परदेशात मुल असणाऱ्या भारतात एकटे राहणाऱ्या आई वडिलांविषयी

Submitted by mimarathi on 22 June, 2018 - 08:51

नमस्कार,

माझी ७५ वर्षांची आई पुण्या जवळ तळेगाव येथे राहते. इथे अमेरिकेत ती ६ महिन्यांपेक्षा जास्त राहू शकत नाही. तसेच तिला इथे अजिबात आवडत नाही, कंटाळा येतो. ती एकटी राहते त्यामुळे मला सतत काळजी वाटत राहते. वृद्धाश्रमाचा विचार मनात आला तरी खूप अपराध्यासारखा वाटतं. सध्या तरी एखादे वर्ष ताबडतोब भारतात परत जाण शक्य नाहीये . माझ्या सारखेच अशा परिस्थितीतून गेलेले काही जण नक्की असतील, तरी कृपया मला काही तरी मार्ग सुचवा.

धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

फार गहन विषय आहे.. इथे बरेचजण यातून जात आहेत. माझी आई भारतात अशीच रहाते. २४ तास कामाला एक बाई आहे (जी मिळणे अजून अजून कठिण होत चालले आहे), ती मधे मधे २/३ दिवसांसाठी गावी निघून जाते आणि परत येते. अश्यावेळी जवळपासचे नातेवाईक, शेजारी लक्ष ठेवतात. वर्षातून दोनदा जाऊन तिला भेटून येतो.. या पलिकडे उपाय सापडलेला नाही.

1) पुण्यातील अथश्री बद्दल ऐकले असेल तर तिकडे भाड्याने घर घेऊन राहता येईल
2) तलेगाव जवळच मिराघर म्हणून सिनिअर सिटीझन होम आहे (हा वृद्धाश्रम नाही)
http://www.miraghar.org/Public/CMSPage/About-Mira-Ghar.aspx?zEXycsMtR2xT...

माझे आई बाबा काही दिवस तिकडे राहून आले आहेत त्यांना ही फॅसिलिटी आवडली होती. इकडे चौकशी करू शकता.

मी मराठी... तुमचं लोकेशन चेंज करणे हा उपाय ट्राय केलात का. चांगल्या लोकेशन मध्ये जिथे बरेच भारतीय असतील. म्हणजे तुमच्या आई ना अमेरिकेत 6 महिने राहायला आवडेल.

https://www.facebook.com/Non-Resident-Indians-Parents-Organisation-Pune-...

मीमराठी, वरची लिंक बघा. ती संस्था बरेच वर्ष कार्यरत आहे. भारतात एकटे राहात असताना मैत्रीचा हात, परदेशी प्रवासासाठी सोबत वगैरे गोष्टींसाठी उपयोग होतो. वैयक्तिक अनुभव काही नाही, पण खूप पॉझीटीव्ह फीडबॅक आहे.

वरती "अथश्री" चा उल्लेख झाला आहे. माझे काका तिथे राहात होते. खूप आवडायचे त्यांना तिथे. तो पर्यायही चांगला आहे.

त्वरित प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. विचार करून करून थकून गेले होते.
पण आता काहीतरी मार्ग सापडेल अस वाटतंय.

सिम्बा,शुगोल,
अथश्री, फेसबुक ग्रुप बद्दल मला माहिती नव्हते, मिराघर चा पर्यायहि चांगला वाटतोय
आता चौकशी करते. खूप खूप धन्यवाद.

परदेसाई,
२४ तास सोबत शोधतो आहोत, पण विश्वासू बाई मिळण खरंच कर्म कठीण झालय. जवळचे आहेत तेहि सगळे ७०च्या पुढे, त्यामुळे कोण कोणाचं करणार अस झालंय. शिवाय यांची मूल गेल्येत अमेरिकेत मग आम्ही कशाला बघायचं असाही सूर असतोच, पण तुमच्या सगळ्यांशी बोलून खुप बर वाटलं.

मी मराठी, माझ्या आईची पण अशीच गत आहे. त्यातून एक पाय अधू आहे, हल्ली थोडे कमी ऐकू येते.

