महाप्रसाद???

Submitted by ShitalKrishna on 14 June, 2018 - 13:19

मी राहते त्या परिसरात साईमंदिर आहे. दर गुरुवारी महाप्रसाद असतो, अन्नदान करतात लोक. भक्त आपल्या परीने महाप्रसाद ठेवतात. कोणी खिचडी, कोणी लापशी, कोणी सांबार भात, कोणी पूर्ण जेवण. एक पदार्थ असेल तर द्रोण, पूर्ण जेवण असेल तर लेट.
उच्चभ्रू? सधन कुटुंबातील लोकं ४-५ द्रोण घेऊन जातात. पूर्ण जेवण असेल तरी तसेच. मंदिराच्या परिसरातील लोकं तर घरात प्रसाद घेऊन जेवायलाच बसतात(पूर्ण प्रसाद घेऊन, घरी काही न बनवता).
आज आमच्या कुटुंबा तर्फे महाप्रसाद होता. मी व नवरा वाढण्यास मदत करत होतो. एक बाई सधन कुटुंबातील म्हणाली 'द्या अजून, द्या अजून, शिल्लक राहतं'. असे बरेच लोकं करत होते. एका बाईने घरुन शिरा बनवून आणला होता. ती शेजारी उभे राहून ताटात एक एक चमचा वाढत होती. तर एका बाईने ताटात वाढलेला शिरा हाताने माघारी तिच्या डब्यात टाकला 'शिरा कोणी खात नाही, लापशी वाढा अजून'.
तर बरेच लोक पिशवी डबा घेऊन येत होते, त्या मध्ये भरभरून मागून घेत होते. खूप लोक येतात गुरुवारी प्रसाद घेण्यासाठी. शेवटी यजमान/कार्यकर्ते फळं मिठाई देतात.
मन विषण्ण झाले लोकांची वर्तणूक पाहून. लोक आजकाल एवढं हाव हाव करतात देवाच्या प्रसादासाठी???
माझ्या लहानपणी एक लाही मिळाली तरी घरातील मोठी माणसे समजावून सांगायचे, प्रसाद कितीही असला तरी भक्ती भावाने घेतला तर तृप्ती होते. आणि प्रसादातील एक कण पायदळी जावू देत नसत.
अन्नदान सर्वस्रेष्ठ दान, परंतु लोकांची वर्तणूक पाहून असा वाटला, यांचं पोट भरणार आहे का?
मधे fb वर video फिरत होता. एक माणूस मोठा पातेल्यात भात बनवून सकाळी सकाळी रिक्षा मधून गरजुना वाढत होता. इथं खरच गरजूंना अन्न मिळत होते. आणि आजचा प्रसंग? किती भिन्नता?
असो. बोलावं वाटलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक मनुष्य आपल्या पैश्याने गरीब रुग्णांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करतो. >>> हे इथे रुग्णांचे नातेवाईक जे खेडेगावातून आलेले असतात त्यांच्यासाठी इथ्ल्या काही ट्रस्ट्स करतात. सकाळी दहाला त्यांचा टेंपो रिकामे डबे घेउन निघतो, त्यांचे ठरलेले लोक असतात. त्या त्या सोसायटीत ते जातात. काही जने आठवड्यातून १, २ अथवा रोज एक डबा भरुन देतात.. खरच नातेवाईकांचे रुग्ण सरकारी इस्पितळात असताना फार हाल होतात.. बाहेरचे परवडत नाही म्हणून..

साईमंदिरात इथेही दर गुरवारी अन्न्दान होते. बहुतेक वेळा चविष्ट खिचडी असते.. आई बरोबर गेले असताना एकदा आम्हालाही लाभ झाला. द्रोणात देत होते.. ह्याला आपण काही करु शकत नाही. भिकारीही लाभ घेतातच तर बाकीच्यांनीही प्रसाद घेतला तर कुठे बिघडले?

शिर्डीतला माझा किस्सा..

