हळूच...

Submitted by राजेश्री on 30 June, 2018 - 22:02

हळूच

सांग सांग भोलानाथ ..पाऊस पडेल काय..या गाण्यात ...पुढे जाऊन...भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज येईल काय....या ओळीतील हळूच हा शब्द हळूच माझ्या मनात घर करून राहिला आहे.हे हळूच लहानपणापासून माझ्या आयुष्यात आलेले आहे.शेजाऱ्यांचे पेरू हळूच घेताना ते बघू नये ही अपेक्षा असायची,गणित हा विषय कच्चा असल्याकारने माझ्या मैत्रिणीने मला एखादं गणित हळूच दाखवावं ही एक अपेक्षा असायची.घरी अभ्यासाचाही दिखावा चांगलाच जमायचा मला अभ्यासाच्या ते ही भूगोलाच्या पुस्तकात,कारण भूगोलच एकमेव पुस्तक लांबी रुंदीने मोठं होत,मग या पुस्तकात सोनेरी पुरवणी हळूच घालून वाचल्याचे अधून मधून हळूच आठवत असते.बीटूच्या वह्यांमागची पाने हळूच फाडून घेतलेली असतील,किंवा मग वर्गातल्या सेक्रेटरी ला पटवून उशिरा पूर्ण झालेली गृहपाठाची वही हळूच गठयात सरकवायला सांगितली असेल फार धाकधूक जाणवायची हे हळूच काही करताना,पण या हळूच पणाला यश आलं की मेडल मिळविल्यासारखा आनंद फार वाटत राहायचा.
हे हळूच केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यापुरत मर्यादित असतं तर गोष्ट वेगळी असती मी शेजारी बहुतेक करून आमच्या शेजारची इंदू आज्जी आमच्या घरी येताना हळूच दरवाजामागे लपून मोठ्या आवाजात भूक्का घालायचे , माझं आणखी एक वाखाणण्याजोगे कौशल्य म्हणजे मला बेमालूमपणे हळूच चिमटा काढायला यायचा. तिसऱ्या क्रमांकावर राहून पाहिल्याच्या डोक्यात हळूच टपली मारून ,हळूच आपलं लक्ष दुसरीकडे वळवून पहिल्या आणि दुसऱ्याची भांडणे मला हळूच लावता यायची.
आज हे हळूच ऑफिस मध्ये काम करतानाही डोकावत ना अधून मधून पावणे पाच ला ऑफिस सुटताना हळूच पाच वाजून चाळीस मिनिटांनी बाहेर पडायचं झालं तर बॉस च्या केबिन समोरून हळूच निसटताना भीती वाटली तरी या हळूच पणाची सवय काय जाता जात नाहीच.अगदी रजा मागायची झाली तर सर फीलिंग नॉट वेल टुडे... अस टायपात घातलं की वेल .... हा msg पाठवावा की काय या विचारात व्हाट्स अँप वरून हळूच हा msg सेंड केला की .पुन्हा थोडा वेळ offline जाऊन बसायचे हळूच. मग नंतर अगदी पाच मिनिटात पुन्हा हळूच ऑनलाइन येऊन तो msg गेला का? दोन निळ्या रेश्या उमटल्या का ? हे देखील हळूच पहायचे.फीलिंग वेल नाही मग online कसं काय बुवा हा प्रश्न बॉस तरी अजून विचारत नाहीच तोपर्यंत आपण हळूच त्या दिवशी अधे मध्ये हळूच ऑनलाइन येऊन सगळे msg हळूच बघून जायचं असत.
हे हळूच प्रत्येकाच्या आयुष्यात हळुवार पणे आलेलं असतंच.कुणी पाहिली वहिले प्रेमपत्र लिहिले असेल हळूच किंवा कुणी जाळ आन धूर संगठच अस म्हणत काय हुतय तवा ती पहिली उत्सुकते पोटी सिगरेट ओढली असेल हळूच.खूप चांगले वाईट फाटे फुटू शकतात या हळूच ला...हा हळूच विषय खूप नकोच लांबवायला ...मी आता हळूच बद्दल लिहिताना काढता पायही घेते....ते ही हळूच बरं का..

©राजश्री

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users