तुम्ही पाहिलेल्या अंधश्रद्धा???

Submitted by कटप्पा on 4 July, 2018 - 12:50

रूम मेट चे आई बाबा इथे अमेरिकेत घरी आले आहेत, आणि रोज बरोबर 6 वाजले संध्याकाळी की लाईट्स चालू करतात. इथे 9 पर्यंत सूर्यप्रकाश असतो, तरी हा प्रकार चालू आहे.
मी कारण विचारले तर म्हणे की लक्ष्मी येते 6 ला दिवे लावले की. वादात पडायची इच्छा नसतेच, त्यामुळे काही बोललो नाही.

मग हळूहळू नीट विचार केला आणि जाणवले की असल्या काही अंधश्रद्धा आपण कळत न कळत मानत असतो.
उदाहरणार्थ - काही लोक रोज दाबून मटण, चिकन खातात पण शनिवार आला की अंडे पण शिवत नाहीत.

आणखी एक- माझा मित्र कार सुरू करताना रिव्हर्स गियर टाकत नाही जरी 1 इंचावर भिंत असेल तरी आधी फॉरवर्ड गियर टाकणार, 1 mm पुढे नेणार गाडी आणि मगच रिव्हर्स.

इतकेच काय मी सुद्धा देवाला लाच देतो, हे काम होऊ दे, इतके पैसे दान देईन, ही सुद्धा अंधश्रद्धाच.

तुम्हाला आठवतायत का अशा अंधश्रद्धा ज्या इतक्या कॉमन आहेत की आपण नकळत follow करत असतो?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गवताचे ट्विग! Rofl ट्विग म्हणजे अगदी छोटी डहाळी, तीही झाडाची. दर्भ शब्द आठवला नसेल, किमान गवताचं 'पातं' हा तरी आठवावा!

क्रिकेटबद्दल कोणी कुठे टीव्ही बघायला बसायचं वगैरे अंधश्रद्धा असतात, तसा आमच्याकडे टेनिसबद्दल आहेत. परवा फेडरर विंबल्डनमध्ये हरला त्याला मी कारणीभूत आहे असं घरच्यांनी ठरवलंय, कारण खरंच मी तिसर्‍या सेटपासून ठिय्या मारून बसले होते टीव्हीसमोर, फेडीने ऑलरेडी दोन सेट घेतले होते, त्यामुळे तो हरेल असं पुसटसंही वाटलं नव्हतं कोणाला. पण मी मन लावून पहायला लागले आणि तो खरंच हरला! Sad त्यामुळे आज जोकोविच-नदालची मॅच पहायला मला परवानगी नाहीये! फेडीला हरवलंस आता नदालला तरी हरवू नकोस- असं ऐकवण्यात आलंय मला Sad Proud

पूनम सेम! मी २००६-७ला(किंवा २००५-६ पण असेल. फेडरर खूप हरला तो काळ पकडा! :ड) खूप आवडीने फेडररच्या मॅचेस बघायला लागले अन तो हरायला लागला! Uhoh मग मी बंद केले. (मग तो जिंकू लागला! Lol )

मग शेजारच्या एका मुलाला बोलावून आणून त्याला शिव्या द्यायला लावल्या तरी ते घुबडाचं पिल्लू ढिम्म Lol

यावरुन एक राहिलं की,
त्या घुबडाच्या पिल्लाच्या बाल मनावर कित्ती कित्ती वैट परिणाम झाले असतील....शिव्यांमुळे !!!!!!

लॉल

बाकी माझी नाविन अंधश्रद्धा..
रुन्म्या= कटप्पा..
>>>>

खरंय, बरेच लोकांमध्ये ही अंधश्रद्धा मला आढळली आहे. त्यांच्या काही धाग्यावर प्रतिसादांत तसे पाहिले आहे. पण यात त्यांची काही चूक नाही. सुरुवातीला काही काळ खुद्द मलाही तसे वाटू लागलेले.
पण बरे आहे, कोणीतरी धागे काढतेय, मनातल्या भावना आणि डोक्यातले विचार मोकळे करायला वाट उपलब्ध करून देतेय..

परवाच अमावास्या झाली. आमच्याकडे जागेच्या राखणदाराला (वास्तुपुरूष टाइप्स) नारळ देण्याची पद्धत आहे.
आणि थोड्याच दिवसात गटारी अमावास्या येईल. तेव्हा तर कोंबडं किंवा बोकड देण्याची पद्धत पुर्ण कोकणात आहे. दोन्ही प्रकारात जिभेचे चोचले आमचेच पुरवले जातात. श्रावणात उपवास करायचा म्हणून कदाचित एकदाच नाॅनव्हेज खाऊन घेत असतील.

