बल्ली-२

Submitted by राव 007 on 15 June, 2018 - 02:18

बल्ली -१ ची लिन्क https://www.maayboli.com/node/66413

नित्या नेहमी प्रमाणे त्याच्या शहरातील किस्से सांगत होता... शरद ने अल्ताफ चे गाणे लावून आवाज थोडा मोठा केला होता, याला नेमका कसला गम आहे ते काय आज पर्यंत कळले नाही आम्हाला.....नित्याने गोदाम गरम पेटवली होती सुट्टा मारत मारत कधी बल्लीत आलो ते कळले नाही पण...शरद ने पहिला गेर लावून रेस वर पूर्ण जोर दिला तेव्हा लक्षात आले कि बल्लीचा चढ सुरु झाला, खेड्यात राहत असल्याने तो काळोख काही खास असा भीतीदायक नव्हता आम्हाला, पण हवेत गारवा जाणवत होता म्हणून मी नित्याला बोलोकी उन्हाळ्यत थंड हवा कशी काय ? आणि नेमके इथे आल्यावरच का ?
चांद्रया: अरे फट्टू इथे तलाव आहे आणि जंगल पण दाट त्यामुळे हवा थंडच येते इथे नेहमी....(हा नेमका मला समजवत होता कि स्वतःला कारण भीती त्याच्या हि चेर्यावर होती..)
नित्या : सिगरेट मार रे तू, भूत भीत काय नसत.. पोर इथे पोहायला येतात म्हणून हे गाववाले अशी अफवा पसरवतात...मागे तो ढोर डॉ. चा भाऊ नाही का इथे बुडून मेला,
चांद्रया : हे भाऊ कशाला फालतू विषय काढतोय तू... शरद भाऊ गाणे बदल जरा .....
देवघट पोहचलो तर तो दुकानवाला दुकान उघडेच ठेवून घरी जेवायला गेला होता... टाइम पास म्हणून भत्ता खाऊन झाला.. शरद ने एक एक पेप्सी पाजली आम्हाला... पंचर वाला आला होता, त्याने पंचर काढून झाल्यावर टायर ट्रॅक्टरच्या मागे बांधून दिला..
हात दूतांना विचारले कि आबा ने नवा ट्रॅक्टर कधी घेतला रे शर्या?.. आणि तुला बरं एवढ्या रात्री पाठवला इकडे ? थांबतोय का जाशील .....नाही म्हणजे मागच्या येळेला घाबरून पारावरच झोपला होता म्हणून इचारलं ...हि हि हि.......

शरद : बापू घाबरलो नव्हतो मी ताप होता, म्हणून झोपलो होतो... मी नाही घाबरत कोणाच्या बापाला, धर तुझे पैसे.. तुम्ही काय दात काढताय.. हा बापू भपऱ्या आहे एक नंबरचा....चला निघू...

