देहूतील ब्रम्हवृंदातील 'सालोमालो' हे बऱ्यापैकी बडे प्रस्थ. छान वाडा-हुडा, पैसा-अडका असलेली व्यक्ती. साहित्याची ऊत्तम जाण. आवडही. पण या सालोमालोंना काही सरस्वती प्रसन्न होईना. त्यांना फार वाटे की संस्कृतात श्लोक रचना करावी, प्राकृतात काव्यरचना करावी. पण त्यांना काही ते साधेना. हजार प्रयत्न करुनही सालोमालोंच्या काव्यात ओढाताण केलेली जाणवे. सफाईदारपणा, सहजता काही येईना. कालांतराने सालोमालोंच्या लक्षात आले की आपल्या नशिबी काही काव्यलेखन नाही. आपल्याला फक्त लक्ष्मीच प्रसन्न करुन घेता येते, सरस्वती नाही. पण सालोमालोंचा अंतरात्मा काही त्यांना चैन पडू देईना. मग त्यांनी 'लक्ष्मीच्या' मदतीने 'सरस्वतीला' वश करायचीच असे ठरवले. त्याच काळात देहूगावात तुकाराम आंबिले नावाचे गृहस्थ विठ्ठल भक्ती करीत. विठ्ठलाचे गुणगान गाताना त्याच्या तोंडातुन अभंगा मागून अभंग बाहेर पडत. समाजातील दांभीकता पाहून त्यांचा अभंग आसुड होई, नाठाळाला पाहून त्यांचा अभंग काठी होई. फार रसाळ, गोड, अर्थपुर्ण अभंग असत त्यांचे. पण हे तुकोबा फार भोळे. अभंग लिहून मोकळे होत. मग सालोमालोंना छान कल्पना सुचली. तुकोबांनी एखादा अभंग रचला की तो येनकेन मार्गाने सालोमालो मिळवायचे. आणि जेथे 'तुका म्हणे' असे ते खोडून 'सालो म्हणे' लिहित व हा अभंग आपलाच आहे असे सांगत. आपल्या चोपडीत सुवाच्च अक्षरात लिहून ठेवीत. लोकांना काय खरे व काय खोटे हे कळे. पण सालोमालोबरोबर वैर कोण घेणार? तुकोबा तर अशा बाबतीत फार ऊदासीन. असे होता होता सालोमालो महाशयांनी तुकोबांचे असंख्य अभंग चोरले. मध्यंतरीच्या काळात तुकोबांना रामेश्वरभट्टांच्या आदेशावरुन 'गाथा' ईंद्रायणीत बुडवायची आज्ञा झाली. सालोमालोला प्रचंड आनंद झाला. यथावकाश 'गाथा' ईंद्रायणीला अर्पण झाली. तुकोबाही काही काळाने वैकुंठाला गेले. अनेक वर्षे ऊलटली. आणि मग तुकोबांच्या गाथेचे संकलन करायची कल्पना पुढे आली. काम सुरु झाले. पण तुकोबांचे अनेक अभंग काही मिळेनात. अनेक गहाळ झालेले. अनेक विस्मृतीत गेलेले. काय करावे हा प्रश्न संकलनकर्त्यांना पडला. ईतक्यात 'सालोमालोंची चोपडी' प्रकाशात आली. आणि तुकोबांचे असंख्य अभंग क्रमवारीने सापडले. जर सालोमालो नसते, त्यांनी ते अभंग चोरले नसते तर आज आपण तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांना मुकलो असतो. धन्य ते सालोमालो आणि धन्य त्यांची वाङगमयचोरी.(पहा, या त्रासातुन तुकोबा सुद्धा सुटले नाहीत. असो.)
