विवाहबाह्य संबंध काय सल्ला द्याल

Submitted by pintee on 22 June, 2018 - 12:45

माझ्या ताईविषयी मला इथे बोलायचं आहे.माझे आईवडील दोघेही वारले आहेत.आम्ही दोघीच एकमेकींना आहोत. तिला 18 व 11 वर्ष वयाची 2 मुले.आहेत.ताई स्वतःच्या पायावर.उभी आहे हे सगळं सांगायचं कारण माझ्या जिजाजींगेली काही वर्षे दुसर्या मुलींकडे पैसे देऊन जात होते.नुकतेच त्यांनी हे ताईला सांगितले.परत जाणार नाही अशी शपथ घेतली.माझी ताई या प्रकरणाने पूर्णपणे खचली आहे.20 वर्षाच्या.संसाराचे हेच फळ का म्हणून रडते आहे मी तिला कशी सावरू??ती घटस्फोटाला तयार नाही.जिजु ने प्रामाणिक पणे सांगितले ही जमेची बाजू.ती त्यांना माफही करू शकत नाहीये. तिला काय सांगू??

Group content visibility: 
Use group defaults

त्याच्या आज मागे काही प्रिटेक्स्ट असतो.मानसिक गुंतवणूक असते.>>>>>
मानसिक गुंतवणूकिशिवाय शारीरिक जवळीक नाही, हा नियम व्यक्तिपरत्वे बदलतो.
Tindr, इतर डेटिंग अँप वर "looking फॉर One night stand" असे म्हणणारे लोक असतात

खाण्याचं उदाहरण मी "बरेच मार्ग आहेत की गरजा भागवायला" हे ज्यांनी वर लिहिले त्यांना उद्देश्यून होते. कारण त्यांनी त्यांच्या प्रतिसादात पुढे "मराठी जेवण आवडत नाही म्हणून बिर्यानी खाल्ली" असे उदाहरण दिले आहे. मी तोच संदर्भ वापरला इतकेच. अर्थातच, ते रूपक आहे. लिटरली घेऊ नये. पण केवळ खाण्याचे उदाहरण वाचूनच लोक मला प्रतिसाद देण्यावर उतरलेले दिसतात. पुढचे लिहिलेले वाचलेले दिसत नाही. असो.

हा धागा असावा की नसावा? किंवा असे धागे काढले जावेत का नाही? यासाठी माझा एक धागा होता.

मायबोलीवर कोणते सल्ले मागावेत, कोणते मागू नयेत?

https://www.maayboli.com/node/65786

यावर ही चर्चा करू शकता.
असे धागे वापरा आणि अवांतर पोस्ट टाळा Happy

'घरी खाणं नव्हतं म्हणून बाहेर जाऊन जेवून आलो' इतकी सुपरफिशियल गोष्ट नसावी.त्यात भावनाही असतात.त्याच्या आज मागे काही प्रिटेक्स्ट असतो.मानसिक गुंतवणूक असते. >>> +१. हक्क असतो.

मी इतकं स्पष्ट सांगूनही इथे गोंधळ वाढतो आहे आम्हाला आईवडील नाहीत तिला मदत करायची आहे.कोणतीही वैयक्तिक माहिती मी मुद्दामच दिली नाही. मायबोली एक कुटुंब आहे असा माझा समज होता.कोणतेही धागे इथे निघताना मी पाहिले आहे.इतके कठोरपणे बोलताना दुसर्याच्या भावना दुखावल्या गेल्या नसतील का

शमिका तुमचे काही एक चुकलेले नाही. तुम्ही थोडा संयम ठेवा. तुमच्या समस्येवर प्रगल्भपणे सल्ला देणारे कुणी ना कुणी नक्कीच भेटतील. चटपटीत विषय आहे तर पिंक टाकून यावे अशा हिशेबाने आलेले किंवा मनोरंजन करून घेणारे लोक येतच राहतात. पण इथे अ‍ॅडमिन आहेत त्यामुळे वाटेल तसे सल्ले येणार नाहीत ही अपेक्षा रास्तच आहे.

सध्या अशांना इग्नोर करा.

शमिका.

