फ्रिजचा कॉम्प्रेसर बदलावा की फ्रिजच बदलावा?

Submitted by साधना on 10 June, 2018 - 14:25

गेली 18-19 वर्षे वापरात असलेल्या, आजवर कसलाही त्रास न झालेल्या गोदरेज डबल डोअर फ्रीजचे कूलिंग बंद, फक्त फ्रिजर फॅन सुरू हा प्रकार शनिवारी लक्षात आला. दुरुस्तीसाठी बोलावलेल्या माणसाने आधी काहीतरी लावून कॉम्प्रेसर सुरू होतो का पाहिले. तो न झाल्याने त्याने कॉम्प्रेसर उडाला, नवीन बसवा म्हणून सल्ला दिला.

नेटवर थोडी शोधाशोध केल्यावर फ्रीजचे आयुष्य 15 16 वर्षांचेच असते. इतक्या वर्षानंतर कॉम्प्रेसर गेल्यास तो परत घालण्यापेक्षा फ्रीज नवा घेणे चांगले हाच सल्ला वाचायला मिळतोय.

मायबोलीकरांचा अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय... इथे ऑफिस मधले काही कलीग्ज वापरतात विजेचे प्रिपेड मीटर... भाडेकरूंना मॅनेज करायला सोपं पडतं ते (अ‍ॅज अ ओनर). भाडेकरूनी वीजबील भरलं नाही, पेंडिग आहे हे प्रॉब्लेम्स निकालात निघतात. वीज वापरायचीय, रीचार्ज करा आणि वापरा...

ही रिचार्ज वाली वीज पण mseb देते का? >> अर्थात बेबे Uhoh
पुण्यात अजून प्रायव्हेट लाईट विकत नाही कुणी.

होय... इथे ऑफिस मधले काही कलीग्ज वापरतात विजेचे प्रिपेड मीटर... भाडेकरूंना मॅनेज करायला सोपं पडतं ते (अ‍ॅज अ ओनर). भाडेकरूनी वीजबील भरलं नाही, पेंडिग आहे हे प्रॉब्लेम्स निकालात निघतात. वीज वापरायचीय, रीचार्ज करा आणि वापरा... >> असा वैयक्तिक निर्णय असतो की नाही माहिती नाही, पण आमच्या अख्ख्या सोसायटीत प्रिपेडच आहेत मिटर्स.

पोस्टपेड पेक्षा खूप म्हणजे खूपच बरं पडतं हे मी नक्की सांगू शकते. पोस्टपेड मध्ये खुप घोळ असतात, बरिच कॅल्क्युलेशन्स आपल्या आकलनशक्तिच्या पुढे असतात, कसले कसले चार्जेस, कसले कसले टॅक्सेस... रिडिंग नीट घेतात की नाही माहित नाही. कित्येक अशा केसेस ऐकल्या/वाचल्या होत्या (पेपरात) की महामंडळ हजारो रुपयांची बिल्स पाठवते, रिफंड मिळतो पण आगोदर जितके बिल आले आहे तितके भरावे लागते मग रिफंडसाठी अर्ज करावा लागतो. कुणी सांगितलं आहे इतकं? Uhoh त्यापेक्षा प्रिपेड बरं.

दक्षे फक्त ३००? अग काय गावात राहतेस काय? गावातहि इतकं कमी नाहि येत.....
माझ्या माहितीप्रमाणे दक्षिणाताई दहाव्या मजल्यावर राहतात. (हे मागेच त्यांनी कोणत्यातरी धाग्यावर सांगितले होते) त्यामुळे भरपूर हवा येत असेल, पंख्याची गरजच भासत नसेल. त्यातून पुणे म्हणजे थंड हवामान! इकडे आपल्या मुंबईत पंखे २४ x ७ सुरु असतात!
रच्याक, दक्षिणाताई आपल्या प्रिपेड मीटर चा फोटो काढून पोस्ट कराल का?

@ साधनाताई,
माठावर ओले फडके टाकून आत भाज्या ठेवा. टिकतात.>>>
असे करून दोन महिने काढा आणि येत्या १५ ऑगस्टला (तुमच्या वाढदिवसानिमित्त) नवीन फ्रीज घेऊन टाका!!!

