निमित्त

Submitted by मेघना मोकाशी on 25 May, 2018 - 12:30

क्षणाक्षणाला जाणवेल हार,
जरी जिंकलो वाटेल त्यांना …

पाहतील हसरे डोळे माझे,
तरी त्यात अश्रू दिसतील त्यांना …

चेहऱ्यावरती हसू दिसेल माझ्या पण,
मुखवट्याचा भास होईल त्यांना …

कर्तव्य सगळी पार पडली तरी,
दोषी सतत वाटेल त्यांना …

आता फक्त स्विकारायचे आहे ,
समोर येत जाईल जे,

नशिबातच नव्हते माझ्या खरं,
निमित्त मात्र झाले ते!

Group content visibility: 
Use group defaults