सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम बंद करावेत का?

Submitted by खग्या on 14 June, 2018 - 18:39

मंदिर, परमेश्वर आणि भक्ती याचं अनन्यसाधारण महत्व आपल्या संस्कृतीत खूप संत महात्म्यांनी समजावून सांगितलं आहे. मी श्रद्धाळू वगैरे नाही पण मंदिर किंवा मूर्ती पहिली किंवा अन्य पूजनीय व्यक्ती पहिली कि हात आपोआप जोडले जातात, म्हणजे आस्तिक नक्कीच आहे. पण अलीकडे लोकांची भक्ती पहिली कि उबग येतो. २५-३० वर्षाचे तरुण जेव्हा साई बाबांच्या दर्शनासाठी चालत मुंबई हुन शिर्डी ला जाताना दिसतात तेव्हा खरंच वाईट वाटत. लोकांचं देव देव करणं, सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली धुडगूस घालणं, आणि देवाच्या नावाचा बाजार मांडणं पाहिलं कि सहज एक विचार डोकावून जातो :

सार्वजनिक भक्ती स्थळे (सर्व धर्म, पंथ यात आले) आणि सार्वजनिक भक्ती उत्सव 'ज्यात परमेश्वराची पूजा केली जाते ते सगळे उत्सव यात दिवाळी पहाट किंवा तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम अपेक्षित नाहीत' कीर्तन किंवा भाषण सुद्धा चालेल. (पण अमुक ठिकाणी/मूर्तीमध्ये देव आहे त्याला फुलं वहा असं जिथे सांगितलं जात ते नको ) यावर बंदी घातली तर समाजात चांगला फरक पडेल का?

यात स्वतःच्या घरात ४ भिंतीच्या आड कितीही भक्ती करण्यास हरकत नाही फक्त त्याला कुटुंबाच्या बाहेरील लोकांना बोलावू नये म्हणजे झालं. पण महाप्रसादाच्या जेवणावळी उठवण्यास नक्कीच हरकत आहे. कारण प्रसाद घेताना आधी परमेश्वराला नमस्कार करणं अपेक्षित आहे.

या वर मायबोली करांची मते जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@भूमिपुत्र मम :--१++++
'सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली धुडगूस घालणं, आणि देवाच्या नावाचा बाजार मांडणं' हे विधान ठीक आहे, पण पण पाच बोटे एकसारखी नसतात ना साहेब.
'पण अमुक ठिकाणी/मूर्तीमध्ये देव आहे त्याला फुलं वहा असं जिथे सांगितलं जात ते नको' नकोच ना कोणालाही नको ते..... म्हणून काय देवळात जाणे, पालखी , पारायण, पंढरीची वारी, मिरवणूक बंद नाही करता येणार...
मी स्वतः आज पर्यतं शिर्डीत किंवा कुठल्याच धार्मिक ठिकाणी जाऊन कुठल्याही प्रकारचे फुल, प्रसाद, चादर ,ओटी,नारळ नाही घेतले दानपेटी तर दुरच.... दर्शन जरूर करून येतो ,श्रद्धा आहे म्हणून मी जातो,,,, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम बंद करणे हे संस्कृती आणि धर्म दोन्ही बाबतीत घातक ठरेल...

घर्म आपापल्या घरी असावा. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला अडचणी निर्माण करणारे धार्मिक सार्वजनिक कार्यक्रम नकोत मग ते कुठल्याही धर्माचे असोत.

धर्माचे, जातीचे सार्वजनिक जागेवर प्रदर्शन कशाला.... ?
>>>>

कारण मुळातच जातीधर्म या मिरवायच्या गोष्टी आहेत. एकदा मानल्या की त्या घरात ठेवता येत नाही. अर्थात कायद्याने बंधने घातली तर नाईलाज. अन्यथा स्वताहून कोणी तसे करेल या अपेक्षा ठेवू नका.

घरातच ठेवायला सगळे तयार होतील का......
रस्त्या वरची नमाज आणि गणपती कशे काय थांबवू शकता तुम्ही????
या धाग्या मध्ये नमाज, हजरत-हुसैन जुलूस यांचा विषय टाळला गेला आहे.....

