महाप्रसाद???

Submitted by ShitalKrishna on 14 June, 2018 - 13:19

मी राहते त्या परिसरात साईमंदिर आहे. दर गुरुवारी महाप्रसाद असतो, अन्नदान करतात लोक. भक्त आपल्या परीने महाप्रसाद ठेवतात. कोणी खिचडी, कोणी लापशी, कोणी सांबार भात, कोणी पूर्ण जेवण. एक पदार्थ असेल तर द्रोण, पूर्ण जेवण असेल तर लेट.
उच्चभ्रू? सधन कुटुंबातील लोकं ४-५ द्रोण घेऊन जातात. पूर्ण जेवण असेल तरी तसेच. मंदिराच्या परिसरातील लोकं तर घरात प्रसाद घेऊन जेवायलाच बसतात(पूर्ण प्रसाद घेऊन, घरी काही न बनवता).
आज आमच्या कुटुंबा तर्फे महाप्रसाद होता. मी व नवरा वाढण्यास मदत करत होतो. एक बाई सधन कुटुंबातील म्हणाली 'द्या अजून, द्या अजून, शिल्लक राहतं'. असे बरेच लोकं करत होते. एका बाईने घरुन शिरा बनवून आणला होता. ती शेजारी उभे राहून ताटात एक एक चमचा वाढत होती. तर एका बाईने ताटात वाढलेला शिरा हाताने माघारी तिच्या डब्यात टाकला 'शिरा कोणी खात नाही, लापशी वाढा अजून'.
तर बरेच लोक पिशवी डबा घेऊन येत होते, त्या मध्ये भरभरून मागून घेत होते. खूप लोक येतात गुरुवारी प्रसाद घेण्यासाठी. शेवटी यजमान/कार्यकर्ते फळं मिठाई देतात.
मन विषण्ण झाले लोकांची वर्तणूक पाहून. लोक आजकाल एवढं हाव हाव करतात देवाच्या प्रसादासाठी???
माझ्या लहानपणी एक लाही मिळाली तरी घरातील मोठी माणसे समजावून सांगायचे, प्रसाद कितीही असला तरी भक्ती भावाने घेतला तर तृप्ती होते. आणि प्रसादातील एक कण पायदळी जावू देत नसत.
अन्नदान सर्वस्रेष्ठ दान, परंतु लोकांची वर्तणूक पाहून असा वाटला, यांचं पोट भरणार आहे का?
मधे fb वर video फिरत होता. एक माणूस मोठा पातेल्यात भात बनवून सकाळी सकाळी रिक्षा मधून गरजुना वाढत होता. इथं खरच गरजूंना अन्न मिळत होते. आणि आजचा प्रसंग? किती भिन्नता?
असो. बोलावं वाटलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कासाय ना.. प्रसाद बनतोच चविष्ट.. मी पण मंदिरात गेलो की आधी जेवण करतो, दर्शन वगैरे नंतर.

जेवण जरूर करावं.
< बरेच लोक पिशवी डबा घेऊन येत होते, त्या मध्ये भरभरून मागून घेत होते>
<एका बाईने घरुन शिरा बनवून आणला होता. ती शेजारी उभे राहून ताटात एक एक चमचा वाढत होती. तर एका बाईने ताटात वाढलेला शिरा हाताने माघारी तिच्या डब्यात टाकला 'शिरा कोणी खात नाही, लापशी वाढा अजून'.>
यांचं काय?

तुम्हाला हे खटकतंय त्यावर तुम्ही खालील गोष्टी करु शकता

१. मंदिराच्या चालकांना सांगून प्रसादाच्या नावाखाली जेवणाचे प्रकार न्यायला देणे बंद करायला लावा.
ज्यांना प्रसादाचे जेवण जेवायचे आहे त्यांनी मंदिरात जेवावे. घरी नेण्यासारखे पदार्थ पॅक करुन माणशी एकेकच पॅक दिला जाईल अशी व्यवस्था करावी. प्रसाद देणार्‍या फॅमिलीने / मंदिराच्या चालकांपै़की लोकांनी कोणी परत परत तर येत नाही ना लाइनीत हे पहावे व अशा लोकांना हुसकून लावावे.

