सांज अमेरिका

Submitted by अमितव on 6 June, 2018 - 13:23

भारतात असताना सांज लोकसत्तातल्या सासूने सुनेचा छळ करायला वापरलेल्या नामी क्लुप्त्या, गावकर्‍यांनी हिंसक जनावरांना हुसकवायला लावलेला फास आणि त्यात चुकुन अडकलेले उंदीर छाप बातम्या वाचायला जाम मजा यायची.
देश बदलला तरी असल्या गमतीशीर बातम्या रोज कानावर पडतातच. तर अमेरिकेतल्या ट्रिविअल, मजेशिर, विअर्ड बातम्या शेअर करायला हा धागा.
अमेरिका लिहिलं असलं आणि अमेरिकेतील आयुष्यात धागा असला तरी तुमच्या देशातल्या, वाचनातल्या बातम्यांचं स्वागतच आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पहिली बातमी

हल्ली मुलांची नावं टॅटू करायची फॅशन आहे. तर ही जोअ‍ॅना टॅटू आर्टिस्ट कडे तिच्या दोन वर्षाच्या मुलाचं नाव टॅटू करायला गेली. टॅटू आर्टिस्टने मुलाचं नाव 'केविन' असताना चुकुन 'केल्विन' लिहिलं. ही चूक टॅटू पूर्ण झाल्यावर लक्षात आली. टॅटू आर्टिस्टने चुकी बद्दल माफी मागून पैसे परत करण्याची ऑफर दिली. आता जोअ‍ॅन समोर आणखी जास्त पैसे (आणि वेदना )खर्च सहन करुन तो टॅटू काढण्याशिवाय पर्याय न्हवता.

पण तिने आणि तिच्या नवर्‍याने टॅटू बदलण्यापेक्षा मुलाचे नावाच बदलणे पसंत केले. केविन पेक्षा केल्विन जास्त युनिक आणि कूल आहे, आणि दोन वर्षांपर्यंत केविन.. सॉरी केल्विनची नावाशी फार ओ़़ळखही न्हवती. आता तिला दुसरी मुलगी झाली आहे फ्रेया. तिच्या वेळी १००० वेळा नाव चेक करीन असं जोअ‍ॅन म्हणत्येय. बघुया फ्रिडा मोठी झाली की तिला कसं वाटतं ते! Proud
http://bgr.com/2018/05/17/tattoo-mistake-kelvin-kevin-name-change/

https://www.msn.com/en-gb/video/other/relaxed-bear-sits-like-human-at-pi...
ही आजच आली सगळीकडे Happy अलास्कात कुणा बाईच्या बॅकयार्ड मध्ये बेअर आले. अन येऊन पिकनिक बेन्च वर माणसासारखे बसले. ही बातमी टिव्ही वर , इतर वेबसाइट्स वर पण दिसतेय.

छान धागा Happy

मागे एकदा टिव्ही वर बातमी पाहिलेली कि एका बाईच्या लहानपणी ती डिस्नेलँडला गेली असतानाच्या फोटो अल्बममधे एका फोटोत बॅकग्राऊंड्मधे तिच्या नवर्‍याचाही फोटो आलाय. अगदीच अनपेक्षितपणे त्यांना सहज अल्बम बघताना कळले होते Happy

मस्त. योसेमिटीतील एक अपूर्व सन सेट किंवा नायगारा सोबत एक अविस्मरणीय संध्याकाळ असे काहीतरी दवणी य असेल असे वाटले टायटल वरून.

बातम्या गंमत शीर आहेत

नावावरून अमेरिकेतल्या उत्तर आयुष्याबद्दल किंवा उतार वयातील आयुष्याबद्दल धागा आहे ..संध्या छाया भिवविती हृदया असं वाटलेलं.

केविनचा केल्विन होण्यामागे नक्कीच काही दैवी संकेत, ईश्वरी इच्छा असणार Wink

अमितव, तुम्हाला लृ वापरायची संधी मिळालीय. क्लृप्ती.