१. इमोशनल साईडः तुम्ही जे काही सांगितले आहे त्यावरुन असे दिसते की तुमच्या बहिणीची अवस्था पूर्णपणे इमोशनल आहे. ह्यात कोणीही, अक्षरशः कोणीही कोणताही सल्ला देऊ शकत नाही. कारण दिलेला सल्ला त्यांनी (ताईंनी) स्वतः काय मनःस्थिती करुन घेतली आहे, त्यांचे स्वतःचे काय विचार आहेत, कोणत्या प्रकारे त्या ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघतात यानुसार घेतला जाईल. इमोशनल केस मध्ये मनुष्य एक स्टँड घेऊन टाकतो आणि मग त्या स्टँडला सपोर्टीव होतील असे सल्ले, उपाय शोधतो. विरोधात जाणारे, किंवा ताई जे विचार करतायत ते चुकीचे आहेत असे सुचवणारे सल्ले धुडकावले जातात. 'हो गं बाई, तुझंच बरोबर, तुझ्यासोबत अन्याय झाला, असं कसं केलं त्या माणसाने?" अशा प्रकारचे डायलॉग मारत राहिले की बरं वाटत राहतं. त्यांचीच बाजू कशी बरोबर आहे ह्याचे वॅलिडेशन त्या शोधत असतील तर उपाय निघणे अवघड आहे.

२. प्रॅक्टीकल साईडः प्रॅक्टीकली विचार केला तर लग्नाचा नवरा किंवा बायको हे कृत्रिम आणि अनैसर्गिक नातं आहे. सर्वांनाच संभोग करायला मिळायला हवा, कुणी डावलले जाऊ नये अशा उदात्त विचाराने समाजाने निर्माण केलेली सोय आहे. त्यासोबतच मानसिक सुरक्षा, भावनिक सुरक्षा, इत्यादी तकलादू बाबी पण सोबत येतात. पण मूळ मुद्दा शरीरसंबंधांचाच आहे. शरीरसंबंधास मनाई केल्याचे कारण देऊन घटस्फोट मिळतो. शरीरसंबंध करु देणार नाही असे कोण्या व्यक्तीने लग्नाआधी जाहिर केल्यास कोणीच तिच्याशी लग्न करणार नाही. इतके संभोगास महत्त्व आहे. त्यामुळे कुटूंब, मुले, घरदार, संसार ह्या गोष्टी अतिशय दुय्यम व कृत्रिम आहेत. मूळ प्रेरणा शरीरसंबंधाचीच आहे. अशा परिस्थितीत नवर्‍याने 'लग्नाची बायको' असतांना बाहेर पैसे देऊन म्हणा, लफडं जमवून म्हणा, खर्‍याखुर्‍या प्रेमात पडून म्हणा शरीरसंबंध केले तर फार गहजब करायची गरज नाही. नॉट अ बिग डील अ‍ॅट ऑल. मूव्ह ऑन.

३. सेल्फिश साईडः तुम्ही जितकी सांगितलं आहे त्यावरुन ताई फारच सेल्फिश आहेत असे दिसते आहे. वीस वर्षांच्या संसाराचं हे फळ का असे त्या विचारत आहेत म्हणजे नेमकं कशाचं फळ? वेळेवारी नवर्‍याला शरीरसुख द्यायचं नाही, त्याने दुसरीकडुन घेतलं तर माझी फसवणूक झाली असे म्हणायचं हा सेल्फिशनेस आहे. मात्र त्यांना घटस्फोट घ्यायचा नाही ही चांगलीच गोष्ट आहे. आता घटस्फोट घेण्यात काही पॉइंट नाही कारण नवर्‍याचे दुसर्‍या मुलीशी अफेअर वगैरे नाही. घटस्फोट घेऊन नेमकी कोण कोणाला शिक्षा देणार आहे? नेमका कोणाला काय फायदा होईल? मुलांचा इमोशनल तमाशा कोण निस्तरेल? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. नवर्‍याची चूक म्हणून माफ करणे आणि परत संबंध मधुर बनवणे जास्त प्रॉफिटेबल आहे. आता मुले मोठीही झाली आहेत. विथ फ्रेश माइंड, सेकंड इनिंग सुरु करावी.

४. नवर्‍याची बाजू: हक्काची बायको असतांना बाहेर पैसे देऊन जाणे हे शंभर टक्के चुकीचे आहे. तसेच सुख मिळत नसेल तर बायकोशी तशी चर्चा करणे, आपले म्हणणे मांडणे, त्यावर काही उपाय काढणे आवश्यक होतो. पैसे होते, जोश होता, मन भरलं नव्हते तोवर मजा मारली आता मात्र बायकोला माफी मागून मनातला अपराध काढण्याचा प्रयत्न सुरु आहे... असो.

