देशाबाहेर नोकरी

Submitted by दीप्स on 24 March, 2009 - 23:20

बी.ई. मेकॅनिकल , ८ वर्षांचा मटेरीयल्स मधला अनुभव मॅन्युफॅक्चरींग कंपन्यांमधे , अशा प्रोफाइल ला अ‍ॅब्रॉड नोकरी मिळू शकेल का?
आणि तुम्ही इथे अ‍ॅब्रॉड नौकरीचे , तिथे राहताना आलेल्या अडचणींचे अनुभव पण शेअर करु शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नावातला नौकरी शब्द बदलुन नोकरी करता येईल का?? सॉरी.... राहवलं नाही.

त्यात काय सॉरी नात्या , चूक सांगितलीत मीच सॉरी म्हणायला पाहीजे Happy

***********************************
आईने के सौ टुकडे करके हमने देखे है ....

नमस्कार दिप्स,
नुकताच एका जॉब पोर्टल वरुन मेल आला होता. त्याचि माहिति देत आहे.
बघा तुम्हाला कहि उपयोग होतो का?

JOB RECRUITMENT/CAREER DEPARTMENT
HILTON HOTEL LONDON
2-24 Kensington High St | London W8 4PT

Dear Applicants,
JOB VACANCIES IN UNITED KINGDOM
This is to inform you that there is a job vacancy in HILTON HOTEL LONDON
HILTON HOTEL LONDON and Resort in the big city of UNITED KINGDOM LABOUR CONSULTANT:
RECRUITMENT AGENCY: CONTINENTAL RECRUITMENT
We have employment opportunities in all Hospitality and Catering positions,
because we need to fill up all the positions with experienced and qualified
candidates to fill all the position.

Today, we're recognized as one of the world's preeminent destinations
for travelers–providing outstanding service to our guests and promising
careers to our team members,what does all of this mean for your future?
Your passion for service can lead to a successful career with the Hilton
Family of hotels.So whether you're an experienced professional
there's a special place for you in our family.

Welcome to a world where service meets success. Welcome to the Hilton
Family of hotels.
Job Opportunities:
1. Business Manager
2. Asst Manager
3. Marketing/Manager/Asst
4. Landscape Engineer
5. Public Relations/Manager/Asst
6. Chef De Parties
7. Executive Sours Chef / Chef De Cuisine
8 Souse Chef
9. Banquet Sales Executive / Manager
10. Front Desk Supervisor
11. F & B Manager
12. Customer Relation Officer
13. Housekeeping Executive / Assistant
14. Team Leader Manager/Asst
15. Front Office / Guest Relations Executive / Manager
18. Asst Manager/F&B
19. Head / VP / GM-F&B
20. Head / VP / GM / National Manager - Sales
21. Operation Manager
22. Head / VP / GM-Accounts
23. Health Cloud Assistant / Manager
28. Sales and Marketing Manager/Assistant
29. Assistant Restaurant Manager
31. HR Operations Manager
32. Senior Relationship Manager
33. Executive / Master Chef
34.CLEANER
35.GARDENER
36.STEWARD
37.DRIVER
38.BAR ATTENDANTS
39.PLUMBER
40.P.R.MANAGER
41.LANGUAGE TRANSLATOR
42.WATCHMAN
43.RECEIPTIONIST
44.CLERKS
45.COOK
46.ACCOUNTANTS
47.TECHNICIAN
48.WEB DESIGNER,PROGRAMMER,
49.COMPUTER PROGRAMMRS
50.MECHANICS
If you are interested to start up employment where a nice monthly salary,
accommodation, free insurances, free staff private car and many more benefits
will be use in making your months/years a very wonderful experiences in the
field of Hospitality and Catering.

Kindly send in your Current CV/Resume and application letter in Micro Soft
format stating the particular position where you will like to take up in this
HILTON HOTEL LONDON
CONTRACT DURATION:
Level 1: 12 Months, (One Year) and renewable only on satisfactory performance
by employee.Level 2: Full time Interested candidates must have not less than
4 or 6 years experience in any of the above listed fields. Interested
candidates should forward their resumes/CV with verifiable reference(s) as
word attached document to:

2.RE-JOB ID PSC/JV/EC 01145-06
CONTACTS THE RECRUITING DEPARTMENT OFFICE VIA EMAIL ADDRESS BELOW.