नेहमीप्रमाणेच लाडू घ्यायला मी रांगेत उभा होतो..एकावेळी दोन पाकीटच मिळतील असा आणि अजुन पाहीजे असतील परत रांगेत येऊन घेऊन जाणे असा नियम ठरलेला त्यावेळी. (नेमकं साल आठवत नाही पण तेव्हा शेवटचं गेलेलो)

बरं शिर्डीला लोक इतकं दान वैगेरे करतात पण प्रसाद हा तिथे विकत घ्यावा लागतो ही खेदाची गोष्ट ..असो तर झालं असं की मी दोन पाकीट घेऊन रांगेतून बाहेर आलो..

आणि बाहेर आल्यावर पाहील की, खुप सारे गरजवंत प्रसादाचे लाडू पैशाअभावी घेऊ शकत नाही. आणि जे काही जेवण तिथे मिळत ते ही कुपण विकत घेऊन भलीमोठी रांग लावावी लागते आणि तिथेच जेवावं लागतं..

जेवण भाविकांना देण्याऐवजी गरीबांना का अन्नदान करत नाही तिथे..

लांबून येणारे भाविक आपली जेवणाची व्यवस्था करू शकतात..फक्त गरज आहे ती भुकलेल्यांपर्यंत अन्न पोहचण्याची. .

ह्या गरजवंताना किमान ट्रस्टनी मोफत द्यायला हवे..

बाकी सगळी धार्मिक स्थळे मला बाजाराच वाटतात फक्त गजानन महाराजाचं मंदीर तेवढं छान आहे तिथे आत्मिक समाधान तरी लाभत..

आपल्या हातून एकदा दान दिले गेले की आपला त्यावरील हक्क गेला.>> प्लस वन.

एकदा खाणे लोकांसमोर् ठेवले की तुमचा हक्क संपला. दान घेउन ते तुम्हाला उपकृत करत आहेत. देउन तुम्ही त्यांना उपकृत करत नाही. हे झेन बुद्धीस्ट तत्व लक्षात ठेवा. जोतो आपल्या कर्माने जेवतो. तुम्ही फक्त साधन आहात ते अन्न त्यांच्या पुढे पोह्चवण्याचे. त्याम्ची वृती पटत नसेल तर बंद करा त्यांना इतर मार्ग नक्की सापडतील पण मी अन्न देते हा इगो नको. थँक्स व्हेरी मच. साईबाबा पण भात बनवून लोकांना खायला घालत मग आपण कोण आहोत. मी तो हमाल भारवाही वृत्तीने अशी कामे केली तर तुम्हाला त्याचे पुण्य मिळेल.

शिरा परत करण्या बद्दल पण तुमचे जे दान घेणारे आहेत त्यांचा तो प्रेफरन्स आहे. जसे मिपावर गुरुजींच्या आत्मकथेत लिहीले होते की लोक गुरुजींना जिथे पूजेला जाईल तिथे साबुदाणा खिचडी, दूध केळी असे सात्विकच अन्न देतात
पचायला जड खिचडी खाउन पोटाचे हाल होतात. तसे शिरा खाउन होत असेल. त्या ऐवजी पोळी भाजी, दाल राइस असे दिले तर पोट भरेल तरी हायजिन ची म म किंवा अमेरिकन अपेक्षा रस्त्यावर राहणार्‍या गरीब भारतीया कडून करणे जरा अवघड आहे.

मी एकदा अलाहाबाद मध्ये गेले होते काही वर्शापूर्वी व मुले लहान होती सर्वांसाठी आइसक्री म घेतले व एक तिथेच बसलेल्या अपंग भिकार्‍यासमोर धरले तर त्याने नको म्हणून सांगितले त्याचाही जीव विटत असेल सारखे आइसक्रीम सम्मोर बघून. उलट त्याहूनही पूर्वी एकदा व्हीटीवर ट्रेन पकडायला जाताना कोन आइसक्रीम घेत होते तेव्हा एक मुलगा डस्टबिन धुंडा ळत होता त्याला माझ्या बरोबरीने नवा कोन घेउन दिला तर तो आव्डीने घेतला त्याने.

होते असे.

