बल्ली

Submitted by राव 007 on 14 June, 2018 - 05:44

उन्हाळ्याच्या सुटीत नितीन गावी आला होता, मी आणि चांद्रया नित्याची वाट बघत होतो, घरी सगळ्यांशी भेटून झाल्यावर आला तो... काय रे नित्या कस काय, वगैरे टाइम पास गोष्टी करून झाल्यावर आम्ही तलावाकडे मोर्चा वळवला,
मी:- .नित्या ती गोड वली ??
नित्या : अरे थांबला होता कि नाही ? का सातव्यात बाहेर काढलं होत तुला ...
चांद्रया : हि हि हि .... अरे गाव आहे अजून थांब थोडं.. देईल ना नित्या गोड वाली सिगरेट...
मी : अरे आम्ही मालेगाव ला शोधली पण काय भेटली नाय.... नावच विसरलो ...
नित्या : गप भाड्या माहित आहे मला... २ वाली एक अंत आणि त्यात दोघे मारताय ... म्हणे आम्ही नावच विसरलो,,, गोदाम गरम नाव आहे इचे.... गोड वाली म्हणे...
तलाव फिरून, गोड वाली फुकून,... निघालो तर समोरून शरद दिसला... हा आमचा बळजबरीचा मित्र.... पैशे कमी पडले, किंवा काहीच नाही करायला मग आम्हचा शरद भाऊ जिंदाबाद. हे त्यालाही चांगलेच माहित होते .... ट्रॅक्टर चा ड्राइवर होता म्हणून तो काय ५-१० काढे लक्ष नाही द्याचा... आणि तसेही त्याला आम्च्या शिवाय कोण कुत्रा पण विचारत नाही गावात, एक तर रात्री पिल्यावर कोणाची आई बहीण काढेल सांगता येत नाही, आणि शुद्धीत कोणाशी रामराम पण करायचा नाही एकलकोंड्या होता जरा, असो... नित्या ने पटकन डब्बी खालच्या खिशात टाकली...
शऱ्या: काय रे नित्या कधी आलास...आणि तुम्ही भाडखावं मला न बोलवताच आले का आज....
चंद्र : नाही रे भाऊ तू घरी नवहता ना मग आलो निघून, आता तूज्याकढेच येत होतो आम्ही, विचार नाही तर चिक्याला ..
मी : हो हो मी बोलो नित्या ला कि भाऊ कडे जाऊ आता.
शरद : मरू दे ते, देवघट ला चलोय पंचर काढायला, ट्रॉलीच एक चाक फूस झालं आज, येता कि जाऊ... (आमच्या गावात फक्त फटफटी आणि सायकलच पंचर निघायचं )
नित्या : चला कि जाऊ या... भत्ता भी खाऊन येऊ.....
मी.: भाऊ येताना पिणार तर नाही ना तुम्ही ???
शरद : नाही आज नाही... मामा आलाय घरी ...(बोलता बोलता अचानक राग आला, आणि डबल मळायला घेतलेली गाय छाप त्यांनी एकट्यानेच गपकण तोंडात टाकली.. चंद्याची गायछाप गेली भाऊ च्या खिशात... ) तुला काय रे माज्या पिण्याचे... हा ???
चांद्रया : काही नाही भाऊ आज अमावस आहे ना म्हणून बोलला तो ...चला चला नाही तर दुकान बंद होईल....भाऊ पुडी राहिली माझी...

आबा ने नवा ट्रॅक्टर आणला पण ह्या येडंझ*** तेच,भंगार जुने आणि गम भारे गाणे लावायचे नेहमी....गावातून निघताना थोडा अंधार झाला होता ... घरी पण सांगितले नाही, त्यात चंद्राने आमावस्या चा विषय काढला तेव्हा पासून माझी टरकली होती. या चौकडीत मी वयाने लहान होतो म्हणून कि काय मला जी भीती होती ती बाकीच्यांना नसेल बहुतेक... कारण रस्त्यात बल्ली येणार आता तर ठीक पण येताना रात्र झालेली असणार तेव्हा काय खर नाही आपलं...
बल्ली म्हणजे तो छोटासा घाट.. फार काही डोंगर दरी वगैरे नाही पण दोन्ही बाजूने उतार आणि सेन्टर मध्ये आले कि असे वाटायचे कि आता काय हा ट्रॅक्टर वर चढणार नाही... या बल्लीत भूत आहे आणि ते रात्री अपघात घडवत असतात , असं पारावर म्हातारे बोलत होते होते एकदा.., आमच्या गावातील पण ३-४ खपले होते ह्या बल्लीत ....
क्रमश :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.. Happy
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ! (पुभाप्र)
पुढील लेखनास शुभेच्छा ! (पुलेशु)