पण आजकाल 'सालोमालो’चे नाव जरी माझ्या कानावर पडले तरी मला तुकोबांची पुढील ओळ आठवते
तुका म्हणे ऐशा नरा। मोजुनी माराव्या पैजारा॥
जेंव्हा माझे लेख चोरीला जातात
Submitted by हरिहर. on 8 June, 2018 - 06:05
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्लॅगिअॅरिझम आणि पायरसीविषयी
प्लॅगिअॅरिझम आणि पायरसीविषयी आलेलं वरचं तात्विक वगैरे हे फार पातळ जनरलाईझ्ड आर्ग्युमेंट आहे. उद्या ह्या न्यायाने तुम्ही प्रश्न शेवटी 'खोटेपणा न करणे' ह्या तत्वाचा आहे म्हणून 'शाली आजवर कधी खोटे बोलले नाहीत' म्हणून त्यांचे अभिनंदन कराल. स्पेसिफिक मुद्दे भरपूर वेगळे आहेत.
एकीकडे मुद्दा अॅक्सेसचा आहे, तर दुसरीकडे क्रेडिटचा. अॅक्सेस कसा करता ह्या गोष्टी भविष्यात बदलू शकतात. वुडहाऊसच्या कादंबर्यांचा कॉपीराईट काही वर्षांनी एक्स्पायर होईल व इतर कोणी त्या छापू लागतील किंवा त्यांच्या फोटोकॉपिज करून लोकांमध्ये वाटतील, पण त्या कादंबर्या वुडहाऊसच्या आहेत, हे मात्र ते कोणी पुसू शकणार नाहीत.
गणित किंवा संशोधन विषयातलं विशिष्ट उदाहरण घ्यायचं झाल्यास प्रकाशित संशोधन प्रबंध हा मानवजातीच्या ज्ञानाचा साठा असल्याने तो खरंतर प्रकाशकांच्या मक्तेदारीखाली बीहाईंड सबस्क्रिप्शन पेवॉल्स नको, सर्व ज्ञान हे पब्लिक अॅक्सेसिबल फ्री ऑफ कॉस्ट हवे अशी एक चळवळ मूळ धरू पाहते आहे. ह्या चळवळीला मी एकवेळ समर्थन देऊ शकेन, पण मानवजातीचे ज्ञान सगळ्यांच्या मालकीचे आहे म्हणून ते कोणी शोधले त्याचे नावच विसरू पाहून सगळे ज्ञान बिननावाचे एकत्र छापणार्या चळवळीला समर्थन असणार नाही.
भाचा यांच्या विचारांशी सहमत.
भाचा यांच्या विचारांशी सहमत.
भास्कराचार्य >> +१
भास्कराचार्य >> +१
भाचा +१
भाचा +१
भाचा +१
भाचा +१
पायरेटेड कलाकृती बघणं चुकीचंच आहे पण ती बनवणा-याचं नाव तुम्हाला माहिती असतं किंवा तशी माहिती उपलब्ध असते. शाली यांनी लिहीलेलं साहित्य मी दुस-या कोणाचं समजून त्याची वाहवा केली तर ते शाली यांच्यावर अन्यायकारक आहे.
छान आहे लेख. आपले लेख चोरी
छान आहे लेख. आपले लेख चोरी होत असतील तर आपण चांगले लिहितो असे मानावे. अर्थात चोरी करणे चांगले किंवा चोरांना माफ करावे वगैरे असे म्हणणे नाही. पण आपल्यालाच बरे वाटावे म्हणून थोडा सकारात्मक विचार.
भास्कराचार्य >> +१
यू सेड इट, भाचा!
यू सेड इट, भाचा!
