चिकन , मटण , मासे - सर्वोत्तम पर्याय - पुणे (तिथे काय उणे)

Submitted by ShortNote on 18 July, 2018 - 10:23

चिकन , मटण , मासे - सर्वोत्तम पर्याय - पुणे (तिथे काय उणे)

पुण्यात आलात तर वरील पदार्थ सर्वात छान आणि उत्तम रित्या बनवलेले आणि तुम्ही स्वतः खाल्लेलं असेल तर कृपया सुचवा . इथे पाहाल तर एक आधी एक दुकान हॉटेल आणि खाण्याचे आहे त्यामुळे स्वतः अनुभव असलेलं पर्याय सुचवा. मी खूप सारे try केलेत यातले उत्तम पर्याय

मला आता पर्यंत आवडलेले पर्याय
१. पी के बिर्याणी हाऊस (कर्वे नग्गर आणि नवले ब्रिज आंबेगाव शाखा )
अत्यंत छान आणि चविष्ट चिकन आणि मटण . उत्तम प्रकारची तुपातील साजूक बिर्याणी . साजूक तुपातले मटण ( २ दिवस फक्त )
तांबडा पांढरा रस्सा एकदम मजेदार आणि चवदार
२. पुरेपूर कोल्हापूर - (नवले ब्रिज आंबेगाव शाखा )
मजेदार तांबडा पांढरा रस्सा (मस्त तिखट ), थोडासा महाग आहे
३. कावेरी (वाकड ब्रिज जवळ - सदानंद नंतर )
भाकरी मटण एकदम छान

पटपट कंमेंट्स येउद्यात !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे व इथे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची भरपूर उत्तरे (कॉंमेंट्स) आलेली आहेत. तोच धागा तुम्ही ही फॉलो करा.>>>>>
हे मी पाहिलंच नाही .. सॉरी .. : पण वरील धाग्यावर बऱ्याच खाद्य गोष्टीवर चर्चा चालल्या आहेत म्ह्णून म्हंटले वेगळा धागा असावा असा विचार

सिंहगड रोडवरचे मालवणी चवीचे हॉटेल, आनंदनगर मध्ये रोड टच ( नाव विसरले बहुतेक सत्कार असे आहे ) तिथे मत्स्याहारी जेवण उत्तम आहे. मी खात नाही, पण नवरा आणी दिर दोघांनी त्याला चांगले म्हणले यातच सगळे आले कारण दोघांनाही उत्तम नॉनव्हेज बनवता येते.