते म्हणाले, " काय भाऊ वास्तुशांतीचा विधी वास्तूमध्ये करायचा की वास्तू बाहेर करायचा ? " मी काही बोललो नाही. आणखीन तीन ब्राह्मण आले. ते पाठकांचे सहाय्यक असावेत. लवकरच त्यांनी हवन वेदी तयार केली. वेगवेगळं साहित्य त्यांनी पद्धतशीर मांडलं. मग लवकरच विधींना सुरुवात झालीहोमाचा धूर वाड्यात दाटू लागला. मुलांना मुद्दामच बाहेर खेळण्यासाठी पाठवलं . पण ती अधून मधून येतच राहिली.
जुडेकरनी मांडव चांगला घालून घेतला होता. तिथे येणाऱ्या स्टाफ साठी बसण्याची व्यवस्था केली होती.
आल्याबरोबर त्यांना थंड पेय्य दिले गेले. त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं. असो. आमचा विधी आता जोरात चालू होता. मंत्र म्हणणारे म्हणणारे
आता उच्चरवाने मंत्र म्हणू लागले. एकदा तर मला असं वाटलं पाठक गुरूजी तंत्रविद्येतील मंत्र म्हणतायत की काय. अर्थात मला त्यातले फारसे कळत नव्हते. आता जवळ जवळ सव्वा तास बसून झाला होता. आणखीन एक तास तरी लागेल असे गुरुजी म्हणाले." खरंतर यात ब्रेक नसतो . पण हल्ली आम्ही ब्रेक देतो. आजकाळचे यजमान म्हणजे फार काळ न बसणारे असतात . असो. तुम्ही दोघांनी लाल वस्त्र नेसून या ." त्यांना काही तरी टीकात्मक बोलायचे असावे.पण त्यांनी मोह आवरलेला दिसला...... . असो आम्ही दोघेही थोडया वेळापुरते उठलो. सर्वानाच चहा कॉफी दिली गेली. तेवढ्यात आमचे सहाय्यक मॅनेजर माझ्या जवळ येऊन म्हणाले, " सर तुम्ही आणि वहिनी अगदी एखाद्या संस्थानिकासारखे दिसत आहात. .... " काहीतरीच अशा अर्थाचे हात मी हवेत उडवले. मग आम्ही पुन्हा बसलो. तेव्हा गुरुजींनी आम्हाला हार घातले. तीन ब्राह्मणांपैकी एक जे अतिशय काळे आणि ज्यांचे दात पुढे होते ते मंत्र क्वचितच म्हणत होते त्यांना मग पाठक गुरुजींनी समोर बसायला सांगितले.त्यांना पान वाढून जेवायला सांगितले. आणि मला म्हणाले, " इकडे लक्ष द्या, हा विधी तसा यात नसतो, पण या वाड्या करता हा केला जातो. असं माझ्या वडिलांनी पूर्वीच सांगितलं होतं. म्हणून आपण करीत आहोत. " मग त्यांनी ज्या गुरुजींना समोर बसायला सांगितले होते त्यांच्या वर मंत्र म्हणत अक्षता टाकायला सुरुवात केली व बाकीच्या दोघांनी चिताभस्म उधळायला सुरुवात केली. त्याबरोबर मला भीती वाटली. मी तसे त्यांना म्हणालोही. पण त्यांनी त्यांना डिस्टर्ब न करण्याच्या खाणाखुणा केल्या. व नंतर सांगतो असे सांगितले. जवळ जवळ अर्धातास हे सगळं चालू होतं. मग पूर्णाहुती झाली. तेव्हा गुरुजी आणि इतर ब्राह्मण हे " जय बिष्णोई, जय महाकाली, असे ओरडून त्यांनी सगळ्या दिशांना कुंकू उधळले. आणि ज्या ब्राह्मणावर अक्षता आणि चिताभस्म टाकले होते त्याला तयार केलेला वास्तुपुरूष, जो जवळ जवळ अर्धाहात लांब होता, तो बाथरूम आणि संडास याच्या मधल्या मोकळ्या जागेमध्ये पुरायला सांगितलं. बरोबर आणलेला गवंडी घेऊन आम्ही तिघे तिथे जाऊन तिथली एक लादी काढून थोडा खड्डा खणून त्यात प्रथम निळी आणि लाल फुलं पसरून त्या वास्तुपुरूषाची मूर्ती आडवी पुरली. मग त्यावर लादी परत बसवली. ती दक्षिण दिशा होती. त्या वास्तुपुरुषाला नैवेद्य वगैरे दाखवून मग मुख्य आरती होमकुंडाची आणि इतर प्रस्थापित केलेल्या देवतांची आरती केली. सगळं संपायला मला साडेबारा वाजले. मग जेवणं चालू झाली आधी भटजींची जेवणं झाली. नंतर त्यांना दक्षिणा देऊन नमस्कार केले. मला जरा बाजूला घेऊन पाठक गुरूजी म्हणाले, " ज्या भटजींवर आपण चिताभस्माचा प्रयोग केला त्यांना आधी बाहेर काढा मग आम्ही जाऊ. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी केले. ते गेल्यावर पाठक म्हणाले, " असं आहे बघा, हे आपण वेगळं का केलं तर , हा वाडा जेव्हा बांधला गेला तेव्हा त्याच्या पायामध्ये एक कबर आणि काही मानवी हाडं आणि कवट्या सापडल्या होत्या. त्यांच्या नावानं आपण पुजा आणि शांत केली . ती करावी लागते असे पूर्वापार कागदोपत्री या वाड्याच्या बाबत उल्लेख असल्याचे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते. खरंतर नरबली द्यावा लागतो किंवा रक्त द्यावं लागतं. पण आजकाल असं काही केलं तर चालणार नाही, म्ह्णून हे आपण केलेलं आहे. यात भीती दायक काही नाही. उलट आता सगळी भीती संपलेली आहे. काळजी नसावी . " हे सगळं लीनाच्या समोरच झाल्याने तिला बरे वाटलेले दिसले. मग मात्र पाठक गुरूजी आणि दुसरे दोघे गेले. आता मी माझा स्टाफ आणि जुडेकर एवढेच राहिलो. गोळेही त्यांच्या बरोबरच बाहेर पडला. तेही न सांगता. त्यांचं आणि गोळेचं काहीतरी साटंलोटं असणार याची मला शंका आली.
आता स्टाफ आणि आमची जेवणं व्हायची होती. जेवणाची व्यवस्था बाहेरच केली होती.स्टाफ संध्याकाळी येणार नव्हता. नाही म्हणायला माझे असि. पै यांना मी आग्रह करून थांबवून घेतले. जुडेकर आणि गोळे होतेच . म्हणजे गोळे पार्टीला येणार असावा. जेवणा नंतर लवंडण्याची सवय असल्याने मी आणि इतर सगळेच सुस्तावले होते. लवकरच संध्याकाळचे साडेपाच झाले. प्रथम येणारे त्या विभागाचे आमदार होते. पुरेकर नावाचे एक प्रसिद्ध डॉक्टर होते, गावातले नावाजलेले चोनकर आणि भवानीलाल हे सोनार होते. महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या नन मॅडमही आल्या . सहा सव्वा सहा पर्यंत मोहंती साहेब त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली पण आल्या. मुली आल्या आल्या
माझ्या मुलांबरोबर खेळायला गेल्या. मिसेस मोहंती आणि मि. मोहंती एखाद्या जपानी माणसासारखे दिसत होते. जिल्ह्याच्या कार्यालयातील
काही स्टाफ आलेला होता. त्यांच्यात " तो " श्रीवास्तव होता. मला तो आवडत नव्हता. असो. आलेला माणूस आवडायलाच पाहिजे असं थोडंच आहे ? आमचे गावातले काही मोठे खातेदारही होते. म्हणजे त्यांना बोलावलं होतं . ...... नदीवरच वारा वाढला होता. संध्याकाळच्या संधिप्रकाशत पार्टीला सुरुवात झाली. काही ड्रिंक्सही ठेवली होती. संथ संगित चालू होतं. सर्वानाच नदीच्या सान्निध्यात असलेला वाडा आवडला. वाड्यालाही दिव्यांची आरास केली होती . येताना सगळ्याच पाहुण्यांनी भेटी आणल्या होत्या. त्या नको नको म्हणत असतानाही