मी एकुलती एक. त्यामुळे बाबा गेल्यावर भाडेकरू ठेवले घरी. कायम ठेवतेच. खोली रिकामी राहू देत नाही आणि शक्यतो ओळखीओळखीत आले तर बघते. एक बरं आहे की गेली ३५-३६ वर्ष एकाच ठिकाणी राहात असल्याने ओळखीचे खूप आहेत. जातायेता भेटत राहतात. आईची एक घट्ट मैत्रीण आहे ति बर्ञापैकी जाऊनयेऊन असते.
पण आईने वेळ आलि तर स्वतःहून वृद्धाश्रमात जायची पण तयारी दाखवली आहे.

शिवाय यांची मूल गेल्येत अमेरिकेत मग आम्ही कशाला बघायचं असाही सूर असतोच,
>>> अगदी बरोबर. डॉलर पुढे कसली नाती आणि कसलं काय.

<<< शिवाय यांची मूल गेल्येत अमेरिकेत मग आम्ही कशाला बघायचं असाही सूर असतोच >>>
काय चूक आहे त्यात? अमेरिकेचे सोडा, भारतात जरी मुले दुसरीकडे असली तरी इतरांनी का म्हणून या लष्करच्या भाकर्‍या भाजाव्यात?

<<< पण आईने वेळ आलि तर स्वतःहून वृद्धाश्रमात जायची पण तयारी दाखवली आहे. >>>
ही अतिशय चांगली गोष्ट आहे. बर्‍याचदा आई-वडील याला तयार होत नाहीत, ही खरी चिंतेची बाब आहे.

काय चूक आहे त्यात? अमेरिकेचे सोडा, भारतात जरी मुले दुसरीकडे असली तरी इतरांनी का म्हणून या लष्करच्या भाकर्या भाजाव्यात?
>> +१

<<<काय चूक आहे त्यात? अमेरिकेचे सोडा, भारतात जरी मुले दुसरीकडे असली तरी इतरांनी का म्हणून या लष्करच्या भाकर्या भाजाव्यात? >>

माझ्या मते लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्या हा अत्यंत चुकीचा वाक्प्रचार आहे , लष्कर तुमच्यासाठी किती करत याचा विचार करा, तेव्हा त्यांच्यासाठी भाकऱ्याच काय पण वाटेल ते करायची आपली तयारी हवी. लष्कराच्या भाकऱ्या जरूर भाजा का भाजू अस कधीच म्हणू नका.

<<< शिवाय यांची मूल गेल्येत अमेरिकेत मग आम्ही कशाला बघायचं असाही सूर असतोच >>>
हे वाक्य मी केवळ जवळचे नातेवाईक नाहीत एवढाच सांगण्यासाठी लिहिलंय, त्यात कुणी माझ्या आईला बघावं, माझ्यासाठी काही करावं हि माझी अपेक्षा नाही, माझ्या आईनेही मला काही सांगितलेले नाही. ती एकटीच राहते आहे, पण मला काळजी वाटते म्हणून मी वृद्धाश्रमा शिवाय पर्याय काय आहेय याची माहिती करून घेते आहे.

तसेच सगळेजण डॉलरच्या मागे धावतच परदेशात राहतात अस नसत, फक्त सध्या असा झालाय कि नोकरीच्या स्वरूपामुळे परत गेलं तरी ३-४ महिन्यात कंपनी परत बाहेरच पाठवेल. म्हणजे हा प्रश्न तसाच राहणार. माझ्यासारखे काही जण नक्की असणार तेव्हा त्यांनी काय मार्ग काढला, हे जाणून घ्यावं म्हणून मी माहिती विचारली आहे.

च्रप्स, उगाच विषय भरकटवून धागाकर्तीला मनसिक गिल्ट द्यायचा प्रयत्न करू नका.
विषयावर सोलुशन देता येत नसेल तर वाचनमात्र राहा.
मीमराठी, तुमची समस्या समजू शकते, आज ह्या दिवसात खूप लोक ह्या स्थितीतून जात आहेत. तुम्हाला अनेक शुभेछा!

आशु - असा विचार केला नव्हता ... सहमत आहे. प्रतिसाद डिलीट करतो.
मी देखील एक सोल्युशन दिले आहे वरती .

>वृद्धाश्रमाचा विचार मनात आला तरी खूप अपराध्यासारखा वाटतं.

