थांब ना, माझ्या सवे

Submitted by प्रशांत कदम on 20 May, 2018 - 02:34

थांब ना, माझ्या सवे

थांब ना, माझ्या सवे
साथ दे ना, तूझी सखे
हात दे, हातात या
बिलगू दे, तूला असे

का कसे, कुणास ठाऊक
तुलाच का, मी शोधतो
निरंतर का असा,
तूझीच वाट पाहतो

असा भाळलो, मी कसा ?
कळेना मी कशावरी
तुझ्या मोहक रूपावरी,
की प्रफुल्लीत हास्यावरी

मोहीत झालो, मी कसा ?
कळेना मी कशावरी
लांबसडक केसांवरी,
की दिल खेचक चाली वरी

प्रेमात अडकलो, मी कसा ?
कळेना मी कशावरी
गोड मधुर वाणी वरी,
की अल्लडशा वागण्यावरी

पुरतां अडकलो, मी असा
तूझ्यात मी, तूझ्यात मी
मन जडले, हे माझे असे
तूझ्या वरी, तूझ्या वरी

थांब ना, माझ्या सवे
साथ दे ना, तूझी सखे
हात दे, हातात या
बिलगू दे, तूला असे

प्रशांत कदम
०८-०५-२०१८
९५९४५७२५५५.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users