दिवाळी अंकांना कथा नक्की कधी आणि कशा पाठवाव्यात?

Submitted by Vaibhav Gilankar on 25 July, 2018 - 04:02

नमस्कार मायबोलीकर,
दिवाळीला अजून भरपूर वेळ आहे हे मला ठाऊक आहे पण मला यावेळेसच्या दिवाळी अंकांसाठी कथा पाठवायच्या आहेत त्यामुळे कथा पाठवण्यासाठी दिवाळीच्या एक दोन महिन्यांअगोदर पर्यंत थांबावे कि आताच कथा पाठवणे योग्य राहील या बद्दल माहिती हवी होती. तुमच्यापैकी कुणी याआधी दिवाळी अंकांना कथा पाठवल्या असतील किंवा जाणकार असाल तर,
अंकांना कथा कधी पाठवाव्यात?
तसेच इ-मेल द्वारे पाठवल्या असतील तर फॉरमॅट कोणता असावा (.pdf, .word, इत्यादी)? कि मेलच्या बॉडीमध्येच कथा समाविष्ट कराव्यात?
कृपया याबद्दल आणि अजूनही ज्ञात असलेली उपयोगी माहिती द्यावी.
मला धनंजय, किस्त्रीम, अक्षर, गंधाली अशी मासिके ठाऊक आहेत अजून कोणती चांगली मासिके ज्यात उत्तम कथा येतात अशा मासिकांचे नाव, संपर्कही द्यावे. मी यापूर्वी कधी या दिवाळी अंकांना कथा पाठवलेल्या नसल्यामुळे मला जास्त माहिती नाहीये, त्यामुळे सहकार्य करा.
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा वर्ड फाईल फॉरमॅट मध्येच पाठवा, पीडीएफ नको, इमेल बॉडी मध्ये तर अजिबात नको.
दिवाळीला अजून वेळ असला तरी, दिवाळी अंकाची तयारी सहा सात महिने आधीच सुरु होते, काही दिवाळी अंकांनी मे, जून मध्येच जाहिराती प्रकाशित केल्या होत्या, जुलै महिना संपायच्या आत साहित्य मागवले होते, त्यामुळे वर्तमानपत्रातल्या, फेसबुकवर येणाऱ्या जाहीरातींवर आत्तापासूनच लक्ष ठेवा.