२. भारतात अशा प्रकारचे फुकट ते पौष्टिक म्हणुन हावरटपणे घेणारे कधीही सुधारणार नाहीत. कितीही नियम केले तरी पळवाट शोधणारच हे मान्य करावे . या वागणूकीचा त्रास असह्य होत असेल तर प्रसाद देणे बंद करावे. गरजूंना मदत करण्याचे इतर अनेक उपाय आहेत. पुण्यच हवे असेल तर मंदिराला रोख रक्कम किंवा वस्तू दान कराव्यात.

इथे नुस्तं लिहून चार अजून लोक आपले अनुभव लिहितील . या पलिकडे काहीही होणार नाही

वाढलेला शिरा हाताने माघारी तिच्या डब्यात टाकला 'शिरा कोणी खात नाही, लापशी वाढा अजून'.>
यांचं काय? >> मायबोलीकरांनी काय करावं अशी अपेक्षा आहे ? त्या बाईची चूक तिला कळली नाही. तिथे असलेल्या कोणी दाखवली नाही. मायबोलीकर काय करणार कप्पाळ !

महाप्रसाद म्हणून कारल्याचा रस द्यावा वाटी वाटी. आरोग्य दायी असतो.

देवावर खरी भक्ती असेल तर पितील. नाहीतर नाही पिणार.

आहो भक्ती वगरे काही नाही ... फक्त फुकटचे खायला मिळते आहे ना म्हणून येतात लोक .... घरी करण्याचा कंटाळा येत असेल मग काय हाणा आयते

प्रसाद कितीही असला तरी भारतीय भावाने घेतला तर तृप्ती होते. आणि प्रतिसादातील एक कण पायदळी जावू देत नसत.
>>>>
भारतीय भावाने.. ईंडियन ब्रदर Happy
ईथे भक्तीभावाने हवे होते ना...
आणि पुढे प्रसादाचे प्रतिसाद झालेय Happy

@ टॉपिक,
मंदिर ही दुकानं असतात. ईथे श्रद्धेचा बाजार लागतो. लोकांना भक्तीभाव नाही तर त्यांची हाव ईथे घेऊन येते. मग ती प्रसादाची असो वा देवाकडे काही मागणं असो.

माणूस मोठा पातेल्यात भात बनवून सकाळी सकाळी रिक्षा मधून गरजुना वाढत होता. इथं खरच गरजूंना अन्न मिळत होते. आणि आजचा प्रसंग? किती भिन्नता? >> अरे!!! तुम्ही सोल्युशन पण दिलंच आहे की! पुढच्या वेळी रिक्षातुन भात वाढा. हाकानाका!
ऑन सिरियस नोटः लोकांची पोटं आणि मग मनं भरून त्यांना तृप्ती येत नाही तोवर हे असच चालू रहाणार. अशी एक पिढी तृप्त झाली की पुढच्या पिढीत ते झिरपेल. माझ्याकडे भरपूर आहे, कसली भ्रांत/ ददात नाही हे मनावर ठसायला काही पिढ्या तशा जाव्या लागतील. अर्थात फुकट ते पौष्टिक हे वैश्विक सत्य आहेच.
तुम्ही कोणाला फुकट काहिही का वाटता यावर कधी विचार केला आहे का? समोरच्या व्यक्तीला मदत हवी आहे का? हे त्याला आणि स्वत:ला न विचारता मदत केली तर ते अपात्री दान आहे असं वाटत नाही का? आणि असं जर करायचंच असेल तर मग त्या व्यक्तीने ती मदत कशी वापरायची यावर त्याचा/ तिचा सर्वस्वी हक्क आहे असं वाटत नाही का? मदत करण्यापुर्वी हजारदा विचार करुन योग्य ठिकाण शोधावे.
प्रसादाचा एक कुरमुरा खाउन फक्त भरल्यापोटी तृप्ती येते. (फा को नको Proud ) भुकेल्या पोटी असली फालतू बडबड कामी येत नाही.
बरं अन्नदान सर्वश्रेष्ठ दान, पण तुम्ही निवड त्या साईबाबा मंदिराची केलीत तर कसं व्हायचं. त्या फेसबुकवाल्या सारख रिक्षात बसा की ताई!