एकच मोठा फ्रीज घेण्यापेक्षा दोन १९० लिटरचे फ्रीज घेतले तर बिल पण कमी येतं आणि किचन सुटसुटीत राहतं. माझा अनुभव आहे हा.

प्रीपेड बघायला हवं, पण सध्या आमचा विजवापर असतो, एसी जास्त वेळ त्यामुळे 4 ते 5 हजार बिल येतं. प्रचंड उकाडा असतो.

गोदरेज फ्रिज वीज युनिट जास्त खातात हेही ऐकून आहे.
>> का ब्ररे?
माझ्याकडेपण गोदरेजचाच फ्रिज आहे. १८५ लिटरचा. जास्त युनिट खातात असे काही वाटले नाही. टेम्परेचर नॉब कितीवर ठेवला आहे त्यानुसार युनिट कमी जास्त होतात. माझा 1 (कमी थंड) वरच असतो.

गेल्या वर्षभरचा सरासरी वीज वापर महिना 30 युनिट.
बिल 350 च्या आसपास.

वर्षभर फ्रिज, उन्हाळ्यात पंखे आणि पावसाळ्या हिवाळ्यात गरम पाण्यासाठी रॉड हाच जास्त युनिट खाणारा वापर आहे.

एक रुल ऑफ थंब - कुठलंहि इलेक्ट्रिक्/इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रुमेंट दहा वर्षांनंतर (मेजर रिपेअर करता) बिघडलं तर ते दुरुस्त करुन घेउ नये; सरळ नविन घ्यावे. कारण दहा वर्षांत टेक्नॉलजी खूप पुढे गेलेली असते. नविन ओइम पार्ट हि लावायचा विचार केला तरी तो हि दहा वर्षांपुर्वि डिझाइन केलेला असतो आणि नविन डिझाइन्चा पार्ट एकतर जुन्या असेंब्ली बरोबर (बॅकवर्ड) कंपॅटिबल नसतो किंवा एफिशियंटली चालु शकत नाहि. सर्विसमनचं कामंच असतं कि तुमच्या अप्लायंसच्या रिपेअरचं काम मिळवणं आणि पुढच्या रिपेअर कॉलची सोय करुन ठेवणं... Happy

माझ्याकडेपण पुण्यात गोदरेजचाच फ्रिज आहे. १६५ लिटरचा. बाबा आदमच्या जमान्यतला मॅन्युअल डीफ्रोस्ट वाला, महिना बिल ६०० रुपये. सगळे गरम पाण्याने अंघोळ करणारे.

मुम्बईत वडलाकडे फ्रिझ नाही , गरम पाणी वापरतात. त्याचा घरी बिल ३५० रुपये येते. पुर्ण दिवस घरी असतात . टिव्ही , कंप्प्युटर , फॅन चा वापर बराच आहे. वायफाय २४ तास चालु असते.
जर १०-१२ तास बाहेर राहाणार असेल तर ३०० रुपये बिल तसे रिजनेबल आहे.

प्रिपेड साठी काय करावे लागते याची माहिती देणार का? नेट वर शोधिन पण सरकारी काम असल्याने त्या माहितीवर पुर्ण विश्वास नाही ठेउ शकत.

असे करून दोन महिने काढा आणि येत्या १५ ऑगस्टला (तुमच्या वाढदिवसानिमित्त) नवीन फ्रीज घेऊन टाका!!!>>>>>

हायला, तुम्हाला माझा वादि कसा कळला हा प्रश्न आता सोशल मीडियाच्या जगात मूर्खपणाचा आहे, पण तुमच्या तो लक्षात राहीला याचे सुखद आश्चर्य वाटले Happy Happy

सल्ल्याबद्दल आभारी. एकदा गिझर न वापरता बिलाची परीक्षा करावी असे विचार गेले काही महिने मनात घोळत होते त्यांनी आता उचल खाल्लीय. आम्ही कधी 8-10 दिवस बाहेर असतो तेव्हाही बिलात फारसा फरक पडलेला दिसलेला नाही (बिलावर mseb 12 महिन्याचे युनिट छापते त्यावरून आपल्याला आपले खाणे कळते). त्यावरून माझ्या घरात वीज खाणारा प्रमुख मेम्बर गिझर नसून अजून कुणी आहे हे दिसतेय, तो फ्रिज आहे का, हे आता तपासता येईल.