HILTON HOTEL WORLDWIDE EMPLOYEE CONSULTANT MAIL: hotelhiltonworldwide@job4u.com
HILTON HOTEL RECRUITING OFFICE EMAIL: recruiteragencylondon02@live.com
Call now Tel:+447010285235 Tel: +447010995179
Fax: +44 8703 185603

Hilton Presentation Video
http://www.youtube.com/watch?v=HXks_Fi8M04
Website: www.hilton.de
www1.hilton.com

CONTACT PERSON:Mr. Gary Basin
Director/Chief Recruiter.

REGARDS
Steven S. Bollenbach
Co-Chairman and Chief Executive Officer.

kunala Medical Transcription baddal kahi mihiti asel tar please sangal ka?konata course changala or job milanyache chances kiti aahet etc.please help me

या वरच्या लाइव्ह डॉट कॉम वरुन ठराविक छापाच्या येणार्‍या ईमेल्स बोगस असतात. एवढ्या मोठ्या कंपनीची स्वतःची वेबसाईट नसेल का ? या मेल्स सरळ स्पॅम मधे ढकलून द्याव्या.

दिनेश जी
Absolutely खरे आहे.ही ई मेल मला पण आलेली आहे.मी स्पॅम मध्ये पहिल्यांदा टाकल्यावर आता नियमित पणे तिथे पडते.बोगस आहे.सावधान.
मूळ प्रश्नाकडे -मॅन्युफॅक्चरिंग ची पार्श्वभूमी वाल्याना गल्फ व अफ्रिकेशिवाय इतर देशात स्वतंत्र पणे नोकरी मिळणे अशक्य प्राय आहे.
कंपनी ने स्पाँसर केले तर वेगळी गोष्ट.

रेव्यु आणि दिनेशदा म्हणतायत ते खरं आहे. कृपया कुठल्याही भारताबाहेर नोकरी देऊ सांगणार्‍या रिकृटर/ एंप्लॉयमेंट एजन्सींपासून जरा सावध रहा. इथे अमेरिकेत आणून लोकांना फसवल्याचे बरेच प्रकार घडले आहेत.

बाकी, अमेरिके बद्दल सांगायचं तर मेकॅनिकल इंजिनीयरिंग करता नोकर्‍या उपलब्ध आहेत पण आय टी वगैरे सारख्या इतक्या जास्त नाहीयेत. त्यात आपण भारतात असलो की अपलाय करणे, नंतर इंटरव्यू करता येणे वगैरे अवघड आहे. इथे शिकायला आलात तर फरक पडेल. थोडे दिवस इथे राहायची मुभा मिळते, ती मिळाली की बाकी गोष्टी सोप्या होतात.

आफ्रिकेमधे अजूनही बर्‍याच कंपन्या गेल्याबरोबर पासपोर्ट काढून घेतात. मग एक्/दोन्/तीन जी काही वर्षं त्यांचे Contract असेल त्याप्रमाणे अडकायला होते.. (मी घानामधे अशा केसेस बघितल्यात).

तेव्हा जाण्यापूर्वी खात्री करून घ्या...

मला वाटतं,
मी या बाबतीत जास्त सविस्तर लिहू शकेन.
विनय म्हणातोय तसे पासपोर्ट जमा करण्याची पद्धत गल्फ देशांत आहे. तिथे तूम्हाला ओळख पटवण्यासाठी लेबर कार्ड मिळते. त्यावर तूमची सर्व माहिती असते. पासपोर्ट कंपनीकडे राहतो, पण त्याची कॉपी मिळते. रजेवर जाण्यासाठी अर्थातच तो मिळतो. पण समजा काहि अडचण आली तर, भारतीय दूतावासात तक्रार करता येते. आवश्यक भासल्यास तिथून मदत मिळवता येते. एक लक्षात ठेवायचे, कि त्या देशांतील कायदेकानून कडक आहेत आणि ते पाळावेच लागतात.