जोवर खऱ्या गरजूना पण पोटभर मिळते तोवर बाकीच्यांनी 4 द्रोण घेण्यास हरकत नाही.
कदाचित प्रसाद खरंच मोठ्या प्रमाणावर उरत असेल.
जेवणाची व्यवस्था करणाऱ्याला यावर आक्षेप नसेल तर आपल्याला वाईट वाटून उपयोग नाही.
शिरा परत टाकण्याचा प्रकार मात्र ग्रोस.

भारतात अशा प्रकारचे फुकट ते पौष्टिक म्हणुन हावरटपणे घेणारे कधीही सुधारणार नाहीत.>>>> मला वाटतं हे भारतीय मनोवृत्तीत आहे. भारताबाहेर पण बहुतांश लोकं असं वागतात!

माझ्या पिढीने वडिलधार्‍यांकडून त्यांच्या हयातीत अन्नासाठी कशी दुर्दषा झाली हे प्रत्यक्ष ऐकले कदाचित बघितलेही असेल. भारतात पाश्चात्य देशांत असतात तशा फूड बँका/ कूपन्स असले प्रकार जवळ जवळ नाहीतच. थोडक्यात अन्न सुरक्षा आहे असं म्हणवत नाही. ते ज्ञान डिएनए मध्ये झिरपलं असेल नसले, मनात पक्क बिंबवलं गेलं असेल. त्यातुन माणूस कळत नकळत असा वागतो.

रच्याकने: परदेशात फूड बँकेत व्हॉलेंटिअर वर्क करुन बघा आणि ही हाव कशी सार्वत्रिक आहे याचा अनुभव / सहवेदनेतुन जरुर घ्या. भारतात लोकसंख्या आणि गरिबीमुळे ते डोळ्यात भरतं ... पण ती मानवी मूळ भावना आहे असं माझं मत झालं आहे.

मी आणि बायको महिन्याच्या शेवटच्या शनिवारी घरी बनवलेल्या पुलावचे पन्नास पॅकेटस् आणि केळी घेऊन दुपारी बाहेर पडतो. तासा दिडतासात वाटून होते. वर्षातून एकदा २०/२५ ब्लँकेटस् वाटतो आणि वडीलांच्या वाढदिवसाला वह्या आणि पुस्तके देतो जमेल तेवढी आमच्या गावी असलेल्या आश्रम शाळेत.
वर्षभरापुर्वि गावातील ज्येष्ठांना, ज्यांना कुणी नाही अथवा मुले सांभाळत नाही त्यांना दोन वेळ जेवण घरपोच पोहचवण्याचा ऊपक्रम सुरू केलाय. तो अजुन सुरू आहे.
मी पाप पुण्य या संकल्पना मानत नाही. मुद्दाम सविस्तर लिहिले आहे. कुणाला ‘असं काही करावे’ असं वाटावे हा हेतू.

अमित च्या प्रतिसादाशी सहमत,
>>>>>
सधन कुटुंबातील लोकं ४-५ द्रोण घेऊन जातात. पूर्ण जेवण असेल तरी तसेच. मंदिराच्या परिसरातील लोकं तर घरात प्रसाद घेऊन जेवायलाच बसतात(>>>>>
हे असे होते माहीत असताना आणि तुम्हाला पसंत नसताना सुद्धा तुम्ही तिकडेच महाप्रसाद करण्याचे योजलेत हे आश्चर्यकारक आहे,

-पुढच्या वेळेस फक्त लाह्या वाटा.
- वर शाली करत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद काम आहे.
- साईंचा भंडारा फक्त त्यांच्या देवळात/मूर्ती समोर केला तरच फलद्रुप होतो असे नाही, त्यांचे नाव घेऊन इतर ठिकाणी अन्नदान केलेत तरी इतकेच पुण्य ( अश्रद्धाळू लोकांसाठी मानसिक समाधान) मिळेल.

- मुंबई मध्ये असाल तर , टाटा हॉस्पिटल च्या शेजारच्या गल्लीत एक मनुष्य आपल्या पैश्याने गरीब रुग्णांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करतो. महाप्रसाद म्हणून तुम्ही त्याचा भार थोडा हलका करू शकता.

तुम्हाला गरजूंना मदत करायची तर गरजूंना शोधा, ते जिथे आहेत तिथे स्वतः जा व त्यांचा आत्मसन्मान शाबूत राहील असे पाहून त्यांना मदत करा. सगळेच गरजू मिळेल तिथे हात पसरून उभे नसतात.

