बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मेघा आता सईची काळजी न घेता फक्त तसा दिखावा करतेय असे वाटले, जे योग्य ही आहे. आधीतर मेघाने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले पण नंतर जेव्हा सई रडू लागली अन पुष्कर बोलला की तू माझ्या वाटणीचा 1 तास झोप तेव्हा लगेच त्याची री ओढत माझेही एक तास तू झोप असे बोलली ती सईला, अन नंतर स्वतः तिला उठवून जबरदस्ती झोप येत नसून झोपायचा प्रयत्न करत होती. पण मग जर असेच करायचे तर आधी कशाला तसे बोलायचे. मेघा कितीही असे दाखवतीये की ती ठीक आहे वगैरे तर मला वाटतेय की तिचा खेळ गंडलाय आता. असेच आस्ताद अन टीम वागत होते तर ते व्हिलन, मग तू काय Uhoh
बाकी काल सगळ्यात cute स्मिता, ती तशीही छानच वाटते, पण खूप energetic आहे ती. अन मनाने पण चांगली वाटते.

सिक्रेट रूम मध्ये वोटिंग करून झाले नॉमिनेशन्स .
यावेळेस चौगुले जाईल. त्यांनी टास्क करण्याचे कष्ट पण नाही घेतले. डबल नॉमिनेशन्स असतील तर चौगुले आणि शर्मिष्ठा. स्मिताला मांजरेकर या शोची ग्लॅम डॉल म्हणालेत , त्यामुळे तिला ठेवतील अजून १ -२ आठवडे.

आता सगळे मिळून मेघाला नाॅमिनेट करतीलच. सगळ्यांसाठीच एकमेव काॅम्पिटिशन आहे ती.

मेघा आता ईमोशनल फुल वाटायला लागलीये. सै चं आजारपण नेहमीचच झालय. ती आणि पुष्कर बघुन घेतील आता काय ते.. हिने नकोय तिला मिठ्या मारायला, पाठीवरुन हात फिरवायला सै ने ईतकं हाडतुड केल्यावर..
बघु एकटी कशी manage करतीये ते..

मेघा आता ईमोशनल फुल वाटायला लागलीये. सै चं आजारपण नेहमीचच झालय. ती आणि पुष्कर बघुन घेतील आता काय ते.. हिने नकोय तिला मिठ्या मारायला, पाठीवरुन हात फिरवायला सै ने ईतकं हाडतुड केल्यावर..
बघु एकटी कशी manage करतीये ते.. >> अगदी अगदी चैत्राली. पण काल मेघाने सईशी जि जवळीक केली ती दिसतानाच नाटकी वाटत होते, अन तसे नंतर तिच्या क्रुतितुन दिसले सुद्धा.

हि सै काय कुक्कुल बालक आहे का ,कि सतत लाड करुन घेते .मेघा तरि का तिच डोक पाठ दाबून देत होती.जशास तसे वागयच ना.सै उगिच रडून सहानभूति घेत होती .खूप राग येतोय तिचा. बकिच्यनि objection घेतल असत की सै पण 1 contestant आहे ,she should be treated in the same way as others तर मग काय केल असत? मेघा झोपायला गेली आणि तिला झोप येत नव्हती तर पुष्कर ला सै म्हणालि की तिला सांग 1 मिनीट पण वेस्ट नको करु. सै स्वत तर एवढी झोपली आणि आता गेम बद्दल बोलते.

सई एलिमिनेट व्हायला हवीये आता. किती कटकट करते, ऐकत तर कोणाचंच नाही. सतत सगळं लक्ष आपल्यावर केन्द्रित ठेवायचं असतं तिला, विशेषतः पुष्करचं. ती गेल्या गुरूवारपासून इतकी बोलायला लागली आहे एकटीच की आता कंटाळा आला तिचा.
मेघा दाखवून द्यायचा प्रयत्न करतेय मे बी, की मी किती चांगली मैत्रिण आहे. कॅमेर्‍यात चांगलं दिसतं ते Wink किंवा कदाचित न जाणो खरंच तिला सईबद्दल वाटतंही असेल. काही कळत नाही. त्यांचं प्रेमही कॅमेर्‍याकरता आणि भांडणंही!