दर दिवसाआड दीड लिटर दुध घेत होते ते दर दिवशी अर्धा लिटर घेईन म्हणजे सतत तापवण्याचा त्रास वाचेल. ते सकाळीच फस्त होऊन जाईल, आमच्या एडगरसाठी वाटीभर ठेवावे लागेल सांभाळून. साय वाचवणे थोडे अवघड वाटतेय, पण फ्रिज नसतानाच्या अर्ध्या आयुष्यात सायीचे तूप केलेले आहेच, आता परत करायचे. भाजी रोजच्या रोज आणून साफ करून ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवली किंवा वर लिहिले तशा छोट्या मडक्यात/माठात ठेवली तरी राहील. बाकी मी अन्न कायम ताजेच बनवून खाल्लेय, त्यामुळे अन्नासाठी फ्रिज खूप कमी वापरला गेलाय. माझा फ्रिजचा वापर प्रामुख्याने ड्राय फ्रुईट्स, डाळी, कडधान्ये, गहू सोडून इतर पीठे, इतर कोरडे पदार्थ, सुके मासे, गावाहून आणलेले लाल तांदूळ वगैरे यासाठीच होतो. मुंबईच्या दमट हवेत अळ्या व टोके खूप लवकर होतात. कधी मुंग्या लागतात. फ्रिजमध्ये सगळे व्यवस्थित राहते. थोडे दिवस हे सांभाळावे लागेल.

दक्षिणाताई आपल्या प्रिपेड मीटर चा फोटो काढून पोस्ट कराल का? >> कशासाठी? Uhoh
Submitted by दक्षिणा on 12 June, 2018 - 00:07

प्रिपेड मीटर कधी बघितला नाही म्हणून. वाटल्यास फोटो टाकताना तुम्ही त्यातील वैयक्तिक माहिती जसे ग्राहक क्रमांक, मीटर क्रमांक आदी खोडून टाका.
रच्याक, रिचार्ज कसे करता? म्हणजे प्रत्यक्ष मीटर वर काही करावे लागते की web login करून करायची सोय असते? आणि जर web login करून करत असाल तर आपण रिचार्ज केले हे मीटरला कसे कळते? म्हणजे त्यात sim card वगैरे आहे का internet ला connect होण्यासाठी???

हायला, तुम्हाला माझा वादि कसा कळला हा प्रश्न आता सोशल मीडियाच्या जगात मूर्खपणाचा आहे, पण तुमच्या तो लक्षात राहीला याचे सुखद आश्चर्य वाटले Happy Happy
Submitted by साधना on 12 June, 2018 - 08:06

मागे आपणच कुठल्यातरी ज्योतिषविषयक धाग्यावर 'माझा जन्मदिवस भारताच्या स्वातंत्र्यदिनी असल्याने चुकण्याची शक्यता नाही' असे काहीतरी पोस्ट केले होते!!!

>> पोस्टपेड पेक्षा खूप म्हणजे खूपच बरं पडतं हे मी नक्की सांगू शकते.

यापेक्षा ते महाग असे असू शकत नाही. पण मीटर फॉल्टी असेल तर दोन्ही तितकेच खराब. माझ्याच बिल्डिंगमध्ये एक दोन कुटुंबे आहेत. जवळजवळ तितकाच विजेचा वापर. टीव्ही फ्रीज वगैरे सगळे आहे त्यांच्याकडे पण. पण बिल नेहमी शंभरच्या आत. तक्रार त्यांनीही केली आहे. पण नो दखल.
आमच्या इथे फॉल्टी मीटर्सचा सुकाळ आहे.

पोस्ट व प्रि ह्या सुविधा आहेत, तुम्ही पैसे कसे भरता त्याच्या. बिल सगळ्यांना सारखेच येणार.

अजिबात युनिट खर्च झाले नसतील तर बिल साधारण 65 ते 70 रु च्या आसपास येते. 1 phase चा चार्ज 50 रु + इतर खर्च मिळून. ज्यांना 100 रुच्या आत बिल येतेय त्यांचे युनिट्स मोजले जात नाहीयेत. त्यांना नंतर मोठा फटका बसणार.

फायदे माहित नाहीत Sad बिल्डरने जे दिलं ते हे आहे.
बहुदा जास्त संख्येची घरगुती हेवी अप्लायन्स जास्त सहज चालत असतील. ट्रीप न होता.