आणि फुकट मिळत असेल तर गरज नसतानाही ओरबडायचे ही खास भारतीय वृत्ती आहे. उद्या तुम्ही 5 स्टार हॉटेलात जाऊन भंडारा केलात तरी तिथले लोक असेच तुटून पडतील. माझ्या ऑफिसातल्या कार्यक्रमात, एकेक करोडचे पॅकेज घेणारे बिग बॉसेस कंपनी आयोजित फुकट जेवण आपल्या ताटात वाढून घेण्यासाठी इतरांना ढकलून पुढे जाताना बघितले आहे. Happy Happy

त्यामुळे तुम्हाला खरेच मदत करावीशी वाटते तर इतर मार्ग शोधा. जेवणच द्यायचे, तेही अमुकच मंदिरात हाच प्रण असेल तर एकदा जेवण दिले की ते कोण खातंय इकडे दुर्लक्ष करा. आपल्या हातून एकदा दान दिले गेले की आपला त्यावरील हक्क गेला.

<< तुम्हाला गरजूंना मदत करायची तर गरजूंना शोधा, ते जिथे आहेत तिथे स्वतः जा व त्यांचा आत्मसन्मान शाबूत राहील असे पाहून त्यांना मदत करा. सगळेच गरजू मिळेल हात पसरून उभे नसतात. >>
--------- १०० % सहमत... शोधणे कठिण नाही आहे.

मंदिरात प्रसाद वाटतोय हे पुण्य हवंय पण गरजुंना मिळत नाही हे पण सलतंय?
मग साई मंदिर, हनुमान मंदिर अशा ठिकाणी जेवण वाटप करण्यापेक्षा मग जिथे गरजु असतील तिथेच करु शकता.
देवाला सगळीकडचं दिसत असावं.
आणि खरंच मोठ्या प्रमाणावर अन्न उरत असेल, नासाडी होत असेल तर कुणी घरच्या सगळ्या मेंब्रासाठी घरी नेउन खाल्लं तर बरंच आहे की.

ताई

अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. दारात आलेल्याला विन्मुख पाठवायचे नाही हे मी डोळ्यांनी गावी पाहीलेले आहे. भिकारी असो किंवा कुत्रे , त्याला भाकरी मिळत असे. तुम्ही तर स्वतःहून भिक्षा द्यायला जात आहात. अशा ठिकाणी भिक्षेच्या आशेने येणा-याचे पोट भरणे, समाधान करणे हे यजमानाचे कर्तव्य आहे. कितीतरी लोक कर्ज काढून जेवणावळी करतात. काहींनी तर राहते घर, जागा, गाड्या, सोने नाणे देखील विकलेले आहे.

प्रसाद किती असावा हा नियम नाही. खाणा-याने तिथेच खावा असेही नाही. उलट डब्यातून प्रसाद नेणारा पुण्याचे काम करत आहे. तो आपले पुण्य अजून वाढवत नेत आहे. प्रसाद , अन्नदान करणा-याचे मन आनंदी असावे. उदार असावे. प्रसाद देताना ते कलुषित होऊ देऊ नये. नाहीतर पुण्य मिळत नाही. देवाची इच्छा असेल तर लोक डबे आणणार नाहीत. त्याची इच्छा नसेल तर आपण कोण आक्षेप घेणारे. त्यामुळे देवाला दुखावल्यासारखेच होतेय हे.

त्यामुळे अदमास घेऊन प्रसाद द्यायची तयारी ठेवावी. झेपत नसल्यास तिथे प्रसाद देऊ नये . निर्जन जागी दान दिल्यास कमी लोक येतील. त्यामुळे ही तक्रार योग्य नाही असे मला वाटते.

- मुंबई मध्ये असाल तर , टाटा हॉस्पिटल च्या शेजारच्या गल्लीत एक मनुष्य आपल्या पैश्याने गरीब रुग्णांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करतो. महाप्रसाद म्हणून तुम्ही त्याचा भार थोडा हलका करू शकता.
>>++१११

समुद्रावर पाऊस पाडण्यापेक्षा तहानलेल्याला पाणी द्यावे हे उत्तम. तुम्हाला खरोखरच कोणाला मदत करायची असेल तर मायबोलीवर अनेक समाजसेवक कार्यरत आहेत. त्यांच्याशी संपर्क करा. वाटल्यास दुपारी लिंक देते.

Pages