दुधीभोपळ्याची दूधात शिजवलेली भाजी

Submitted by साक्षी on 10 May, 2018 - 05:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मध्यम आकाराचा दुधीभोपळा - साल काढून चौकोनी फोडी करून
मिरी - ७-८ दाणे
तमालपत्र - १ पान
दालचिनी - १ इंच
लवंग - २-३
जिरे - १/४ चमचा
दूध - १/४ कप
तूप - फोडणीकरिता
मीठ, साखर - चवीनुसार (साखर वगळली तरी चालेल)

क्रमवार पाककृती: 

१) तूप जिर्‍याची नेहेमीसारखी फोडणी करावी. त्यात मसाल्याचे सगळे पदार्थ घालावेत.
२) त्यात दुधीभोपळ्याच्या फोडी घालाव्या. एक वाफ काढावी.
३) आता दूध घालावे. दुधात भाजी शिजू द्यावी. (अंदाजे ७ ते १० मिनिटे)
४) भाजी पूर्ण शिजली की मीठ, साखर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

कुकरला दुधी आधी थोडा शिजवून घेतला तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
खूप वर्षापूर्वी 'अन्नपूर्णा' मधे वाचली होती, ती आठवून आणि थोडं स्वतः चं डोकं चालवून
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला, त्यात त्यानी मारूतरावाच्या बेंबीत बोट घातलन त विंचू चावला... Biggrin
भाजी कृती म्हणूनच वाचायला ठीके Wink मी अज्जिब्ब्ब्ब्ब्आत करोन पाहाणार नाहीये. साला दुधी आणलाच बाजारातून त घरातले नाकार्डे टेंबलतात; त्यात तो दूध घालून शिजवला त माझी वेवस्था दाराबाहेर होईल.

मी अज्जिब्ब्ब्ब्ब्आत करोन पाहाणार नाहीये. >> मी पन. पचास साल गुजर गये सब्झी लाते लाते. घरके अंदर दुधी कभी आया नही.

माझ्या मैत्रिणीची आई करा यची.. कल्पना भयं कर वाटलेली, पणा भाजी फार भारी होती.
आजच करून बघणार. गरमग रम डोश्याबरोबर. (मऊ डोसे - सेट डोसा टाईप्स)

दुधी दुधातच शिजवायचाय तर मिरी, दाल्चिनी लवंगा घालण्यापेक्षा वेलची पुड, चारोळी, बदाम काप आणि साखर घालुन शिजवेन मी.
मस्त हलवा तयार, दुधी घरी फक्त हलवा करायचा असेल तरच आणते. तो ही सटीसमाशी.

दुधी मलाई म्हणावे का?
साखर घातली मसाल्या ऐवजी आणि वेलची की झाला दुधी हलवा!

आमच्या कँटीनला दुधी भोपळ्याच्या पांढरी दिसणारी भाजी हीच असावी बहुदा. मी खाल्ली आहे फारसी नाही आवडली!
मला आपली नेहमीची तेलावरची हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट वालीच आवडते दुधी भोपळ्याची भाजी!

मला आपली नेहमीची तेलावरची हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट वालीच आवडते दुधी भोपळ्याची भाजी! >> मलापण Lol
+ मुगडाळ पण घालते मी!

>>>दुधी दुधातच शिजवायचाय तर मिरी, दाल्चिनी लवंगा घालण्यापेक्षा वेलची पुड, चारोळी, बदाम काप आणि साखर घालुन शिजवेन मी.
मस्त हलवा तयार, दुधी घरी फक्त हलवा करायचा असेल तरच आणते. तो ही सटीसमाशी.<<<
+१११

आता तर बांदेकर किस्सा वाचल्याने दूधी बंदच केलाय.

बांदेकर किस्सा>>> काय आहे?>>>
आदेश्स भावजींना म्हणे कडू दुधी भोपळ्याची ( ते दुधी भोपळ्याचा रस वैगेरे प्रकार) बाधा झाली होती..

सुंदर लागेल ही भाजी Happy तसं मला दुधीच्या फोडींचंच टेक्श्चर आवडत नाही पण तरी करुन बघेन. साध्या फोडणीपेक्षा ह्याची चव नक्कीच जास्त आवडेल. टण्याच्या आईने लिहिलेली दूधवांगंही फार आवडली होती मला.

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
खडा मसाला आणि दूध यामुळे मस्त वेगळीच चव येते. मला साध्या भाजीपेक्षा आवडली. सर्वांनाच आवडेल असं नाही.

बांदेकर किस्सा>>> काय आहे?

~साक्षी

योक्या मेल्या एकदा खाऊन बघ. चांगली दुधीची भाजी खाल्ली नसशील आज्तगायत.
डाळ, लसुण मिरचीचा ठेचून गोळा घातली तर अप्रतिम होते दुधीची भाजी. (गुळ ही हवा अर्थात :फिदी:)

आज माझ्या अॉफिसमध्ये एकीने दुधीची भाजी आणली होती. ती खूप कडू लागत होती पण हे लक्षात येईपर्यंत ४ जणांनी थोडीशी भाजी खाल्ली (एक घास). त्या सर्वांना मळमळ, पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास झाला आहे. तेव्हा दुधीची भाजी करण्यापूर्वी एक तुकडा खाऊन बघा आणि जर कडू लागला तर तो तुकडा थुंकून टाका (केवळ एका घासाने सर्वांना त्रास झाला आहे).