देवळातल्या महाप्रसादाला अन्नदान म्हणावं का?
मूळ लेखातल्या वर्णनावरून ते काहघ गरजूंसाठी केलेलं दान वाटत नाही.
प्रसाद म्हणावं, तर प्रसादासारखंही घेत नाहीत.
सगळ्यांनी आळीपाळीने सगळ्यांसाठी काही करून न्यायचा प्रकार वाटतोय.
नाव महाप्रसाद.

पॉट लक म्हणता येईल.
खरं तर तेही काही चूक नाही.रोज अनेक घराचे गॅस आणि रिसोर्स वापरले जाण्यापेक्षा आजूबाजूच्यांनी आळीपाळीने करून सर्वांनी घेणे.
गरजूंना पुरेसे मिळत असेल तर बाकी लोकांनी किती घेतले आणि काय केले यांच्याशी फारसे कन्सर्न नसले तरी चालतील.
कदाचित हे लोक 4 द्रोण आणून घरी येणाऱ्या गरीब नातेवाईकांनाही देत असतील.
'प्रसाद जेवणे' आणि 'लग्नाचं जेवणे' हे आपल्या इथे तेव्हा असलेली भूक, श्रीमंती वगैरे यांच्याशी संबंधित नाही.ते पुण्य मानलं जातं आणि अगदी फाईव्ह स्टार मध्ये पैसे खर्च करून जेवून आलं असलं तरी चार घास खाल्लं जातं.

दिल्लीत होते २ वर्ष!
आजुबाजुच्या मन्दिरान्मधे जेव्हा जेव्हा महाप्रसाद लन्गर असाय्चा,. लन्गर मधे जेवणही छानच असते.
छोले, पुरी, आणि साजुक तुपातला, ड्राय फ्रुटस घालुन शिरा!
त्यात मोठ्या घरचे सरदारजी सुद्धा खाली जमिनीवर बसुन जेवायचे. आणि बरोबर ४-५ डबे आणुन घरच्यान्साठी सुद्धा न्यायचे. त्यात काही वावगे वाटले नाही तेव्हा.

देवळात वाटले जाणारे जेवण हा एक प्रकारचा कम्युनिटी इटिंग चा प्रकार वाटतो. यामागे काय हेतू असावा ? आपल्या हातून देवाच्या नावे काही खर्च व्हावा/ इतक्या लोकांना देताना बघतो, आपणही एकदा द्यावे/ गाठीला थोडे पुण्य जोडावे इ इ काहीही हेतू असू शकेल.

माझी एक भोपाळची मैत्रीण आहे. त्यांच्या घरात दर दिवाळीला त्यांच्या भागातल्या मंदिरात छप्पन भोग चढवायची परंपरा आहे. वेगवेगळे 56 गोड तिखट पदार्थ बनवून देवाला वाहतात व तिथेच इष्टमित्रांसकट व इतर भक्तगणांसोबत त्याचा आस्वाद घेतात. मंदिरात सणावाराला हे सुरूच असते.

माझ्या एक मल्याळी शेजाऱ्यांनी अय्यप्पा देवाच्या उत्सवात एक दिवशी अन्नदान केले होते. ते आम्हालाही सोबत घेऊन गेले होते, आज आम्ही जेवण ठेवलेय, जेवायला चला म्हणत. Happy देवळात जेवायला सगळे उचभ्रू होते, गरजू कुणी नव्हते.

एकूण फीलगुड फॅक्टर, कम्युनिटी फिलिंग इत्यादी सोशल कारणांसाठी हे केले जाते हे माझे मत आहे. तिथे खाणारे कुणीही गरजू नसतात.

मी मलेशियात बाटु गुंफांच्या इथे गेले होते, त्या परिसरात बरीच देवळे आहेत. तिथे एक तामिळ कुटुंब द्रोणातून खिचडी वाटत होते, त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त. मला एक द्रोण दिल्यावर मी अजून एक मागून घेतला होता कारण माझ्यासोबत अजून तिघे होते, जे तेव्हा देवळाच्या बाहेर होते व त्यांनीही ही गंमत अनुभवावी ही माझी इच्छा होती. बाकी द्रोण घ्यायलाच हवा ही गरज नव्हती.