बर्लिन मध्ये एका राइट विंग राजकारण्याचे तो लेक मध्ये पोहत असताना कोणी तरी कपडे पळवले. नही कभी नही.
नाझी लोकांना लेक मध्ये मजा करायचा हक्क नाही असे ओरडत तो चोर पळून गेला म्हन. मग ते नेता साहेब कोणाचीतरी प्यांट घालोन रोड वरून चालते झाले. गटस यार.

मजेशीर धागा. मलाही वाटले बहुधा अमेरिकेतील भारतीयांच्या जीवनातील संध्याकाळचे अनुभव असतील .

मस्त बातम्या.. Happy
मला ही अमेरिकेतल्या रिटायरमेंन्ट प्लानिंग बद्दल चा धागा वाटला.

एका बाईच्या लहानपणी ती डिस्नेलँडला गेली असतानाच्या फोटो अल्बममधे एका फोटोत बॅकग्राऊंड्मधे तिच्या नवर्‍याचाही फोटो आला >>> हे भारीये Lol

हे दैनिक संध्यानंद सारखं वाटतय,, तो पेपर अजून चालू आहे की नाही माहिती नाही.. त्याच्यात बातम्या तुफान असायच्या पण

कृषीभूषण म्हणजे भारतीय 'कार्वर' दादाजी खोब्रागडे यांची ही कहाणी जरूर वाचावी. महाराष्ट्र सरकारने त्यांना दिलेले सुवर्णपदक विकण्याची त्यांच्यावर वेळ यावी हे मुळातच चटका लावणारे, पण ते पितळ्याचे निघावे हे त्याहूनही दुर्दैवी!
Chandrapur: Rice researcher Dadaji Khobragade who died at the age of 85 on Sunday was presented a fake gold medal, exposing the degree of corruption in government procedures. The agriculture genius was presented a gold medal for his notable work by the agriculture ministry in 2007.
The contract given for making the medal described it to be of 30gms.
http://www.eenaduindia.com/news/maharashtra/2018/06/04114701/Fake-gold-m...

अरारा. पण खरे कोण? सरकार का जो म्हणतो की ते पदक पितळेचे आहे?

काय आहे, आजकाल खरे कोण नि खोटे कोण हे ब्रह्मदेवाला पण सांगता येत नाही.
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, जिंदगी ख्वाब है वगैरे.

ते अस्वल खूपच गोड आहे
मला जाऊन हत लावावासा वाटला असता.पण नंतर त्याने मारले असते Happy

हो. हे वाचलं. फारच हार्श. मेल्यावर कोणाला धन्यवाद म्हणायचे राहिले असं वाचतो. इथे जिवंतपणी ग्रजेस सांगायचे राहिले.

सँडी मध्ये तुमच्या जर्सी वरच्या रिअलेटरची साईन पार पाँड पार करुन पाच वर्षांनी फ्रांसच्या किनार्‍याला लागली, ती कोणाला तरी सापडली आणि त्याने नंबर शोधून तिला फोन केला. ती रिअलेटर फ्रांसला जाउन ती साईन आणणारे आता. आणि मग ती साईन सॅंडी म्युझियम करणारेत तिकडे ठेवणारेत.
https://www.nytimes.com/2018/05/31/nyregion/sign-hurricane-sandy-new-jer...
सही वाटलं हे ऐकून! Happy

आता तिला दुसरी मुलगी झाली आहे फ्रेया. तिच्या वेळी १००० वेळा नाव चेक करीन असं जोअ‍ॅन म्हणत्येय. बघुया फ्रिडा मोठी झाली की तिला कसं वाटतं ते! Proud
<<

तो ट्याटू वाला जे काय करायचं ते करेल यथावकाश. तुम्ही ऑलरेडी फ्रेयाचं फ्रिडा मात्र केलं आहे ऑल्रेडी.