आमच्या हातात कोंबल्या गेल्या. माझा हेतू फक्त काहीतरी निराळे करायचे एवढाच असल्याने भेटी मला अनपेक्षित होत्या. असो. कॉंट्रॅक्टरची
माणसं ड्रिंक्स फिरवीत होती. आता गप्पांना ऊत आला होता. आमदार साहेब अचानक उठले आणि हातात माइक घेऊन म्हणाले, " जरा
सगळ्यांनीच इकडे लक्ष द्या." (नाहीतरी त्यांना भाषणाची सवय होतीच . बहुतेक ते संधी पाहत असावेत असे वाटले) त्यांनी स्थानिक राजकारणाचा परामर्श घेत म्हंटले, " बँकेनी जेवढी कर्ज देता येतील तेवढी उद्योजकांना द्यायला पाहिजेत. सरकार बँकेच्या पाठीशी आहे.
गावात आणि म्हंटलं तर सबंध जिल्ह्यात उद्योग वाढले पाहिजेत , म्हणजे बेकारी कमी होऊन लोकांना वेगवेगळ्या वस्तुही वापरायला मिळतील. हे लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी विकास साधता आला पाहिजे. गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास, ............. " ते आणखीनही काही पुढे बोलत होते. पण मी आणि मोहंती साहेब तर लोकांशी बोलण्यात मग्न होतो. त्यामुळे माझं लक्ष भाषणात बिलकूल नव्हतं. तसंही भाषण आजच्या पार्टीच्या अजेंड्यावर नव्हतं. आलेले लोक खूष असावेत असे एकूण त्यांच्या चेहेऱ्यांवरून वाटत होते. मग
जेवण तयार असल्याची घोषणा मी केली. बुफे लावल्याने लोकांना बरं वाटलेलं दिसत होतं. मुख्य म्हणजे गावातल्या लोकांना त्याचं अप्रूप
वाटलं. आता साडेआठ वाजत होते. जेवणाची गर्दी चालू झाली. खाद्यपदार्थांचं कौतुक होताना दिसत होतं. लीना मिसेस मोहंतींशी गप्पा मारण्यात रंगली होती. मुलं वाड्यात खेळत होती. अधून मधून त्यांनाही जेवणाची आठ्वण केली जात होती. पण ती तिकडे लक्ष देत नव्हती.
अचानक ऐकू आलेल्या किंकाळीने सगळ्यांच जेवण थांबलं. माझ्या मुलीचा रक्ताळलेया हाताने धावत माझ्याकडे आली ती ओक्सबोक्शी रडत होती. तेवढ्यात माझ्या मुलाच्या तक्रारीने मी स्तंभित झालो. " पप्पा, पप्पा , रसिकाला ना तिकडे एक ताई आहे ना तिनी बोलावलं आणि तिच्या हाताला ती चावली. आणि दिव्याला ना (म्हणजे मोहंतींची एक मुलगी ) ती ताई घेऊन गेली. " असं म्हंटल्याबरोबर मी आणि मोहंती वाड्याकडे धावलो. वर जाऊन पाहतो तर खिळवलेली खिडकी मला पूर्ण उघडी दिसली. कोणीतरी ती जोर लावून उघडली असावी. मध्ये गज नसल्याने
मोहंतीच्या मुलीला घेऊन जाणं शक्य झालं असावं. आम्ही तिच्या नावाने हाका मारीत राहिलो. उघडलेल्या खिडकीतून आत शिरून मी तिथल्या जिन्याचा दरवाज्या उघडण्याचा प्रयत्न केला. पण मला ते जमले नाही. तसं तिथे शांतता होती. आणि वातावरणही बदलले नव्हते. एक प्रकारची निराशा निर्माण झाली. मिसेस मोहंती आणि लीनाही मग आत आल्या. दोघीच ताबा सुटला होता. दिव्या मिळत नाही असे दिसल्याने मिसेस मोहंतीही रडू लागल्या. तेवढ्यात कोणीतरी पोलिसांचं नाव घेतलं आमदार साहेब आत आले आणि त्यांनी माझ्या विभागात असं झालंच कसं यावर ते बोलू लागले त्यावर कोणितरी पोलिस कंप्लेंट करण्याचं सुचवलं . मग आमदार साहेबांनि पोलिसांना फोन लावला. अर्ध्या पाऊण तासाने पोलिस आले. आता चौकशिला सुरुवात होणार या काळजीने मला ग्रासले.