काही देवळात कायम अन्नदान असते. त्याचे लाभार्थी गरजू असू शकतात. आम्ही एकदा असेच सज्जनगडाला गेलो होतो. तिथे पोचेतो उशीर झाला. तिथेच जाऊन प्रसादाचे जेवण घ्यायचे म्हणून वाटेत काही खाल्लेही नाही. वर देवळात गेलो तर सगळा शुकशुकाट.. पोटात कावळे कोकलत होते. शेवटी धीर करून तिथल्या ब्राम्हणाला विचारले आणि अगदी पोटभर जेवण मिळाले. त्यादिवशी आम्ही खरेच गरजू होतो. Happy Happy

साधना चांगला प्रतिसाद.
गरजुनीच जेवावे असं काही नसतं.
तिथे येउन जेवणारा / री आपल्या घरी असणार्या ज्ये ना साठी किंवा इतर लोकांसाठी नेउच शकतात की.

साधना, प्रतिसाद आवडला. मलाही प्रसादाचे जेवण खूप आवडतं. गोंदवलेकर महाराजांच्या जयंतीला जातेच प्रसाद घ्यायला. रामकृष्ण मठातली खिचडी अप्रतिम तिथे रीतसर डब्यात घालून घेऊन येतात. .... एकदा मनालीला एका देवळात गेलो होतो तिथे प्रसाद घेऊन जायचा आग्रह झाला ... पंचवीस वर्षानंतरही ती चव आजही रेंगाळते....
अन्न वाया जात तर नाही ना एवढेच बघावे ....
लग्नात जी काय अन्नाची नासाडी होते ते बघून राग, संताप, चीड , कीव ..... असं बरंच काय काय वाटतं

साधना उत्तम प्रतीसाद. हो, मला प्रसादाचे जेवण निश्चीतच आवडते. शेगाव, अक्कलकोट व गोंदवले तिन्ही ठिकाणी जेवलेय. सज्जनगडला तीन दिवस राहीलो होतो, त्यामुळे तिथले पण जेवलेय.

आमच्या इथे हनुमान मंदीर व महालक्ष्मी मंदीरात पण कायम महाप्रसाद असतो. तिथे लोक रांगा लावुन असतात. मी २ दाच गेले, मात्र आमच्या एरीयातले सर्वच लोक झाडुन तिथे हजर असतात. माझ्या मते आधी ते जेवण ( प्रसाद) गरीबांना, कष्टकर्‍यांना व गरजूंनाच मिळाले पाहीजे. कारण हे लोक २ वेळेच जेवण घेऊ शकतातच असे नाही. आपल्या कडे मात्र चला संध्याकाळच्या जेवणाला सुट्टी असे मानुन बरेच लोक मंदीरात रांगा लावुन असतात हे पाहीले आहे. प्रसाद जरुर घ्या पण तो आधी या लोकांना मिळु द्या, तीच खरी देवाची सेवा.

आमच्या इथे जेव्हा शनी मंदीरात प्रसाद दिला होता, तेव्हा बर्‍याच लोकांनी तो प्रसाद पूर्ण न खाता, पत्रावळी वाटेतच फेकल्या होत्या. आणी नेमके बरेच लोक प्रसाद संपेल या भीतीने घाई घाईने त्या पत्रावळी तुडवत जातांना मी पाहीले, तेव्हापासुन मी महाप्रसादाला जाणेच सोडले. आपले लोक त्या पत्रावळी कचरा पेटीत कधीच टाकत नाहीत, ती शिस्तच नाही लोकांना.

नीट नियोजन झाले तरच प्रसाद सगळ्यांना मिळेलच.

एकूण फीलगुड फॅक्टर, कम्युनिटी फिलिंग इत्यादी सोशल कारणांसाठी हे केले जाते हे माझे मत आहे. तिथे खाणारे कुणीही गरजू नसतात.>>>> +१.
मी एकदाच ३०-३२ वर्षांपूर्वी बाणगंगेच्या महालक्ष्मी मंदिरात असे प्रसादाचे जेवण जेवलेय.लंगरचे जेवण,जेवायची इच्छा आहे.
बाकी तिरुपतीला प्रसाद म्हणून कालवलेला दहीभात हाताने दिल्यावर न खाता दुसर्‍याला दिलाय.