त्या सर्वांना मळमळ, पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास झाला आहे. तेव्हा दुधीची भाजी करण्यापूर्वी एक तुकडा खाऊन बघा आणि जर कडू लागला तर तो तुकडा थुंकून टाका (केवळ एका घासाने सर्वांना त्रास झाला आहे).>>>>>>>>>>>> बापरे. डेंजरच आहे.

आतापर्यंत असे होते माहित नव्हते.
तेव्हा दुधीची भाजी करण्यापूर्वी एक तुकडा खाऊन बघा आणि जर कडू लागला तर तो तुकडा थुंकून टाका>>>+१११

नेटवर हे मिळाले.....
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3307184/

आज माझ्या अॉफिसमध्ये एकीने दुधीची भाजी आणली होती. ती खूप कडू लागत होती पण हे लक्षात येईपर्यंत ४ जणांनी थोडीशी भाजी खाल्ली (एक घास). त्या सर्वांना मळमळ, पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास झाला आहे. तेव्हा दुधीची भाजी करण्यापूर्वी एक तुकडा खाऊन बघा आणि जर कडू लागला तर तो तुकडा थुंकून टाका (केवळ एका घासाने सर्वांना त्रास झाला आहे).
नवीन Submitted by जिज्ञासा on 11 May, 2018 - 21:42 >>>>> ते आपले आदेश भावोजी, त्यानि दुधिचे ज्युस प्यायले आणि ते त्याच्या जिवावर बेतले. (२ yrs purvi ghadleli ghatna)
vegetable juices can be very poisonous, especially when they taste unusually bitter.
This is the lesson Marathi actor Aadesh Bandekar has learnt the hard way, after drinking a glass of juice from bottle gourd (lauki or dudhi).
Within minutes, he had severe stomach ache and started vomiting blood. Aadesh Bandekar was admitted to a ICU of Hiranandani Hospital where he was treated for a case of bottle gourd poisoning. He was also treated for blood vomiting.

मला वाटते छान लागेल. करून पहायला हवी एकदा.

डाळ, लसुण मिरचीचा ठेचून गोळा घातली तर अप्रतिम होते दुधीची भाजी. >>> अगदी अगदी. गरम फुलक्याबरोबर तर भारीच. (गुळ हवाच असतो मला बहुतेक भाज्यांमध्ये पण दुधीत नाही खाल्ला कधी)

दूधभोपळ्यासंबंधी

पुण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने *दुधी भोपळ्याच्या रसाने प्राण जाऊ शकतो का?* याविषयी
टीव्ही 9 मराठी वाहिनीने प्रश्न विचारला. काही वेळातच त्या वाहिनीवर माझे उत्तर प्रसारित होईल. त्यांना दिलेले उत्तर आपल्यासाठीही येथे सामायिक करत आहे.

घरी स्वयंपाक बनवताना काकडी किंवा दुधी भोपळा चिरताना एखादी चकती कापून तिची चव बघितली जाते. ती कडू असेल तर त्या भाजीचा आहारात शक्यतो वापर होत नाही. असे का? तर cucurbitaceae कुटुंबातील भाज्यांमध्ये असलेले cucurbitacin हे कडू चवीचे द्रव्य अत्यंत विषारी असते. याची मात्रा धोकादायक प्रमाणात असल्यास ते प्राणघातक ठरू शकते. या भाज्यांचा रस तयार केल्यावर एकाच वेळेस या द्रव्याची खूप अधिक मात्रा पोटात गेल्याने विषबाधा होते. उलटी, अतिसार, चक्कर येणे, उलटी वा शौचावाटे रक्त पडणे यांसारखी लक्षणे या विषबाधेत दिसून येतात.

*काय काळजी घ्याल?*

cucurbitacin हे विषारी द्रव्य काकडी, लाल भोपळा, दुधी भोपळा, पडवळ, तोंडली, झुकीनी इत्यादि भाज्यांत आढळते. या साऱ्याच भाज्या खाताना त्या कडू नसल्याची खात्री करून घ्यावी.

भाज्या या शक्यतो शिजवूनच खाव्यात. भाज्या व फळांचे रस काढून घेणे हेच मुळात आरोग्यासाठी योग्य नसल्याचे आयुर्वेद आणि आधुनिक आहारशास्त्रदेखील सांगते.

त्यातही रस पिणे झाल्यास बाहेर मिळणारे रस पिणे टाळावे.

घरी रस तयार करतानाही भाज्या व फळांची नैसर्गिक चव कायम असल्याची खात्री करून मगच सेवन करावे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे वैद्यकीय सल्ला न घेताच भाज्यांचे रस, स्मूदीज् यांचे सरसकट सेवन करू नये. किंबहुना; वैद्यकीय सल्ल्याव्यतिरिक्त अन्य कोणीही सांगितलेल्या ‘घरगुती उपायांचे’देखील अंधानुकरण करू नये.

*डॉ. परीक्षित स. शेवडे*
(आयुर्वेदज्ञ-लेखक-व्याख्याते)

।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।।
0251-2863835