वृद्धाश्रम म्हणजे काहीतरी वाईट, कृतघ्न मुलांनी आई वडिलांच्या उपकराची अपकाराने केलेली परतफेड, निराधार वृद्धांचे आश्रयस्थान वगैरे गैरसमज आपण पर्सनली व समाज म्हणून मनातून काढून टाकले तर बरे. वृद्धाश्रम हा शब्दच इतका बदनाम झालेला आहे की पर्यायी शब्द शोधावा वाटतो. "आय टी मध्ये काम करून लाखोनी पगार घेणार्‍या मुलाने आईवडीलांची वृद्धश्रमात रवानगी केली", "कुठे तो श्रावण बाळ अणी कुठे हे.." अशी टाळ्याखाऊ वाक्ये वाचून उबग आला.

काही दशकांपूर्वी आई वडील दोघांनी नोकरी करणे फारसे कॉमन नव्हते. तेव्हा पाळणाघर ही कल्पना नवीच होती. आमच्या चाळीत एकच कुटुंब असे होते की नवरा बायको नोकरी करत व मुलाला "पाळणाघरात" ठेवत. त्यावेळी इतर बायका त्या जोडप्याला टोचून बोलत की पैशासाठी पोटच्या मुलाला असे कसे बाहेर ठेवू शकता? आबाळ. उपासमार. प्रेमाला पारखा. ई ई. त्या मुलांना उगीचच सिम्पथी दाखवत की आईवेगळी मुले ई. दोन पगार असल्याने त्यांना तुलनेने ते मुलांना बरी खेळणी, शैक्षणीक साहित्य ई ई देऊ शकत. त्यांनी लवकरच घर खरेदी केले व चाळीतून बाहेर गेले. त्यांच्या घरात मुलांना अभ्यासाला स्वतंत्र खोल्या. आज त्या दोन्ही मुलांचे चांगलेच झाले आहे.

आज "पाळणाघर" हे आपण स्वीकारले आहे. काही कंपन्या कामच्या ठिकाणीच पाळणाघर देतात. मग वृद्धाश्रम हे स्वीकारायला काय अडचण आहे ? आणी आपण स्वीकारले नाही तरी तेच भविष्य आहे.

<<< माझ्या मते लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्या हा अत्यंत चुकीचा वाक्प्रचार आहे , लष्कर तुमच्यासाठी किती करत याचा विचार करा, तेव्हा त्यांच्यासाठी भाकऱ्याच काय पण वाटेल ते करायची आपली तयारी हवी. लष्कराच्या भाकऱ्या जरूर भाजा का भाजू अस कधीच म्हणू नका. >>>
लष्कराबद्दल इतके अपार प्रेम असणार्‍यांनी सॅम माणेकशॉ यांची आठवण काढावी. सॅम माणेकशॉ म्हणजे बांगलादेशाच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार, भारताचे पहिले फिल्ड मार्शल. पण त्यांच्या मृत्यूनंतर सरकारने दुखवटा जाहीर केला नाही, इतकेच कशाला प्रेसिडेंट, पंतप्रधान, डिफेन्स मिनिस्टर, सैन्यदल-वायुदल-नौसेना यांचे प्रमुख यापैकी कुणीही त्यांच्या अंत्यविधीला हजर राहिले नाही. फाइव्ह स्टार डेकोरेटेड ऑफिसरची ही कथा, तर बाकीच्यांचे काय? फक्त बोलायच्या गोष्टी.
असो, विषयांतर झाले. आता मूळ मुद्द्याबद्दल.

मुळात वृद्धाश्रमाचा विचार मनात आला तरी खूप अपराध्यासारखा वाटतं, हे विचार मनातून काढून टाका. तुमच्या परीने तुम्ही सगळं करताय ना? मग झालं तर. माझा अनुभव सांगतो. सध्याच्या अथश्री मध्ये भाड्याने जागा मिळणे, वाटते तितके सोपे नाही. चौकशी केली होती, जमले नाही. परांजपे यांचा नवीन प्रकल्प पण येत आहे, त्यात चौकशी केली होती, ४५-५० लाखाचा १ फ्लॅट आहे. खरंतर किंमत अवच्यासव्वा आहे, पण तरी त्याला तयार झालो. जागा तयार होउन रहायला जायला ३-४ वर्षे लागतील असे कळले, म्हणून तो बेत बारगळला. नंतर मी ओळख काढून http://dignitylifestyle.org/index.html इथे माथेरानमध्ये पण सोय केली, पण आम्हाला म्हातारपणी कुठेही जायचे नाही, इथे हवा जास्ती छान आहे वगैरे फालतू कारणे सांगून तो बेत हाणून पाडण्यात आला. घोड्याला पाण्याजवळ नेता येते, पण पाणी पाजता येत नाही. शेवटी कंटाळून तो नाद सोडून दिला आहे. सध्या जेवणाची सोय तरी झाली आहे, हे त्यातल्यात्यात समाधान. वयस्कर आई-वडिलांना व पर्यायाने स्वतःला पण त्रास होऊ नये, म्हणून प्रयत्न केला, पण शेवटी काय आहे ना, प्रत्येकजण स्व्तःच्या नशीबानेच जन्माला येतो आणि स्व्तःच्या नशीबानेच जातो, हेच सत्य आहे. या सर्व द्राविडीप्राणायामातून १ गोष्ट मात्र नक्की शिकलो की उद्या स्वतःवर अशी वेळ आली की मुलांना कमीत कमी आर्थिक आणि मुख्य म्हणजे मानसिक त्रास कसा कमी होईल याचा विचार नक्की करणार आहे. आमच्यावर वेळ आली तशी त्यांची फरपट होऊ नये, इतकीच इच्छा.

