तुम्ही आंबा कसा खाता?

Submitted by अश्विनीमामी on 25 May, 2018 - 05:08

उन्हाळा म्हणजे आंबा. कैरीचा तक्कू, डाळ, लोणचे, पन्हे करून झाले. की महाशय झोकात एंट्री घेतात. लहान पणी सुट्टीत आई बाबा दुपारचे झोपले की चुपचाप उठून शिस्तीत दोन आंबे कापून ग्यालरीत सावलीत बसून लायब्ररी तून कायते किशोर, कुमा र, विचित्र विश्व जे काय आणले असेल ते वाचत तब्येतीत खायचे.

ह्याची आ ठवण आली कारण परवा घरात लेकीच्या मैत्रीणी च्या कृपेने खास रत्नागिरी हून देवग ड हापूस दोन डझन
घरी आले. केमीकल ने न पिकवलेले, घरच्या बागेतले आंबे अचानक आल्याने मला तर हर्ष वायूच झाला. आंब्याची नीट आढी लावून पहिले त्या सोनेरी केशरी वैभवाचा फोटू घेतला मग दोन शोधोन शिस्तीत कापायला घेतले.

उभा आंबा धरून दोन व्हर्टि़ कल कट घ्यायचे. मग साइडचे दोन कट. दोन मोठी अर्धुके असतात त्यांचे उभे दोन काप केले. चार मेजर फोडी हातात येतात. प्लस बारक्या दोन . आता कोय. हिच्या वर व खालच्या बाजूला पन साइजेबल खाण्याचा मॅटर असतो. तो वाया जाउ द्यायचा नाही. कोय मात्र चोखूनच खावी लागते. ( तंदुरी चिकन प्रिन्सिपल! वाया जाउ द्यायचे नाही!!!)

मग चार मोठ्या फोडी सावकाश, आत्मा तृप्त होईपरेन्त खायच्या. मग ब्रेक घेउन साई डच्या दोन खाउन टाकायच्या.
मग हात तोंड व्यवस्थित धुवून पाच मिनिटे शांत बसायचे. हा फळांचा राजा कधी कधी केशरी खुणा कपड्यांवरही
ठेवून जातो.

दुसरा प्रकार, थेट आमरस. चिमुट भर मीठ, मिरेपूड, दूध घालून फ्रिज मध्ये ठेवायचा. मग हात पाय धुवून खायचा.
पुरी बरोबर किंवा नुसताच. वासाला हापूस घ्यायचा व व्हॉल्युम साठी पायरी घालायचा.

तिसरा प्रकार : पहिल्या पद्धतीने आंबे कापून चौकोनी नीट तुकडे करून काचेच्या बोल मध्ये फ्रिज मध्ये ठेवायचे.
मग फ्रूट फोर्क किंवा साध्याच फोर्कने ऐटीत खायचे. ही जरा साहेबी ऐट. एक एक तुकडा जिभेवर विरघळ वत खाता येते व हात तोंड रंगत नाही.

चौथा प्रकार, : ह्याच तुकड्यांत आणिक फ्रेश क्रीम व साखर फेटून किंवा व्हॅनिला आइसक्रीम एक स्कूप घालून.

पाचवा प्रकारः मँगो मिल्क शेक. किंवा मॅन्गो बनाना मिल्क शेक.

अजून एक चोर प्रकार म्हणजे सुरी हपिसात ठेवायची. लंच करून यायचे. मग हळूच डेस्कात ठेवलेली सुरी काढायची. टिफिनच्या पिशवीतला आंबा काढायचा. पहिल्या पद्धतीने कापून गट्टं. !!!! मग कुठे केशरी रंगलागलेला नाही ना ते चेक करून साळसूद पणे कामात दंग व्हायचे.

सहावा प्रकारः हा लहान पणीच केलेला. आज परत करून बघेनः आंबा नीट हातात घेउन त्याचे सर्व साल काढून टाकायचे. काही ठिकानी तो कोरडा सुद्ध्हा दिसतो, चंद्रावर कसा एक सी ऑफ ट्रेंक्विलिटी आहे. तसा हा आंब्यातला सी ऑफ बेस्ट टेस्ट. काही ठिकाणी ओलसर. घरी कोणी नसेल तर तसाच उभे राहून खायचा. खाली ओट्यावर प्लेट ठेवायची. आयत्यावे ळी बेल वाजली तरा आंबेराव नीट प्लेटीत ठेवता यायला हवे. कींवा बेल मारणार्‍या अरसिक आदमीला इग्नोअर करून आंबा खाणे ध्यान चालू ठेवावे. ऑल एल्स इज जस्ट सेकंडरी.