अहो उगाचच काय?
लेखात प्रसाद गरजूंना द्यावा किंवा गरज नसलेली माणसे का येऊन जेवतात वगैरे काही म्हंटले नाहीये
उलट चांगल्या सधन कुटुंबातील माणसे तिकडे येऊन असे का वागतात? प्रसादाला प्रसाद म्हणून ट्रीट न करता, मेजवानी असल्यासारखे का खातात, सधन लोक फुकट मिळतेय म्हणून ओरबाडून का घेतात? असा त्यांना पडलेला प्रश्न आहे.

वर लोकांनी आम्ही पण प्रसादाचे जेवण लायनीत उभे राहून घेतले वगैरे लिहिले आहे, पण तुम्ही प्रसाद घेताना अमुक नको, कोणी खात नाही ,तमुक द्या, किंवा वाढा अजून ,नाहीतरी पातेल्यात भरपूर आहे वगैरे सांगितलेत का?
लोकांच्या अशा वर्तणुकीची त्यांना खंत वाटते आहे इतकेच.

Aho pan tilbhar/ kanbhar/ chamchabhar prasad dyaychi paddhat fakt maharashtra t aahe. Baki sagalikade vyavasthit dronbharun tari prasad deta. Prasad chamchabhar khalla ki yogya aani dronbhar khalla kinva ghari nela ki ayogya asa kuthe sangitalay.
Jar denaryachi ashi specific ichcha hoti tar tyanni pati lavayla havi hoti ki jyanna don velechya jevanachi bhrant aahe ashyanich prasadacha labh ghyava. Bagha bar jyanna kharokhar bhrant aahe te tari yetil ka!
Ekda denara (data) mhanoon ubha rahilyavar lokanch standardization aani grading kass kay karu shakta. Ha sadhan yachak, ha nirdhan.
Ase vichar manat asatil tar upyog kay tithe ubha rahun mahaprasad purvaycha.

राजसी,
तुम्ही विपर्यास करत आहात,
त्यांनी अजिबात म्हंटलर नाहीये सधन लोकांनी खाऊ नये,
देवळात येणारे सगळ्या प्रकारचे लोक प्रसादाचे जेवण घ्यावेच, मात्र प्रसाद घेताना त्यासाजे पावित्र्य जपावे असे कोणाला वाटले तर ते चूक आहे का?
(इकडे त्यांनीच प्रसाद ठेवला होता त्यामुळे वाढायला उभे राहिल्यावर त्यांना जास्त नमुने दिसले आणि ती गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवली असेल कदाचित)

"चमचाभर शिरा" ऑब्जेशन सर्वस्वी तुमचे आहे,
दुसऱ्या एका बाईंनी त्यांच्या बजेट प्रमाणे शिरा बनवून आणला होता जो लोकांना पुरावा म्हणून चमचाभर वाढत होत्या, प्रसाद म्हणून मिळालेली वस्तू " हे नको, लापशी द्या" म्हणून परत करणे म्हणजे प्रसादाचे पावित्र्य जपणे निश्चितच नाही,

असो,
वर कोणीतरी (बहुतेक अमित)म्हंटल्याप्रमाणे ओरबाडून घेणे ही भारतीयांच्या DNA मध्ये रुजलेली गोष्ट आहे, (अगदी एक्सिक्युटिव्ह क्लास ने विमानातून जाणारे लोक पण विमानातील कटलरी, उश्या पळवतातच की)

एखादी गोष्ट देताना ते सत्पात्री दान आहे की नाही हे पहायची जबाबदारी दात्याची असतेच. आणि केलेले दान सत्पात्री ठरले नसेल तर तो अनुभव इतरांशी शेअर केल्याने काही "दान" संकल्पनेला धक्का वगैरे बसत नाही.

