प्रेमस्पर्ष

Submitted by महादेव सुतार on 21 July, 2018 - 05:08

भास तुझा होई मनाला
आठवण येई तुझी या क्षणाला
हुरहूर लागे या जीवाला
बेधुंद  होऊनी तुला  पाहुनी
चिंब पावसात नाचावे
तुझ्या नि माझ्या प्रीतीची कळी नकळत उमलावी
हृदयी वसून स्वप्नात दिसून
ते प्रीतीची फुल फुलावे
नजरेस नजर मिळावी
मनातली भावना न बोलता कळावी
ओठी तुझ्या नाव माझे
माझ्या ओठी नाव तुझे
सदैव असावे
अविश्वास नाव त्यात नसावे
आपल्या प्रेमात प्रेमच दिसावे
आयुष्यभर एकमेकांना  बघावे
आयुष्य आपलं एकमेकांच्या मिठीत जावावे

MDS

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.
पण प्रेमस्पर्श हवं ना...षट्कोनातला ष नको.