आभास- भाग २

Submitted by आदीसिद्धी on 11 May, 2018 - 08:00

आभास भाग :-1
https://www.maayboli.com/node/66101
●●●●●●●●●●●●●●
अधराला स्वतःचाच राग आलेला. त्यात परत सगळे फ्रेंडस मूव्हीला गेलेले. तीला आत्याकडे जावं लागणार असल्यामुळे प्लॅनवर पाणी सोडावं लागलेलं. फार चिडचिड होत होती तिची. शेवटी तीने कॅफेत जायचं ठरवलं. गाडी पार्क करून ती आत आली तर तिची फेव्हरेट जागा आज गर्दी असूनही रिकामी होती. ती पटकन तिथे जाऊन बसली.आज पावसाळी वातावरण होतं. बाहेर मस्त गार हवा सुटलेली. खिडकीतून समुद्राचा खारा वारा तिच्या नाकात शिरला. तितक्यात तिने ऑर्डर केलेली काॅफीसुद्धा आली. तिने पटकन गरम गरम काॅफीचा वास घेतला. काॅफीच्या सुगंधामुळे तिचं मनही फ्रेश झालं. नेहमीचीच सवय होती तिची. सकाळपासनं बेक्कार गेलेल्या दिवसात जरा काहितरी चांगलं झालेलं.तिने पटकन मोबाईल ऑन करून वेळ बघीतली. अजून दोन तास होते जायला. तिने सहज म्हणून फेसबुक ऑन केलं. लाॅग इन केल्यावर तिला ईशानचा मेसेज दिसला.
"गुड माॅर्निंगचा" मेसेज होता.
तिने त्याला रिप्लाय केला. तो पण ऑनलाईन आला...
"काय गं आज दुपारी ऑनलाईन कशी?" त्याने विचारलं..
"हम्म..बंक मारला आज.." ती म्हणाली..
"अगं पण सबमिशन होतं ना आज..कालच तर म्हणालेलीस.." त्याने काळजीने विचारलं..

अधरा -" हो रे बाबा गेलेले! फाईल देऊन परत आले..आता तु डोकं नको खाऊ माझं"

ईशान - "अरे वा! टेस्टी लागेल...डिशला काय नाव देऊया बरं!!!"

अधरा - " इशान स्टाॅप ईट..एकतर आधीच तुझ्यामुळे दिवस खराब गेलाय.."

ईशान - क्यु , ऐसा क्या गुनाह किया हमने? बताओ तो सही!

अधरा - हम्म ..ऐक आता....असं म्हणत तीने सकाळपासनंची सगळी स्टोरी सांगितली...

ईशानला हसायला आलं ...त्याने डझनभर फिदीफिदी हसणार्या स्मायली पाठवल्या...या स्मायलींचा पण एक फायदा असतो. समोरच्याला न बघताही त्याच्या भावना कळतात....

अधरा - हम्म; तु पण हसून घे पोटभर माझ्या मूर्खपणावर....नाहीतरी सगळेच जण छळता मला...फक्त एकटा अक्षुच समजून घेतो मला....

ईशान - ये इतना स्पेशल इंसान कौन है भई ??? काल रात्री काही म्हणाली नाहीस तसं...

अधरा - तुला वाटतय तसं काही नाहीये..तो एक छोटा मुलगा आहे....हल्लीच वर्षभरापूर्वी दिसला...दोन तीन दिवस सतत आमच्या बाल्कनीतनं दिसायचा...खाली रस्त्यावर उभा असायचा....नेहमी एकटक बघायचा वरती बाल्कनीत...एके दिवशी खूप पाऊस पडत होता....तरीही हा वेडा तसाच भिजत उभा होता...शेवटी मीच त्याला खाली जाऊन वर घरी घेऊन आले....पाऊस गेल्यावर निघून गेला...छान गप्पा मारल्या आम्ही.. तेव्हा रस्त्यावरनं हात करायचा...नंतरही बर्याचदा दिसला..एकदोनदा घरी पण येऊन गेलाय... आता आईबाबा आल्यापासनं दिसला नाहीये ...बघू कधी भेटतोय ते...क्युट आहे रे पण...