शेवटी म्हणेन. की हे प्रकरण लटकतं आहे. याला काही लॉजिकल एंड नाही. माझा सल्ला असा की ताइंनी गीतासार वाचावे, सर्व दु:ख-त्रास-किलमिष दूर होईल. वाचावे म्हणजे पारायण नका करु. अर्थ समजून घ्या. चिंतन करा त्यावर. आयुष्य क्षणाक्षणाला बदलत असते. वीस वर्षे संपली आहेत. आताचा क्षण, आताचे जगणे हेच खरे आहे. मागच्या घटनांवर रडत बसण्यापेक्षा आणि त्याने आपले भविष्य खराब करण्यापेक्षा आताचा विचार करा. इमोशनल क्रिबिंग करत बसणे थोडा वेळ ठिक वाटेल. आणि हे असेच असते. दोन वर्षांनी कोणालाच काही वाटणार नाही ह्याची खात्री देतो.

शमिका तुमचा सूड घ्यावा प्रतिसाद वाचला. कृपा करुन दुष्मनालाही असले काही सल्ले देऊ नका.

त्याच्या आज मागे काही प्रिटेक्स्ट असतो.मानसिक गुंतवणूक असते
>>> लोल... अहो पैसे देऊन सेक्स करणारे कशाला मानसिक गुंतवणूक करतील. घरच घरगुती जेवण मिळत नाही म्हणूम पैसे देऊन बाहेर खानारा रोज बिर्याणी कशाला खाईल की त्यात गुंतायला. कधी बिर्यानीज कधी तंदुरी, कधी चायनीज, etc...

ही गोष्ट कोणाच्याही बाबत घडू शकते म्हणून धागा काढावा असा विचार केला >> हो ही गोष्ट कोणाच्याही बाबतीत घडू शकते, घडते. लोक सल्ला विचारत असतात मैत्रिणींना, नातेवाईकांना. नेटवर अनामिक राहुन सल्ला मागता येतो हितर अजूनच चांगली बाब आहे, म्हणजे ओळखीतल्या कोणासमोर घरातली धुणी धुतोय असेदेखील होणार नाही.

===
२. प्रॅक्टीकल साईडः प्रॅक्टीकली विचार केला तर लग्नाचा नवरा किंवा बायको हे कृत्रिम आणि अनैसर्गिक नातं आहे. सर्वांनाच संभोग करायला मिळायला हवा, कुणी डावलले जाऊ नये अशा उदात्त विचाराने समाजाने निर्माण केलेली सोय आहे. त्यासोबतच मानसिक सुरक्षा, भावनिक सुरक्षा, इत्यादी तकलादू बाबी पण सोबत येतात. पण मूळ मुद्दा शरीरसंबंधांचाच आहे. शरीरसंबंधास मनाई केल्याचे कारण देऊन घटस्फोट मिळतो. शरीरसंबंध करु देणार नाही असे कोण्या व्यक्तीने लग्नाआधी जाहिर केल्यास कोणीच तिच्याशी लग्न करणार नाही. इतके संभोगास महत्त्व आहे. त्यामुळे कुटूंब, मुले, घरदार, संसार ह्या गोष्टी अतिशय दुय्यम व कृत्रिम आहेत. मूळ प्रेरणा शरीरसंबंधाचीच आहे. अशा परिस्थितीत नवर्याने 'लग्नाची बायको' असतांना बाहेर पैसे देऊन म्हणा, लफडं जमवून म्हणा, खर्याखुर्या प्रेमात पडून म्हणा शरीरसंबंध केले तर फार गहजब करायची गरज नाही. नॉट अ बिग डील अॅट ऑल. मूव्ह ऑन.>> हे लिहिल्याबद्दल आभार!
प्रॉब्लेम इज
शक्यतो बायका मुलं आणि संसार (म्हणजे काय ते त्यांनाच माहित) यासाठी लग्न करतात आणि पुरुष सेक्ससाठी लग्न करतो. दोघांच्या प्रायोरिटी वेगळ्या असतात. बऱ्याच बायकांना नैसर्गिकरित्या सेक्समध्ये फारसा इंटरेस्ट नसतो आणि पुरुषांची हाय ड्राईव्ह, डिझायर माहितदेखील नसते

बऱ्याच बायकांना नैसर्गिकरित्या सेक्समध्ये फारसा इंटरेस्ट नसतो
>>> अस नसते हो. जणारलायशन नको. क्रियिम पेट्रोल वर कित्येक एपिसोडस असतात की नवऱ्याकडून पुरेसे शारीरिक सुख मिळत नाही म्हणून अफेअर्स करणाऱ्या अधेड वयाच्या बायका. सेक्स सर्वानाच हवे असते.

