दैवी कृपा

Submitted by मी संतोषी on 28 May, 2018 - 06:42

दैवी कृपा

क्षण होते कितीतरी सुखाचें
अजुनी आठवणीत ताजे तवाने
बिलोरी आरशासमोर असूनही
मी आरशात तुलाच पाहते

रुबाबदार डोळ्यांतील तुझे हसणे
मनामनात सतत तरळत राहते
ऐटीत फिरणे आणि ना कुणासमोर वाकणे
वैशिष्ट तुझ्या जीवनाचे मज भावले

तुझीच होऊन राहणे खूप खूप आवडले
शक्य नव्हते तरीही दैवीकृपेने साध्य झाले
एक एकदा मन विचारते स्वतःलाच
दुसऱ्या कुणी सुख दिले असता का ग एवढे?

नको तो विचार सुद्धा माझ्या मना
तू आणि तूच जीवांसाठी व्हावास पुन्हा पुन्हा
ईश्वर चरणी हीच एक प्रार्थना
देवो आरग्य आणि भरपूर आयुष्य तुला

२२/०५/२०१८
मी संतोषी

Group content visibility: 
Use group defaults