मुली घडवताना

Submitted by Priya ruju on 20 July, 2018 - 06:11

सद्य परिस्थितीनुसार मुलींना स्वसंरक्षण करता यावे या हेतुने मोठ्या मुलीला (वय ७ वर्ष)तायक्वोंदो क्लास सुरु केला. परवा क्लासनंतर तिने सांगितले, " मम्मा मी गडबडीत पँट उलटी घातली होती" . तिला वाईट वाटु नये म्हणुन मी म्हणाले असुदे. यावर तिनेच माझी समजूत घातली, "कपड्याचा उपयोग काय? कोणाला काही दिसायला नको, ते काम तर झाले .
का कोण जाणे खूप आनंद वाटला. मूळ संकल्पना पक्की आहे याचा. दुसरयाच क्षणाला विचार आला ईतका सहजसरळ विचार सगळ्यांना करता आला असता तर?
या चिमुकल्यांकडून खूप शिकायला मिळते हे खरे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users