जिंदगी

Submitted by कल्पेशकुमार on 12 July, 2018 - 07:51

आज संकष्टी म्हणून
उपवास होता बिचाऱ्याचा
गर्लफ्रेंडच्या किसमुळे
मोडला तो जर
काय दोष आता त्या
समुद्र किनाऱ्याचा

दोस्ताची पार्टी म्हणून
दोन पेग ज्यादा मारले
गळ्यात गळे घालून
नंगे फोटो व्हायरल झाले
इज्जतीचा पंचनामा करून
आता रे पोलिसांचे पाय धरले

पॉकेटमनी पुरेना म्हणून
भुरटेगिरी सुरु केली
सीसीटीव्हीत पकडला तेव्हा
बोलती का रे तुझी
अशी बंद झाली

आईबाप आशेवर तिकडे
रोज हाडे झिजवतात
तुझ्या भरोस्यावर राहून
सावकाराच्या फेऱ्यात अडकतात
परिक्षेचे रिझल्ट्स तुझे मात्र
त्यांच्या स्वप्नाला का रे भुलवतात

वक्त हमारा है -
प्यार दीवाना है बोंबलत
पिक्चर चालतो रे एकवेळ
पण तुझ्या करियरच्या वक्ताला
कधी घालशील खऱ्या जिंदगीचा मेळ

― कल्पेश

Group content visibility: 
Public - accessible to all site users