शाली यांच्या लेखात जर कुणाला
शाली यांच्या लेखात जर कुणाला (खुद्द शालींनासुद्धा) पायरसी हा ईश्यू आहे हे दिसले नसेल तर नम्रपणे नमूद करू ईच्छितो... <<<<<मग सालोमालोंना छान कल्पना सुचली. तुकोबांनी एखादा अभंग रचला की तो येनकेन मार्गाने सालोमालो मिळवायचे. आणि जेथे 'तुका म्हणे' असे ते खोडून 'सालो म्हणे' लिहित व हा अभंग आपलाच आहे असे सांगत. <<<< ह्यातले दुसरे वाक्य आहे 'येनेकेन मार्गाने' ही साहित्यचोरी (Piracy) आहे आणि तिसरे वाक्य 'खोडून सालो म्हणे लिहित' हे श्रेयअव्हेर ( Plagiarism ) आहे. आशा करतो ह्याबाबतीत वाद नसावा.
जर लेखकाची टीका आणि ईतरांचे अर्ग्यूमेंट्स फक्तं सालोमालोंनी 'खोडून सालो म्हणे लिहित' ह्याबद्दलच आहे आहे आणि 'येनेकेन मार्गाने' ह्या चोरीबद्दल कुणाला काही वावगे वाटत नाही त्यामागे प्रत्येकाची कारणे काहीही असोत. (खरे तर साहित्यचोरीचा गुन्हा पहिला आहे आणि तो श्रेयअव्हेराच्या गुन्ह्याईतकाच मोठा if not more severe आहे .. पण ते असो..) तर मग मी म्हणेन नैतिक किंवा तात्विक विचारांचा आपला क्रम ज्याने त्याने तपासून पहावा.
मानवी स्वभाव संधीसाधू आहे. मी प्रत्येक माणूस कायम संधीसाधूच वागतो असे म्हणत नाहीये.. पण जिथे कारणे देऊन बुद्धीभेद करू शकतो तिथे तो स्वतःच्या फायद्यासाठी तात्विक आणि नैतिक दृष्ट्या अयोग्य गोष्टी करत राहतो.
मानवी स्वाभावाचे ऊदा.( ह्या ऊदा.त तात्विक आणि नैतिक दृष्ट्या योग्य/अयोग्य काही नाही.. शोधायला जाऊ नका) माणूस अपघात विमा काढतो आणि लॉटरीचे तिकिटही.. पहिल्यात त्याला अघटित होऊ नये अशी अपेक्षा असते कारण त्यात त्याचे नुकसान आहे आणि दुसर्यात अघटितच व्हावे अशीच ईच्छा असते कारण त्यात फायदा आहे.
तर जिथे माझा फायदा आहे ('येनकेन प्रकारेण' शून्य वा कमी पैशात/वेळात साहित्य ऊदा. पुस्तके, सिनेमे, गाणी, सॉफ्टवेअर्स ई. मिळवणे - थोडक्यात साहित्यचोरी) तिथे मी स्वतः करत असलेल्या नैतिक दृष्ट्या अयोग्य गोष्टी कशी अदखलपात्रं आहे हे स्वतःला आणि ईतरांना समजावणार.
पण ऊलट माझे साहित्य दुसर्याने चोरले वा मला निर्मितीचे श्रेय दिले नाही तर 'मिलॉर्ड ये अन्याय है' म्हणणार... आणि पुन्हा 'मी केलेली साहित्यचोरी' आणि 'माझे नाकारलेले श्रेय' हे दोन वेगळे मुद्दे आहेत आणि न्यायाच्या कसोटीवर ते वेगळे तोलावेत अशी अपेक्षा करणार.. हा संधीसाधू पणा नव्हे?
प्लॅगिअॅरिझम आणि पायरसीविषयी आलेलं वरचं तात्विक वगैरे हे फार पातळ जनरलाईझ्ड आर्ग्युमेंट आहे. उद्या ह्या न्यायाने तुम्ही प्रश्न शेवटी 'खोटेपणा न करणे' ह्या तत्वाचा आहे म्हणून 'शाली आजवर कधी खोटे बोलले नाहीत' म्हणून त्यांचे अभिनंदन कराल. स्पेसिफिक मुद्दे भरपूर वेगळे आहेत. >>तुम्ही लेबल लावले तितके टॅन्जन्ट नक्कीच नाहीये माझे अर्ग्यूमेंट.