विक्षिप्त मुलगा :- प्रिपेड मिटरचे एक छोटे युनिट सोसायटीच्या पार्किंग मध्ये बसवले आहे. तिथे सर्वांचीच आहेत. ते असे दिसते.
Digital-metre_1.jpg

आणि आतमध्ये एक मोठी मिटर रूम आहे तिथले मीटर असे दिसते.

Single-Phase-Prepaid-Meters_2.jpg
यात जो पांढरा फ्लॅप आहे तिथे बटणं आहेत, ती दाबून पण रिचार्ज करता येतो.

रच्याक, रिचार्ज कसे करता? >> प्रत्यक्ष एम एसई बी च्या ऑफिसात जाऊन आपला कंन्झुमर नंबर सांगितला की ते रिचार्ज करून एक प्रिन्ट देतात. त्यावर आपल्या क्रेडिट कार्ड सारखे आकडे येतात, ते विशिष्ट प्रकारे मिटर मध्ये फीड करावे लागतात.

Capture 1.JPG
वर पाहिले तर फक्त २ रांगाच आहेत ज्या मिटर मध्ये फिड करायच्या आहेत पण कधी कधी खूप येतात, त्या अश्या

Capture2.JPG

म्हणजे प्रत्यक्ष मीटर वर काही करावे लागते की web login करून करायची सोय असते? --> हो मीटर वर सगळे आकडे फिड करावे लागतात.

आणि जर web login करून करत असाल तर आपण रिचार्ज केले हे मीटरला कसे कळते? म्हणजे त्यात sim card वगैरे आहे का internet ला connect होण्यासाठी??? -->> नाही वेब लॉगिन वगैरे करून नाही. पण इलेक्ट्रिसिटी ची वेबसाईट अ‍ॅक्सेस करून आपण ऑनलाईन रिचार्ज करू शकतो, पण टोकन मिटर मध्ये मॅन्युअली फिड करावे लागते ही एक पद्धत.
दुसरी पद्धत म्हणजे एम एस ई बी ने आम्हाला पेन ड्राईव्ह दिला होता, त्यात ते टोकन जाते आणि बाहेरच्या छोट्या मिटरला पेन ड्राईव्ह साठी यु एस बी आहे. पण माझा पेन ड्राईव्ह कधीच चालला नाही. मी कायम मॅन्युअल करते आणि माझे बाहेरचे मिटर नीट काम नाही करत, मला मेन मीटर रूम मध्ये जाऊन टोकन फिड करावे लागते. (ही फक्त माझी केस आहे) बाकिच्यांचे व्यवस्थित चालते.

अमी, 3 फेजचे काय फायदे आहेत? >>>

३ फेज शक्यतो हेवी लोड ला वापरतात. मोठे industrial conditional air conditioner थ्री फेज असतात.
मुकेश अंबानीच्या घरात थ्री फेज एसी बसवल्यास पॉवर सेव्ह होईल. माझ्या छोट्याश्या घरात मात्र काही फार फरक पडणार नाही.
पुण्यात MSEB चे पर फेज ला 4kW चे लिमिट आहे (जर रुम मध्ये एसी आणि दोन्ही बाथरुम मध्ये हिटर चालु असतिल तर आपण त्यापेक्षा जास्त पॉवर घेतो, ) पण थ्री फेज ला ते लिमिट १२ kW होईल.

जनरेशन , transmission & distribution थ्री फेज मध्ये होत असल्याने लोड शेडिंग झाल्यास थ्री फेज असल्याचा काही फायदा नाही पण सोसाईटी मधला जर एका फेज चा फ्युज गेला तरी घरतल्या काही लाईट चालु राहतात.
मात्र महिन्याचे मिनिमम बिल वाढते.

दक्षिंणा फार उपयुक्त माहिती.
प्रीपेड मध्ये तुम्हाला ५% सुट देतात, पण तुमच्याकडुन कर जास्त घेतात.
जर १६% कर असेल आणि १००० रुपये भरले तर ८६२. ०७ विजेसाठी आणि १३७.९३ रुपये कर म्हणुन घेतला पाहिजे
तुमच्या कडुन ८४० रुपये विजेसाठी आणि १६० रुपये कर म्हणजे १९.०४% कर घेतला जातो

<< सर्विसमनचं कामंच असतं कि तुमच्या अप्लायंसच्या रिपेअरचं काम मिळवणं आणि पुढच्या रिपेअर कॉलची सोय करुन ठेवणं... Happy >>
------ सहमत, नुकतेच अनुभवले...