मस्तुरबेशन हा एक चांगला पर्याय होऊ शकतो बाहेर जाण्यापेक्षा.

>>>>>>धागाकर्ती चा प्रश्न आणि त्याचं सोल्युशन आर्थिक परावलंबित्व/स्वातंत्र्य,नवऱ्याशी असलेलं भावनिक बॉंडिंग,त्याने स्पष्ट मागणी केली का स्वतःच 'आता हे घरी नाही मिळणार' म्हणून गृहीत धरून बाहेर जायला चालू केलं यावर आहे.त्यावर मला सल्ला द्यायचा नाही.
पण 'होते चूक एकदा, प्रामाणिक पणे सांगितलं ना, सोडा आता' विचार करणारे बायकोने 'तू बिझी असायचास.म्हणून मी टिण्डर वरून भेटून काही वेळा शारीरिक जवळीक केली' अशी कबुली दिल्यावर तिला ऍक्सेप्ट करतील?यातले काही जण बायकोच्या एक कानाखाली या पहिल्या रिऍक्शन वर उतरतील.(आठवा फरहान विद्या चा शादी के साईड इफेक्टस)
शारीरिक संबंध ही 'घरी खाणं नव्हतं म्हणून बाहेर जाऊन जेवून आलो' इतकी सुपरफिशियल गोष्ट नसावी.त्यात भावनाही असतात.त्याच्या आज मागे काही प्रिटेक्स्ट असतो.मानसिक गुंतवणूक असते.<<<<< +११११ खास करून लीगल बंधन सारझ्य तर हे इतकं सोपं नसतं.

'बायकोला हौस नव्हती म्हणून बाहेर जाणं चालू केलं' असा अनुभव असलेले किती जण दिवसभर काहीतरी कामं, मुलं, मल्टी टास्किंग करत असलेल्या बायकोला 'तू रोज ही अमकी अमकी कामं माझ्यावर टाक. मी करत जाईन.म्हणजे आपल्या दोघांना रात्री निवांत आणि थोडा कमी थकलेला वेळ मिळेल' असं सांगून बायकोचा रोमँटिक वेळ मिळवतात?
सकाळी उठून डबे, नोकरी करत असल्यास 9 तास काम, करत नसल्यास मुले शाळेत सोडणे आणणे,दुपार 3 च्या पुढे त्यांचा वेळ मॅनेज करणे, असल्यास इन लॉज,रात्रीची आवरा आवर, सकाळ ची तयारी, मुलांनी केलेले पसारे आवरणे हे सर्व करून थकून बेड वर आल्यावर किती बायकांना 'अरे वा शारीरिक जवळीक किती मस्त' वाटत असेल आणि कितीना 'ही काही मिनिटांची जकात दिली की आपण आजच्या दिवसाच्या झोपेचा उंबरा ओलांडायला गिल्ट फ्री मोकळे' वाटत असेल? ☺️☺️☺️

असं काही नाहीये च्रप्स. कित्येक घरं आहेत जिथे नवरे घरातल्या कुठल्याही कामात मदत करत नाहीत.

अस नसते हो. जणारलायशन नको. क्रियिम पेट्रोल वर कित्येक एपिसोडस असतात की नवऱ्याकडून पुरेसे शारीरिक सुख मिळत नाही म्हणून अफेअर्स करणाऱ्या अधेड वयाच्या बायका. सेक्स सर्वानाच हवे असते. >> जनरलायझेशन कसलं त्यात? हे जीवशास्त्रीय सत्य आहे. फर्टाईल असते किंवा बीजांड रिलीज झालेलं/होणार असतं तेव्हाचे महिन्यातले ४ ते ७ दिवसच स्त्री 'खरोखरच' सेक्स करण्यास उत्सुक असते.

<< कोणत्या जनरेशन ची लोक आहेत इथे? आजकाल नवरा बायको मिळूनच घरातली कामे करतात. >>
------ अजिबातच नाही. तुम्ही फार प्रगत जगात वावरत असाल. बहुतेक घरात वर mi_anu यान्नी म्हटल्याप्रमाणे परिस्थिती आहे.

साधे जेवताना ताट-वाटी- पेला घेणे माहित नाही, स्वयम्पाक येत नाही, स्व त : च्या हाताने पाण्याचा/ चहाचा ग्लास भरुन घेता येत नाही, सम्पवलेला पाण्याचा/ चहाचा उचलता येत नाही. फक्त नोकरी करुन थोडा पैसा आणता येतो, बस. इतर घरातली कामे शुन्य असे टोकाचे उदाहरणे माहित आहे.