सर्वच आफ्रिकन देशांत पासपोर्ट जमा केले जात नाहीत. काहि देशांत ते सुरक्षिततेच्या कारणासाठी जमा केले जातात.
तर परत मूळ प्रश्नाकडे, नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
त्याच्या जाहिराती भारतातही प्रसिद्ध होत असतात. मूलाखतीला जायला काहिच हरकत नाही, पण मुलाखती दरम्यान सर्व शंकांचे निरसन करुन घ्यावे हे उत्तम.
निवड झाल्यावर, निघण्यापुर्वी मात्र त्या देशांत जे आधीच वास्त्यव्य करत आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून, त्या देशाबद्दल, त्या कंपनीबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवणे योग्य.
अश्विनीने सांगितल्याप्रमाणे, कधीही त्या एजंटला पैसे देऊ नयेत (जी कंपनी तूमच्या तिकिटाचा/व्हीसाचा खर्च करू शकत नाही, ती तूमचा पगार काय देणार ? ) खुपदा एजंट दोन्हीकडून पैसे खातात. शारिरिक कष्टांची कामे करणार्‍या लोकांबद्द्ल मी असे प्रकार झालेले जास्त प्रमाणात बघितले आहेत. ते बिचारे आपली जमीन वगैरे विकून तिथे जातात आणि मग कधीही ती जमीन परत मिळवू शकत नाहीत.
याबाबतीत जास्त माहीती हवी असल्यास, (म्हणजे काय काळजी घ्यावी वगैरे ) तर माझ्याशी संपर्क साधता येईल.

मि BE Electrical (Pune university)
MBA IT ( US ) केले आहे.

अपल्य महितित गल्फ मधिल कोनि consultancy आहे का ?
मि स ध्या नोकरिच्या शोधात आहे

कळावे

धन्यवाद

परदेशातील शिक्षणाच्या संधी: विज्ञान आणि विशेश्तः रसायन्शास्त्र या विषयावर मी लिहिले होते.

ते नंतर अहमदनगर च्या दै. देशदूत ने प्रसिद्ध केले होते.

हि लिन्क http://bit.ly/Education_Abroad

मला अमेरिकेत नोकरीसंबंधी काही प्रश्न आहेत. इथे विचारणं योग्य असावं असं वाटतंय.
मी इथे काम करण्यासाठी वर्क पर्मिट मिळवलंय. खूप ठिकाणी अप्लाय करतेय, पण अगदीच कमी प्रतिसाद मिळालाय. मी QA Resource ahe, 1.5 वर्ष काम केलंय पुण्यातल्या एका आयटी कंपनीमधे.

१. सध्या माझी गरज ही कामात गॅप जाऊ नये म्हणून (तरी) नोकरी हवी अशी आहे. मला जर QA मधलच जॉब मिळाला तर उत्तमच, Entry Level सुद्धा चालेल, पण नाहीतर मी कोणता जॉब करावा जेणेकरून मी किमान ६-७ तास बिझी राहू शकेन?

२. monster, dice वर माझा रेझ्युमी टाकलाय, पण समाधनकारक प्रतिसाद (अप्लाय केल्यावर, कंपनीकडून) येत नाही. माझं काय चुकत असेल?

३. सध्या मी रेक्रुटर्स पोझिशन वगैरेसठीपण अप्लाय करतेय. पण अशा प्रकारे ट्रॅक बदलला तर मला भारतात गेल्यावर नोकरी मिळताना त्रास होईल का? (सगळं करिअर आयटीमधेच असावं असं माझा अजिबात आग्रह नाहीये. कारण मी बेसिकली electronics and Telecom ची आहे, मला परत स्विच करायल नक्की आवडेल)

४. मी E & TC चेही जॉब्स बघतेय, पण ते सिलिकॉन वॅली किंवा पश्चिम किनार्‍याकडे गेलं तर मिळू शकतात. नवर्‍याची नोकरी न्यु यॉर्कमधे असल्यामुळे आणि मी रेलोकेट होउ शकत नसल्यमुळे ते शक्य नाही. स्वतःची कार नसल्यमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांना पर्याय नाही. त्यामुळे electronis संबंधित जे काही थोडे फार जॉब्स इकडे आहेत ते अंतराकडून खूपच दूर आहेत.

५. घरापासून खूप लांब नको, मला घरातलं सगळं करून जो वेळ उरतो तो (६-७ तास) सत्कारणी लागावा म्हणून, आणि चांगलं काम केल्याचा अनुभव हवा म्हणून करता येईल असा जॉब कोणता?