ऐन वेळेला रिचार्ज खतम झाला तर काय पर्याय आहे यात दक्षे? की बॅलन्स कमी असं काही नोटिफिकेशन येतं त्या लहान डिव्हाईसवर (कारण ते बाहेर पार्किंगमध्ये असल्यानी विजिबल आहे)? फोन वर तर नाही येणार काही नोटिफिकेशन कारण कुठे वेब कनेक्टिविटी नाहीय या प्रोसेस मध्ये.
एखाद वेळेस मीटर नी टाईपलेले नंबर्स अ‍ॅक्सेप्ट नाही केले तर काय सोय आहे? जस्ट क्युरिऑसिटी म्हणून विचारतोय. मी ही हा प्रकार प्रत्यक्ष कधी पाहीला नाहीय म्हणून...

पुढील धागा:
गेली 18-19 वर्षे वापरात असलेल्या, आजवर कसलाही त्रास न झालेल्या अँबॅसेडर फोर डोअर कारचे कूलिंग बंद. कारचे प्रति किमी. अ‍ॅवरेज पण फार कमी झाले आहे. नेटवर थोडी शोधाशोध केल्यावर कळले की कारचे आयुष्य 15 16 वर्षांचेच असते.
नवीन कार घ्यावी का? कार विकून सायकल घ्यावी का?
मायबोलीकरांचा अनुभव काय आहे? Wink

निल्सन, सेम पिंचबद्दल धन्यवाद. मला वाटलेले मध्यमवर्गीयांत सात आठ हजार वीजबिल येणारे आम्हीच आहोत की काय, आणि उगाच गिल्टी फिलींग येऊ लागलेले. मागे जेव्हा ऑफिसमध्ये हे बिल सांगितलेले तेव्हा लोकांनी सहानुभुती देणे तर दूर उलट विजेची नासाडी आणि गैरवापर करत असणार म्हणून फैलावर घेतलेले.

असो,
यानिमित्ताने सहज मोजमाप केले असता, घरात खालील वीज उपकरणे आहेत.

फ्रिज
वॉशिंगमशीन
एसी
टीव्ही
ओवन
गीझर
डोअरबेल
5 पंखे
5 ट्यूबलाईट
1 झुंबर
7 छोटेमोठे बल्ब
4 मोबाईल चार्जर
3 गूडनाईट
1 ईंटरनेट
दिवाळीचे लाईटचे तोरण आणि कंदील वर्षभर लटकून असतो. सणवाराला तो देखील लावतो.

अहो विंजिनिअर... किमान डिप्लोमा होल्डर ना तुम्ही? नुसती उपकरणं कसली देताय! यांची वॅटेज किती आहेत ती लिहून काढा. प्रत्येक उपकरण किती वेळ चालवलं ते लिहुन काढा. ती उपकरणं किती अँपिअर स्विचला जोडली आहेत ते बघा... धरा बोटं आणि करा गणित.
वीज आठ हजाराची वापरा का ऐशी... आमचं काय जातय! बिल वेळेवर भरा म्हणजे झालं.

महिन्याला 7-8 हजार वीजबिल येतेय व ते परवडतेय मग मध्यमवर्गीय कसले?

तुमची रिलायन्स किंवा टाटाची वीज असणार. त्यांचे रेट जास्त असले तरीही माझ्या मुंबईतल्या नातलगांचे वीज बिल इतके येत नाही. तुमचे युनिट्स किती होतात ते पहा, तुमच्या मीटरमध्ये गडबड आहे. Mseb च्या साईटवर युनिट calculator आहे, तिथे बघा तुमच्या वापरासाठी किती युनिट्स लागतील. ते calculation सगळीकडे जवळपास सारखेच हवे.

मागे जेव्हा ऑफिसमध्ये हे बिल सांगितलेले तेव्हा लोकांनी सहानुभुती देणे तर दूर उलट विजेची नासाडी आणि गैरवापर करत असणार म्हणून फैलावर घेतलेले.>>>>>>
तुम्हाला तेव्हाच कळायला हवे होते, तुमचे बिल सामान्यापेक्षा जास्त येतेय.

Pages