माझी मावशी सकाळी ५ वाजता उठायची, सर्वान्चा जेवणाचा डबा करुन ९ ला ऑफिससाठी बाहेर, बस-लोकलचे धक्के खात १०-३०- ११ पर्यन्त कामावर, परतीचा प्रवास ६ ला सुरु, ७:३० ला घरी, पुन्हा स्वयम्पाक, जेवण, झोप.... क्वचित नातेवाईकान्चे रात्री ९ वाजता फोन येणार आम्ही नाशकावरुन येत आहोत, बाहेरचे जेवण चालत नाही, घरी आल्यावर खिचडी (किव्वा पिठले पोळी जास्त त्रास नको तुला) पण चालेल. पुन्हा पदर खोचुन कामाला... रात्री १२ वाजता झोपणार... पुन्हा दुसर्‍या दिवशी पहाटे ५:३० ला चक्की सुरु....
पण हे सर्व करतानाही चेहेर्‍यावर स्मित होते.... सगळीकडे असेच असेल असे नाही.

मुलीन्ना चान्गले शिकवा, अर्थाजन करण्यास प्रोत्साहित करा. आर्थिक स्वावलम्बन तसेच मानसिक स्वास्थ्य, मानसिक विकास महत्वाचे घटक आहेत.

ज्याला आधुनिक विचार म्हणतात त्या अनुषंगाने जे सल्ले दिले जातात ते प्रत्यक्षात अंमलात आणणे कितपत शक्य आहे याचा विचार केला जातो का ? लग्न ही गोष्ट अनैसर्गिक आहे वगैरे तत्त्वज्ञान म्हणून ठीक आहे. पण याची सुरूवात नेहमी स्वतःपासून करायची असते. दुस-याला तू लढ म्हणून नाही. बंधन कुठलेही अनैसर्गिकच असते. मग ते नियमांचं असो वा कायद्याचं. ते झुगारून देण्याआधी सारासारविचार हवा. ही बंधने का आली आहेत याचे ज्ञान हवे (जे मला नाही).

नव-याला सोड आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन पायावर उभी रहा इथपर्यंत ठीक आहे सल्ला. पण नवरा बायको दोघांनीही परस्पर बाहेर आपल्या शारीरीक गरजा भागवाव्यात आणि एकत्र रहावे असे सल्ले अस्वस्थ करणारे आहेत. मग लग्नच कशाला पाहीजे आणि लग्नशिवाय तरी कमिटमेंट कशाला हवी आहे ? ती सुद्धा अनैसर्गिकच ना ?

भावनिक गुंतवणूक वगैरे तुम्हाला अनैसर्गिक वाटते का ? ज्याने मुलं जन्माला घातली त्याची काही जबाबदारी वगैरे असेल ना ? त्याने ती पार पाडायची असेल तर सामाजिक बंधनांशिवाय ते शक्य होईल का ?

बरं ही बंधनं झुगारून द्यायची म्हटली तर समाजाला फाट्यावर मारण्याइतपत धैर्य , हिंमत शक्य आहे का ? लोक तुम्हाला जवळजवळ बहीष्कृत करतील, गल्लीतले गुंड, आंबटशौकीन तुम्हाला त्रास देऊ लागतील हे सहन होईल का ? आणि या सगळ्याचं खापर तुमच्यावरच फोडलं जाईल. मॉडर्न विचार असावेत. पण शहाणपणा देखील असावा.

या केस मधे संबंधित व्हिक्टीमची वैचारील लेव्हल नीटशी माहीत नाही. तडजोड करायला तयार आहे यावरून थोडा अंदाज येतो. त्यावरून असले सल्ले व्यर्थ आहेत असे वाटते.

पुण्यासारख्या ठिकाणी एका महीलेला नवरा दीड वर्षे दूर असतानाही मूल झाले म्हणून सोसायटीने आमच्या मुलांवर परिणाम होईल असा ठराव पास करून त्या महीलेला घर खाली करण्यसाठी नोटीस बजावली होती. तिच्या नव-याला सुद्धा सौदीला संपर्क करून कळवले आणि हजर रहायला सांगितले होते अन्यथा तुम्ही अनैतिक प्रकारांसाठी सदनिकेचा वापर करू देता यासाठी ती जप्त केली जाईल असा मजकूर त्यात होता. हा इश्यू बरेच दिवस चालला होता. कोर्ट वगैरे बरंच.