@कटप्पा,
तुमच्या शुभेच्छाबद्दल आभारी आहे.

Come back to India. This is also an option if you want to explore. Though it is tough.
Aaja ke umar bahut hai choti
Aapne ghar me bhi hai roti....

वृद्धाश्रम म्हणजे काहीतरी वाईट, कृतघ्न मुलांनी आई वडिलांच्या उपकराची अपकाराने केलेली परतफेड, निराधार वृद्धांचे आश्रयस्थान वगैरे गैरसमज आपण पर्सनली व समाज म्हणून मनातून काढून टाकले तर बरे. वृद्धाश्रम हा शब्दच इतका बदनाम झालेला आहे की पर्यायी शब्द शोधावा वाटतो. "आय टी मध्ये काम करून लाखोनी पगार घेणार्‍या मुलाने आईवडीलांची वृद्धश्रमात रवानगी केली", "कुठे तो श्रावण बाळ अणी कुठे हे.." अशी टाळ्याखाऊ वाक्ये वाचून उबग आला.>>>>>>.

सहमत. आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रमाचे महत्व सांगितलेले आहे, लोक ते का विसरतात कळत नाही. मी तर स्वतःचे स्वतः करायचा कंटाळा आला की सरळ वृद्धाश्रमात जाणार आहे. रोज भाजी काय करा, बिले भरली का, गळका नळ दुरुस्त करणारा कधी येणार,बाई आज येतेय की आजही दांडी वगैरे चिंता आयुष्यभर का म्हणून करत बसाव्या? पैसे देऊन या सगळ्या चिंता कुणा दुसऱ्याच्या गळयात टाकायच्या व आरामात राहायचे.

बोका,
अथश्री मध्ये फ्लॅट्स भाड्याने सुद्धा मिळतात, परत एकदा प्रयत्न करा.
अथश्री ची भुगाव जवळ नवीन फेज (एक पूर्ण एकाचे बांधकाम) सुरू झाली आहे, तिकडे सुद्धा चौकशी करा,

पुण्यातल्या सोसायट्यांमध्ये , मनमोहन सोस, महात्मा सोस, इत्यादी बंगले भाड्याने मिळू शकतात,
आपले आई वडील आणि जाहीरात देऊन/ओळखतील अजून एखादे वृद्ध जोडपे/बाई यांची सोय तिकडे होऊ शकेल. भाडे/कामवालिचे पैसे इत्यादी गोष्टी शेअर करता येतील.