प्रथम पोलिसांनी मला भाड्याने न दिलेल्या भागाची पाहणी केली. आत जाऊन खालचा दरवाज्याही उघडला. आतमध्ये प्रखर टॉर्चच्या प्रकाशात आतली धूळ मात्र अंगावर आली. खाली असलेल्या खोलीत आम्ही सगळेच शिरलो. पण तिथे एका प्रचंड बेडशिवाय काही सापडले नाही तिथेल्या गाद्यांमधून अळ्या वळवळत असलेल्या दिसल्या. मात्र तिथे त्यांना दिव्याच्या स्कर्टचा एक तुकडा सापडला. " म्हणजे इथे दिव्या आली होती तर. पण ती कुलूप असताना कशी आली ?मि. सबनीस तुम्ही इथे केव्हातरी आला असालच नाही का ? " मला त्यांनी विचारले. अर्थातच मी नाही म्हंटले. त्यावर कानविंदे माझ्याकडे संशयाने पाहत म्हणाले, "तुमचं उत्तर हेच असणार म्हणा.... " तिथून बाजूच्या खोल्याना पण कुलुपं होती. अर्थातच माझ्याकडे चाव्या नव्हत्या. त्या हरिदास कडे असतील असे मी सांगितले. त्यांनी हरिदासचा पत्ता फोन नंबर सहित घेतला. त्याला त्यांनी उद्या सकाळी पोलिस स्टेशनला बोलावले होते. त्यानंतर थोडा वेळ जाऊन देऊन
इन्स्पे. म्हणाले, " कशी नाहीशी झाली असेल हो ? " मी म्हंटले , " मला तरी काय माहित ? ".... " मला ते माहित आहे हो. पण तुमचा अंदाज काय आहे ते पाहतोय. " मग ते खाली आले. आणी प्रत्येकाचे स्टेटमेंट घेतले. आणि नंतरच सगळ्यांना घरी जाऊन दिले. जाता जाता मला म्हणाले, "काय आहे मि. सबनीस जो भाग आपल्याला दिला नाही, तो पाह्ण्याची उत्सुकता तुम्हालाही असणारच. म्हणजे तुम्ही तो भाग केव्हातरी पाहिला असणारच , नाही का ? अर्थात तुमच्याकडे चावी नव्हती . काय ...? " असंच म्हणायचंय ना तुम्हाला. " मी होकार दिला.
तुम्ही नक्कीच मूळ कुलूप तोडून आत पाहिलं असणार. आणि आत्ता आम्ही जे कुलूप तोडलं , ते तुम्ही लावलेलं कशावरून नव्हतं ? " थोडे
थांबून ते म्हणाले, " बघा काही आठवलं तर लगेच सांगा आणि हो उद्या या पो. स्टेशनला तुमच्या साहेबांबरोबर . तक्रार नोंदवावीच लागेल.
(क्र म शः )

Group content visibility: 
Public - accessible to all site users