एकीकडे मुद्दा अॅक्सेसचा आहे, तर दुसरीकडे क्रेडिटचा. अॅक्सेस कसा करता ह्या गोष्टी भविष्यात बदलू शकतात. वुडहाऊसच्या कादंबर्यांचा कॉपीराईट काही वर्षांनी एक्स्पायर होईल व इतर कोणी त्या छापू लागतील किंवा त्यांच्या फोटोकॉपिज करून लोकांमध्ये वाटतील, पण त्या कादंबर्या वुडहाऊसच्या आहेत, हे मात्र ते कोणी पुसू शकणार नाहीत. >> तुम्ही कधी पब्लिक वा स्कूल लायब्ररीमध्ये वा रेप्युटेड सोर्स कडे वुडहाऊसच्या फोटोकॉपीड कादंबर्या बघितल्या आहेत का? नसल्यास का नाही ते सांगा?
गणित किंवा संशोधन विषयातलं विशिष्ट उदाहरण घ्यायचं झाल्यास प्रकाशित संशोधन प्रबंध हा मानवजातीच्या ज्ञानाचा साठा असल्याने तो खरंतर प्रकाशकांच्या मक्तेदारीखाली बीहाईंड सबस्क्रिप्शन पेवॉल्स नको, सर्व ज्ञान हे पब्लिक अॅक्सेसिबल फ्री ऑफ कॉस्ट हवे अशी एक चळवळ मूळ धरू पाहते आहे. >>> ओपन सोर्स सारखे का?
ह्या चळवळीला मी एकवेळ समर्थन देऊ शकेन, पण मानवजातीचे ज्ञान सगळ्यांच्या मालकीचे आहे म्हणून ते कोणी शोधले त्याचे नावच विसरू पाहून सगळे ज्ञान बिननावाचे एकत्र छापणार्या चळवळीला समर्थन असणार नाही. >> मी निर्मात्याला श्रेय देऊ नये/मिळू नये असे कधी म्हणालो? रादर मी स्व्तः कधीमधी काहीबाही लिहित असतांना असे का म्हणेन?
मी फक्तं "तुम्ही जेव्हा म्हणता [माझे श्रेय त्याने लाटले] तेव्हा [जाणते अजाणतेपणी मी कुणाचे श्रेय्/मोबदल लाटला नाहीना] हे moral & ethical grounds वर तपासून बघा" एवढेच म्हणतो आहे.
एक साधा प्रश्न विचारतो... समजा तुम्ही प्रोफेसर आहात आणि प्रबंधात श्रेयअव्हेर ( Plagiarism ) केल्याने सापडलेल्या एका विद्यार्थ्याला तुम्ही तुमच्या केबिन मध्ये डिसिप्लिनरी अॅक्शन साठी बोलावले आहे... आणि त्याने तुमच्या टेबलावरच्या पुस्तकाकडे बघून 'प्रोफेसर, हे रिचर्ड टॅपिआच्या नॉन्पॅरामेट्रिक प्रोबॅबिलिटी डेन्सिटी एस्टिमेशन मॉडेल ह्या $१०० च्या पुस्तकाची $१० ची नॉक-ऑफ कॉपी आहे ना, कुठल्या कॉपीअर कडून मिळवली?' तर तुमची प्रतिक्रिया काय असेल...
तुम्ही नियमावर बोट ठेऊन त्याच्यावर डिसिप्लिनरी अॅक्शन घेणार की आत्मपरीक्षण करणार?
भा, थोडक्यात कितीही तांत्रिक धागेदारे काढून 'हे आणि ते कसे वेगळे आहे' हे सांगितले तरी मुद्दा फक्तं आणि फक्तं Content Integrity चाच आहे ते समजण्यासाठी हे वाचणार्या प्रत्येकाने ह्या लिंकवरचे 'जोनाथन बेली'चे आर्टिकल एकदा तरी वाचावे..
https://www.plagiarismtoday.com/2014/06/23/content-integrity-piracy-plag...