मेघाच्या निर्णयाचा सईला धक्का बसला हे पटले. पण सई आता आवडेनाशी झालीये.
पुष्कर बोलतांना खरंच इकडे तिकडेच पहात राहतो.
कॅप्टन निवडीच्या वेळी मेघा उमेदवार घोषीत करत असतांना पुष्की म्हणाली, तेव्हा त्याने लगेच वाईट तोंड केले.

सईला कायम center of attraction राहायचं असतं. काही लोकांकडे "ऐच्छिक आजार" हा गुण असतो. जरा आपलं पारडं हलकं होतंय किंवा कुणी लक्ष देत नाहीये असं वाटलं की ते शस्त्र बाहेर काढतात.

पुष्कर पुर्णपणे कॅलक्युलेटीव खेळ खेळतोय. मेघा जो काही चांगुलपणा दाखवतेय त्यामुळे अगदी खुळी दिसतेय. स्वतःसाठी स्टँड घेणं जमत नाही तिला??

नाहितर काय .. खरच खुळी वाटतेय.. त्यादिवशी सईने तिला आत बोलावल तर गेली लगेच धावत आत.. कालहि अगदिच खुळेपणा..

नाहितर काय .. खरच खुळी वाटतेय.. त्यादिवशी सईने तिला आत बोलावल तर गेली लगेच धावत आत.. कालहि अगदिच खुळेपणा.. >>> मलाही तेच म्हणायचेय, तिने नंतर जे केले तेच करायचे होते तर आधी पुश्करची री कशाला ओढायची. शांत बसायचे ना ईतरां सारखे. आधी तिला माझे वाटणीचा तास भर तु झोप बोलायचे अन नंतर झोप येत नसतानाही लोळत पडायचे, यामुळे तिच जास्त चुकीची वाटतीये.

तसेही मेघा, आधी पासुन रडीचे डाव खेळत होती, पण रेशम ग्रुप बदनाम झाला होता दादागिरीसाठी त्यामुळे तिला सिंपथी मिळत होती. पण हळुहळु तिचा खोटारडे पणा नजरेत येतोय.

भावना, उगाच प्रतिवाद करत नाहिये पण काल तरी नक्कीच केला खोटारडे पणा तीने. असो
मी हा शो न्युट्रली बघते, माझे तिथे फेवरेट असे कोणी नाही, प्रत्येक एपिनुसार ते बदलत आलेत पण तरी मला मेघा या आधीही फेअर गेम खेळते असे वाटले नाही. प्रत्येक वेळी ति अन सई काहीतरी चिटींग करायच्या, पण रे ग्रुप आधीच बदनाम असल्यामुळॅ ते तीतकेशे लक्षात यायचे नाही.

बाकी "लॉयल असते ती तिच्या लोकांसाठी" हे मान्य किमान लास्ट विकपर्यंत हे खरे होते पण आता तसे वाटत नाही

मेघाचे ते गेम साठीचे डावपेच असावेत. मेघा सुरवातीपासूनच उत्तम डावपेच खेळत आली आहे. कोणाला तो खोटारडे पणा वाटू शकेल पण हा गेम असाच खेळायला लागणार . रे रा गृप गेमचा किन्वा प्रेक्षकांचा काहीच विचार न करता केवळ आपण 'लय भारी' आहोत , अशी समजुत करून घेऊन दादागिरी करण्याचे काम करत होता.
अता कमी लोक राहिल्याने बघायला मजा येतेय. यावेळी रेशम ला वाचवले नॉमिनेशन्स मधून बिग बॉस ने.

Won't be surpised if Ushatai says "Devani shixa dili Sai la,mala naraz kela mhanun ajari padli Sushant sarkhi. "

बाकी काल सगळ्यात cute स्मिता, ती तशीही छानच वाटते, पण खूप energetic आहे ती. अन मनाने पण चांगली वाटते. >>> हो ना, कधी रड नाही, चिडचिड नाही. अतिशय स्वभावाने चांगली मुलगी.