सातवा प्रकारः पहिल्या प्रका रातली दोन अर्धुके मोठी वाली असतील त्यात उभ्या आडव्या रेषा मारायच्या चाकू/ सुरीने हलक्या हाताने मग साल उलटे करून ते चौकोन स्वाहा करायचे. काय एलिगं ट दिसतो हापुस अश्यावेळी.

अजून आमच्या हैद्राबाद साइडला बैंगन पल्ली, मलगोबा वगैरे किलोच्या भावाने मिळतात. तिथ ल्या उन्हाळ्यात हे
कमी गोड गार आंबे बरे वाटतात.

अजून पहिला पाउस यायला दहा पंधरा दिवस आहेत तो परेन्त ही आंबा खायची ऐश करून घ्या. तुमची आंबा खायची पद्धत कोणती!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी सॉरी.
विषयांतर खूप झाले.

बॅक टू आंबा
आमच्या सासरी हापूस सोडून काही खात नाहीत. आमरसही खात नाहीत. फक्त आंबे कापून किंवा मिल्कशेक या स्वरुपात खातात.
आता निम्म्या पब्लिक ला ते खाणे मेडिकली बंद आहे.
मला गोड लागणारा कोणताही आंबा आवडतो. त्यात कोणताही दुसरा वास न घालता (व्हॅनिला इसेन्स्,वेलची इ.इ.) कोणत्याही स्वरुपात खायला चालतो. चोखून खाणे हात आणि कपड्यांना धोका पोहचवणारे वाटल्याने लहानपणापासून खाल्ले नाही. आंबा कापून चमच्याने, फोड हातात घेऊन रस हाताला न लागता किंवा साल काढून फोडी कोणी करुन दिल्या तर काट्याने खायला आवडते.

मी आंब्याचा मोअर आंबा करून खातो. चट्क मट्क. चपातीसोबत मग भाजी नसली तरी चालते. असल्यास तिखट झणझणीत उसळ आणि त्याविरुद्ध आंबटगोड मोरंबा. (आंबट किंचित, गोड जास्त)

या गुर्जीनी सांगितलंय आंबा कोणता आणि कसा खायचा:

https://www.youtube.com/embed/0oLh3Jtw1yU?start=53&end=125

"भगवंताची कृपा मला एक कोय मिळाली. मी त्या कोईचं रोपटं करून झाड वाढवलं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे ती सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन आठ-आठ दहा-दहा बारा-बारा वर्षे झाली तरीसुद्धा पोर होत नाही अशा स्त्री-पुरुषांनी पती पत्नींनी ती फळं खाल्ली तर निश्चित पोर होणार. असं झाड आहे माझ्याकडे. मी आज तुम्हाला सोडलं तर कुणाला माझ्या आयुष्यभरात मी कुणाला सांगितलं नाही. ते आंबे तसे आहेत. मी आतापर्यंत १८० पतीपत्नीना जोडप्यांना खायला दिले. तेची पद्धत शिकवली. पथ्य सांगितलं. आणि दीडशेपेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल मुलगाच होतो. अपत्य नसेल अपत्य होतेच. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुसंकत्वावरचा आणि वंध्यत्वावरचा ताकत देणारा तो आंबा आहे."

शंभर नंबरी धागा .. अभिनंदन .. मी आंबा प्रेमाने संपूर्ण रस घासून पुसून खाते Lol चेहऱ्याला आंब्याचा रंग आला पाहिजे आणि नंतर कितीतरी वेळ हात त्या आम्रसुगंधाने दरवळले पाहिजेत असं वाटतं Happy

