जणू काही झालेच नाही

Submitted by बेफ़िकीर on 14 July, 2018 - 12:30

तिला नोकरी हवी होती
नवर्‍याने सोडले होते
आठ वर्षाचा मुलगा तिच्याजवळ
माहेरी राहणे तिला आवडत नव्हते
तिच्या आईवडिलांनाही
लोक काहीबाही बोलायचे, टोमणे मारायचे
ग्रामीण भागातून आलेली होती
आर्थिक स्थितीही फारच बेताची
शिक्षणही यथातथाच
अतिशय गरजू परित्यक्ता

तिला चार ठिकाणी नेले
अहो आश्चर्यम
चारपैकी तीन ठिकाणी तिला ऑफरही मिळाली
नोकरी, राहणे, खाणे, सगळे तिथेच
मुलाला जवळच्या शाळेत अ‍ॅडमिशन
कामही तिला जमण्यासारखे
प्रत्येक ठिकाणी हसून 'हो, करेन'म्हणाली
बिचारी!

आपल्यामुळे कोणाचेतरी भले होत आहे
ह्याचाही आनंद केवढा असतो

मग संध्याकाळी तिने आवरले
तिचे आणि तिच्या मुलाचे
बराच वेळ व्हॉट्स अ‍ॅपवर चॅट करत राहिली
आलेले विनोद वाचून दाखवत खळखळून हासत राहिली
आजचे वेगवेगळे फोटो फेसबूकवर टाकले
दुपारी पिठलं भाकरी खाल्ली होती
त्या थाळीचाही फोटो फेसबूकवर
बिचारी नोकरी लागल्याच्या आनंदात होती
असे वाटून मीही आनंदात सहभागी झालो

मग तिने मैत्रिणींना फोन सुरू केले
एकेक फोन आठ, आठ, बारा, बारा मिनिटांचा
विषय आगळेवेगळे
ही अशीच वागते, ती तसलीच आहे
मी आता बोलणारच नाही
तिचे आणि त्याचे काहीतरी आहे
माझ्याही मागे लागला होता
ड्रेस, साडी, फेसबूक लाईक्स, गॉसिप
त्रागा, फणकारे, जोरजोरात हसणे
नवल वाटले मला
पण हे सगळे करायचा हक्क प्रत्येकाचा

मग जेवायला बसली
ताटे-वाट्या घेणे नाही
मी काहीच मदत केली नाही म्हणणे नाही
आधी मुलाला वाढणे नाही
मुलगा टीव्हीवर हवा तो चॅनेल लावून बसलेला
तिथेच जेवतोय
सांडतोय, घास हातात ठेवून टीव्हीकडेच नजर लावून बसतोय

आणि ही?
गावाकडे ही भाजी अशी करतात
आमच्याकडे त्या ह्याचे लोणचे खातात ह्याबरोबर
थोडी कडक फोडणी असते
तुमचे जेवण फारच गोडसर
एकदा आमच्याकडचे जेवून बघा

रात्री स्वतः टीव्हीसमोर
पण लक्ष मोबाईलमध्ये
मध्येच खिडकीत जाऊन
कोणाशीतरी फोनवर
कुजबुजत बोलणे
खुसखुसणे
पुन्हा चेहरा गंभीर
पुन्हा टीव्हीसमोर
मालिकेतील प्रसंगांवर टीका
मुलगा झोपलेला

दिवसभर मी पाहत होतो
कानातले, गळ्यातले
सगळ्या अ‍ॅक्सेसरीज
कपडे, तो उघड्या खांद्यांच्या फॅशनचा टॉप
मॅचिंग, हिल्स, पर्स
पण हे सगळे व्यक्तीस्वातंत्र्य
ज्याला जसे परवडेल तसे

रात्री बाराला मी विषय काढला
कोणती नोकरी बरी वाटतीय तीनपैकी

म्हणाली....

वडिलांना विचारायला हवे
पुण्यात राहिले तर चालेल का
वडील कडक आहेत
मुलाची शाळा इथे कशी होईल कोण जाणे
हे काम जमणार नाही
त्या संस्थेचे इथून अंतर फार आहे
मला वाटले ऑफिसचे काम मिळेल
बसेसचे तंत्र जमणार नाही
त्यामानाने पगार विशेष नाही
माझी मैत्रीण तर इतके कमवते
मुलगाही रमेल असे वाटत नाही
बघू
सकाळी गावी जायला निघते
तिकडे गेल्यावर ठरवते

झोपायला गेली
त्यानंतरही फोनचे मेसेजेस वाजत राहिलेच

मला माझी आजी आठवली
दाण्याचे लाडू करून तीस पैशांना एक विकणारी
हलव्याचे दागिने करणारी माझी आई आठवली
नोकरीसाठी मैल मैल जाणारी बायको आठवली

असे बोलू नये
पण खरंच मनात आले
आत्ताच्या आत्ता
ह्या मुलीला
लाथ घालून हाकलून द्यावे

सकाळी पेपर वाचत तिने चहा घेतला
मुलाला दूध मीच दिले
तो रडत वगैरे राहिला
सावकाश स्वतःचे व त्याचे आवरून
नाश्तापाणी करून
'सोडता का बसस्टँडला'म्हणाली

तिला सोडले
त्या दिवसावर फुली मारून कामाला लागलो

आता ती मेसेजेस पाठवते
गुडमॉर्निंग, गुडनाईट
फॉर्वर्ड्स

जणू काही झालेच नाही!

========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकिर yanchi mi fan ahe, pan tyani kahi katha ardhavat sodalya ahet, te khup khupte, karan kalel ka? Anya, Sanam and baryach katha ajun manatun jat nahit.

भेटतात असेही लोक. >>+१

बेफिकिर yanchi mi fan ahe, pan tyani kahi katha ardhavat sodalya ahet, te khup khupte, karan kalel ka? Anya, Sanam and baryach katha ajun manatun jat nahit. >>>+१

असे बरेच लोक भेटलेत. खूप तोंड वेण्गाडतात, काम बघा म्हणतात. आपण वेळ घालवून, शब्द टाकून काम मिळेल असे पहातो. पण नंतर हजार कारणं देत काम नाकारतात. बसून खायला आवडते, उसने न्मागने चालते, पण काम करायला, मेहनतीला नको म्हणतात. Sad
आता अशा लोकांना आधीच 'बघते' म्हणते, पण कानामागे टाकून पुढे चालते.

He Khare Ahe!

Mi Hi Asya Bayka Pahilya Ahet.

Mala Kiv yete kay bolava suchat nai, raag hi yeto.

mag watta this is why nobody helps them who don't want to help themselves.

असेल तर एका दिवसात judgement करुन पार! >> स्वभाव लक्षात यायला वर्षे जायची गरज नसते.

mag watta this is why nobody helps them who don't want to help themselves. >> खरे आहे Happy

असतात असे लोक.
त्यांना पोटाला भुक असेल तरी चालतं पण हाताला सुख पाहिजे असं माझी आजी म्हणायची.

नक्की कोणत्या आर्थिक वर्गातली स्त्री आहे ही?

ग्रामीण भागातून आलेली होती
आर्थिक स्थितीही फारच बेताची
शिक्षणही यथातथाच
अतिशय गरजू परित्यक्ता

हे वर्णन आणि

कानातले, गळ्यातले
सगळ्या अॅक्सेसरीज
कपडे, तो उघड्या खांद्यांच्या फॅशनचा टॉप
मॅचिंग, हिल्स, पर्स

हे वर्णन जुळत नाहीय.
इतरांनाही असे बरेचजण भेटतात?