गुरुग्राम :- रस्तावर किंवा कोणत्याही ठिकाणी नमाज नको म्हणून मागील महिन्यात एक आंदोलन करण्यात आले, सुरवात एका गावातून झाली, या गावात एक हि मुस्लिम कुटुंब राहत नाही जे राहात ते भाडेकरू आहेत, त्यांना नसेल पटत तर ते जाऊ शकता गाव सोडून, पण आमच्या गावाच्या वेशीत (हद्दीत) आम्ही नमाज होऊ देणार नाही.... हे एक विधान अधिकाऱ्यांना मान्य होते, म्हणून सर्व सरकारी दलाने मिटिंग वगैरे करून शहरात २७ नियोजित ठिकाणे निवडले आणि फक्त तिथेच नमाज करण्याची परवानगी दिली इतर कुठे हि जमाव करू नका हा निणर्य लावला... दोन्ही पक्षांना निर्णय मान्य हि झाला......
त्यात भर म्हणजे एक सरकारी घोटाळा हि उघड झाला, शिया बोर्ड ला मजीद साठी दिलेली सरकारी जमनी एक नेत्याच्या भावाने बळजबरी कब्जा करून ठेवली होती, हि केस अजून चलु आहे कि जमीन नेमकी कोणाची....

सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम बंद करावेत का?
<<

अजिबात करु नयेत.
उलट आणखी कोण-कोणते, नविन सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम सुरु करता येतील ते पहावे.

हजरत-हुसैन जुलूस यांचा विषय टाळला गेला आहे.....
>>>>

मी दक्षिण मुंबईला राहतो. हा जुलूस लहानपणापासून बघतोय. जोरजोरात छात्या पिटणे, स्वताच्याच छातीवर पाठीवर ब्लेड चाकूचे वार करणे, रक्त काढणे, अगदी लहान मुलांच्याही, मग कोणी बेशुद्धही पडणे, सोबत एम्ब्युलन्स तयारच असणे, आणि ते मोठाले 20-30 फूट उंच काळे हिरवे झेंडे सांभाळत कसरत करत चालणे. लहानपणी ईतरांना रस्त्यावर उतरायला भिती वाटायची. तेव्हा मी त्यातून रस्ता क्रॉस करून समोर जायचो. कारण तेव्हापासूनच किडा. आईच्या जाम शिव्या खायचो यासाठी. कारण लग्नानंतर ती जेव्हा ईथे आली आणि तिने हे पहिल्यांदा पाहिले तेव्हा तीच घाबरली होती.

बाकी हल्ली हे प्रकार दिसत नाही. बंद झालेत की जुलूसाचा मार्ग बदलला कल्पना नाही.

कारण मुळातच जातीधर्म या मिरवायच्या गोष्टी आहेत. एकदा मानल्या की त्या घरात ठेवता येत नाही. अर्थात कायद्याने बंधने घातली तर नाईलाज. अन्यथा स्वताहून कोणी तसे करेल या अपेक्षा ठेवू नका.
नवीन Submitted by भन्नाट भास्कर on 16 June, 2018 -
<<
हळूहळू याच्या संतुलीतपणाचा बुरखा गळून पडू लागलेला आहे अन आतला bigot उघड पडतो आहे.

आ रा रा - उत्तर देण्याचे टाळले होते कारण गांभीर्य दिसले नाही.

ज्यात स्वत: चे कर्तुत्व शुन्य असते त्यात मिरवण्यासारखे काही नाही. बाळगायचाच असेल तर स्वकष्टाने मिळवलेल्या गोष्टीचा अभिमान बाळगा.

ज्यात स्वत: चे कर्तुत्व शुन्य असते त्यात मिरवण्यासारखे काही नाही. बाळगायचाच असेल तर स्वकष्टाने मिळवलेल्या गोष्टीचा अभिमान बाळगा.
>>>>>
एकदा स्वकष्टाने एखादी गोष्ट मिळवली की तिची सहसा कधी मिजास होत नाही. जाती आयत्या मिळाल्याने जी मिळालीय ती भारी आहे हे दाखवायला माज वा मिरवणे हे होतेच.
आणि म्हणूनच मी स्वतःचीही जात मानत नाही. धर्मही मानत नाही. डोक्यात कसली हवा घुसायचा प्रश्नच नाही. ज्यात कर्तुत्वच नाही, नुसता मटका असतो ते मानायचे तरी कश्याला...

Pages