चांगला हापुस खाउन बरीच वर्ष झाली. हल्ली अल्तुफो का काय नावाचे आंबे खातो. ते पण छान असतात.
सोलाण्याने साल काढायची आणि मग हापुसच्या करतो तशा फोडी करुन आणखी बारिक क्युब कापायचे. मस्त लागतात. चांगला तयार झाला की अगदी रसाळ असतो. वेळ असेल आणि उत्साह असेल तर रस काढायचा. पण याची साल सलग रहात नाही आणि तुटते. मग हापुस सारखा पिळून पिळून शेवटच्या थेंबा पर्यंत रस काढता येत नाही. रबरबाट होतो अगदी मग!
हापुसच्या फोडी करुन खाण्यापेक्षा रस जास्त आवडतो. आजी रसाच्या वाटीत नंतर भात घालून रस भात खात असे. तेव्हा तिला हसायचो.. आता मलाही तो आवडतो कधीमधी. कोकणात घराच्या शेजारी रायवळचं झाड होतं. मे महिन्याच्या सुट्टीत गेलो की दुपारी ओसरीवर पत्ते खेळत बसायचं. काही तरी कौलावर धाडकन कोसळलं की माजघरातुन आत्याबाई माझं कौल फोडलंन मेल्यानं करुन बाहेर धावायची आणि आम्ही तो आंबा शोधायला! वाडीत एक हापुसचं आणि एक कलमी होतं... फार जास्त फळ येत नसे, पण आजोबा असताना ते कोणाला तरी बोलावून आंबे उतरवुन माजघरात आढ्या करुन ठेवत, आणि मग जो कोणी मुंबई वरुन येई त्याच्या बरोबर आंबे जायचे.
नंतर काही वर्ष्यांनी कोकणातलं घर विकलं तेव्हा त्या उन्हाळ्यात सगळे गेलेलो.. तर कधी न्हवे ते भरघोस आंबे आलेले. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या आजही आठवतात.
आंब्याची सांदणं, रस घालून केलेल्या नारळाच्या वड्या, रस आटवलेला मोरांबा, साठं अशा स्वरुपात भारतात गेलो की मातोश्री हमखास खायला घालतात. घरी आईने लोणचं घातलं की ते लहान लहान बरण्यात भरुन फ्रीज मध्ये ठेवते. त्या बरण्यांना कोणी हात नाही लावायचा. मग एक्दम गणपतीला नवी बरणी फोडायची. त्याची चव आणि तो लाल चुटुक खार! अहाहा!!! आंबा त्याच्या चवी बरोबर आठवणीच जास्त घेउन येतो. Happy

परवा इ.ग्रो मध्ये कैरी दिसली ती आणली तर आतुन जरा पिकायला लागलेली. काय करावं असा आईला फोन केला तर मेथांब्याची कृती कानी पडली. असला भन्नाट चवीचा मेथांबा झालाय! दोन दिवसात पोळीशी/ ब्रेडशी येता जाता नुसता खाउन संपवला. इतके दिवस का नाही केला असं झालं. आणखी एका कैरीचं लोणचं केलं... कैरी चांगली कडक न्हवती पण बाजारची ती आंबट आणि टिपिकल एक्च एक चवीची लोणची खाउन पकलेल्या जिवाला ते ताजं लोणचं थंडावा देउन गेलं. Happy

अमितव, छान लिहिलंय.
पण <<<<काही वर्ष्यांनी कोकणातलं घर विकलं >>> इथे ठेचकळल्यासारखं झाल. पुन्हा वाचलं मी हे वाक्य. Sad

अमितव छान लिहिलंय. माझी आजीपण आंबे भात जेवायची रोज, माहेरी कोकणात रायवळ जास्त त्यामुळे ते आंबे असायचे.

नंतर काही वर्ष्यांनी कोकणातलं घर विकलं तेव्हा त्या उन्हाळ्यात सगळे गेलेलो.. तर कधी न्हवे ते भरघोस आंबे आलेले. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या आजही आठवतात. >>> टचिंग.

तर कधी न्हवे ते भरघोस आंबे आलेले. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या आजही आठवतात. >>>>>> माझे वडिल गेले त्यावेळी असाच आंबा भरभरून आला होता.त्याची आठवण आली.

खूप छान लिहिलं आहेस अमित.
पहिला पाऊस पडला की आंब्याचे आणि कैरीचे साठवणीचे पदार्थ करायचे. वर्षभराची लोणची तर मी करत नाही, पण साखरांबे करते, हापूसचा साखरांबा तर फ्रीजमध्ये हाय सेक्युरिटीत असतो Lol श्रावणात कैरीचा किसाचा, दिवाळीत कैरीचा फोडींचा आणि जवळपास विस्मृतीत गेल्यावर वर्ष संपून जानेवारी, फेब्रुवारीत हापूसचा साखरांबा अचानक पानात पडल्यावर घरच्यांच्या चेह-यावर जो आनंद दिसतो ना... दॅट्स प्राइसलेस! Happy पुढे लगेच नवीन आंब्यांच्या मोसमाची चाहूल लागतेच.