हे थोडंसं 'आखूडशिंगी बहुदुधी' सारखं झालंय, पण नुसतं बसून राहून कंटाळा आलाय. नवरा ऑफिसमधे गेला की मी नि माझा लॅपटॉप...
त्यामुळे चांगलं काहीतरी काम करावं असं मनात आहे.

प्लीज मदत कराल का?

प्रज्ञा, तुमच्याकडे कशाप्रकारचं वर्क परमिट आहे? J-2, L-2 ला २०च तासांची परवानगी असल्यामुळे काही वेळा कंपन्या पार्ट टाइम जॉब द्यायला नकार देतात.

तुम्ही जवळपासच्या युनिव्हरसिटीमधे, कम्युनिटी कॉलेजमधे नोकरीचा प्रयत्न केलाय का? न्यु यॉर्कात ते पर्याय बर्‍यापैकी उपलब्ध आहेत असा अनुभव आहे.

प्रज्ञा,

तुम्ही CSQA/CSTE certification साठी प्रयत्न करु शकता. दुहेरी फायदा..तुमचे ज्ञान वाढेल आणि नोकरीसाठीही उपयोग होउ शकेल. टेस्टींग मधे बरेच जॉब्स उपलब्ध असतात.

अधिक माहितीसाठी www.softwarecertifications.org पहा.

मृण्मयी, mansmi18, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.

मी L 2 व्हिसा वर आहे. पण नोकरीसाठी २०च तास असतात हे मला माहिती नव्हतं. Sad

माझं ISTQB Foundation झालंय आणि पुढच्या certification साठी किमान २ वर्षं कामाचा अनुभव लगतो जो माझा नाहिये. मी तिथे चौकशी केली होती. पण अनुभव कमी आहे.

ISEB चं इंटर्मेदिएट करू शकेन मी, पण त्याआधी जर छोटासा का होईना, इकडे काम केल्याचा अनुभव मिळाला तर हवाय.

पण एकूणातच सगळे पर्याय तपसून बघतेय.

प्रज्ञा९ , मला यातला फस्ट हँड एक्सपिरियन्स नाही. पण सध्या QA, testing च्या फिल्ड मध्ये जॉब खुप कमी आहेत दुर्दैवाने. माझ्या ग्रुप मधल्या ३ मैत्रीणी कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर QA मध्ये परत जॉब मिळवु शकल्या नाही आहेत. त्यांना ७/८ वर्षाचा अनुभव आहे.तसच इथल्या कॉलेज ग्रॅज्युएट ना यातील एंट्री लेव्हल जॉब साठी बर्‍याच वेळा प्रेफर केले जाते.
तरीही प्रयत्नासाठी आणि जॉबसाठी माझ्या शुभेच्छा.

आत्ताच मी गुगलून बघितलं आणि ही माहिती मिळाली..

http://en.wikipedia.org/wiki/L-2_visa

त्यामुळे मला जॉब करायला काही अडचण येऊ नये. फक्त तो मिळायला मात्र हवा! Happy
माझा जॉब सर्च खूप ओपन आहे. मी QAचं काम केलंय म्हणून तो प्रेफरंस आहे, पण म्हणून बाकीचे ऑप्शन्ससुद्धा विचारांत घेतेय. म्हणजे अगदी software dev/ DB वगैरे नाही, कारण मला ते येत नाही. बाकीचे ऑप्शन्स म्हणजे नॉन आयटी ऑप्शन्स.

सगळयांना पुन्हा एकदा धन्स. इथे येऊन नवीन माहिती मिळते आणि त्याचा चांगला उपयोग होतो. Happy

प्रज्ञा नॉन आयटी पर्याय विचारात घेणार असाल तर आणि आवड असेल तर शाळेत सब्स्टिट्युट टीचर या नोकरीचा पण पर्याय विचारात घ्या. खूप पैसा, खूप कामाचे तास यात नसते. माझ्या माहिती प्रमाणे Substitute teacher ला वर्गात शिकवावे लागत नाही इतर कामे करावी लागतात - मुलांकडून स्वाध्याय पूर्ण करुन घेणे. प्रोजेक्ट मध्ये मदत करणे इ. थोडक्यात या कामासाठी ठराविकच विषयातल्या डीग्रीची आवश्यकता नाही. बहुदा झक्की जात होते इथे शाळेत सब म्हणून त्यांना विचारु शकता.