ईशान - हम्म..मस्तच..चल बाय आता जातो मी...बाॅस ओरडतील नाहीतर....

अधरा - काहीही हं...तुझे बाबाच तर बाॅस आहेत ना..ते कशाला ओरडतील...

ईशान - ते इथे बाॅसच असतात...महत्त्वाची मिटींग आहे ...चल निघतो मी ...बाय...रात्री बोलूया...

अधरा - ओके बाय...

तीने पटकन काॅफी संपवली. बिल देऊन ती बाहेर पडली. सकाळपासूनचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला होता. तीने गाडी काढली आणि आत्याकडे जायला निघाली. तिथे सगळी मदत करून ती आणि तीची आई रात्री उशीरा घरी आल्या.अकरा वाजले होते. ती पटकन कपडे बदलून फ्रेश झाली. पीसी ऑन करून फेसबुकवर लाॅग ईन केलं. ते होईपर्यंत ती रूमच्या बाहेर आली. तिने आजूबाजूला बघीतलं . आई किचनमध्ये नव्हती .त्याअर्थी झोपायला गेलेली. बाबा आज गावी गेलेले. ती हळूच मांजरीच्या पावलांनी किचनमध्ये गेली. भांड्यांचा आवाज होऊ न देता तिने काॅफी बनवली. ती घेऊन ती रूममध्ये आली. तोपर्यंत ईशानचा मेसेज आलेला.
ईशान - हाय ! कुठे होतीस इतका वेळ..वाट बघत होतो...

अधरा - काॅफी बनवायला गेलेले....
काॅफीचे सिप घेत अधरा बोलू लागली..

ईशान - मग; आता कसा आहे मूड बाईसाहेबांचा...नाकाचा शेंडा लाल असतो सतत Wink

अधरा - चांगला आहे बरं का...आता पुढचा आठवडाभर आपल्या गप्पा बंद...लग्नाला जाणार आहोत आम्ही...आता डायरेक्ट पुढच्या सोमवारी भेटू...

ईशान - हम्म...जाम बोअर होणार मला...पण आल्यावर लगेच मेसेज कर बरं का....मी पण नसणारे दोन तीन दिवस...

अधरा - का रे ? कुठे चाललास..

ईशान - मित्राचं लग्न आहे ...तिथेच जाणारे...

अधरा - हम्म ..चल बाय ..आज लवकर झोप येतेय...दमायला झालय..गुड नाईट...

ईशान - गुड नाईट...बाय...हॅपी जर्नी...

अधराने पीसी ऑफ केला आणि झोपायला गेली. दुसर्या दिवशी घरी सगळा गोंधळच होता. सगळ्या सामानाचं पॅकींग सुरू होतं..अधरा सकाळी लवकर काॅलेजला जाऊन सुट्टीसाठी अॅप्लीकेशन देऊन आली....तीनेही आपलं सगळं सामान आठवणीने घेतलं. रात्री एक वाजता तिने सहज लाॅग इन करून बघीतलं...ईशान ऑनलाईन होता...तीने पटकन त्याला ' हाय' केलं...

ईशान - काय ग? आजपासून आठवडाभर नव्हतीस ना ...मग आता कशी अवतरलीस Wink

अधरा - का रे नको होतं का यायला? चुकलंच माझं उगाच मेसेज केला... Sad

ईशान - अगं हो हो; किती लगेच चिडतेस ...मानलं हं तुला... ..बाय द वे झाली का तयारी जायची...तुम्हा मुलींच बरं असतं...काय नटता सगळ्याजणी...हाॅलमध्ये फुलपाखरासारख्या बागडत असता..तु पण चांगली तयार होशील...

अधरा - हम्म ते आहेच...पण मला जास्त मेक अप वगैरे नाही आवडत....आणि मी सजायला माझं लग्न थोडीच आहे... Wink

ईशान - हम्म..ऐक; एक महत्त्वाचा मेल करायचाय..काम पण आहे जरा...बाय...गुडनाईट...नीट काळजी घे...हॅपी जर्नी...सोमवारी भेटू...