हाब, तुला 'अस्थानी' या
हाब, तुला 'अस्थानी' या शब्दाचा अर्थ लक्षात आला नसेल तर थोडा सविस्तर लिहू का?
प्रस्तुत लेख श्रेय अव्हेरलं गेल्याबद्दल आहे. इथे पायरसीची चर्चा मूळ मुद्द्याला बाजूला सारून व्हावी हे कन्टेन्ट इन्टेग्रिटीला मारक आहे. (लेखातली व्याख्या पाहणे: showing respect for other content creators and their wishes.)
तू प्रतिसादात बेलीच्या लेखाची लिंक देऊन 'तुमचा वैताग समजतो, त्याचबरोबर याचाही विचार व्हावा' असं थोडक्यात म्हणू शकला असतास.
तू लिंक दिलेला लेख आणि त्याबाबतचं तुझं विवेचन (लबाडीच्या छत्रीखाली आणखी काय काय येऊ शकेल, मुळात चूक म्हणजे काय - बरोबर म्हणजे काय इ. याबद्दलचा कल्पनाविस्तार) मिराळ्या लेखात लिहून तिथे या लेखाचा उल्लेख 'मला हा लेख वाचताना असंही वाटलं' अशा प्रकारे करू शकला असतास.
आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे वरच्या दोनांसारखा एखादा मार्ग निवडून तू 'म्हणजे तुम्ही अमुक अमुक करत नसालच, तेव्हा त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो' यातला निष्कारण उपरोध टाळू शकला असतास.
त्यामुळे काय झालं असतं की तुझा (बेलीच्या लेखातला) मुद्दा तुलनेने अधिक वाचकांनी अधिक आस्थेने लक्षात घेतला असता. असो.
बाय द वे, बेलीच्या लेखाची लिंक तू आत्ता दिलीस, त्यातला विचार मात्र कालपासून तुझाच असल्याप्रमाणे तू मांडतो आहेस. लेख तूही आजच वाचलास की काल श्रेयाव्हेर केलास?
<<< त्यातला विचार मात्र
<<< त्यातला विचार मात्र कालपासून तुझाच असल्याप्रमाणे तू मांडतो आहेस. लेख तूही आजच वाचलास की काल श्रेयाव्हेर केलास? >>>
@स्वाती_आंबोळे
विचारांवर कॉपीराइट नसतो, लेखांवर असू शकतो. स्वतःच्या विचाराने लिहिलेल्या गोष्टींसाठी श्रेयाव्हेर करत नाहीत.
>>> विचारांवर कॉपीराइट नसतो,
>>> विचारांवर कॉपीराइट नसतो, लेखांवर असू शकतो.
मी कॉपीराइटबद्दल विचारलेलं नाही, हाबच्या भाषेत 'moral & ethical grounds'बद्दल विचारलं आहे. कालच 'यावरून बेली यांच्या लेखात वाचलेला आणि मला अत्यंत पटलेला हा विचार मी मांडू इच्छितो आहे' असं म्हणणं उचित ठरलं असतं की नाही नैतिकदृष्ट्या? लेख म्हणजे रेकॉर्ड केलेले विचारच असतात ना?
वरील लेखात लिहिलेला मुद्दा:
वरील लेखात लिहिलेला मुद्दा: It’s about being honest with the work you create and showing respect for other content creators and their wishes.
स्वतः यूजर असताना पायरटेड (श्रेय न देता) पुस्तके, सिनेमे, गाणी, सॉफ्टवेअर्स वापरणे ठीक आहे, असे म्हणायचे (read Piracy), पण स्वतःचे लेख चोरीला गेले ( दुसर्या कुणीतरी स्वतःच्या नावावर खपवले) read Plagiarism म्हणून श्रेय मिळत नाही, म्हणत गळा काढायचा यातला दुटप्पीपणा निव्वळ दाखवून द्यायचा आहे. या अर्थाने पायरसी आणि उचलेगिरी एकमेकांशी संबंधित आहेत, इतकेच.
