आँधी....तेरे बिना जिंदगी से कोई ...

Submitted by राजेश्री on 10 May, 2018 - 01:20

तेरे बिना जिंदगी.....

तेरे बिना ज़िंदगी से कोई, शिकवा, तो नहीं,
शिकवा नहीं
शिकवा नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िंदगी भी लेकिन, ज़िंदगी, तो नहीं,
ज़िंदगी नहीं
ज़िंदगी नहीं, ज़िंदगी नहीं

आयुष्याच हे असच असत.ज्यावेळी हातात वेळ असते तेंव्हा आपल्या मनात काही वेगळंच सुरू असत.आपण ज्या ठिकाणी आहोत,ज्या परिस्थितीत आहोत ती जागा ,ती परिस्थिती आपल्याला आपलंच अस्तित्व विसरायला लावत आहे की काय अस वाटायला लागतं.मग आपण आपल्या आयुष्याची काही निर्णय एकतर्फी घेऊन पुढे निघून जातो.हे पुढे म्हणजे नेमकं कुठे? हा प्रश्न आपण आपल्या हातातून वेळ वाळूसारखी निसटून जाते तेंव्हा विचारत राहतो.
शाश्वत या शब्दाचे अर्थ आयुष्याच्या उत्तरार्धात उमजायला लागतात आणि आपण भूत आणि भविष्य च्या मधोमध निघणाऱ्या सीमारेषांवर उभा राहून विचार करतो.आपण तेंव्हा या तीनही काळात एकाच वेळी जगू पाहतो.मेंदूने कौल दिला म्हणून भविष्याच्या वाटा समोर गडद असतात.हे अस केलं तर मी जिंकेन,मी अमुक अमुक अस ध्येय साध्य करेन. आता जे जगतोय ती आपली तगमग आहे ,घुसमट आहे असं भूतकाळात मेंदूने तर आपल्याला बजावलेलं असत.आयुष्य अर्ध जगून होत आणि ज्या माणसाची साथ सोडून आपण पुढे निघून आलो तो एखाद्या वळणावर आपल्याला भेटतो.मग काय स्तब्धता येते आयुष्यात, मनात आणि मेंदूत सुद्धा.हे आपण जे काही जगलो आणि भूतकाळात जो निर्णय घेतला तो एखाद्या वेगळ्याच कैफ मध्ये असताना घेतला अस काहीस जाणवू लागत. असे काहीसे क्षण आठवत राहतात जिथे याच तर व्यक्तीने आपल्या आयुष्याची पडझड रोखलेली असते.उत्कट प्रेमाची व्याख्या शिकवलेली असते.मग आपण आपल्या आयुष्याचा लेखाजोखा आपल्या मनात मांडायला लागतो.आणि मग आपल्या लक्षात येत.की या आयुष्याकडून माझी तुझ्याशिवाय काहीच अपेक्षाही नव्हती आणि आताही नाही.पण तुझ्याविना जे आयुष्य मी जगले ते आयुष्य नव्हतंच ती फक्त सरलेली वेळ होती.

काश ऐसा हो तेरे कदमों से, चुन के मंज़िल चले
और कहीं दूर कहीं
तुम गर साथ हो, मंज़िलों की कमी तो नहीं
तेरे बिना ज़िंदगी से कोई, शिकवा, तो नहीं, शिकवा नहीं

आता ही सगळी उमज आली आहे तर अस नाही का होऊ शकणार तुझ्या पावलांच्या ठशांवरूनच मी निर्धोक चालत राहीन तुझ्या मागोमाग.आणि तूच सोबत आहेस तर मग ध्येयाची काळजी कशाला करायला हवी.ते दूरवर चालायचं ठरवलंच आहे तर चालता चालता निवडूया ना आपण...

जी में आता है, तेरे दामन में, सर छुपा के हम
रोते रहें, रोते रहें
तेरी भी आँखों में, आँसुओं की नमी तो नहीं
तेरे बिना ज़िंदगी से कोई, शिकवा, तो नहीं,
शिकवा नहीं
तेरे बिना ज़िंदगी भी लेकिन, ज़िंदगी, तो नहीं,
ज़िंदगी नहीं

आणि हे अस सगळं ठरवता ठरवता गेलेल्या आणि तुझ्याविना जगलेल्या क्षणांनी मला आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.हे आरोप तू लावतच नाही आहेस माझ्यावर तरीही माझ्या हृदयातील अगतिकता मला तुला सांगायचीय.मला हे आधी उमगलं असत तर किती बर झालं असत की तुझं असणं म्हणजेच माझं सर्वस्व होत आता या हरपलेल्या वेळेला मला तुझ्याच खांद्यावर डोकं ठेऊन आठवायचय.माझ्या डोळ्यात कित्येक वर्षे साचून राहिलेल्या अश्रूंना आता मोकळी वाट करून द्यायचीय.तू कुठे बदलला आहेस अगदी आहे तसाच आहेस माझ्या सगळ्या चुका पदरात घेऊन माझ्यासाठी हळवा होणारा...