अधरा - ओके..कर तु काम...दीड वाजलाय...उद्या लवकर उठून निघायचय..बाय...तुला पण हॅपी जर्नी...

तीने लाॅग आऊट करून पीसी बंद केला आणि त्याचा विचार करता करता तीला झोप लागली...सकाळी लवकर उठून ते निघाले...घरातून निघताना तीला सतत काहीतरी राहिल्यासारखं वाटत होतं..मनात कुठेतरी कसलीतरी कमतरता जाणवत होती...पण काय ते कळत नव्हतं...शेवटी एकदाचे ते गावी पोहोचले...

दोन दिवसांनी लग्नाचा दिवस उजाडला..अधरा अतिशय सुंदर दिसत होती. तीने कमीच मेक अप केलेला...मुळातच सुंदर असल्यामुळे त्यातही ती अतिशय खुलून दिसत होती...जांभळ्या रंगाची साडी तिच्या गोर्या रंगावर अजूनच उठून दिसत होती...एकदाचे ते कार्यालयात पोहोचले. तिथे अधरा एका खुर्चीवर आरामात बसली. तीचं कशातच मन लागत नव्हतं. एकटी बसली की सारखी त्याची आठवण यायची.. इथे ईशानचीही काही वेगळी अवस्था नव्हती..त्यालाही तीच्याशी बोलायची सवय झाली होती...रात्री च्या वेळी तो रोज लाॅग इन करून बघायचा....कदाचीत तिचा एकतरी मेसेज येईल....पण निराशा व्हायची...कारण लास्ट सीन दोन दिवसापूर्वीचं असायचं...तो ही तिची आतुरतेने वाट बघत होता...