झक्की मला वाटत नाही तुमचे पोस्ट वाचल्यावर प्रज्ञा सब या पर्यायाचा विचारसुद्धा करतील म्हणून. Happy

झक्की, खूप चांगली माहिती इतकी सविस्तरपणे दिलीत त्यासाठी खरंच धन्यवाद!
रूनी, तुम्ही म्हणताय तेच होणार आहे. सब चा पर्याय स्वीकारणं अशक्यच दिसतंय. Happy
माझे आधीच ३४० डॉ. work permit मधे फी म्हणून गेलेयत. Sad आणि तिथेही हे हाताच्या बोटाचे ठसे वगैरे प्रकरण होतंच. ते घरपासून (पब्लिक ट्रान्स्पोर्टने) लांब, त्यामुळे NJ Transit चं देणंही देऊन झालंय. Wink

खरं तर QA ची अनेक ओपनिंग्स मी नेट वर बघितली. पण प्रवासाचं अंतर, कार्यानुभव, आणि बर्याच वेळा उमेदवराच्या बाबतीतल्या कंपनीच्या गरजा (green card/citizenship सारख्या अटीसुद्धा आहेत अनेक ठिकाणी) हे गणित अजूनही जुळत नाहिये.
माझा अनुभव Manual testing चा असला तरी ऑटोमेशन सुद्धा शिकले आहे मी. तिथेही प्रयत्न करतेय. पण सगळं क्वचित जुळलं, तरी मी स्वतः संपर्क करूनही कंपनीकडून प्रतिसाद नाही असं होतंय.

आणि गंमत म्हणजे मला आलेले ३-४ कॉल्स आणि २-३ ई-मेल्स कॅलिफोर्निआ वरून होते, ज्यांना माझा रेझ्युम त्यांच्या ओपनिंगसाठी योग्य वाटला होता!

अ‍ॅप्लाय करतानाच काही चुकत असेल का माझं?
Sad

प्रज्ञा९,
मी इथे २००७ डिसेंबरमध्ये मास्टर्स करायला आले. मे २०१० मध्ये मी (२ समर ब्रेक + १ फुल सेम गॅप घेउन) ग्रॅज्युएट झाले. तेव्हा मार्केट वाईट म्हणण्या इतकं वाईट होतं. त्यात मी ओपीटीवर होते. अमेरिकन सरकारचा नविन नियम आहे कि ओपीटी सुरु झाल्यावर जास्तीत जास्त ९० दिवस बेरोजगार राहता येतं. त्या काळात नोकरी मिळाली नाही तर बोर्‍या बिस्तर बांधुन आपल्या देशात परत जायचं. माझ्याकडे ओपीटी सुरु होण्याआधीचे २ आणि ओपीटीचे ३ असे ५ महिने होते नोकरी शोधायला. माझा नवरा अटलांटामध्ये नोकरी करतो म्हणुन मला तिथेच नोकरी हवी होती. सुरुवात मी माझा रेझुमे अपडेट करण्यापासुन केला. माझ्या काही मित्रं-मैत्रिणींकडुन रिव्हु करुन घेतला. मग जमतील तेव्हड्या सगळ्या जॉब सर्च साईटवर टाकला. जवळपास १२-१५ साईट्स वर टाकला. कंपनीमधले एच आर लोकं जेव्हा त्यांच्या रिक्वायरमेंटसाठी रेझ्युमे अश्या जॉब साईट्स वर शोधतात तेव्हा ते मोस्ट अपडेटेड रेझ्युमेवर सर्च करतात. म्हणजे तुम्ही ३ महिन्यांपूर्वी जर साईटवर रेझ्युमे टाकला असेल तर त्यांच्या सर्च क्वेरी मध्ये कदाचित तो येणार नाही. पण कालच अपडेट केला असेल तर लगेच येईल. म्हणुन मग मी सगळ्या साईटस वर दिवसातुन एकदा तरी जाउन रेझ्युमे अपडेट करुन यायचे. (तेव्हडंच काम होतं तेव्हा :अओ:)
आणि नविन दिसलेल्या जॉब्सला अप्लाय करायचे.
सुरुवातीला काहीच कॉल्स येत नव्हते. नंतर हळु हळु यायला लागले, मला मुळात कन्सल्टंट कडे नोकरी नको होती म्हणून त्या लोकांना सुरुवातीपासुनच नाही म्हटलं. खुप चिडचिड व्ह्यायची. इतकं करुनही साधा कॉल सुद्धा येत नाही म्हणुन, भरीस भर म्हणून कोणाशीही बोललं की पहिला प्रश्न हाच असायचा, मिळाला का जॉब. नशिबाने नवर्‍याने खुप सपोर्ट केला. पहिले २.५ महिने काहीही कॉल न येता गेले. आणि मग अचानक एका आठवड्यात ३ ठिकाणी इन्टरव्ह्यु साठी कॉल्स आले. त्यापैकी २ ठिकाणी नोकरी मिळाली. सिरिअसली जॉब सर्च सुरु केल्या नंतर अवघ्या ३ महिन्यात २ नोकर्‍या मिळाल्या. तिसर्‍या ठिकाणी फायनल राउंडसाठी गेलेच नाही. मला मास्टर्स करण्याआधी टेस्टींगचा ३ वर्षांचा अनुभव होता. आणि जॉबही क्युए मध्येच मिळाला.
सांगण्याचं तात्पर्य इतकंच की काहीही असो, आत्मविश्वास आणि चिकाटी असेल तर कधी ना कधी मिळतेच नोकरी.
माझे फुकटचे सल्ले,
१. प्रयत्न सोडु नका.
२. रोजच्या रोज वेबसाईटवर रेझ्युमे अपडेट करत रहा.
३. लोकांचे सल्ले/ टोमणे ह्यांचा सरळ अनुल्लेख करा. मला काही जणांनी आता नोकरी मिळत नाही तर पोरांचा विचार करा असा आगाऊ आणि भोचक सल्ले पण दिले होते.
४. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्व:तावर विश्वास ठेवा. इथे काय आणि देशात काय, २ वाक्य धड बोलता न येणार्‍या लोकांना नोकरी मिळते तर आपल्याला का नाही मिळणार?
फारच मोठी पोस्ट झाली, तुम्हाला जॉब सर्च साठी शुभेच्छा!

