केस गळणे

Submitted by arjun1988 on 15 May, 2018 - 00:44

माझे केस दोन महिन्यापुर्वीपर्यंत चांगलेच दाट होते. अचानक गळायला लागले. आता जवळजवळ ८०% केस गळुन टक्कल दिसु लागले आहे. केस अचानक गळण्यामागे काय कारण असु शकेल ? कोणी उपाय सुचवाल का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्जुन,
मागील 3-4 महिन्यात तुला काही आजार/ताप झाला होता का?
माझे केस मला dengue झाल्यावर 3 महिन्यांंनी गळायला सुरुवात झाली होती.
Doctor ने सांगीतले कि हे सामान्य आहे आणि केस परत येतात.
Please consult a dermatologist..

हेल्मेट
स्ट्रेस
चहा कॉफी चे प्रमाण वाढणे
व्हिटामिन कमी होणे
डेअरी (दही/ताक) खाणे कमी होणे
आयर्न कमी होणे
घरी हार्ड पाणी
शांपू बदल

हेल्मेट - नाही.
स्ट्रेस - काही बदल नाही.
चहा कॉफी चे प्रमाण वाढणे- - काही बदल नाही.
व्हिटामिन कमी होणे -शक्य आहे
डेअरी (दही/ताक) खाणे कमी होणे- - काही बदल नाही.
आयर्न कमी होणे-शक्य आहे
घरी हार्ड पाणी- - काही बदल नाही.
शांपू बदल- - काही बदल नाही.

विटामिन b12 चा गोळ्या घ्या .tango सीरम केस धुतल्या वर एक दोन थेंब वापरा .हेअर gain सल्यूशन दर्र्मा roller वापरा .रिज़ल्ट लवकर मिळेल

ओके मी_अनु.
स्वानुभवाने असेल, हेल्मेट आणि केस गळती याबद्दल कधीच विचार केला नव्हता.

Male pattern baldness आहे की diffuse thinning आहे ते आधी चेक करा. Pattern baldness मध्ये कपाळाच्या दोन्ही बाजूने व डोक्याच्या वरचे केस गळतात temples and crown thinning. Trichologist म्हणजेच केसतज्ञांचा सल्ला घ्यावा.