>>> संबंधित आहेत, इतकेच
>>> संबंधित आहेत, इतकेच
बरोब्बर! आणि प्रतिसादात 'तितकेच' असायला हवे होते.
हाबच्या पहिल्या पोस्टमधला उपरोध (किंवा तुमच्या याच पोस्टमधला 'गळा काढायचा' या वाक्प्रचाराचा वापर) जणू लेखकाने हा असा दुटप्पीपणा केलाच आहे आणि आता त्याची कानउघाडणी करण्याची दुर्दैवी जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे अशा प्रकारे आला. त्याची आवश्यकता नव्हती.
माझा हे श्रेयअव्हेर वेगळे आणि
माझा हे श्रेयअव्हेर वेगळे आणि ते साहित्यचोरी वेगळी (तांत्रिकदृष्या ते वेगळे आहेत हे मी कालच लिहिले आहे ) आहेत असे तांत्रिकतेचा मुद्दा पुढे करून भासवण्याबद्दलच आक्षेप आहे. ईंटेग्रिटी अशी सोयीस्करपणे वापरणे चूक आहे. मी आधीही लिहिले आहे की व्याख्येवरून वाद घालत नाहीये तर दोन्हींमागच्या छापा/काटा टाईप्स संधीसाधू भावनेच्या वापराबद्दल बोलतो आहे. छापा दिसतो आहे म्हणून काटा कधी नव्हताच असे प्रीटेंड करण्यात काय हशील?
ऊपरोधिक लिहिले हे मान्य... शालींसारख्या सातत्याने चांगले आणि जेन्यूईन लिहिणार्या लेखकांसाठी ते विनाकारण हार्श झाले का ? कदाचित हो. पण ते मला अस्थानी आजिबात वाटत नाही. असे सिलेक्टिव विक्टिमायझेशन बद्दल वाचले की मला 'हे दुटप्पी वागणे तर नाही ना?' असे वाटते, म्हणून विचारले लिहिले.
बाय द वे, बेलीच्या लेखाची लिंक तू आत्ता दिलीस, त्यातला विचार मात्र कालपासून तुझाच असल्याप्रमाणे तू मांडतो आहेस. लेख तूही आजच वाचलास की काल श्रेयाव्हेर केलास? >>
हे आपले बळेच वाटते आहे.
बेलीची लिंक (कंटेंट नाही) अगदी त्याच्या नावासहित साईट केली आहे आणि तुम्ही म्हणता श्रेयअव्हेर केला.
आणि Content Integrity आणि त्यामागचा विचार ही काही बेलीची कॉपीराईटेड ईंटेलेक्चुअल प्रॉपर्टी थोडीच आहे. आणि त्यावर लिहिणारा तो एकटा थोडीच आहे.. बाकीही अनेक किचकट भाषेत, अगदी लीगल केसेस आणि आऊटकम्स डिस्कस करणार्या लिंक्स आहेत ही त्यातल्या त्यात सोपी सुटसुटीत वाटली म्हणून मुद्दा समजण्यासाठी दिली.
आमच्याकडे रिसर्च आणि ट्रेडिंग मध्ये रोज कानी कपाळी ओरडून सांगतात Content Integrity राखण्या बाबतीत. Plagiarism आणि Piracy हे वर्गीकरण आहे पण त्याचा ऊगम Content Integrity प्रती अनास्था ह्या भावनेत आहे. ट्रेनिंग घेऊन परीक्षाही पास करायला लागते आणि भरमसाठ डिस्क्लोजर्स लिहावे लागतात प्रत्येक रिसर्च रिपोर्टच्या शेवटी.. श्यपथेवर सांगावे लागते हे जे काय आहे ती 'फक्तं माझी आणि माझीच निर्मिती आहे आणि त्यासाठी मी माझी ईंटेग्रिटी कुठेही कॉम्प्रमाईझ होऊ दिलेली नाही'... असो..ह्यापुढे मी ह्याचे स्पष्टीकरण देणे अनावश्यक आणि 'अस्थानी' आहे.