आणि गंमत म्हणजे मला आलेले ३-४ कॉल्स आणि २-३ ई-मेल्स कॅलिफोर्निआ वरून होते, ज्यांना माझा रेझ्युम त्यांच्या ओपनिंगसाठी योग्य वाटला होता! अ‍ॅप्लाय करतानाच काही चुकत असेल का माझं?

>>> बर्‍याच कंपन्या लोकांशी बोलून ठेवतात प्रत्यक्षात requirement नसली तरी. त्यामुळे सगळेच कॉल्स कामाचे असतात असे नाही. पण न्युयॉर्क/न्युजर्सी या भागातही संगणक क्षेत्रात भरपूर नोकर्‍या आहेत त्यामुळे जॉब मिळु शकेल. फक्त कन्सल्टींग/काँट्रॅक्ट जॉब करायची तयारी ठेवा. कारण पुर्णवेळ नोकर्‍यांसाठी हल्ली बर्‍याच कंपन्या ग्रीन कार्ड/सिटीझनशीप मागतात. कन्सल्टींग/काँट्रॅक्ट क्षेत्रात बर्‍याच वेळा योग्य वेळी योग्य ठिकाणी असण्याचाही फायदा होतो कारण कंपन्यांना काही वेळा लगेच लोक हवे असतात आणी अश्या ठिकाणी चांगली संधी मिळु शकते. जॉबसाईट्सच्या बरोबरीने मोठ्या कंपन्यांना लोक पुरवणार्‍या consulting/bodyshopping कंपन्यांच्या संपर्कात राहीलात तर त्याचा उपयोग होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवसात (नोव्हेंबर/डिसेंबर) एकुणच नविन लोक घ्यायचे प्रमाण कमी असते. जानेवारी दुसर्‍या/तिसर्‍या आठवड्यानंतर नविन भरतीचे प्रमाण वाढते. पण प्रयत्न करत रहा. तुम्हाला शुभेच्छा.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्व:तावर विश्वास ठेवा. इथे काय आणि देशात काय, २ वाक्य धड बोलता न येणार्‍या लोकांना नोकरी मिळते तर आपल्याला का नाही मिळणार?
फारच मोठी पोस्ट झाली, तुम्हाला जॉब सर्च साठी शुभेच्छा!