@सिम्बा, अगदी योग्य प्रतिसाद. माझ्या भावना ओळखल्या.
<प्रसादाचे पावित्र्य जपणे निश्चितच नाही> +1111
धन्यवाद.
@रश्मी <माझ्या मते आधी ते जेवण ( प्रसाद) गरीबांना, कष्टकर्‍यांना व गरजूंनाच मिळाले पाहीजे. कारण हे लोक २ वेळेच जेवण घेऊ शकतातच असे नाही. आपल्या कडे मात्र चला संध्याकाळच्या जेवणाला सुट्टी असे मानुन बरेच लोक मंदीरात रांगा लावुन असतात हे पाहीले आहे. प्रसाद जरुर घ्या पण तो आधी या लोकांना मिळु द्या, तीच खरी देवाची सेवा.>+११११
@साधना, पटलं मत.
@भरत, <मूळ लेखातल्या वर्णनावरून ते काहघ गरजूंसाठी केलेलं दान वाटत नाही> गरजू साठी असतं, परंतु त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही. कारण स्वयंपाक करण्याचा कंटाळा आलेले डबा, पिशवी भरून घेऊन जातात.
@ सस्मित, तिथे येउन जेवणारा / री आपल्या घरी असणार्या ज्ये ना साठी किंवा इतर लोकांसाठी नेउच शकतात की.> उरलं तर न्यावं ना. प्रथम उपस्थित लोकांना मिळायला पाहिजे.
@अमा, <शिरा परत करण्या बद्दल पण तुमचे जे दान घेणारे आहेत त्यांचा तो प्रेफरन्स आहे> ताटात वाढलेला माघारी डब्यात टाकणं? Preference? प्रसाद होता. Ego नाही हो, लोकांची वर्तणूक पाहून वाईट वाटले, कोणाशी तरी बोलावं वाटलं, म्हणून इथं धागा काढला.
<एकदा खाणे लोकांसमोर् ठेवले की तुमचा हक्क संपला> मान्य.
@यो यो अज्जूबाबा, पटलं मत.
@अनघा, इतरांनी प्रसाद घेऊ नये असं नाही म्हणत.

प्रसादाचे पावित्र्य >>>> देणारा प्रसाद म्हणून देतोय आणि खाणारा मस्त जेवणाची पार्टी म्हणून खातोय. या दृष्टीकोनातील फरकामुळे गोंधळ उडाला आहे.

आम्ही कॉलेजला असताना कुठल्याही मित्राच्या आजूबाजूच्या एरीयात कुठेही महाप्रसाद वा भंडारा असायचा तिथे ओळख ना पाळख मोठ्या संख्येने जायचो. आम्ही सगळे खात्यापित्या घरचे होतो. पण ती एक धमाल असायची. अर्थात अन्नाला नावे ठेवायचो नाही. पण जेवण आवडले नाही तर ज्या मित्राने आमची ही सोय केली असायची त्याला शिव्या जरूर घालायचो Happy

आणखी एक म्हणजे देवाच्या नावावर वाटला जाणारा प्रसाद वा महाप्रसाद याकडे भीक वा गरजूंना अन्नदान, मदत म्हणून बघितले जात नाही. तो देवाचा आशिर्वाद असतो त्यामुळे सारेच लाभ घ्यायला पुढे सरसावतात.

त्यातही जे लांबून मुद्दाम येतात त्यांच्यासाठी हा देवाचा प्रसाद असतो आणि ते भक्तीभावाने प्राशन करतात. मात्र जे जवळचे आणि रोजचे असतात ते प्रॅक्टीकल असतात.

मॉरल - ज्याला अन्नदान करायचे आहे त्याने त्या अन्नाला देवाच्या प्रसादाचा टॅग चुकूनही लाऊ नये.
देवळासमोर लाडू वाटायला बसलात तर प्रत्येक घण्टा वाजवून जाणारा आपला हात पुढे करणारच..

<<ज्याला अन्नदान करायचे आहे त्याने त्या अन्नाला देवाच्या प्रसादाचा टॅग चुकूनही लाऊ नये.>>

बरोबर आहे.
साधे अन्नदान, एकदा देव मधे आणला की, त्यात प्रसादाचे पावित्र्य, आशीर्वाद असले काहीतरी आणून उगाच गोंधळ वाढवायचा.

एकूणच जे काही करायचे ते स्वतः विचार करून जे योग्य वाटेल ते करायचे, त्यात फुकट देव कशाला पाहिजे? नसता देव तर केले नसते का तसे?

Pages