वृद्धश्रमाला सरसकट क्षुद्र लेखणार्यांनी काही गोष्टींचा नीट विचार करावा.
१. ज्या वृद्ध लोकांकडे सतत लक्ष देणे आवश्यक आहे (जसे कि अल्झयमर असलेले ) , आणि तसे घरी करणे शक्य नाहिये; ज्यांना आता स्वतः स्वतःची काळजी घेणे शक्य नाही , ज्यांची मुले परदेशात असतात, त्या लोकांसाठी वृद्धाश्रम हा उत्तम उपाय आहे.
वृद्धाश्रमाचे फायदे जरा पहा
सतत आजुबाजुला कोणीतरी माणुस उपलब्ध असतो.
समवयस्क लोकांची संगत मिळते.
एकदाही न चुकता न्याहरी , जेवण , चहा वेळच्या वेळी मिळतो जो बर्याच घरातही मिळू शकत नाही.
वेळच्या वेळी औषधे दिली जातात.
कुठल्या म्हणजे कुठल्याच गोष्टीची (बिले , गेलेला गॅस - वीज - पाणी , अचानक रजेवर गेलेली कामवाली , ही यादी वाढतच जाइल) चिंता वृद्ध आणी त्यांच्या आप्तांना रहात नाही.
तातडीच्या वेळेस कर्मचारी आवश्यक असल्यास परस्पर इस्पितळात घेउन जातात आणि मग तुम्हाला कळवतात.
वृद्धाश्रमात विविध उपक्रम चालू असतात जसे कि रोज भजनी मंडळ , रविवारी व्याख्याने आणि इतर करमणुकीचे कार्यक्रम ; सर्व सणांचे उत्साहाने साजरे करणे ...
२. घरी एकटे असणार्या वृद्धासाठी अटेंडंट ठेवणे हे खूप धोक्याचे असते. समजा चांगला अटेंडंट मिळाला तरी तो सर्व गोष्टी खरच प्रेमाने करतो का ही शंका सतत खात रहाते. आपण आपल्या आप्तांना त्याच्यावरच सोपवून जात असल्याने त्याच्यावर अविष्वास दखवणेही धोकादायक वाटते. तो आपल्या पश्च्यात घरात काय काय उपद्व्याप करेल ही भीतीही सतत असते.
३. कित्येक घरात वृद्ध लोकांची होणारी घुसमट आणि हेळसांड , मुस्कट्दाबी कोणीच थांबवू शकत नाही. त्यांच्यासाठी वृद्धाश्रमात रहाणे आनंददायी ठरेल.
४. आजच्या काळात उत्तम वृद्धाश्रम उपलब्ध आहेत हे खरच खूप लोकांसाठी वरदान आहे.

मदतनीस ठेवत असाल तर (किंवा नसाल तरीही) घरात सीसी टीव्ही कॅमेरे लाउन घ्या. तुमच्या घरबसल्या तुम्ही आईंवर लक्ष ठेउ शकता.

सध्या तरी आई बाबा हसते फिरते आहेत, त्यामुळे ६ महिने माझ्याकडे, ६ महिने भारतातल्या दोन बहिणींकडे असतात. त्यांना आतापासूनच असे फिरावे लागतेय, पण मुला नातवंडांना, जावयांना आणि खुद्द आई बाबांना एकमेकांचे प्रेम लागणे आवश्यक आहे असे वाटते.

उद्या आजारी झाले तर एकाच बहिणीच्या घरी सोय करून बाकीच्या दोघी येऊन जाऊन मदत करतील असा विचार आहे. आर्थिकदृष्ट्या ते दोघेही स्वतंत्र आहेत. माझे इतर नातेवाईकही मदतीला तत्पर आहेत. आई बाबांनी माणसं जोडली आहेत. त्यामुळे आश्वस्त वाटतयं. आमचा सध्या तरी परतोनी पाहेचा प्लान नाही. पण वेळ पडली तर ते ही करू असं वाटतयं. आंअची आजी आता अशीच सोयीने रहातेय. मनात आलं की माझ्या मुम्बैच्या किंवा बहिणीकडे ओलाने जाते, तिच्या पाच मुलांपैकी दोघांकडे नि त्यांच्या मुलांकडे (मोठा मामा आणि आई) जायचं तिने ठरवलयं. माझे आई बाबा पण तसेच करतील असे वाटतंय सध्या.

मी स्वतः म्हातारी होईन तेंव्हा मुलांच्या आजुबाजुला राहू इच्छिते. मला थोडं अ‍ॅडजेस्ट करावं लागलं तरी चालेल. माझ्या मुला-भावंडांपासून दूर पण स्वदेशात रहाण्यापेक्षा मुलाबाळांसोबत जोडून घेऊन रहायला आवडेल. पुढे इश्वरेच्छा!

सिल्व्हर होम्स बद्दल चौकशी करा. माझी एक चुलत बहिण तेथे रहायला गेली आहे. तिचा अभिप्राय चांगला आहे. बाणेर/बालेवाडी एरीयात आहे.
http://www.onpsilverhomes.com/contactus/

कुठे तो श्रावण बाळ
<<
अवांतर.

श्रावण बाळ ही कन्सेप्ट मला व्यक्तिशः अजिबात आवडत नाही.