तू प्रतिसादात बेलीच्या लेखाची
तू प्रतिसादात बेलीच्या लेखाची लिंक देऊन 'तुमचा वैताग समजतो, त्याचबरोबर याचाही विचार व्हावा' असं थोडक्यात म्हणू शकला असतास. >>> एक्झॅक्टली! कालपासून मला काय पटत नव्हते ते पिनपॉईण्ट करायचा प्रयत्न करत होतो पण अचूक सुचत नव्हते. हाब ने काढलेल्या मुद्द्याबद्दल विरोध नाही पण पोस्ट अकारण वैयक्तिक लेव्हलला गेली असे वाटले. ते हे ठीक आहे. मला आधी वाटले हाब चा उद्देश कदाचित जो प्रश्न डोक्यात आला तो इथे लिहीताना "पॉलिटिकली करेक्ट" न करता तसाच्या तसा विचारायचा असेल. His right, and his choice. पण नंतर पुढच्या पोस्ट मधे वैयक्तिक घेउ नका म्हण्टल्याने मग ती आधीची पोस्ट जास्तच खटकली. शाली यांनी एक जनरल ओपिनियन धागा काढलेला नाही. त्यांच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल आहे. त्याला उत्तर देताना त्यांच्या वागण्याबद्दल त्यांच्यावरच आरोप करणारे प्रश्न विचारून पुन्हा वैक्यक्तिक घेउ नका म्हणणे- हे काही झेपले नाही.
हाबच्या पहिल्या पोस्टमधला
हाबच्या पहिल्या पोस्टमधला उपरोध (किंवा तुमच्या याच पोस्टमधला 'गळा काढायचा' या वाक्प्रचाराचा वापर) जणू लेखकाने हा असा दुटप्पीपणा केलाच आहे आणि आता त्याची कानउघाडणी करण्याची दुर्दैवी जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे अशा प्रकारे आला. त्याची आवश्यकता नव्हती. >> असा विचार आजिबात नव्हता केला... ह्या न्यायाने तर लेखातल्या भावनेवर टीका करणारा कुठलाही प्रतिसाद मायबोलीच्या कुठल्याही धाग्यावर फाऊलच म्हणायला हवा.. लेखातल्या भावनेला अनुमोदन देणेही मग 'सुदैवी जबाबदारी पार पाडल्याची कर्त्यव्यपूर्ती' म्हणता येईलच ना.
चर्चा दुसरीकडे हलवायची असल्यास माझी ना नाही.
कळले नाही फा..
कळले नाही फा..
माझे लेख चोरीला जातात
तुमचा त्रागा समजू शकतो..
लेखातल्या तुमच्या भावनेशी सहमत आहे >> लेख आणि अश्या अर्थाचे अनेक प्रतिसाद वैयक्तिक दृष्टीकोनातूनच आले आहेत ना. मग केवळ एका प्रतिसादातून ऊपरोध दिसून आला म्हणून तो तेवढाच प्रतिसाद वैयक्तिक असे कसे?
त्याला उत्तर देताना त्यांच्या वागण्याबद्दल त्यांच्यावरच आरोप करणारे प्रश्न विचारून पुन्हा वैक्यक्तिक घेउ नका म्हणणे- हे काही झेपले नाही. >>
आरोप खचितच केला नाही ( तसा विचार किंवा प्रयत्न नक्कीच नव्हता) पण 'आपण मांडत असलेला त्रागा आपल्यामुळे दुसर्यावर ओढवला नाही ना' ही दुसरी बाजू सुद्धा बघावी हे जरूर सुचवले. त्याआधी तुमचा त्रागा समजू शकतो असेही लिहिले आहे मी.