नवीन Submitted by अदिति on 14 June, 2018
<<
त्या रुतुजा दिवेकर नामक मंद व्यक्तीमुळे असंख्य डायबेटीक्स आम्बे खाऊन आजार वाढवून घेतात, हे इथे नमूद करू इच्छितो.
सेलेब्रिटीची "डायेट कन्सलटण्ट" याव्यतिरिक्त यांचे काही इतर क्वालिफिकेशन्स नाहीत, असे ऐकून आहे.

आरारा, अगदी अगदी.
भारतीय पदार्थाना ग्लॅमर देऊन परदेशी पदार्थाचे पैसे खर्च करणारे स्तोम कमी केले हा मात्र ऋजुता चा मोठेपणा मानायलाच हवा

मी डोन्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट वाचून भारावले आणि वुमन अँड वेट लॉस तमाशा वाचून अनेक कॉन्ट्रॅडिक्शन मिळाल्याने जमिनीवर आले.
सध्या मुद्दा टू मुद्दा ती दाखवता येणार नाहीत पण एकदा दोन्ही पुस्तके समोर ठेवून हा अभ्यास करण्याची इच्छा आहे.

ऋजुता च्या पहिल्या पुस्तकातील काही मुद्दे पटतात आणि लॉजिकल आहेत.काही आपले मेकॅनिकल इंजिनीयर वैद्य आहेत तसे आहेत "डायबिटीस वाल्यानी साखरभात खायला काहीच हरकत नाही" सारखे.

अमितव छान लिहिलंय. मला रसारोबर आणि कुरडया, तांदळाचे पापड खाते. विदर्भात सरगुंडे, शेवया उकडलेल्या खातात.
नंतर काही वर्ष्यांनी कोकणातलं घर विकलं तेव्हा त्या उन्हाळ्यात सगळे गेलेलो.. तर कधी न्हवे ते भरघोस आंबे आलेले. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या आजही आठवतात. >>> टचिंग.
आज आंब्याच लोणच केलं. आंबे फोडणी नव्हती म्हणून चिरून केलं. मग तासून त्याचं गोड लोणच ! कोयी आमटीत घालीन.दोन कैर्या पिवळ्या निघाल्या त्याचा साखरांबा केला. आंबावडी, आंबाकेक, ममोच्या रेसिपीने सांदण करून झालेच होते आता लिहीता लिहीता आठवलं आंब्याचा शिरा राहिला न करायचा ... गोडी आंबा अपूर्णतेची ..... इति आंबा पुराणम् ह्या वर्षाकरिता सुफळ संपूर्ण

मस्त लिहीले आहेस अमित! << +१
आ रा रा, बर झाल तुम्ही कॉमेंट केली.
वजन कमी जास्त करण्यापर्यंत ठिक आहे पण लोकांच्या जिवाशी कशी खेळुशकते ही?

अमा तै , आज पाहिल्यान्दाच ललितलेखन मायबोलीवर तुमचे लेखन वाचायला एन्ट्री घेतलीय .. काय सुंदर लिवलंय .. मस्तच .. सुदैवाने काही आंबे अजूनही बाजारात शिल्लक आहेत .. मी आंबा हा असा विचार करून खाल्लाच नाही .. माझ्या लेखी , मी माजुरडा राजा आणि हे आंबे सारे गुलाम माझे .. मी त्यांना ओरबाडून ओरबाडून ठार मारलंय .. पॉट आत्मा सर्व काही भरून घेतलंय. प्रत्येक ऋतूत , हे नवीन जन्माला येणारे आंबे जणू काही माझ्याचसाठी किंबहुना माझ्याच हातून मारण्यासाठी जन्माला आलेयत कि काय असं वाटत ..असो हा लेख मस्त झालाय आता पुढचा वाचून काढेन आणि प्रतिसादेन

हा धागा तर इतका फेमस आहे की अक्षय कुमारने मोदीजींना प्रश्न विचारण्यामागे देखील ह्याच धाग्याची प्रेरणा होती.

Market madhun Shevatacha Nilam Aamba disenasa hoiparyant khayacha.. Roj ratri jeun zhalyavar...Ratris Khel chale baghta baghta .. phakt deth kadhaycha .. hatat ek plate sali takayala ..Aamba Khaycha.... mast brahmanadi tali

Pages