Why the hell should a son sacrifice his every pleasure just for the sake of a pilgrimage for parents? I would applaud him if he would have died saving his parents' life, or gave his kidney or something like that. But just to take them on a pilgrimage to holy places???

मी माझ्या मुलांना श्रावणबाळ होऊ देणार नाही.

Why the hell should a son sacrifice his every pleasure just for the sake of a pilgrimage for parents?
>>> Maybe he got pleasure in doing that??

अहो लाईनच्या मधलं वाचा की! त्याकाळी तीर्थयात्रा हे इतिकर्तव्य होतं. आज रेग्युलर मेडिकल चेकप होतोय ना? त्यांच्या जेवणात योग्य प्रमाणात आवश्यक घटक आहेत ना? मोबिलिटीला सहाय्य करेल अशा काही नव्या गोष्टी आल्या असतील तर त्याने त्यांना काही फरक वाटेल का? त्यांना युरोप/ अमेरिका/ काश्मिर/ वज्रेश्वरी जे काय बघायची / फिरायची इच्छा असेल तर ते आपल्याला करणे शक्य असेल तर करा. जवळ रहात नसाल तर फोन करा, क्वालिटी टाईम देण्याचं बघा. किंवा काय जमेल ते करुन तुमची आम्हाला गरज आहे ही भावना त्यांच्या मनापर्यंत पोचवा.

कावडीत घालून तीर्थयात्रा नाही कोणी करायला सांगते.

कावडीत घालून तीर्थयात्रा नाही कोणी करायला सांगते.

Between the lines is what is the problem.
It is not my job or life goal to provide them with their life goal, AT THE EXPENSE OF MY LIFE. And NO parent should expect it.

And if you think he is THE ideal, then leave that foreign job, come home and be a lifelong caretaker. Simple.

तसेच तिला इथे अजिबात आवडत नाही, कंटाळा येतो.
<<
This कंटाळा should be reason for my guilt?
Or should I quit pursuing my life goals or ambitions for that?

THIS is the actual श्रावणबाळ moral.

सीमंतिनी ने हे विचारले Lol

. अयोध्या ते वाराणसी पायी पायी फक्त ४० तास लागतात. अगदी निबीड अरण्य असेल तेव्हा असे धरले तरी ८० तास. एकूण १६० तासाचा प्रवास. गाव की गोरीयोंको बॉडी-डोले-शोले दाखवत दाखवत रोज ४ तास चालला तरी एकूणात श्रावणाची काशीयात्रा असाईंन्मेंट ६-८ विक्स पेक्षा मोठी नव्हती. त्यावरून तो आयुष्यभर आई-बाप भक्त होता हे कंक्लुजन कस काढतं ?

अयोध्या ते वाराणसी पायी पायी फक्त ४० तास लागतात. अगदी निबीड अरण्य असेल तेव्हा असे धरले तरी ८० तास. एकूण १६० तासाचा प्रवास. गाव की गोरीयोंको बॉडी-डोले-शोले दाखवत दाखवत रोज ४ तास चालला तरी एकूणात श्रावणाची काशीयात्रा असाईंन्मेंट ६-८ विक्स पेक्षा मोठी नव्हती. त्यावरून तो आयुष्यभर आई-बाप भक्त होता हे कंक्लुजन कस काढतं ?
>>> त्याचं आयुष्य तेवढंच होत.

त्याचं आयुष्य तेवढंच होत. >> श्रावण जन्माला आल्या आल्या लगेचच कावड्यांमधे आईबापाला घालून गेला म्हणता ? Lol

नाही असामी. __/\__
लहान वयात त्याला दशरथाचा बाण लागून तो गेला. तेवढेच आयुष्य होते आणि माता पित्यांची सेवा करताना तो गेला असे मला म्हणायचे होते.