मिनी,
सहीच बोलताय ...
अनुमोदन !

मिनी, नात्या, अनिल७६..

खूप चांगली माहिती आणि सल्ले दिल्याबद्दल धन्स!
मला २ कॉल्स आले होते, (वेगवेगळ्या ठिकाणाहून, पण एकाच गोष्टीसाठी), की आमच्या एजन्सीमधे ट्रेनिंग घ्या, १००% जॉब गॅरेंटी! अर्थात पेड ट्रेनिंग.
$४०० च्य रेंजमधे फी. BA+QA असा सिलॅबस होता दोघांचाही. थोडे फरक सोडले तर खूप साम्य होतं त्यात.
QA चा जो सिलॅबस होता तो तर माझा ISTQB Foundation मधे झाला होता आणि कामही करताना त्यातल्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात केल्या होत्या.
BA मधे basics of Database, SDLC, Relation bet'n SDLC and Testing असा होता आणि मग बिझनेस बेसिक्स होते. म्हणजे client कडून रिक्वायरमेंट्स घेऊन त्याचा QA Document करणे, वगैरे काय काय होतं त्यात.

अश्या एजन्सीज भरवशाच्या असतात का?

(EAD ची फी भरून झाल्यावर आता कुठेही पैसे भरायचं जिवावर येतंय माझ्या. एकदा नोकरी मिळाली की ती भरलेली फी वसूल होईल, पण कधी हे कळत नाही. मी चिक्कू नाही, Happy पण अनोळखी गोष्टीसाठी खर्च करताना विचार येतो तो जरा सावधगिरीचाच!)

शेवटी काय ते मलाच ठरवायचं आहे, पण मनातले प्रश्न काही संपत नाहीत. Happy आणि रोज नवीन काही माहिती सांगणारी अनेक मेल्स साईट्स वरून येत असतात.
मी उगीच पॅनिक/एक्साइट्/अपसेट वगैरे होत नाही, शांतपणे माझं शोधकाम चालू असतं, पण तरी प्रयत्न करण्यात कुठे कमी राहू नये असं वाटतं.

नमस्कार मित्रान्नो,

इतके दिवस मी तुम्चे लिखाण आवडीने वाचायचो. तुम्च्यातलाच एक होण्याची खूप इच्चा होती. ती आज पूर्ण झाली. मला काहि विचारायचे होते.

मी पुण्याचा. बी. कोम झालोय. अभ्यासात फ्स्ट क्लास विथ डिस्टीन्क्शन कधिच सोदले नाही. त्यामूळे बर्यापैकि हुशार म्हनयला हरकत नाही.

पण अनेक वर्स्।पासुन परदेशात पाऊल थेवायची खूप इच्चा आहे. ती जमीन काय आहे, ते सगळे जग मला डोळ्यान्नी बघायचे आहे. हे माझे खूप लहानपणापासूनचे स्वप्न आहे. या तीव्र आकक्ष्अर्णाचे कारण मला अजून ही समजले नाही. मी शिक्शनासाठी जाण्याचा प्रयत्ना केला. मला एक चान्गली स्कोलर्शीप सुद्धा मिळली होती. पण मला दुस्रे खर्च झेपले नाही. आणि माझे स्वप्न अपुरेच राहीले.

आता मी नोकरीसाठी जन्याचा प्रयत्न करतोय. मला तस अनुभव नाही. पण एखादा CCNA or MCSE सारखा सन्गण्क कोर्स करायचा विचार करतोय.

तुम्ही सगळे अनुभवी आहात. तुम्ही जग बघितले आहे. तुलनाच करायची म्हतली तर मी नुकताच अन्ड्यातून बाहेर पडलो आहे. Happy मला सध्याच्या मार्केट ची पूर्ण कल्पना आहे. तरी ही मला निराश होयचे नाही. मला प्रयत्न कराचाय.

माझे अफाट कश्ट करायची तयारी आहे. फक्त दिशा सापडत नाहीये. आणि त्यमुळे मी खूप अस्वस्थ आहे. तुम्ही काही सान्गू शकाल?

माझा इमेल mkmayurlord@gmail.com आहे. लिहिण्यात चुका खूप झाल्यात पण प्रथमच मराठी टाइप करतोय.

Pages