एवढ्या दिवसात स्मिता चे असे tantrums कधिच नाही दिसले >>> अगदी अगदी, फार गुणी आहे ती.

स्मिताला मांजरेकर या शोची ग्लॅम डॉल म्हणालेत >>> फक्त एवढंच नाही, हेल्पिंग नेचर आहे, कामं करतेस, टास्क पण चांगला खेळतेस हेपण म्हणाले.

सईला कायम center of attraction राहायचं असतं. काही लोकांकडे "ऐच्छिक आजार" हा गुण असतो. जरा आपलं पारडं हलकं होतंय किंवा कुणी लक्ष देत नाहीये असं वाटलं की ते शस्त्र बाहेर काढतात. >>> अगदी अगदी, तरी तिला ठेवतील ड्रामा करायला. अगदी आता रेशमच्या खालोखाल मनातून उतरली. रेशमपेक्षाही जास्त उतरण्याकडे वाटचाल, कारण रेशम हल्ली बरी वागतेय तिच्यापेक्षा.

स्मिता फार गुणी आहे पण या शो मधे ती चमकू शकली नाही कारण एकच , तिला स्वतःचे मत नाही अथवा ते खंबीरपणे मांडता येत नाही , त्यावर ठाम रहाता येत नाही. सुशांत एपिसोडनंतर स्मिता मनातून उतरली ती उतरलीच.

अता कमी लोक राहिल्याने बघायला मजा येतेय. यावेळी रेशम ला वाचवले नॉमिनेशन्स मधून बिग बॉस ने. >>> तिच्यापेक्षा स्मिता सलतेय ना डोळ्यात. कारण फक्त कन्फुस्ड देता येतं तरीही. स्मिताला डंब समजून तिलाच घाबरतात Lol

smitaa kaay maahit kaa paN shant, samajun ghenari, manmiLau waaTatch naahee..

mhaNaje itake diwas itakya atarangi lokansobat aaNi paristhiti madhe raahilyaa nantar bhandaNe hoNe swabhawik aahe..

tichee tichyaa mataa warun kuNaashich bhaaNDaNe naahee zaalee.. kinvaa ti laDhalee paN naahee kadhee swatahachya mataa saaThee..

kaaraN tilaa swatahaach asa kaahee matach naahiye.. waaraa waahil tikaDe jaate..

fakt disate chhaan .. physique chhaan aahe.. jyaachi garaj, koNee aadhee mhaNalyaapramaaNe, fear factor type game madhe aahe.. ithe tumachi mat, swabhaw mahatvache aahet..

aaNi kharachach sushant prakaraNaanantar aawaDalich naahee tee.. aadhee bichaaree waataayachee..

shaneewaaree paN dusaryaanee dilelya uttarana similar or tich uttar dete..
dilelya uttarach spashTikaraN paN Tukaar asat,,
tyaacha tichya marathi na samajaNyaashee kaahee sambandh naahee

मी जेव्हा गुण दोष बघते तेव्हा मला स्मितामध्ये कमी दोष दिसतात तिच्या गुणांपेक्षा, ती चुकते तेव्हा मी त्यांच्या पेजवर पण लिहून येते. कोणाला आवडो न आवडो स्मिता मला आवडते आणि मी तिला मत देणार.

पुष्कर खूप आवडत होता पण मेघाशी जसं वागला त्यामुळे आवडेनासा झाला. फायनलला मेघालाचं मत देणार.

स्मिताला सगळे Dumb, confused म्हणतात आणि तिलाच नाॅमिनेट करतात. ती खरच शो चा style factor आहे. मस्त carry करते स्वतःला. पण बहुतेक घरातल्या इतर वैचारिकदृष्ट्या "प्रगल्भ" लोकांना ती त्यांच्या लेव्हलची वाटत नाही. आणि इतक्या वेळा नाॅमिनेट होऊनपण ती टिकून आहे याची भीती.. Wink

Pages