मी या प्रश्नाच्या विरूद्ध बाजूला आहे. म्हणजे माझी दोन मुले अमेरिकेत आहेत. हा खरोखर मोठाच विषय आहे. सद्ध्य्या आम्ही दोघे साठीत आहोत व अजून तब्येती ठीक आहेत .मुलान्चे अमेरिकेत स्थायिक होणे सकारात्मकतेने घेतले आहे अगदी दरवर्षी नाही पण मधून मधून जातो.पण पुढ्चा विचार आला की थोडी भीति वाटतेच . मुले येथे येणे आणि आपण तिथे जाणे हे दोन्ही अशक्य आहे .कारण मुले स्वत: नागरिक होऊन आम्हाला नागरिक बनवायला खूपच वर्षे जातील .
यावर अथश्री हा खरोखर उत्तम उपाय आहे . भूगाव येथील अथश्री मी पाहून आले आहे .ते अतिशय उत्तम आहे . तिथे रहाणारी मन्डळीही मला भेटली. ती या व्यवस्थे बाबत समाधानी वाटली.
माझे अत्यन्त वैयक्तिक मत असे आहे की आपले नातेवाइकही आपल्याबरोबरच वयाने वाढत असतात .त्याना त्याची आजारपणे , रुटिन, त्यान्चे प्रश्न असतातच .त्यान्च्या कितीही मनात असले तरी ते आपल्याला सदैव मदत करू शकतीलच असे नाही. विषेशतः एखादा रेन्गाळणारा आजार असेल तर किन्वा आपण बेडरिडन झालो तर . तसेच तरुण पिढीचेही आहे. ते आपल्याला पहातील की त्यान्च्या मुलाबाळाना ? भारतात आता नोकर मिळणे तेदेखील विश्वासू कठीण झाले आहे .
या विरुद्ध अथश्री ही एक सिस्टिम आहे . आणि सुमारे २० २५ वर्षे यशस्वी रित्या चाललेली . तेथे सर्व गोष्टी योजनाबद्ध आहेत. वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध आहे .शिवाय स्वातन्त्र्य आहे . आजूबाजूला समवयस्क लोक आहेत . शिवाय ते आपल्याच सारखे आहेत म्हणजे मुले परदेशी असणारे. आणि ९९ टक्के मराठी .(याचा ही फरक पडतो वयस्क माणसाना. )
भूगाव चे अथश्री तर फारच छान आहे. माझा तिथे घर घ्यायचा विचार आहे .
आता एक निगेटिव्ह गोष्ट अशी की आजूबाजूला फक्त म्हातारी माणसे . तरुणाई नाही मुले नाहीत . पण सर्वच कसे मिळणार , नाही का ?

अयोध्या ते वाराणसी पायी पायी फक्त ४० तास लागतात. >>> अहो दशरथ तिथे अयोध्येवरून गेला असेल म्हणून श्रावणबाळाने तेच अंतर कापले हे कशावरून? ही तुमची अ‍ॅझम्प्शन्स झाली. तो रामेश्वर-काशी ही पदयात्रा पूर्ण करत असेल त्या वेळेस.

तो रामेश्वर-काशी ही पदयात्रा पूर्ण करत असेल त्या वेळेस. >> +1 ब्याकराउंडला कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी वाजत असेल.

त्या श्रावणबाळामुळेच तर पुढलं सगळं रामायण घडलं.

एकतर आइवडिलांच्या उतार वयात जन्माला आला. हा टीनेजमध्ये आला, तोवर आईवडिलांना धड चालताही येईनासं झालं. मग कावडीत बसून रिलिजस टूर वर निघाले, तिथे शिकार (बघा शिकार करणं कधीपासून वाईट आहे) मुलगा चुकून बळी पडला आणि दशरथाला पुत्रवियोगाचा शाप मिळाला.

राम जन्मला नाही अजून तर रामेश्र्वर कसं वसेल??! काहीही Happy ह्याला अझंप्शन नाही जी.के. म्हणतात Wink
नर्मदा परिक्रमा ज्यात काही बारा ज्योतिर्लिंग येतात ती सगळ्यात लांब समजली जाते पण ती पण चालत चालत ६ महिन्यात होते.

असो. विषयांतर फार झाले. अथश्री मध्ये मासिक फी अंदाजे किती आहे ?

माझ्या मर्यादित अनुभवावरून अशा लोकांसाठी मुंबई पुण्यापेक्षा सांगली सोलापूर सारखी टियर २ गावे बरी. मेडिकल सोयी असतात. खर्च तुलनेने कमी. कामासाठी माणसे / महिला मिळणे तितकेसे कठीण नाही. तळमजल्यावर घर मिळणे शक्य वा स्वतंत्र घराची किंमत अगदी प्रचंड नाही. शेजार पाजारची सपोर्ट सिस्टीम बरी. अर्थात पूर्ण आयुष्य मुंबईत गेले तर ते सर्व सोडून अशा ठिकाणी जणे अवघड आहे.

Pages