पण दरम्यान नवरा बायकोत बेबनाव झाला. त्यावरूनही कोर्ट केस सुरू आहेत. बदनामी झाल्याने केसचाआ निकाल येण्याआधीच त्या महीलेने घर सोडले. आता माहेरीही तिला घरात घेत नाहीत. अजून बरेच काही प्रॉब्लेम आहेत. हे सगळं पाहीलेलं असल्याने या गोष्टी तोंडची वाफ दवडण्याइतक्या सोप्या नाहीत हे माहीत आहे. त्याच ठिकाणी नव-याचं काही अफेअर असतं तर हे सगळं झालं नसतं याची खात्री आहे. समाज पुरूषाला नेहमीच माफ करत असतो.

पुण्यासारख्या ठिकाणी एका महीलेला नवरा दीड वर्षे दूर असतानाही मूल झाले म्हणून सोसायटीने आमच्या मुलांवर परिणाम होईल असा ठराव पास करून त्या महीलेला घर खाली करण्यसाठी नोटीस बजावली होती.
>>>>

शॉकिंग आहे.

पण कदाचित बातमीमागेही बातमी असू शकते. बाईचे गैरवर्तन असू शकते. बाहेरच्या लोकांची ये जा असू शकते. ते बघून मुलांमध्ये कुजबूज वगैरे.. कारण असा एक प्रकार आमच्याईथेही झालेला. सोसायटीने तर नाही पण शेजारपाजारच्या काही घरांनी ओरडा केलेला. आणि हा प्रकार बंद केलेला...

विवाहबाह्य सेक्स बाबत आपल्या समाजाचे कायदेकानून वेगळे आहेत. आम्ही बंद दाराआड काहीही करू तुम्हाला काय असे आपल्याकडे चालत नाही. ते चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा झाला.

भभा
त्याला गैरावरत्न म्हणायचे कि नाही हाच वादाचा विषय आहे. मी हा किस्सा बाहेर भूक भागवणे असा सल्ला देणे किती सोपे आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारात काय घडते हे दाखवण्यासाठी सांगितला आहे. एका विशिष्ट वर्तुळात फारसा फरक पडत नाही. पण खमंग चर्चा होतेच. उदा. नीना गुप्ता आणि सुष्मिता सेन.

लग्नानंतर अनेक वर्षांनी वैवाहिक जीवनात येणारा तोचतोचपणा बरेचदा कारणीभूत असतो. शिवाय प्रत्येकाला आपली स्पेस आवश्यक असते. शारिरीक संबंधाच्या पलीकडे पण एक नाते असते. प्रसिद्ध नानावटी केस १९६० च्या आसपास झाली. त्यावर चित्रपट पण निघाले. पण हेच नानावटी त्यानंतर आपल्या त्याच पत्नीबरोबर आयुष्याच्या अंतापर्यंत म्हणजे २००३ पर्यंत विवाहबंधनात राहिले. एके काळी राजेश खन्नाच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या व कित्येक काळ त्याच्या बरोबर एकत्र राहत असलेल्या टीना मुनीम बरोबर नंतर अनिल अंबानी यांनी विवाह केला. त्याला सुरवातीला प्रचंड विरोध झाला. टिंगलटवाळी केली गेली. तरीही आजतागायत ते विवाह बंधनात आहेत. नाते म्हणजे एकमेकावर पाळत ठेवणे नव्हे तर एकमेकाच्या स्पेसचा आदर करणे. हि जुनी उदाहरणे झाली. आजकाल नवरा आयटीमध्ये बायको अभिनयक्षेत्रात, नवरा एका कंपनीत तर बायको दुसऱ्या. अशी अनेक उदाहरणे आहेत. असे कितीतरी लोक सुखेनैव संसार करत आहेत. जखडून टाकत नाहीत. एकमेकाला स्पेस दिल्याशिवाय हे शक्य होत नसते.

प्रेम हि खूप वेगळी गोष्ट आहे. ती ज्यांना जमत नाही ते हरलेले जीव हे आपल्या पार्टनरविषयी पजेसिव्ह झालेले आढळतात. बाजारासाठी बाहेर जाऊन आलेल्या बायकोला प्रत्येक मिनटाचा हिशेब मागणारे बिचारे नवरे पाहिलेत. हेच लोक इतर जोडपे एकमेकांना स्पेस देताना दिसले कि मात्र जळफळाट होऊन त्यांची बदनामी करत सुटतात. हेच लोक मग आपल्या झुंडी करत फिरतात. बागेत बसलेल्या जोडप्याला हाणतात. ट्रेनमध्ये कोणत्या जोडप्याने किस्स केला कि यांच्या जीवाची घालमेल होते. निमित्त समाजाच्या नियमाचे असते पण खरे कारण यांना ते सुख मिळत नसते व इतरांना मिळालेलं पाहवत नसते हे असते. हेच लोक मग एखाद्या फोरम मध्ये येऊन एखाद्या स्त्रिला आम्ही बदनाम करून सोसायटीबाहेर कसे हाकलले हे मिरवण्यात धन्यता मानतात.

