सहज सुचलं म्हणून .....

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 24 June, 2018 - 04:27

'मी आज काहीतरी लिहिलं' हा आनंद असतोच पण त्याहीपेक्षा लिहिण्याचं 'ते' वातावरण आपल्यासाठी आपण तयार केलेलं असेल किंवा ते नशिबानं म्हणा किंवा कसंही ते तयार झालेलं असेल तर ते feeling ‘लय भारी’ असतं !
अगदी रिप रिप नाही आणि मुसळधार पण नाही असा दोन्हीच्या मधला पाऊस पडतोय,लॅपटॉप ला ८०-८५% टक्के चार्जिंग आहे,एक तासादोनतास तरी कुणी स्वत: भेटायला यायची किंवा कुणाचा फोन यायची शक्यता नाहीये (खास करून मित्रांचा-कारण मग तिथं 'नाही' म्हणायला जागा नसते !), घड्याळाची टिकटिक स्प्ष्ट ऐकू येण्याएवढी शांतता आहे ,स्वतःच्या हातानं केलेल्या (कशीही लागत असली तरी) कॉफीचा 'मग' आहे ,लॅपटॉपमध्ये किशोर पासून अरिजित पर्यंतचा 'Unplugged' वाला भरणा आहे आणि डोक्यात लिहिण्यासाठी भरपूर कायकाय साठलेलं आहे ..... स्वर्ग !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हि कचेरित सन्गनाका समोर काम आनि माय्बोलि

आहा.. नुसते शब्दांनी सही वातावरण निर्माण केलेत.
हे कथा विभागापेक्षा ललित विभागात जास्त उठून दिसले असते असे प्रामाणिक पणे वाटून गेले.