तुम जो कह दो तो आजकी रात, चांद डूबेगा नहीं,
रात को रोक लो
रात कि बात है, और ज़िंदगी बाकी तो नहीं
तेरे बिना ज़िंदगी से कोई, शिकवा, तो नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िंदगी भी लेकिन, ज़िंदगी, तो नहीं,
ज़िंदगी नहीं

आणि ही सगळी तगमग त्याच्या हृदयापर्यंत पोहचलीय आणि आताही सारकाही तिच्या मनासारखं घडावं म्हणून तो तिला आश्वस्त करतोय.तिला दिलासा देतोय.अगतिकता समजावून घेतोय पण त्याला ही देखील जाणीव आहे की ही रात्रही आता सरत चाललीय आणि हिची सोबत देखील मग कुठे उरेल आयुष्य.......

आँधी मधील हे गाणं आपल्याला या सिनेमाची पूर्ण कथा सांगते.हळवेपणा काय असतो हे गुलजार सोडून दुसर कोण नेमकेपणाने सांगू शकेल.सबकुछ गुलजार असणारा हा सिनेमा काल पाहीला.आणि मग हे गाणं आज आणि ऐकताना पूर्ण सिनेमा डोळ्यासमोर आला.काही गोष्टी विस्तृत लिहूच नयेत.ज्याच्या त्याने समजावून घ्याव्यात.
आँधी की तरह उडकर वक्त गुजरता है.....हे बाकी खर आहे.याच भान योग्य वेळी यावं इतकंच....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेरे बिना ज़िंदगी से कोई, शिकवा, तो नहीं,
शिकवा नहीं
शिकवा नहीं, शिकवा नहीं>>>>>>> या आयुष्यात तुझ्याखेरीज माझी कसलीही तक्रार नाही.बरंच काही मिळाले/मिळवलं या आयुष्यात. पण तुझी कमतरता भासत राहिली.त्या कमतरतेमुळे आयुष्याकडून फक्त तुझीच तक्रार राहिली.तरीही वाटतं की तुझ्या खेरीज आयुष्य जगणं म्हणजे केवळ जिवंत असणं इतकेच.!

मला असा अर्थ वाटायचा.
तुझ्या शिवाय असलेल्या जिंदगीबद्दल माझी काहीच तक्रार नाही,
पण तुझ्याशिवाय जिंदगी , जिंदगीपण नाही.

छान रसग्रहण.

या आयुष्यात तुझ्याखेरीज माझी कसलीही तक्रार नाही.
>>> माफ करा - हे म्हणजे हिंदी ते मराठी ट्रान्सलेशन झाले फक्त.
भावार्थ महत्वाचा आणि मला वाटते लेखिकेने छान भावानुवाद लिहिला आहे.

छान भावानुवाद!

गाण्याच्या पहिल्या ओळीचे उलटसुलट अर्थ ऐकले आहेत.
एक म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे या आयुष्यात तुझ्याखेरीज माझी कसलीही तक्रार नाही हा एक अर्थ.
तर दुसरा अर्थ तुझ्या शिवाय असलेल्या जिंदगीबद्दल माझी काहीच तक्रार नाही.

मला स्वतःला दुसरा अर्थ जास्त भावतो (तो बरोबर आहे की नाही हा भाग वेगळा!) कारण त्यामुळे त्याच्या पुढच्या ओळीला एक वेगळीच खिन्नता येते.
म्हणजे,
तू माझ्या जीवनात नसलास तरी तुझ्यावाचून असलेल्या माझ्या जीवनाबद्दल माझी काही तक्रार नाही.
पण तुझ्यावाचूनचं जीवन हे जीवनच नाहीये!

<<<एक म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे या आयुष्यात तुझ्याखेरीज माझी कसलीही तक्रार नाही हा एक अर्थ.
तर दुसरा अर्थ तुझ्या शिवाय असलेल्या जिंदगीबद्दल माझी काहीच तक्रार नाही.>>>

लग्नाला काही वर्षे झाल्यावर नवरा बायको एकमेकांना असेच सांगतात. मग घटस्फोट घेतात.

या आयुष्यात तुझ्याखेरीज माझी कसलीही तक्रार नाही.>>>> तक्रार म्हणजे शब्दशः तक्रार नव्हे.नवराबायकोंच्या नात्यात
राहून गेलेला सल असतो.जीवन जगताना एकमेकांचे व्ह्यूज नेहेमी पटतात असंच नाही.दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबर असतात.तरीही स्वतःचा इगो म्हणा किंवा इतर काही ज्यावेळी नवरा बायको काही मुद्द्यावरून एकमेकांपासून दूर जातात, त्यावेळी हिने/ह्याने माझ्या मनासारखं ऐकलं असते तर आयुष्य वेगळंच झालं असतं असा तो सल मनात रहातो.तारुण्याच्या रगेत त्या सलाचा विसर पडतो.तरी मनाच्या एका कोपर्‍यात ती/ तो उभा असतोच.

मला वाटते लेखिकेने छान भावानुवाद लिहिला आहे.>>>>>> अगदी खरंय! राजेश्री सुरेख रसग्रहण करतात. मला जे वाटलं ते मी लिहिलं इतकेच.