आपण कुठल्या विचारधारेचा भाग व्हायचे आपल्यावर आहे.

शमिका,
तुला इथे, खऱ्या आयुष्यात (आणि बहुदा प्रोफेशनल काउंसलरकडेदेखील) दोन पर्याय सुचवले जातील

• घटस्फोट - यात गेल्या वीस वर्षांपासूनची घडी उचकडून परत सगळी मांडामांड करावी लागेल.
• मोठ्या मनाने माफ करून, कदाचित आपलीच चूक होती का ते तपासून, परत या चुका होणार नाहीत या आशेवर सगळे तसेच चालू ठेवणे - यात चुका करणार्याला (असलाच तर) पश्चातापखेरीज इतर काहीच नुकसान होत नाहीय.

माझ्यामते मी या दोन्हीतला मध्यम मार्ग सुचवतेय ज्यात:

• सध्याची घडी विस्कटणार नाही,
• मुलांचे काही नुकसान नाही,
• जर पत्नीने यापुढे नवर्यासोबत सेक्स करायचा नाहीच असे ठरवले तर माफक प्रमाणात सूड आहे,
• forgive but don't forget आहे,
• जर खरंच त्याला पश्चाताप होत असेल तर तो बाहेर जाणार जाणार नाही म्हणजे ज्यासाठी रिस्क घेतली, अट्टाहास केला तीच मिळेना,
• जर पश्चाताप क्षणिक असेल तर तो परत बाहेर जाईलच पण पत्नी सम्बन्ध ठेवत नसल्याने तिची hiv वगैरेची रिस्क नाहीशी झाली,
• जर तो इतकी वर्ष चांगला बाप असेल तर त्याला मुलांपासून तोडले असेदेखील होणार नाही,
• जर इतकी वर्ष आपले कर्तव्य समजून त्याचे नातेवाईक सांभाळत असू तर ते आता unceremoniously डम्पता येतील आणि तोच वेळ स्वतःचे छंद, ग्रुमिंग, काहीतरी नवीन शिकणे याला देता येईल,
• मोठा मुलगा 18चा म्हणजे बारावीला असेल तर यापुढे दुसऱ्या गावात तो होस्टेलला राहू शकेल,
• दुसरा 11चा म्हणजे तसा लहान आहे पण तोदेखील अजून 6-7 वर्षात बाहेर जाईलच
• त्यानंतर दोघे सेपरेट रूममध्ये राहू शकतील

पण प्लिज नोट हि सगळी अरेंजमेण्ट तेव्हाच काम करेल जेव्हा दुसऱ्याचे थोबाड बघणे, आवाज ऐकणे डोक्यात जात नसेल, त्याचे अस्तित्वच तिडीक आणत नसेल.

हे शक्य आहे का त्याचा निर्णय ताईने आणी भावजीनी स्वतःच घ्यायचा आहे.
त्यासाठी best luck!

===
बाकी आर्थिक स्वतंत्र (हा मुद्दा फार महत्वाचा आहे) बाईने नवर्याकडून पुरेसे शरिरसुख मिळत नाही म्हणून जिग्लो हायर करायचा का कि हॉट घटस्फोटीत/विधुर कलीगसोबत अफेअर करायचे कि शेजारच्या बॅचलर शेअर फ्लॅटमधल्या 25 वर्षच्या मुलासोबत म्युचअल अरेंजमेंट करायची वगैरे वगैरे हा या धाग्याचा विषय नाही!

===
परिचित, प्रतिसाद आवडला!

