आज दिनांक २३ जून

Submitted by Yankee Juliet on 19 June, 2018 - 23:54

मुंबईहुन रत्नागिरीच्या मंडणगडला बदली झाल्याने तो जरा नाराजच होता. पण नविन नोकरी टिकवताना आलीया भोगासी म्हणत मंडणगड़च्या त्या गावरान वातावरणात सामावून जाण्याशिवाय काही ईलाजच नव्हता. रविवारचा बकार्डी हैंग ओव्हर वेळेत न संपल्याने आज उशिराच जाग आली. वड़ापची सूमो अर्थातच चुकली. ऑफिस वेळेत गाठणे आवश्यक होते. त्यामुळे समोर आलेल्या लाल डब्याच्या गर्दीचा एक भाग होण्यावाचुन त्याला पर्यायच नव्हता. आपली कड़क इस्त्री अन् टाय बूट वगैरेची पर्वा न करता शेवटच्या बाकड्यावर खिड़कीतल्या सिटवर बसकण मारण्यात त्याने धन्यता मानली. स्वत:च्या एक्स-इफेक्टचा दरवळ आजुबाजुला सोडत अजुन रिलैक्स होण्यासाठी डोळ्यांचा पॅनोरमा मोड़ ऑन करत सर्वत्र नजर फिरवली.

त्या छोट्या तालुक्याच्या गावात बऱ्यापैकी नैसर्गिक हिरवळ होतीच पण ह्या तास भराच्या प्रवासात मनाला शांत करणारी हिरवळ मिळाली तर ....! अन् काय आश्चर्य, मिस मंडणगड़ वाटावी अशी ललना मस्त स्टाईलमध्ये चक्क त्याच्या शेजारच्या सिटवर येवून बसली. तासाभरात काय काय गप्पा मारता येतील अन् प्रकरण फार अंगाशीसुद्धा येणार नाही ह्याचा परत एकदा मनाशी आढावा घेत त्याने बोलायला सुरुवात करायची म्हणून शेजारी पाहिले.

"हाय...."

"....."

प्रत्युत्तर म्हणून तोंडावाटे रिप्लाय नाही आला मात्र तिचे डोळे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते हे त्याला जाणवले. पण नक्की काय ते मात्र त्याला समजत नव्हते. थोडावेळ पॉझ घेवून त्याने परत एक अंदाज घेण्यासाठी शेजारी चोरटा कटाक्ष टाकला, अन् तिने तिच्या ओठांचे चंबू करत केलेले हावभाव पाहुन मनात ख़ुशी के लड्डू फुटल्याने तो छताला जावून आपटायचाच बाकी होता. त्या ओठांच्या उचंबळण्यावरुन त्याने मनात भलताच अर्थ काढला होता अन् त्या निष्कर्षाची खात्री पक्की करण्यासाठी सर्व पिक्चर मनातल्या मनात फ्लैशबैक पासून बघणार इतक्यात तिने त्याचा हात पकडून स्वत:च्या बाजूला ओढले....

एका ग्रामीण भागात एवढा प्रगतशील बोल्डपणा पाहुन तो मनोमन सुखावला आणि मुंबईबाहेरची पहिली गर्लफ्रेंड हीच असे शिक्कामोर्तब करणार इतक्यात.... इतक्यात त्याच्या अंगावर 'ते' सांडलेच. त्याला मघाच्या विचारांनी स्वतःचीच किळस आली, पण आता नाईलाज होता. तिने तिचा कार्यभाग उरकला होता. प्लास्टिक पिशवी न मिळाल्याने उघड्या खिड़कीत तिने उलटी करताना त्यातला थोड़ा प्रसाद ह्यालाही मिळाला होता. ह्याच त्या मघापासुनच्या खाणाखुणा होत्या हे समजेपर्यन्त त्याचा शुभ्र पांढरा शर्ट आता हिरवट दिसू लागला अन् त्या शेजारच्या हिरवळीकडून सॉरी शब्द कानात पड़ेपर्यन्त दरवाजाकड़े धूम ठोकत तो प्लास्टिक बंदीचा पहिला मानकरी ठरला होता.

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

cgan

भारी लिहलय.
निळ्या, काळ्या वगैरे कमी मायक्रोनच्या पिशव्या आहेत त्यावर बंदी आहे ना की सरसकट सगळ्याच प्लास्टिक वर आहे. सगळ्याच असेल आणि हा त्रास असेल तर वन टाइम इन्व्हेस्ट करून एखादा स्टील चा छोटा डब्बा घ्यायला हरकत नाही. तो डब्बा फक्त अश्यावेळीच वापरायचा.

धन्स अक्षय Happy
स्टील डब्बाचं सोल्युशन भारीये Wink

यक झालं :,>>> हो नं....आणि अक्षय दादाचा सल्ला.. कल्पनाच करवत नाही उलटीचा डबा मिरवायचा. Lol त्यापेक्षा गोळ्या मिळतात त्या घ्यायच्या बिनधास्त.

धन्स शाली आणि पवनपरी Happy
_______
कल्पनाच करवत नाही उलटीचा डबा मिरवायचा. >> पान खाणारे मिरवतात की सोबत Lol इकडे रॉ मटेरिअल फक्त बदलेल Wink

हाहाहा ... मला आधी वाटलं पान खाणारी असेल म्हणजे दिसायला ढिनच्यॅक पण पान पचकन थुंकण्याची सवय असणारी

तात्पर्यः आपणहून जवळ येऊन बसणार्‍या मुलीबद्दल जरा साशंकच रहात जा! मुलगी शेजारी बसली, तिने आपल्याला जवळ ओढले म्हणून एकदम उचकून जाऊ नका. इतके हपापलेले असू नये. जरा धीर धरला तर सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात!!