हिपोक्रसी - 2

Submitted by कटप्पा on 9 July, 2018 - 23:14

https://www.maayboli.com/node/66693

रोजचीच गोष्ट. दोन बायका गप्पा मारत आहेत.

काकू १ - काय ग, कसे चाललंय, काय म्हणतेय सून.

काकू २ - काही विचारू नको. कामचुकार सून मिळाली आहे. उशिरापर्यंत झोपून असते. मुलगा चहा करून देतो सकाळी. एक काम करत नाही. सारखी बाहेर जेवायला जाऊ म्हणत असते. नशीबच फुटलय.असली सून कोणाला मिळू नये.

काकू १- अरेरे.. आणि मुलगी आणि जावई काय म्हणतात.

काकू २- जावई मस्त. एकदम राणी सारखं ठेवतो माझ्या मुलीला. सकाळी स्वतः कॉफी बनवून देतो. घरातले एक काम करू देत नाही. आठवड्यातून निदान 4 वेळा तरी बाहेर जेवायला घेऊन जातो. असला जावई सगळ्यांना मिळो !!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉटसपवर धागा काढून मला त्याचे महत्व वाढवायचे नाहीये. त्यापेक्षा मी स्वतःवर धागा काढेन.