अँमी प्रतिसाद अतिशय संयमीत व प्रामाणिक पणे दिल्याबद्दल आभार.पण जिजुपासून वेगळे राहून तिचा शारीरिक कोंडमारा नाही का होणार?तुम्ही सुचवलेले कोणताच पर्याय तिला जमणार नाही
साँरी पण माझ्या डोक्याची जाम मंडई झालीये

जनरलायझेशन कसलं त्यात? हे जीवशास्त्रीय सत्य आहे. फर्टाईल असते किंवा बीजांड रिलीज झालेलं/होणार असतं तेव्हाचे महिन्यातले ४ ते ७ दिवसच स्त्री 'खरोखरच' सेक्स करण्यास उत्सुक असते.>>
असे असेल, तर मग लग्नानंतरच सहजीवन मोडल्यातच जमा होईल. म्हणजे, ४-५ दिवस वगळता, बाकीचे दिवस नवरेमंडळी शरीरसुख जोरजबरदस्तीने घेतात की काय?

असे असेल, तर मग लग्नानंतरच सहजीवन मोडल्यातच जमा होईल. म्हणजे, ४-५ दिवस वगळता, बाकीचे दिवस नवरेमंडळी शरीरसुख जोरजबरदस्तीने घेतात की काय?>> ते त्यांच्या स्किलवर अवलंबून आहे.

तुमच्या बहिणीने स्वतःच्या नवर्याला माफ करुन पुढचे आयुष्य परस्पर सामंजस्याने व्यतित करावे.तसेही त्यांना नवर्याचाच आधार आहे.
नैतिकता वगैरे फालतु गोष्टी आहेत.नैतिक /अनैतिकतेचा फारसा बाऊ करु नये.तसेही costs and benefits ,trade off या गोष्टींवर जग चालते.प्रेम ,नैतिकता वगैरे नंतर तोंडी लावायला असतात. तोंडी लावणे खात बसून मेन कोर्स बाजुला टाकणे हे काही बरोबर नाही.आपला फायदा बघावा दूरचा आणि नजिकचा,जो मार्ग फायद्याचा आहे तो निवडावा.equation मांडावे व yield जास्त असेल तो मार्ग निवडावा.

ते त्यांच्या स्किलवर अवलंबून आहे.>>
कुठलं स्किल? घरकामाचं की बळजबरीचं?

जोक्स अपार्ट, पण बर्याच घरगुती कुरबुरींच कारण कुठं ना कुठं या कामजीवनातल्या असमतोलात असतं. एक जरी पार्टनर संतुष्ट नसेल, तर तो दुसऱ्याशी शारिरीक द्रुष्ट्या किती एकनिष्ठ राहील ‌‌‌‌‌‌हा सवाल उरतोच.

कुठलं स्किल? घरकामाचं की बळजबरीचं?
>> याच उत्तर कदाचित "सर्व करून थकून बेड वर आल्यावर किती बायकांना 'अरे वा शारीरिक जवळीक किती मस्त' वाटत असेल आणि कितीना 'ही काही मिनिटांची जकात दिली की आपण आजच्या दिवसाच्या झोपेचा उंबरा ओलांडायला गिल्ट फ्री मोकळे' वाटत असेल?" इथे आलं आहे.

अनामिक सर्वे घ्यायला हवे एकदा स्त्रियांचे म्हणजे कळेल.️

पूर्वी एकदा आपण लैंगिक दृष्ट्या समाधानी आहोत का यावर सर्वे आणि चर्चा झाली होती. त्या धाग्याची आठवण झाली.

https://www.maayboli.com/node/60915

तेंव्हा मायबोलीवर अनामिक वोटिंग ची सोय होती. ऊर्ध्वश्रेणीकरणाच्या प्रक्रियेनंतर ती गायब झालेली दिसते. त्यामुळे सध्या तिथला वोट काउंट दिसत नाही. पण धाग्यात एक दोन ठिकाणी त्या सर्वेचे निकाल आहेत त्यानुसार लैंगिक असमाधान असणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे असे संबंध असण्याचे प्रमाणही त्यानुसारच असणार.

असो. धागाकर्तीने समुपदेशकाचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहेच. त्यामुळे हे प्रतिसाद त्या वाचत आहेत याविषयी शंकाच आहे. तरीही वाचत असाल तर वर काहींनी सुचवल्याप्रमाणे या झाल्यागेल्या गोष्टींवर फार विचार न करता मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करून तुमच्या ताईंनी निर्णय घ्यावा असे वाटते. त्यांच्या मनातून जाणे अवघड आहे मान्य पण एक दु:स्वप्न पडून गेले असा विचार करून सोडून देता येते का त्यांनी पहावे. प्रचंड कार्यमग्न राहणे हा एक उपाय आहे. डोक्यातून यासंबंधीचे विचार निघून जातील इतके. फारतर तोवर अबोला धरा नवऱ्याशी. ती पण खूप मोठी शिक्षा असते.

Pages