अधरा आरामात बसली असताना तिला हाॅलच्या दारात लोकांची गडबड दिसून आली...इतकं स्पेशल कोण आलय ते बघायला ती उठून पुढे आली...तो दुसरा तिसरा कोणी नसून ईशान होता....तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता..उगाच आपण त्याचाच विचार करतोय म्हणून दिसत असेल असं तिला वाटलं..तिने पटकन हाताला चिमटा काढून बघीतला..पण खरंच ईशान आलेला.. तिला मनापासून आनंद झाला...ईशानचा मित्र दुसरातिसरा कोणी नसून तिचाच आतेभाऊ होता...ईशान त्याला भेटून आला..नंतर विधी सुरू झाल्यावर तो ही एका खुर्चीवर जाऊन बसला...अधरा त्याला ओळखत होती..पण तो तिला ओळखत नव्हता ...कारण तिने फेसबुकच्या प्रोफाईलला सेफ्टी म्हणून तिचा फोटो लावला नव्हता...नेहमी ऑनलाईन ते भरपूर गप्पा मारायचे.. मजामस्करी करायचे...पण आता त्याच्याशी प्रत्यक्ष जाऊन बोलायची तिची हिंमत होत नव्हती...शेवटी तिचा हे प्रश्न आपोआप सुटला..तिचा भाऊ घरातल्या सगळ्यांशी त्याची ओळख करून देताना त्याने तिचीही ओळख करून दिली..दोन मिनीटं तो तिच्याकडे बघतच राहीला..त्याला आठवलं हीच ती त्याची अधरा...इतके दिवस तो जिला शोधत होता ती समोर उभी होती..त्याने पटकन तिला नजरेने बाजूला यायचा इशारा केला..इतरांशी पटकन बोलून तो ती जिथे बसलेली तिथे आला..दोघांनाही काय बोलावं ते सुचत नव्हतं..शेवटी ईशाननेच तिला "कशी आहेस " असं विचारून गप्पा मारायला सुरूवात केली..तासाभराने ते एकत्रच जेवायला गेले..नंतर संध्याकाळपर्यंत फोटो काढण्यात धमाल करण्यात वेळ गेला...इथे आल्यापासनं पहिल्यांदा अधराला इतकं फ्रेश वाटत होतं..ईशानच्या येण्याचा हा ईफेक्ट आहे हे तिनेही मनातल्या मनात मान्य केलं..एक विलक्षण तरतरी तिच्या चेहेर्यावर आलेली.. त्यामुळे अजून सुंदर भासत होती ती...रात्री उशीरा सगळे घरी जायला निघाले..दोघांचाही तिथून पाय निघत नव्हता..पण कसंबसं एकमेकांचा निरोप घेऊन ते निघाले. दोघांनी मोबाईलनंबर एक्स्चेंज केले..फायनली एकदाचे ते घरी पोहोचले..अधराने रूममध्ये जाऊन पटकन आवरलं..आणि मोबाईल घेऊन ती गच्चीत जाऊन बसली..खाली थांबली असती तर सगळ्यानी कामाला लावलं असतं..आज गच्चीतनं ती रात्रीचं जग अनुभवत होती..रात्र इतकी सुंदर मनमोहक असते हे आज तिला नव्याने जाणवत होतं.. समोर अथांग पसरलेला समुद्र ; आकाशात पसरलेल्या लाखो चांदण्या ती चार वर्षांनी बघत होती..आता इथे अक्षु असायला हवा होता..लहान आहे तो..त्यालाही मजा आली असती...लग्नात धमाल केली असती त्याने..तितक्यात मोबाईलची मेसेजची टोन वाजली..ईशानचा मेसेज आला..आता तिच्या डोक्यातल्या अक्षुच्या विचारांनी एक्झिट घेतली आणि ईशानच्या विचारांनी एन्ट्री केली..बराच वेळ दोघंही आजच्या गमतीजमती आठवत होते..तितक्यात त्याने तिच्याकडे तिच्या लाडक्या अक्षुची विचारपूस केली..आई बाबा आल्यापासनं तो दिसलाच नाही असं तिने सांगितलं..उद्या संध्याकाळी समुद्रावर भेटायचं त्यांनी ठरवलं..
दुसर्या दिवशी संध्याकाळी अधराने अख्खी बॅग उसकून सगळे ड्रेस स्वतःला लावून बघीतले.. शेवटी पटकन एक आकाशी टाॅप निवडला . नंतर केसांना एका साईडला क्लीप लावून मोकळे सोडले. झटपट तयारी करून ती समुद्रावर पोहोचली. थोडावेळ वाट बघत समुद्राकडे एकटक बघत बसली होती. तितक्यात ईशान हळूच शेजारी येऊन बसला. तिला कळलंही नाही. त्याने हसतच तिच्या डोळ्यासमोर टीचक्या वाजवल्या..तेव्हा कुठे ती भानावर आली.

ईशान तिच्याचकडे एकटक बघत होता. बोलताना अधरालाही ते जाणवत होतं. समुद्रावरनं वाहणारा बेभान वारा तिच्या केसांशी लपंडाव खेळत होता..तिच्या कपाळावर रूळणारी ती कुरळ्या केसांची बट त्याच्या हृदयाचा ठाव घेत होती.. आपलं बोलणं पटवून देताना तीच्या पटकन डोळे मिचकावून बघण्याच्या स्टाईलवर तर तो फिदा झालेला. अधराही ईशानच्या त्या मिलीयन डाॅलर स्माईलची फॅन होती. कुठलीही गोष्ट मनापासून आवडली की आपसूकच त्याच्या चेहेर्यावर तसं हास्य उमटायचं...संध्याकाळी उशीरा ते जायला निघले....गाडीत बसल्यावर अधराचा चेहेरा उतरलेला..तिने विचारलं

अधरा - उद्या निघणार ना..
ईशान - हम्म ..

अधरा - नको ना जाऊस..थांब ना दोन दिवस..

ईशान - थांबलो असतो गं पण महत्त्वाची डील आहे..जावं लागणार गं..पण बघ ना आपण ध्यानी मनी नसताना कसे भेटलो..

अधरा - देवानेच आपली भेट घडवून आणली असेल...