आईच्या गावात म्हणजे हा शर्या आम्हाला सोबत म्हणून घेऊन आला तर.... पंचर वाल्या बापूने शरद चा पारावर जोपल्याचा किस्सा सांगून त्याचा पचका केला होता...पण शरद सुद्धा बल्ली ला घाबरतो हि गोष्ट आमहाला धक्का देऊन गेली होती... म्हणून हा साला रस्त्यात एक हि शब्द न बोलता गपचूप बसला होता...
देवगट सोडताना नऊ वाजले होते... बल्ली चा विषय कोणी काढला नाही.. उगाचच इकडचे तिकडचे फालतू विषय चालू होते...
बल्लीचा उतार सुरु झाला.. सावली म्हणून जे छप्पर असत ट्रॅक्टर मध्ये तिथला लाईट शरद ने चालू केला होता. त्यामुळे आम्हाला सगळंच नीट दिसत होत...ब्रेक वरचा पाय जोर लावून दाबला होता त्याने तरी ट्रॅक्टरचा वेग काही कमी होत नव्हता..
चंद्या ओरडला अरे हळू चालव उतार आहे... शरद ने पायाकडे इशारा करून दाखले कि ब्रेक पूर्ण दबलेला आहे आता काय अरु अजून... नित्या आणि मी त्याच बाजूला होतो नित्या ने काही विचार न करता ब्रेक वर पाय ठेवून जोर लावला पण काही फरक नाही... उलट शरद ने एक कानाखाली हाणली त्याच्या कारण त्याचा पाय नित्या च्या पायाखाली चेम्बला होता. ... मी नित्याला मागे ओढले... अरे तो चालवतोय ना... तू का आई घालाया गेला तिथे... फाटली तर माझी पण होती... पण काही पर्याय नव्हता...
उतार संपला पण आता आम्ही संपतो कि काय असं झालं होत... कारण त्या आबा चा नवा कोरा ट्रॅक्टर बल्लीच्या मधोमध आल्यावर झटके देत होता.... आणि ह्या झटक्यानं मुळे कि काय बांधलेला तो मागचा टायर आर्धा खाली घासत होता.. खाली उतरून ते वर ठेवायची कोणाचीच हिंमत नवहती...
तेवढ्यात रोड लाईट बंद झाली... चांद्रया मध्ये काय ताकत आली काय माहित पण त्याने फटकन शरद च्या कानशिलात वाजली... आरे आई घाल्या ट्रॅक्टर पलटी करतो का आता.. लाईट लाव पटकन...
शरद : मी नाही बंद केला रे... हे बघ बटन चालू आहे... ( मधला लाईट चालू होता म्हणून आम्हाला बटन चालू आहे कि नाही ते दिसलं...)
झक मारली आणि तुमच्या बरोबर आलो म्हणत नित्याने ते लाईट च बटन बंद चालू करून बघितलं पण लाईट काय चालू होत नवहता.... ट्रॅक्टर झटका देत देत चालूच होता... हळू हळू का होईना पण इथून निघून जाऊ आधी मग बघू लाईट...
चढ संपण्याच्या पॉईंट पर्यंत आला होता.. आता मोसम तुटला आणि जर परत खाली गेलो तर काही खरं नाही आपलं, एक तर भूत मारेल नाही तर हा ट्रॅक्टर बॅक मध्ये जाताना पलटी तरी होईल... त्यातल्या त्यात ब्रेक पण काम करत नाही... नशीब तो छपरं वाला लाईट होता म्हणून थोडं फार दिसत होत....
तुम तो ठेहरे परदेशी..... अचानक गाण्याचा आवाज सुरु झाला आणि आमची अजूनच फाटली चांद्याने राग- रंगात तो टेप वायरिंग सोबत उपटला आणि गाण्याचा आवाज बंद केला....
खर्रर्रर्रर्र... खर्रर्रर्रर्र..... खर्रर्रर्रर्र......... आईच्या गावात आता हे काय मागे लागलाय.... मागे वळून पाहण्याचा कोणाचा हि धीर नव्हता... शरद ने पुरा पंजा दाबला होताच पण स्पीड काही वाढत नव्हता.पण लाईट सुरु झाली होती ... १५ मिंटचा रास्ता १ तास लागला ती बल्ली पार करता करता.....
बल्ली संपली होती आमच्या गावाचे दिवे दिसायला लागले... म्हटले मागे काय आवाज आहे तो तरी बगु तर तो टायर जो आधी फक्त आर्धा घासत होता तो आता फरफट होता त्याने हा आवाज येत होता....
नित्याने गाव जवळ आले आहे पाहून ट्रॅक्टर थांबवायला सांगितले तो एकटाच उतरला आणि टायर बांधून वर आला... एक सिगरेट पेटवली होती..... तीच ती गोड वाली....
ट्रॅक्टर त्याच स्पीडने आबाच्या घरी लावणून आम्ही पण घरी गेलो पण ट्रॅक्टर पेक्षा जास्त स्पीड ने....
दुसऱ्या दिवशी चेक केलं तर ट्रकटर मध्ये काहीच खराब झाले नव्हते, फक्त टेप तेवढा फुटला होता आणि त्याचा खर्च शरद च्या पगारातून कापला जाणार होता,........

हि सत्य घटना असल्याने मिर्च मसाला नाही टाकला ....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users