फ्रिजचा कॉम्प्रेसर बदलावा की फ्रिजच बदलावा?

Submitted by साधना on 10 June, 2018 - 14:25

गेली 18-19 वर्षे वापरात असलेल्या, आजवर कसलाही त्रास न झालेल्या गोदरेज डबल डोअर फ्रीजचे कूलिंग बंद, फक्त फ्रिजर फॅन सुरू हा प्रकार शनिवारी लक्षात आला. दुरुस्तीसाठी बोलावलेल्या माणसाने आधी काहीतरी लावून कॉम्प्रेसर सुरू होतो का पाहिले. तो न झाल्याने त्याने कॉम्प्रेसर उडाला, नवीन बसवा म्हणून सल्ला दिला.

नेटवर थोडी शोधाशोध केल्यावर फ्रीजचे आयुष्य 15 16 वर्षांचेच असते. इतक्या वर्षानंतर कॉम्प्रेसर गेल्यास तो परत घालण्यापेक्षा फ्रीज नवा घेणे चांगले हाच सल्ला वाचायला मिळतोय.

मायबोलीकरांचा अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंज वरचेवर असतो. स्टिकर चिकटवण्या आधी बारीक सँडपेपर वापरून घासून घ्या, म्हणजे स्टिकर नीट चिकटेल.

***

स्टिकर्स पहाणार असाल, तर व्हाईटबोर्ड अथवा खडूने लिहिता येईल असे ब्लॅकबोर्ड स्टिकर्सही आजकाल मिळतात. फ्रीजच्या दर्शनी दारा/साईडवर हे चिकटवले तर घराचे मेसेजिंग हब तयार होते.

आमच्या फ्रीजवर व्हाईटबोर्ड मार्करने करायची कामे, बिले देण्याच्या आठवणी, मी अमुक ठिकाणी जातो/जातेय, असे अनेक मेसेजेस लिहिले जातात.

Pages