ईशान - देव वगैरे वर माझा विश्वास नाही गं..पण नशीबात नक्की होतं आपल्या...तुला मी तिथनं कोपर्यातनं एकदोनदा बघीतलं ना तेव्हा असं एक वेगळंच फिलींग येत होतं मनात..कोणीतरी जवळचं भेटल्यासारखं..पण मी दुर्लक्ष करत होतो.. जेव्हा ओळख पटली ना तेव्हा मला मनापासनं खूप आनंद झाला..आयुष्यातल्या बेस्ट मोमेंट्स पैकी एक आहे ती...
ईशानने गाडी तिच्या घरासमोर गाडी थांबवली..
ईशान - राणीसरकार..आला आपला महाल..उतरा आता..
अधरा - जशी आपली आज्ञा राजे साहेब...असं म्हणत ती उतरली...हसत हसत तीने जड अंतःकरणाने तिने त्याला निरोप दिला..

दुसर्या दिवशी ईशानही त्याच्या घरी गेला. दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी तो मोकळाच होता..तो लवकर घरी आला आणि सरळ आपल्या रूममध्ये येऊन फ्रेश झाला..आईशी खाली जाऊन जरा वेळ बोलला..नंतर चहा घेऊन वरती येऊन त्याने लॅपटाॅप उघडला..कालचे मोबाईलमधले सगळे फोटो तो पुन्हा एकदा बघत होता..त्यात अधराचेच फोटो जास्त होते.. तिला माहित नसताना लांबून घेतलेला एक फोटो तर अप्रतिम होता. ईशानने तो आपल्या मित्राकडून फ्रेम करून घ्यायचं ठरवलं..तिला बघून त्याच्या कोमेजलेल्या मनाला तरतरी आली..
दोन दिवसांनी अधरा एकटीच घरी आली..आई बाबा तिथनंच त्यांच्या घरी गेले होते..आल्यावर तीने फ्रेश होऊन सगळं सामान आवरलं..सात वाजता हातात गरम गरम काॅफीचा मग घेऊन ती बाल्कनीत थांबली..संध्याकाळचा गार वारा सुखद वाटत होता..तिला त्या वातावरणात काहीतरी सुचलं..ती पटकन घरात गेली आणि तीने पीसी ऑन करून लाॅग ईन केलं..ईशानला हाय करून तिने टाईप केलं...

{ भेटीचा क्षण जवळ आला तशी हुरहूर वाढत होती.उन्हाळ्यात पावसाची एक सर जितका आनंद देते तितका आनंद त्याच्या येण्याने झाला.डोंगरातल्या दरीसारख्या त्याच्या गालावरच्या खळ्यांनीच मला त्याच्या प्रेमात पाडल होत.त्याच्या निळ्या डोळ्यांच्या आरशातलं माझं प्रतिबिंब मलाच मोहीनी घालत होत....}
आयुष्यात पहिल्यांदा तिला काहीतरी सुचलं होतं..आता त्याच्या रिप्लायची ती वाट पाहत होती..ईशानलाही ते फार आवडलं..हळूहळू रोजच पुर्वीसारख्या त्यांच्या गप्पा होऊ लागल्या..ईशान अधराच्या प्रेमात तिला लग्नात पाहिल्यापासूनच वेडा झालेला..पण त्याला एक जाणवत होतं.. हल्ली अधराच्या बोलण्यात अक्षुचा नेहमीच उल्लेख असायचा..अक्षु अधराला रोज भेटायचा..ती त्याच्याशी बोलायची..त्याला खायला द्यायची..त्याचे सगळे लाड करायची..

क्रमशः
--आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पु भा प्र.
वाचतेय
येऊ द्या पुढचे भाग लेखिका बाई Lol Lol

Mastch.....
I think akshu ha Adhara cha Abhas aahe....
Wi8ng for next part....

जमलाय भाग.
पण कॉफी बनवुन पिउन लगेच झोपायला जाणं म्हणजे....

कॉफी बनवुन पिउन लगेच झोपायला जाणं म्हणजे....

Submitted by सस्मित on 12 May, 2018 - 11:54
सस्मित आयरिश कॉफी असेल ☺️

Submitted by च्रप्स on 13 May, 2018 - 01:

>>> याचा अर्थ सांगता का प्लीज...मला कळलं नाही काय चुकतय ते....