गवताचं ट्विग, दर्भ आणि थेट गर्दभ << Lol
मला गवतापासुन बनवलेला दोरी/सुतळी सारख काहीतरी म्हणायचे होते. ट्विग चुकलच पण त्याला दर्भ, पात>, किंवा गर्दभ म्हणत असतिल तर तेच समजा...

माझी एक शेजारीण आहे.तिने माझ्या ज्या ज्या झाडांना नावाजले ती ती मरून गेली आहेत.जे जगले त्याला ३-४ वर्षे फुलंच येत नाहीत.व्हॉयलेट व केशरी गुलाबं ,मिरचीचे एक रोप,ब्रह्मकमळ (हे जिवंत आहे पण फूल नाही) ,आले,हळद ,अनंत वगैरे. अनंताच्या दीडफुटी कलमाला एकदम ११ फुले येऊन झाड मरून गेले.याला योगायोग म्हणावा की आणि काय!

जिभेवर काळा डाग असल्यास हे असे होते. ही अंधश्रद्धा नाही. आमच्या बिल्डींगमध्येही एकाच्या आहे. आणि त्याचे असे कैक अनुभव आहेत.
एक उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास सारे क्रिकेटचा सामना बघत आहेत. लक्ख सुर्यप्रकाशात सामना चालू आहे. भारत जिंकायच्या स्थितीत आहे. हा येऊन बोलतो आज पाऊस पडणार. सर्वजण त्याला मुर्खात काढतात. पण खरेच कुठून तरी काळे ढग धावून येतात. त्याच्या जिभेवरच्या काळ्या डागाची लाज राखतात. आणि पावसाने सामना पार धुवून निघतो.

दुर्लक्ष म्हणावे. खत, पाणी, चांगली माती>>>>>>> त्यावेळी अजिबातच दुर्लक्ष नव्हते.अंगात जोर होता,त्यामुळे झाडांना कुरवाळणे,खत व्यवस्थित दिले जायचे.असो.

<तिने माझ्या ज्या ज्या झाडांना नावाजले ती ती मरून गेली आहेत.>

त्यांनी न नावाजलेली झाडं कशी आहेत?

त्यांनी न नावाजलेली झाडं कशी आहेत? >>>>>> मस्त आहेत.फार नव्हती पण जी होती ती आहेत.मी आधीच म्हटलंय की योगायोग असेलही.बोलाफुलाला गाठ पडली म्हणायचे..तरीही तिने म्हणू नये असं वाटतंच.नाईलाज आहे.
मीही म्हणते एखाद्याची झाडेचांगली आहेत.ती झाडे मेली की नाहीत माहित नाही.

दर्भ म्हणतात त्याला!>>
दर्भ गाढवाला पण म्हणतात न?
Submitted by अग्निपंख on 13 July, 2018 - 13:16
<<

फ्रेम करून हॉल ऑफ फेम मधे टांगायला हवं या प्रतिसादाला. Lol

आपल्या देशाला शिव्या घालून वाजवीपेक्षा जास्त टीका करून करी ते नेटकरी सगळ्यांना घालून पाडून बोलून झाल्यावर कदाचित आपण सवाई अमेरिकन होऊ अन ट्रम्प तात्या आपल्याला घरी धाडणार नाहीत अशी अंधश्रद्धा पाळणारे खूप भेटले, अशी माझी अंधश्रद्धा आहे!. Wink

ते ठीकच आहे, पण आपलाच देश(च) काय तो अळणी बाकी दुनियेचा शेम्बुड गोड हा एटीट्युड तितकासा पटत नाही, अर्थात दुय्यम नागरिक असणे म्हणजे कसंय नव्या बाटग्यासारखा प्रकार, बांग जरा जास्तच जोरात पडते. असो!

प्रत्येकजण तुमच्यासारखा एक्सपांडेड व्यु असणारा असे नाही
च्रप्स भाऊ......

असो! चालायचंच, मायबोलीवर व्यक्त होताना ह्यापुढे भान राखलं जाईल, पटत नाही ते मुळातच वाचलं नाही तर जमेलही. Happy

माझ्या आजी कडे पाहिलेलं ... माणूस बाहेर गेलेला असताना जर त्याला उशीर झाला परतायला तर थोडेसे मीठ दरवाज्याजवळ ठेऊन त्यावर तांब्या पालथा ठेवायचा ...

तेव्हा मोबाईल किंवा फोन पण नव्हते

Pages