'वैयक्तिक घेउ नका' ह्यासाठी म्हणालो की ते मायबोलीवर नव्यानेच लिहू लागले आहेत आणि माझ्या पोस्टनंतर त्यांच्या अनपेक्षितपणे ऊद्भवलेल्या चर्चेतून/वादातून पुढे त्यांच्या मनात माझ्या प्रती काही किल्मिष/ आकस राहू नये. त्याचा अर्थ असा नव्हे की I do not stand by my earlier post.
शालींनी वाद पुढे न वाढवण्याबद्दल सुचवले आहे (निदान दुसर्या बाजूने बोलणार्या मी आणि ऊपाशी-बोका ह्यांनातरी), पण त्यांच्या समर्थनार्थ बोलणार्यांना त्यांनी अजून असे सुचवलेले नाही (आरोप नाही निरिक्षण आहे)त्यामुळे दरवेळी त्यांचा/लेखाचा रेफरंस घेऊन प्रतिसाद देतांना माझी अडचण होते आहे. Plagiarism आणि Piracy विषयाला धरून चर्चा करूयात का? ईथे किंवा दुसरीकडेही चालेल.
हाब, तू जर >>>मी फक्तं
हाब, तू जर >>>मी फक्तं "तुम्ही जेव्हा म्हणता [माझे श्रेय त्याने लाटले] तेव्हा [जाणते अजाणतेपणी मी कुणाचे श्रेय्/मोबदल लाटला नाहीना] हे moral & ethical grounds वर तपासून बघा" एवढेच म्हणतो आहे. >> येवढंच म्हणत असलास तर एकवेळ ठीकच आहे. पण त्या बोलण्यात उपरोध दिसला म्हणून ते बर्याच जणांना खटकलं.
एकही पायरेटेड कंटेंट न बघितलेला/ न वापरलेली व्यक्ती याजगात मिळणे जवळ जवळ अशक्य असेल. पुस्तके, नाटकं, चित्रपटा पासून आज जे काही इलेक्टॉनिक हार्डवेअर सॉफ्टवेअर वापरतो त्यात किती व्हायोलेशन/ इनफ्रिंजमेंट झाल्या असतील, आणि त्या केसेस सेटलमेंट करुन मिटवल्या असतील... कोणाला माहित आहे! म्हणून मग प्लेजरिझम वर टीका करणे अयोग्यच का? त्या येशूच्या गोष्टी सारखं उत्तर मागितलं तर हो उत्तर असेल कदचित..पण मग हे जग चालणंच अशक्य होईल.
मी कुठल्या ना कुठल्या बाबतीत
मी कुठल्या ना कुठल्या बाबतीत लबाड आहे, हे कबूल करतो.
आपण सर्वांनीच असे एकदाच कबूल करायचे का ?
बघा विचार करून .
"Who is NOT guilty ? "असे वचन आहेच ना?
गेले काही दिवस माबोवर जे काही
गेले काही दिवस माबोवर जे काही प्रकार चालले होते ते पाहून मला वाटले ईथेही वाह्यातपणा होणार. त्यामुळे ही चर्चा वाढू नये अशी माझी ईच्छा होती. पण एकून जी काही चर्चा झाली आणि होते आहे ती पाहून, वाचुन खरच बरं वाटलं. प्रत्येकाने आपापले मुद्दे ठामपणे पण तोल सुटू न देता मांडले. भास्कराचार्य, स्वाती, अमितव या सगळ्यांनीच फार मुद्देसुद विचार मांडले. हाब यांनी ज्या पद्धतीने लावून धरले ते पाहून तर क्षणभर त्यांच्या बाजुनेच वादात ऊतरायचा मोह झाला. असो. सगळ्यांचे धन्यवाद!
Pages